जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • राजकारणात कुणाचे दिवस कधी कसे फिरतील, काहीही सांगता येत नाही. ज्या गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणत संघ परिवारातील विविध संघटनांनी येथे एका हातात भगवा ध्वज व दुसर्या हातात तलवार घेऊन हिंदू विरुद्ध मुस्लिम असे मतांचे ध्रुवीकरण केले, त्याच गुजरातमध्ये संघ परिवारात वाढलेले हिंदू नेते आता हिंदुत्वाचे मेरुमणी म्हणवणार्या नरेंद्रभाईंवरच चाल करून येण्याची जय्यत तयारी करत आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या हातातून सत्ता खेचून घेऊन 10 वर्षांपूर्वी ती संघ...
  July 6, 12:24 AM
 • या विश्वाचा आकार केवढा हा प्रश्न केशवसुतांना पडला तेव्हा, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, आइन्स्टाइनचा सिद्धांत मांडलाही गेला नव्हता! फक्त आकाराचा प्रश्न नव्हता, तर विश्वनिर्मितीचेच गूढ सर्व वैज्ञानिकांना झपाटून टाकत होते. केशवसुत वैज्ञानिक नव्हते-त्यांचा तर आधुनिक विज्ञानाचा शास्त्रशुद्ध अभ्यासही नव्हता. पण असे म्हणतात की जे कवीला दिसू शकते ते रवीला, म्हणजे सूर्यालाही दिसू शकत नाही! म्हणून केशवसुतांनी विश्वाचा आकार केवढा या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!...
  July 5, 12:12 AM
 • वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संत तुकाराम यांच्या अभंगाचा ऊठसूट दाखला देणा-या सरकारी यंत्रणेचे (त्यातील काही अपवाद वगळता) पर्यावरण जतनासंदर्भातील प्रेम किती बेगडी आहे हे पश्चिम घाटाच्या उदाहरणावरून स्पष्टपणे दिसून आले आहे. जैववैविध्याने नटलेल्या व हिमालयापेक्षाही जुने जंगल असलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशीलअसलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यांतील 39 ठिकाणांचा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आयसीयूएन) या...
  July 3, 11:19 PM
 • तमाम विश्वाला आकर्षित करून घेणारा युरो कप रविवारी संपला. स्पेनने विश्वविजेतेपदापाठोपाठ सलग दुस-यांदा युरो कपवर आपले नाव कोरले. लॅटिन अमेरिका आणि काही अंशी आफ्रिकन फुटबॉल वगळता जगातील फुटबॉलचे वर्चस्व युरोप खंडातच एकवटलेले आहे. त्यामुळे युरो कपला मिनी विश्वचषक फुटबॉल म्हणण्यापेक्षाही पर्यायी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा म्हणणेच योग्य ठरेल. आज अमेरिका आपल्या बेसबॉल या खेळाला वर्ल्ड सिरीज संबोधते. अमेरिकन फुटबॉलचा एवढा बाऊ केला जातो की सुपर बॉल नावाने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न...
  July 2, 11:41 PM
 • ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राजकारणाबाहेरचे सद्गृहस्थ आहेत, हा समज आता दूर व्हायला हरकत नाही. म्हणजे ते सद्गृहस्थच आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत, त्यांच्यावर भ्रष्टाचार वा अन्य कोणताही आरोप नाही आणि ते क्षेपणास्त्रतज्ज्ञ आहेत, हे सर्व खरे आहे. पण ते तसे राजकारणाबाहेरचे आहेत, हे विधान मात्र तितकेसे खरे नाही. आपल्याकडे राजकारण या शब्दाचा अर्थ फ ार चुकीने आणि गैरसमजाने घेतला जातो. गेल्या काही वर्षांत तर राजकारणी म्हणजे भ्रष्ट, कारस्थानी, कपटी, निगरगट्ट, सत्तापिपासू वगैरे वगैरे...
  July 1, 10:18 PM
 • स्वत:ला सभ्य नि सुसंस्कृत म्हणवणा-या, उठता-बसता संस्कृती-परंपरांचे दाखले देणा-या आत्ममग्न समाजगटाला चपराक देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. लाफ्टर क्लबच्या उपक्रमाचा आपणास मनस्ताप सहन करावा लागत असून या क्लबच्या सदस्यांना आपल्या घरासमोर हा उपक्रम राबवण्यास मनाई करावी, अशा आशयाची याचिका मुंबईतील कुर्ला उपनगरातील एका कुटुंबाने दाखल केली होती. त्या याचिकेवर मत नोंदवताना न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने, हसणे हा गुन्हा नाही, पण...
  June 30, 04:20 AM
 • पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा अर्थमंत्रिपदाची वस्त्रे परिधान केली आहेत. डॉ. सिंग यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला तेच मुळी अर्थमंत्री म्हणून. पंतप्रधान नरसिंह राव यांनी बरोबर 21 वर्षांपूर्वी अनपेक्षितपणे डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून निवड केली. खरे म्हणजे खुद्द राव हेच पूर्णत: अनपेक्षितपणे पंतप्रधान झाले होते. राजीव गांधींची हत्या झाल्यामुळे विसकटलेल्या निवडणुकीच्या वेळापत्रकाने देशाचे राजकारणही अस्वस्थ केलेले होते. त्या विषण्ण अस्वस्थतेला अरिष्टग्रस्त...
  June 29, 04:45 AM
 • जून महिना संपत आला तरी मान्सूनने महाराष्ट्रात लय धरलेली नाही. मराठवाडा, उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रातील बहुसंख्य तालुक्यांमधील गवतही अजून हिरवे झालेले नाही. त्यामुळे पेरणीचे कामही सुरू झालेले नाही. हवामान खात्याचे अंदाज नेहमीप्रमाणे हवेतच विरून जात आहेत आणि कोकण, विदर्भ वगळता राज्यावर शुभ्र पांढरे ढग संचार करत आहेत. उन्हाळ्यात देशाच्या मुख्य हवामान कार्यालयाकडून 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला गेला. आता तो 96 टक्क्यांपर्यंत आला आहे आणि कदाचित जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुधारित अंदाज...
  June 28, 03:29 AM
 • प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीचा राजीनामा दिला, तेव्हा सोनिया गांधी यांच्यासह सर्वच जण गहिवरून आल्याचे टीव्हीवरील दृश्य बातम्यांमध्ये स्पष्ट दिसत होते. ज्यांना राजकारणी व्यक्ती ही भावनाशून्यच असते असे वाटते, त्यांनाही ती दृश्ये पाहून किमान आश्चर्य वाटले असणार. नितळ भावनांचा आणि सत्ता वा राजकारणाच्या पलीकडच्या नातेसंबंधांमधील स्नेहाचा तो आविष्कार होता. वस्तुत: प्रणवदा राष्ट्रपती होणार आहेत (हे राजकीय गणित पाहता उघड आहे) आणि त्यामुळे ते सत्तेच्या राजकारणातच...
  June 27, 06:30 AM
 • फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीतील घडामोडींवरून क्रांती आपल्या पिल्लांनाही खाते असे म्हणण्याची प्रथा रूढ झाली. अर्थात हे विधान म्हणजे काही ब्रह्मवाक्य नव्हे. प्रत्येक देशातील क्रांतीची कल्पना ही काळ व व्यक्तिसापेक्ष असते. इजिप्तमध्ये झालेल्या निवडणुकीत मुस्लिम ब्रदरहुड या संघटनेचे नेते मोहंमद मोर्सी हे होस्नी मुबारक पंथातील प्रतिस्पर्धी उमेदवार अहमद शफिक यांच्यावर मात करून तसेच तब्बल 51.73 टक्के मते मिळवून त्या देशाच्या अध्यक्षपदी निवडून आले व त्यांचे जनतेने मोठ्या संख्येने कैरोतील...
  June 26, 06:39 AM
 • गेली अनेक दशके हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या म्यानमारमध्ये लोकशाही राजवट प्रस्थापित व्हावी म्हणून तेथे पुकारलेल्या लढ्यातील अग्निशिखा आँग सान स्यू की यांनी आजवर केलेला संघर्ष व सहन केलेल्या हालअपेष्टा यांना तोड नाही. या गंभीर गुन्ह्यासाठी म्यानमारमधील हुकूमशहांनी त्यांना 20 जुलै 1989 रोजी नजरकैदेत डांबले होते, मात्र जागतिक दडपण वाढू लागल्यानंतर त्यांची तब्बल 21 वर्षांनी म्हणजे 13 नोव्हेंबर 2010 रोजी नजरकैदेतून सुटका केली. आता कोणतेही निर्बंध नसलेल्या आँग सान स्यू की सध्या...
  June 25, 07:01 AM
 • मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे एक बाब सहजच सिद्ध झाली आहे. गेली सुमारे 15-20 वर्षे युती असो वा आघाडी, कुणीच राज्याकडे आणि प्रशासनाचे कंठस्थळ मानल्या गेलेल्या मंत्रालयाकडे लक्ष दिलेले नाही. आग विझवली गेल्यानंतर चौकशी होईल, तिचा अहवाल प्रसिद्ध होईल, त्यावर चर्चा होईल, निष्कर्षांवर टीका होईल आणि पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होईल. राज्यकर्ती आघाडी आणि नोकरशाही इतके निगरगट्ट झाली आहे की सामान्य माणूस त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले जीवन स्वत:च्या कुवतीनुसार व वकुबानुसार जगत असतो...
  June 22, 10:54 PM
 • भारतीय जनता पार्टीला अखेर राष्ट्रपतिपदाचा उमेदवार सापडला. सापडला म्हणण्यापेक्षा या निवडणुकीच्या रिंगणात पूर्णो संगमा हे आधीपासून घोड्यावर बसून तयारच होते. मात्र, मध्येच ममतादीदींनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव सुचवल्यामुळे, हे वर्ष 2012 नसून 2014 आहे व देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आला असून त्यात भाजपला 300 पेक्षा अधिक जागा आल्या आहेत, असे दिवास्वप्न पाहणा-या यच्चयावत भाजप नेत्या-कार्यकर्त्यांना आता यूपीएची शकले होणार या विचाराने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या...
  June 21, 10:32 PM
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी आवर्जून सांगत असतो की, त्यांची संघटना राजकारणाच्या बाहेर आहे. प्रत्यक्षात सगळ्या जगाला माहीत आहे की, संघ ही एक छुपी (पण लपून न राहिलेली) राजकीय संघटना आहे. आपण राष्ट्रीय आहोत, पण राजकीय नाही, असे ते सांगतात. संघाला सांस्कृतिक राष्ट्रवाद अभिप्रेत आहे, म्हणूनच हिंदू महासभा नावाचा पक्ष अस्तित्वात असताना हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हिंदू महासभेची स्थापना 1915 सालची. संघ 1925मध्ये स्थापन झाला. हिंदू महासभा स्थापन झाली तेव्हा स्वा. सावरकर...
  June 20, 10:24 PM
 • ऑलिम्पिकच्या टेनिस हिरवळीवर सामना रंगण्याआधीच भारतीय टेनिसपटूंची वेगळ्याच कोर्टवरील लढाई सुरू झाली आहे. लिअँडर पेस आणि महेश भूपती ही जागतिक टेनिस क्रमवारीत एकेकाळी कायम अव्वल क्रमांकावर असणारी जोडी. त्यांचे टेनिसमधील वर्चस्व अटलांटा ऑलिम्पिकमधील दुहेरीच्या कांस्यपदकाशिवाय कधीच पदकांमध्ये परावर्तित झाले नाही. प्रत्येक ऑलिम्पिकआधी दोघांमधील भांडणे विकोपाला गेलेली असतात. या वेळी अगदी तसेच घडत आहे. दोघांनाही आपले वाढते वय, मंद झालेल्या हालचाली यांची जाणीव झाली आहे. त्यामुळे...
  June 19, 10:19 PM
 • ऑलिम्पिक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात असलेली इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा सायना नेहवालने रविवारी जिंकली. त्याआधी बँकॉक स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावले होते. स्पर्धांच्या विजेतेपदापेक्षाही तिने ज्या परिस्थितीत आणि ज्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून स्पर्धा जिंकली, ते पाहता भारताला बॅडमिंटनमधील ऑलिम्पिक पदकाचे निश्चितच स्वप्न पडायला हवे. कारण इंडोनेशियन स्पर्धा जिंकताना सायनाने तब्बल तीन चिनी अव्वल खेळांडूना नमवले, तर एका कोरियन आणि थायलंडच्या अग्रगण्य खेळाडूला पराभूत...
  June 18, 11:07 PM
 • जर्मन तत्त्वज्ञानात ज्याला वेल्टआनशाऊंग म्हणतात, म्हणजेच जगाकडे पाहण्याचा सम्यक दृष्टिकोन नावाचा जो प्रकार असतो तो जर एखाद्याच्या ठायी नसेल तर हिमालयाइतके कर्तृत्व असले तरी त्याची किंमत शून्य होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत नेमके हेच झाले आहे. निम्न मध्यमवर्गात जन्म घेऊनही त्यांनी स्वत:चे नेतृत्व तेव्हाच्या काँग्रेस पक्षाला व पक्षाबाहेर कम्युनिस्टांच्या मजबूत तटबंदीला धडका देत सिद्ध केले होते. त्यांच्या तापट व प्रसंगी अतिरेकी स्वभावाकडे...
  June 18, 02:48 AM
 • कॉँग्रेसने प्रणव मुखर्जी यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर देशाच्या राजकारणातील समीकरणे बदलायला सुरुवात होणार आहे. कदाचित ममता बॅनर्जींनी केलेला बेबंद उतावीळपणा हा प्रत्यक्षात कॉँग्रेसच्या पथ्यावरच पडला आहे. कॉँग्रेस आणि यूपीए या दोघांनी ममता बॅनर्जींचे आव्हान स्वीकारून आघाडीला पडलेली खिंडारे बुजवायला सुरुवात केली आहे. असे असले तरी 2014 मध्ये पंतप्रधान कोण होणार, या प्रश्नाचे उत्तर निवडून येणारा राष्ट्रपती आता देऊ शकणार नाही. म्हणूनच आतापासूनच बिहारचे...
  June 16, 12:39 AM
 • दरवर्षी जून महिना उजाडला की दहावी-बारावीचे निकाल कधी लागणार याची टांगती तलवार विद्यार्थी व पालकांवर असते. यंदा मात्र राज्यातील दहावी व बारावीच्या नऊ विभागीय शिक्षण मंडळांचे निकाल वेळेत जाहीर केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करावयास हवे. त्याचबरोबर सरकारने कॉपीला आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या त्यालाही ब-यापैकी यश आले आहे. तसेच यंदाच्या परीक्षा पेपरफुटीपासून मुक्त राहिल्या. एकूणच निकालाची टक्केवारीही वाढली. दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक...
  June 15, 12:33 AM
 • एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती चढ-उतार यावेत, यालाही काही मर्यादा असतात. सुख-दु:खाचा फेरा प्रत्येकालाच अनुभवावा लागतो; पण कधी कधी असा प्रश्न पडतो की, दु:ख एखाद्या आणि तेसुद्धा गुणी माणसाचा पिच्छा का पुरवत असेल? गझल गायनाचा नवा अध्याय लिहिणा-या मेहदी हसन यांच्यासारख्या प्रतिभाशाली माणसाची होरपळ व्हावी, यासारखे दुर्दैव नाही. या गायकाने रसिकांना भरभरून दिले; पण जेव्हा तो अडचणीत सापडला, तेव्हा त्याच्या वाट्याला फक्त उपेक्षाच आली. त्यांच्या वाट्याला कधी दु:ख येईल असे त्यांच्या गायक...
  June 14, 12:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात