जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनाचे बरेच गुणगान गायले जात असे. भारतातील व्यवस्थापनशास्त्राची पंढरी समजल्या जाणा-या आयआयएम अहमदाबाद या संस्थेत तर लालूप्रसाद यांची व्याख्याने ठेवली जात असत. या व्याख्यानांमध्ये एकाच विषयावर चर्चा केंद्रित होत असे आणि ती म्हणजे रेल्वेच्या अवाढव्य व्यवस्थापनावर. अमेरिका, चीन, रशिया या तीन देशांनंतर भारतीय रेल्वेचे जाळे सर्वात मोठे असून ते हजारो किलोमीटर अंतरापर्यंत पसरले आहे. देशाच्या कानाकोप-यातील गावे, शहरे...
  February 25, 03:33 AM
 • मुंबई महानगरपालिकेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी तीन दिवसांपूर्वी दिलेला राजीनामा बुधवारी सायंकाळी काँग्रेस हायकमांडने स्वीकारला. मात्र नेमक्या त्याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाने कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांकडील मालमत्तेवर प्रश्नचिन्हाची मोहोर उमटवली. तसेच त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा व त्यांच्याकडील मिळकतीपेक्षा अधिक मालमत्ता कुठून आली याचा तपास करण्याचा आदेश मुंबईच्या पोलिस आयुक्तांना दिला. त्यामुळे...
  February 24, 12:43 AM
 • चालू आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम एक महिना शिल्लक असताना देशातील नोकरदार मध्यमवर्गीयांसाठी दोन खुशखबरा आल्या आहेत. पाच लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या नोकरदारांना चालू आर्थिक वर्षात रिटर्न भरण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच त्यांना यापुढे रिटर्न भरण्याची सक्ती असणार नाही, परंतु त्यांना जर स्वत:हून रिटर्न भरावयाचा असेल तर ते भरू शकतात. दुसरी खुशखबर आहे पगारवाढीची! जगात मंदीची बोंब सुरू असताना आपल्याकडे सरासरी 12 टक्क्यांनी नोकरदारांचा पगार यंदा वाढेल अशी अपेक्षा आहे. पाच लाखांपर्यंत...
  February 23, 05:05 AM
 • महापालिका निवडणुकीनंतर पराभवाचे हिशेब चुकते करण्याच्या प्रयत्नात पक्षांतर्गत उफाळून आलेल्या हिंसक प्रतिक्रियेमुळे विद्वेषी राजकारणाचा भयावह चेहरा समोर येत असतानाच विद्यापीठ पातळीवरील संशोधनाची अधोगती दर्शवणारे कटू वास्तवही पुढे यावे, ही बाब समाजाचा अनेक पातळ्यांवरील आत्मविश्वास घालवणारी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महासत्तेच्या गमजा मारणा-या भारतात युरोप-अमेरिका आणि चीनच्या तुलनेत मूलभूत संशोधनाच्या बाबतीत आनंदीआनंद होता हे सर्वजण जाणून होतेच, पण एका आरटीआय...
  February 22, 05:16 AM
 • राज्यातील 10 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा बसत चालला आहे. अपेक्षेप्रमाणे यश न मिळालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे, तर शिवसेना, भाजप आणि रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची महायुती मुंबईचा गड राखता आल्यामुळे खुशीत आहे. पण ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ग्रामीण महाराष्ट्र विखुरला आहे, त्यांच्या निकालाच्या विश्लेषणाच्या भानगडीतही फारसे कोणी पडताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसची...
  February 21, 04:23 AM
 • शहरी भागातील मतदाराने काँग्रेस-राष्ट्रवादीला चार हात दूर ठेवणे पसंत केले, तर ग्रामीण मतदाराने सेना-भाजप, मनसे यांना थारा दिला नाही, हा राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ आहे. या स्थितीत मनसेला सत्तेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणा-या नाशिक महापालिकेचा निकाल सर्वाधिक लक्षवेधी असल्याचे म्हणावे लागेल. मनसे आणि भाजप एकत्रितरीत्या नाशिकमधली सत्ता हस्तगत करतील, हे आता जवळपास निश्चित असून तसे झाल्यास राज्याच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत त्यात दडले असतील....
  February 20, 01:29 AM
 • महाराष्ट्रात 2014 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते, त्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांचे निकाल आज समोर आले आहेत. बहुतांश निकाल अपेक्षेनुसार लागले असले तरी जे अनेक अनपेक्षित धक्के मतदारांनी निकालाद्वारे दिले आहेत, त्या धक्क्यांचे अन्वयार्थ लावण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप या सगळ्यांनाच पुढील दोन वर्षांत करावे लागणार आहे. जिल्हा परिषदांचे संध्याकाळपर्यंत जे निकाल हाती आले त्यात अपेक्षेनुसार...
  February 18, 02:22 AM
 • शिवसेनेने अखेरीस करून दाखवले! मुंबईची महापालिका निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि अटीतटीची होती. सेना-भाजप युतीच्या मुकुटातील मुंबई हा कोहिनूर हिरा होता. तो हिरा जोपर्यंत शिवसेनेच्या कब्जात होता, तोपर्यंत मुंबईत बसून महाराष्ट्रावर राज्य करणा-या म-हाट्यांना कमालीचे अस्वस्थ वाटत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीतील बिघाडीची लक्तरे सर्व टीव्ही वाहिन्यांवरून लोकांना रोज दिसत होतीच. शिवाय दिल्लीतही त्या लक्तरांचे प्रदर्शन भरलेले होते. फक्त आघाडीचीच नव्हे,...
  February 18, 01:25 AM
 • अमेरिका व युरोपातील विकसित देशांची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस संकटात सापडत असताना त्याचे पडसाद भारतासारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर उमटणार हे नक्की. 2008 मध्ये अशाच आलेल्या आर्थिक संकटाचा आपण यशस्वी मुकाबला केला होता. आता पुन्हा एकदा जग मंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना या परिस्थितीशी आपल्याला सामना करावा लागणार आहे. गेल्या सहा महिन्यांत आपले औद्योगिक उत्पादन झपाट्याने घसरले आहे. त्याचा परिणाम म्हणून चालू वर्षी आपला विकास दर सात टक्क्यांच्या खाली घसरण्याची भीती व्यक्त होत आहे....
  February 17, 01:01 AM
 • राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या महाभारतातील एक पर्व म्हणजे मतदानाच्या कुरुक्षेत्रावरील युद्ध आज मोठ्या त्वेषाने लढले जाईल. जगातील सा-या मानवी प्रवृत्तींचे दर्शन महाभारतात घडते तसेच चित्र या निवडणुकांच्या रणधुमाळीतही दिसले. गेल्या 7 फेब्रुवारी रोजी राज्यातल्या 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांची एकूण संख्या तीन कोटी 89 लाख 13 हजार 556 इतकी होती. त्यामध्ये पुरुष मतदार (दोन कोटी 24 लाख 84 हजार 59), महिला मतदारांची संख्या...
  February 16, 01:04 AM
 • मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात निर्माण झालेला तणाव आता जरा कमी झाला आहे. मात्र या देशांदरम्यान अद्यापही असलेले अनेक मतभेदांचे मुद्दे सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय परिणामकारक नाही हे एव्हाना सगळ्यांनाच कळून चुकले आहे. पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून आपल्याकडील अनेकांना पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची खुमखुमी येत असते. पण युद्ध जिंकल्यानंतर ताब्यात येणा-या पाकिस्तानच्या भूभागाचे आणि तेथील कोट्यवधी जनतेचे करणार काय, या प्रश्नाचे उत्तर...
  February 15, 01:01 AM
 • जिथे प्रेम आहे तिथे द्वेष कसा काय असू शकतो, असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे! कारण वरकरणी या दोन परस्परविरोधी भावना आहेत. एका भावनेत प्रसंगी दुस-या व्यक्तीसाठी स्वत:चा जीव देण्याची तयारी तर दुसरीत जीव घेण्याची. मग लव्ह टू हेट यू ही काय भानगड आहे? मनोवैज्ञानिक वास्तव असे आहे की जिथे आत्यंतिक प्रेम आहे तिथेच द्वेषही असू शकतो, किंबहुना असतो. या दोन्ही भावना परस्परविरोधी नसून एकमेकींच्या जोडीनेच वाटचाल करत असतात. एवढेच काय, प्रेम आणि द्वेष या भावना निर्माण होतात तेव्हा मेंदूत उद्दीपित होणारी...
  February 14, 04:47 AM
 • देशाचे लष्करप्रमुख विजयकुमार सिंग यांच्या वयाचा वाद अखेर सरकार आणि सिंग यांच्या सामोपचारामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीमुळे मिटला. व्ही. के. सिंग यांनी त्यांच्या निवृत्तीच्या वयावरून अनेक प्रशासकीय संकेत डावलून सरकारच्या विरोधात निष्कारण आघाडी उघडली होती आणि हा संघर्ष चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कसे अडचणीत येईल याची नेपथ्यरचना तथाकथित देशप्रेमी बुद्धिवादी मंडळींनी, लष्करातील माजी अधिकायांनी, भाजप व डाव्यांनी आखण्यास सुरुवात केली...
  February 12, 10:50 PM
 • एका आठवड्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे एकदम बदलण्याची चिन्हे आहेत. पुढच्या शुक्रवारी 17 फेब्रुवारीला राज्यातील दहा महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झालेले असतील. खरे तर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता कुणाच्या हातात जाते यावर राज्यातील राजकारणाचे भवितव्य अवलंबून असले तरीही या निवडणुकांच्या निकालामुळे तत्काळ राज्यातील सत्तेवर त्याचा परिणाम दिसून येत नाही. मात्र...
  February 11, 12:50 AM
 • सत्तेवरून हुकूमशहा गेला तरी हुकूमशाही संपतेच असे नाही. हुकूमशहाचे अनेक समर्थक सत्तेत लपून राहतात. त्यांच्या गुप्त कारवाया सुरू असतात. वेळ आली की, संधी मिळाली की हुकूमशाही सत्तेत येण्याचा प्रयत्न करते. नव्या व्यवस्थेला ती आव्हान देते. प्रसंगी रक्तपात होतो, लोकांवर रणगाडे चालवले जातात, लोकशाहीवाद्यांची धरपकड केली जाते. आपल्या जवळच्या आणि हिंदी महासागरातील सुमारे 1200 हून अधिक बेटांचा समूह असलेल्या मालदीवमध्ये अशीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. या घटनेमुळे हिंदी महासागरातील राजकीय...
  February 10, 12:58 AM
 • कामात दिरंगाई करत असलेल्या उच्चपदस्थ आयएएस, आयपीएस अधिका-यांना धडा शिकवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील व त्यांच्या सेवेला 15 वर्षे पूर्ण झाली असतील, अशा अधिका-यांच्या कामाचे मूल्यमापन करून ते दोषी आढळल्यास त्यांना नोकरीवरून सरळ बडतर्फ करण्याचा सरकारचा विचार आहे. आतापर्यंत नोकरीत 30 वर्षे झाल्यानंतर सरकारी बाबूंना सक्तीने निवृत्त करता येत होते. सरकारने या नव्या नियमात आयएएस, आयपीएस या श्रेणींच्या अधिका-यांबरोबरच इंडियन फॉरेस्ट...
  February 9, 01:05 AM
 • कोणताही देश किंवा राज्य केवळ नैतिकतेच्या बळावर चालत नसते. भारतासारख्या गुंतागुंतीची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक रचना असलेल्या देशाला तर नैतिकता आणि लोकशाही चौकट असलेल्या राजकीय व्यवस्थेबरोबरच, किंबहुना त्याहून अधिक कायद्यांची नितांत आवश्यकता असते. म्हणजेच नैतिकतेपेक्षाही अनेकदा कठोर कायद्यांमध्येच देशाची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्याची क्षमता दडलेली असते. परंतु सर्वसामान्य माणसांना कायदा आणि त्यातली गुंतागुंत सहजी कळणारी नसते. अशा वेळी जनतेमधील कायदेविषयक अज्ञानाचा गैरफायदा...
  February 7, 11:34 PM
 • जागतिक पातळीवर वाहत असलेले मंदीचे वारे आणि त्याचे आपल्या देशावर होणारे संभाव्य परिणाम, या पार्श्वभूमीवर आणखी महिनाभराने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी अर्थसंकल्प सादर करतील. विविध राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे यंदा प्रणवदा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी मार्चच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचे पडघम मात्र आता वाजण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच अर्थमंत्र्यांना भेटून आपल्या...
  February 7, 12:33 AM
 • जागतिक क्रिकेटमधील अग्रक्रम गमावल्यानंतर बसला नसेल एवढा धक्का सहारा परिवाराने आपला पाठिंबा काढून टीम बीसीसीआयला दिला आहे. तब्बल 11 वर्षांची भागीदारी तुटली. सहाराच्या निर्णयामुळे बेसहारा कोण झाले? भारतीय क्रिकेट बोर्ड, टीम इंडिया की स्वत: सहारा परिवार? भारतात एवढ्यात विश्वचषक स्पर्धा होणार नाही. सचिनच्या शंभराव्या शतकानंतरही क्रिकेट या खेळाची भारतातील लोकप्रियता एवढी वाढणार नाही की ज्यामुळे पाठिंबा काढून घेतल्याचा सहारा परिवाराला पश्चात्ताप होईल. सहारा परिवार प्रमुखांनीच आपला...
  February 6, 05:09 AM
 • दोन हजारांहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असलेली मराठी भाषा ही भविष्यात जगेल की मरेल या विषयावर जंगी चर्चा सर्वत्र सुरू असतात. त्यासाठी मराठी दिन वगैरे पाळण्याचे उपचारही पार पाडले जातात. एखाद्या भाषेच्या नशिबी ही अशी हलाखीची स्थिती का आली असावी याचा जितक्या गांभीर्याने विचार व्हायला हवा तितका तो होताना दिसत नाही. मराठी समाज हा मुळातच आत्मसंतुष्ट प्रवृत्तीचा आहे. स्वत:ची भाषा, स्वत:ची ओळख याविषयी कमालीचा न्यूनगंड असलेला असा भाषकसमूह दुसरीकडे कुठेही नसावा. आपले क्षितिज व्यापक असावे व...
  February 4, 03:48 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात