जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • गणितांमधील समीकरणांना तर्कशास्त्रीय पाया असतो; परंतु राजकारणातील समीकरणांना गणितीय तर्कशास्त्र लावता येत नाही. निदान तेवढ्यापुरते तरी राजकारण हे गणितापेक्षा अधिक प्रगत, अधिक तरल आणि अधिक अॅब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त आहे असे म्हणावे लागेल. गेल्या 25 वर्षांत या समीकरणांचे हे अ-तार्किक गूढ अधिक गडद होत गेले आहे. एखादे गूढ उकलते आहे असे वाटत असतानाच ते अधिक गडद होते आणि तर्काने विचार करणारा दिङमूढ होतो. काहींच्या मते, म्हणूनच राजकारण हे अविश्वसनीय असते आणि राजकारणी विश्वासाला पात्र नसतात!...
  May 23, 11:46 PM
 • राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचा राजीनामा न स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चर्चेचा एक विषय तात्पुरता थोपवला आहे. जळगावच्या तत्कालीन नगरपालिकेने 1997 मध्ये सुरू केलेल्या घरकुल योजनेतील कथित घोटाळ्यात देवकर एक आरोपी आहेत. याच प्रकरणात सोमवारी त्यांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई होण्याआधी देवकरांचे राजीनामापत्र पक्षश्रेष्ठींच्या हातात होते. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असता तर राजीनामा स्वीकारायचा, अशी भूमिका पक्षाने घेतली होती. ती वेळ त्यांच्यावर आली नाही....
  May 22, 11:37 PM
 • जगाच्या आर्थिक उलाढालीची केंद्रे असलेल्या सिंगापूर ते सिलिकॉन व्हॅली या पट्ट्यामध्ये मे महिन्यात फेसबुक आपला पहिला आयपीओ घेऊन येणार असल्याने आर्थिक वादळ निर्माण होईल अशी वैश्विक अपेक्षा होती. या वादळातून मंदावलेल्या जगाची आर्थिक चक्रे जोमाने फिरतील किंवा नवे वंगण भरल्याने न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये नवा आत्मविश्वास येईल असेही वाटले होते. तसा आत्मविश्वास आणण्यास फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यशस्वी झाला का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. ही चर्चा होणे साहजिकच होते. कारण...
  May 22, 12:14 AM
 • युवकांनी आपल्या सुरक्षित घरट्याबाहेर पडावे, आव्हाने पेलावीत व आपले ध्येय साध्य करावे. युवकांनी हे सारे करावे याची प्रेरणा देण्यासाठीच जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट हिमालय पर्वतराजीत ठामपणे उभे आहे. हे प्रतिपादन केले आहे जगविख्यात गिर्यारोहक नील बिडलमन याने...निधड्या छातीने आव्हान पेलण्याची आकांक्षा असलेल्या कोणत्याही धाडसी वीराला एव्हरेस्ट कायम साद घालत असते. पुण्याच्या गिरिप्रेमी व पिंपरीच्या सागरमाथा या संस्थेच्या मराठमोळ्या गिर्यारोहकांनी शनिवारी सकाळी एव्हरेस्टचा माथा...
  May 20, 11:44 PM
 • शरद पवार हे भारतातील काही थोड्याच दैववादी नसलेल्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. राजकारणातील अस्थिरतेचा सामना ते स्वत:च्या मुत्सद्दीपणाच्या, बुद्धिप्रामाण्याच्या आणि संयमाच्या आधारावर करीत असतात. बहुतांश राजकीय नेत्यांप्रमाणे ग्रहदशा वाईट असल्याचे समजून हाता-पायांच्या वीसही बोटांमध्ये इस्टमन कलर अंगठ्या, गळ्यात सोने अथवा प्लॅटिनम धातूंनी बनवलेल्या साखळ्यांमध्ये ग्रहशांती यंत्रे वगैरे घालण्याचे प्रकार पवार कधीच करीत नाहीत. मात्र सध्या देशपातळीवर घडणा-या घटनांमुळे शरद पवार...
  May 18, 11:22 PM
 • ग्रीक तत्त्वज्ञान हे महान असले तरी त्यात भारतीय परंपरेत सांगितलेल्या अर्थस्य पुरुषो दास: म्हणजे माणूस हा पैशाचा दास असतो हे तत्त्व बहुधा सांगितलेले दिसत नाही. खासगी संपत्ती व नफ्याची प्रेरणा हे भांडवलशाहीचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी समाजवादी, साम्यवादी राजवटींमध्येही या प्रेरणा मारून टाकणे शक्य झाले नव्हते हे विसाव्या शतकातील इतिहासावरून सिद्ध झाले आहे. ग्रीसमध्ये सध्या जे राजकीय व आर्थिक अराजक माजलेले आहे त्याचा थेट परिणाम युरोझोन व युरो या चलनावर होत आहे. ग्रीसमध्ये गेल्या...
  May 18, 12:19 AM
 • क्रिकेटमधील भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी आता पूर्वीसारखे धक्के बसत नाहीत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे भ्रष्टाचार आणि क्रिकेटपटूंची अनैतिक कर्तृत्वे हे नित्यनियमाचे झाले आहे. क्रिकेटच्या कार्पेटखाली कितीतरी रहस्ये दडली आहेत. त्यातील एखादे गुपित बाहेर पडताक्षणी तात्पुरता गहजब निर्माण होतो. बळीचे बकरे शोधले जातात. पुन्हा क्रिकेटचे क्षेत्र शुचिर्भूत झाल्याची आवई उठते. क्रिकेट रसिकांच्या डोळ्यात फेकलेली ती धूळ होती, हे सिद्धही होते. कालांतराने दुसरे प्रकरण बाहेर पडते. पुन्हा एकदा...
  May 17, 04:40 AM
 • केबल डिजिटायझेशन सिस्टिम लागू करण्यापूर्वी काही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात एका घरात एक नव्हे तर दोन-दोन टीव्ही संच असल्याचे समोर आले आहे. म्हटले तर हे भारतीय जीवनशैलीचे बदलते रूपच. 1960 च्या दशकात हंस नावाच्या त्या वेळच्या प्रतिष्ठित मासिकात अमेरिकी जीवनशैलीची अत्यंत चवीने चर्चा रंगत असे. प्रत्येक अमेरिकी घरात एक नव्हे तर दोन-दोन टीव्ही संच, प्रत्येकाकडे टेलिफोन, भला मोठा फ्रिज, कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतंत्र गाडी, सुस्थापितच नव्हे तर कामगार वर्गाकडेही घर, गाडी आणि...
  May 16, 05:35 AM
 • ऐन सुटीच्या हंगामात एअर इंडियाच्या वैमानिकांनी एकसाथ आजारपणाची रजा घेऊन प्रवासी व पर्यटकांचे हाल केले आहेतच, शिवाय ते ज्या सरकारी कंपनीत नोकरीत आहेत त्या कंपनीलाही त्यांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. ज्याप्रमाणे मुंबईत चाकरमानी सकाळी कामावर येण्याच्या गडबडीत असतो वा संध्याकाळी घरी जाण्याच्या घाईत असतो, त्या वेळी लोकलचे मोटरमन आपला संप पुकारतात किंवा मुलांच्या परीक्षांच्या काळात मुंबईच्या रिक्षावाल्यांना संप करण्याची खुमखुमी येते, त्याच बिनदिक्कतपणे सरासरी सात-आठ...
  May 15, 01:07 AM
 • भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध जिव्हाळ्याचे आणि तिरस्काराचेही आहेत. तुझे माझे जमेना आणि तुझ्याविना करमेना अशीच परिस्थिती उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट रसिकांची सध्या झाली आहे. एकीकडे राजकारण्यांनी उभय देशांच्या क्रिकेट संबंधांना आडकाठी आणली असतानाच दुसरीकडे दोन्ही देशांच्या क्रिकेटपटूंवर एकमेकांचे क्रिकेट चाहते निस्सीम प्रेम करीत आहेत. भारतीय म्हणून पाकिस्तानात सचिन तेंडुलकरचा कुणीही तिरस्कार करीत नाही. त्याच वेळी पाकिस्तानच्या मर्दानी क्रिकेट खेळावर भारतीय क्रिकेट...
  May 14, 05:14 AM
 • आधार वाटण्याऐवजी समाज नावाच्या समूहाची दहशतच मोठी. समाज काय म्हणेल, या भीतीपोटी सावध पावले उचलणा-यांची (खरे तर माघार घेणा-यांची) संख्याही येथे खूप मोठी. कोण बरोबर कोण चूक, काय योग्य काय अयोग्य, कोण प्रामाणिक कोण लबाड हे सगळे ठरवण्याचा अधिकारही या समाज नावाच्या समूहाने प्रारंभापासून स्वत:कडे राखलेला. म्हणजे घटनेने जरी न्यायालयांना न्यायदानासंदर्भातले सर्वाधिकार दिले असले तरीही हा समाज नावाचा समूह (यात अर्थातच अलीकडच्या काळातील मीडियारूपी व्यवस्थेचा सहभाग सर्वात मोठा) करेल तो फैसला...
  May 12, 12:04 AM
 • उशिरा का होईना, सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना काही खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया आणि जनरल सेक्रेटरी राहुल, दोघांनी दीर्घकाळ जी मुग्धता पाळली होती, त्यामुळे पक्षात काहीसे आश्चर्याचे, गोंधळाचे आणि अस्वस्थतेचेही वातावरण पसरले होते. दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश व इतर राज्यांत, तसेच मुंबई व दिल्ली महानगरपालिकांमध्ये काँग्रेसला जो दारुण पराभव पत्करावा लागला, त्या पार्श्वभूमीवर पक्षाची निवडणूक जिंकण्याची क्षमताच संपत आली आहे, असे चित्र निर्माण झाले. राहुल...
  May 10, 11:43 PM
 • अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची नुकतीच झालेली भारतभेट ही इराणची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा अमेरिकेचा एक मोठा डिप्लोमॅटिक प्रयत्न होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एफडीआयच्या बाजूने मन वळवण्यासाठी हिलरी क्लिंटन या भारतात आल्या होत्या, असे चित्र आपल्याकडील मीडियाने तयार केले होते. पण या भेटीचा मूळ उद्देश भारताने इराणकडून तेलआयात कमी करावी किंवा ती संपूर्ण बंद करावी हा होता हे मीडियाला उशिरा कळले. इराणच्या गुप्त अणुकार्यक्रमामुळे अमेरिका...
  May 9, 11:22 PM
 • केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर लादलेले एक टक्का उत्पादन शुल्क अखेर मागे घेण्याची घोषणा अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांना करावी लागली आहे. सोन्यावरील हा कर लादल्यापासून देशातील सराफांनी याला विरोध केला होता आणि या निषेधार्थ 21 दिवस संप पुकारून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या. अखेरीस सोन्या-चांदी व्यापार्यांच्या एकजुटीचा विजय झाला आणि सुवर्णमृग आता पुन्हा एकदा भरधाव होण्यासाठी मोकळा झाला आहे. अर्थसंकल्पात करवाढीची घोषणा होताच सराफांनी संपाचे...
  May 9, 02:18 AM
 • फ्रान्समधील सत्तापालट तसा अपेक्षितच होता. निकोलस सर्कोझी हे प्रस्थापित अध्यक्ष धोरण व मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांच्या खुशालचेंडू उडाणटप्पूपणासाठी प्रसिद्ध होते. त्यात भर पडली होती त्यांच्या अरेरावी आणि वर्णद्वेष्ट्या वृत्तीची. अध्यक्ष म्हणून 2007 मध्ये निवडून आल्यानंतर सर्कोझींनी रिफॉर्मच्या नावाखाली बेभान मार्केटशाही सुरू केली. त्या नवसुधारणावादी आर्थिक धोरणाचा एक पैलू म्हणजे नफेबाजीला अवास्तव उत्तेजन आणि कामगार-मध्यमवर्गावर, म्हणजे त्यांच्या वेतन व जीवनशैलीवर आघात. सर्कोझी...
  May 7, 11:09 PM
 • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये महाराष्ट्रातील 80 उमेदवारांनी पटकावलेले यश मराठी प्रसारमाध्यमांमध्ये नकारात्मक पद्धतीने मांडले गेलेले आहे. वास्तविक अखिल भारतीय स्तरावरच्या परीक्षांमध्ये कोणत्याही राज्याचा ठसा असणे किंवा त्या राज्यांतील बहुतेक उमेदवारांचे नाव अंतिम यादीत असणे हा या परीक्षांकडे बघण्याचा निखळ दृष्टिकोन असू शकत नाही. त्याची कारणे जेवढी आर्थिक आहेत तेवढीच सामाजिकही आहेत. अगदी महाराष्ट्राचा विचार केल्यास गेल्या 20 वर्षांमध्ये...
  May 6, 09:28 PM
 • आणखी दोन वर्षांनी होणारी लोकसभा निवडणूक सर्वार्थांनी ऐतिहासिक होणार, असे मानले जात आहे. राजकीय भूकंप होईल, कुणीतरी धूमकेतूसारखे आकस्मिकपणे अवतरेल वा एखाद्या महा-अराजकाला सुरुवात होईल, अशी भाकिते केली जात आहेत. बहुतेक लोक, पत्रकार, राजकारणी आणि पंडित मंडळी मात्र काँग्रेस वा भाजप किंवा त्यांच्या पुढाकाराने उभ्या होणा-या आघाड्या, डाव्यांची तिसरी वा शरद पवारांची चौथी आघाडी, अशा समीकरणांचीच चर्चा करत असतात. काही महिन्यांपूर्वी मीडियात नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच अटीतटीची...
  May 4, 11:55 PM
 • एकेका सामन्यासाठी कोट्यवधी रुपये कमावणारा सचिन तेंडुलकर, एकेका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेणारी माधुरी दीक्षित, एकेका मराठी चित्रपटातून लाखो रुपयांचा नफा मिळवणारा महेश मांजरेकर आणि शासनाच्या प्रत्येक सांस्कृतिक योजनेवर व्यवस्थित हात मारणारा नितीन चंद्रकांत देसाई यांना आपण देशसेवा करणारे मान्यवर म्हणून अजून किती काळ डोक्यावर घेऊन नाचणार? या देशाची सेवा कोण करतंय? या देशासाठी कोण झटतंय? या देशाची संस्कृती कोण टिकवतंय...? हे सेलिब्रिटी की दुष्काळासारख्या भीषण...
  May 3, 11:39 PM
 • कल्पना करा, के. एल. सैगलचा दर्दभरा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता, लता मंगेशकर-नूरजहाँ-महंमद रफी यांच्या नादमय स्वराने आणि खेमचंद प्रकाशपासून सी. रामचंद्र-आर.डी. बर्मन ते आजच्या ए. आर. रहमान यांच्यापर्यंतच्या संगीत जादूगारांनी रचलेल्या रचनांनी आपल्याला वेडावून टाकले नसते, दिलीपकुमार-बलराज साहनी यांच्या बावनकशी अभिनयाचे आपल्याला दर्शनच घडले नसते, बिमल रॉय, के. आसिफ, महबूब खान, व्ही. शांताराम, सत्यजित रे, अदूर गोपालकृष्णन या प्रतिभावंतांनी वास्तवाचे भावस्पर्शी दर्शनच घडवले नसते,...
  May 3, 12:09 AM
 • पांढरपेशा शहरी मंडळींच्या दृष्टीने मे महिना म्हटला की सुटी, पर्यटन, आंबे, आइस्क्रीम अन् एकुणातच धमाल, मौजमस्ती.. असा माहोल असतो. परंतु बाकीच्या बहुसंख्य वर्गासाठी मे महिना पाण्यासाठी भटकंती, रखरखाट आणि उकाडाच घेऊन येत असतो. यंदाचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. राज्याच्या अनेक भागांवर सध्या दुष्काळाचा फेरा आला असताना उत्तर महाराष्ट्रात तर त्याच्या झळा तापत्या उन्हाएवढ्याच तीव्रतेने जाणवत आहेत. मात्र अन्य ठिकाणच्या तुलनेत येथला आवाज फारच क्षीण आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्न,...
  May 1, 11:45 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात