Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • योगगुरू बाबा रामदेव यांचा गेले ९ दिवस सुरू असलेला देशातील एक मोठा रिअॅलिटी मॅडनेस शो काही ठोस निर्णय न होताच अखेर संपला. बाबांनी हे उपोषण मागे घेतले असले तरी भ्रष्टाचारविरोधातील त्यांची लढाई सुरूच राहील, अशी बाष्कळ बडबड त्यांचे निकटचे अनुयायी बालकृष्ण यांनी जाता-जाता केली. त्यातच श्री श्री रविशंकर, मोरारी बापू, कृपालू महाराज आणि इतर आध्यात्मिक नेत्यांच्या आग्रहामुळे बाबांनी हे उपोषण मागे घेत असल्याचे सांगून अनेकांना बुचकळ्यात पाडले. उपोषण मागे घ्यावे, अशी महत्त्वाची सूचना राष्ट्रीय...
  June 13, 01:25 PM
 • भांडवलशाही व्यवस्था आभास निर्माण करते असे म्हणतात. त्या अर्थाने आठवले आणि पवार दोघेही प्रस्थापितांचेच प्रतिनिधी आहेत.गेल्या दोन दिवसात सेना-भाजप अधिक रिपाइं यांचा महायुती मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्ताने झालेली सामाजिक परिवर्तन हक्क परिषद ही मुंबईत झालेली दोन शक्तिप्रदर्शने या शहराच्या इतिहासाला साजेशी आहेत. परंतु त्यात सामाजिक परिवर्तन किती आणि त्याचा आभास किती हे लोक प्रत्यक्षात अनुभवीत आहेतच. रामदास आठवले हे धर्मांध शक्तींच्या विरोधात लढणारे...
  June 11, 12:56 AM
 • शृंगाराचे प्रतीक बनलेली स्त्री आणि वेग-ऊर्जेचे प्रतीक असलेला अश्व यांच्या एकत्रित परिणामातून साधलेला हुसेन इफेक्ट भल्या-भल्यांना भुरळ पाडायचा.ज्या लंडन शहराने वैश्विक प्रवाहांना जन्माला घालणा-या विविध विचारप्रवृत्ती आणि प्रतिभांना उदार मनाने आश्रय दिला, ज्या लंडन शहराने चार्ल्स डार्विनपासून कार्ल मार्क्सपर्यंत आणि आल्फ्रेड हिचकॉकपासून अॅना एरीपर्यंतच्या जगावर छाप सोडणा-या प्रतिभावंतांचा प्रेमाने सांभाळ केला, त्या दोन हजार वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या,...
  June 9, 11:29 PM
 • राजकारणाच्या माध्यमातून माल आणि मत्ता (म्हणजे धन आणि सत्तेचा माज) जमा करण्याची प्रवृत्ती सर्व देशांत असली तरी भारतात त्या प्रवृत्तीने अधिकच ओंगळ थैमान घातलेले आहे.पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फतवा जाहीर केला आहे की, केंद्रातील सर्व मंत्र्यांनी त्यांची संपत्ती, विविध उद्योगधंद्यांत असलेली गुंतवणूक, कुटुंबीयांचे आर्थिक हितसंबंध, विशेषत: पत्नीच्या (वा पतीच्या) नावावर असलेली मिळकत वा उत्पन्न हे ३१ आॅगस्टच्या आत जाहीर करावे. हा फतवा फक्त काँग्रेसच्या नव्हे, तर मंत्रिमंडळातील सर्व...
  June 8, 11:42 PM
 • यमाजी मालकर - दिव्य मराठी चे सल्लागार संपादक१००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका, अशी रामदेव बाबांनी मागणी केली आहे. मात्र, रामदेव बाबा आणि सरकारही या मागणीविषयी पुढे काही का बोलत नाहीत, यामागील गुपित समजून घेतले पाहिजे.काळ्या पैशांच्या विरोधातील आंदोलनात १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका, अशी अतिशय रास्त मागणी करण्यात येत आहे; मात्र या मागणीचा आगापिछा समजून घेतल्याशिवाय तिचे महत्त्व कळू शकणार नाही. या नोटा रिझर्व्ह बँकेने चलनात का वाढविल्या आणि आता पुरेशा...
  June 8, 11:32 PM
 • जयप्रकाश नारायण यांच्या एक टक्काही नैतिकता नसलेल्या रामदेव बाबांपासून भाजपपर्यंतच्या सगळ्यांचेच अंतिम लक्ष्य देशाचे शुद्ध चारित्र्य नव्हे, राजसत्ता आहे. रामदेवबाबांनी आपले संपूर्ण राजकीय अवकाश व्यापावे आणि मीडियातील सर्व चर्चा याच योगी माणसाच्या आत्मनिष्ठ आंदोलनावर जवळजवळ एक आठवडाभर चालू राहावी यावरून आपले राजकारण किती सवंग आणि संदर्भहीन झाले आहे, हे लक्षात येईल. त्यांनी उपस्थित केलेले भ्रष्टाचाराचे व काळ्या पैशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याबद्दलची त्यांची मांडणी शुद्ध...
  June 7, 11:41 PM
 • आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळे लावायचे तंत्रज्ञान अजून निर्माण झालेले नाही. दिल्लीतील यूपीए सरकारची अवस्था सध्या आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांपैकी कुणीही ते आभाळ शिवायला पुढे आले नाही. याची मुख्यत: दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे साधू, योगी, बाबा यांचे आणि तथाकथित सिव्हिल सोसायटीचे आंदोलन हे सर्व मुख्यत: सत्तेचे राजकारणच आहे, हेच त्यांच्या लक्षात आले नसावे. दुसरे कारण म्हणजे हे सरकार...
  June 7, 08:44 AM
 • सलीम शहजादच्या शोधपत्रकारितेतून एक गोष्ट स्पष्ट होत होती की तालिबानी व अल कायदाच्या दहशतवादाचा धोका भारत वा अमेरिकेपेक्षाही पाकिस्तानलाच अधिक आहे. कारण त्या दहशतवाद्यांना तेथील संपूर्ण नियंत्रण हवे आहे.पाकिस्तानमधील पत्रकारिता म्हणजे थेट विस्तवाशी खेळ आहे. दहशतवादाने पोखरलेल्या त्या देशात त्याच दहशतवादाच्या विरोधात लिहिणे वा बोलणे, आणि तालिबानी वा अल कायदासारख्या संघटनांचे प्रशासनात वा पाकिस्तानी सेनादलात कसे जाळे विणलेले आहे हे जाहीर करणे जिवावर उदार होऊनच करावे लागते....
  June 6, 04:27 AM
 • अहिंसा, शांतता याच मार्गाने जनता बदल घडवू इच्छिते. पण याचा अर्थ ही शांतता म्हणजे जनतेचा षंढपणा समजू नये. या देशातील जनतेला भगतसिंगांचा मार्ग अपरिचित नाही, हे लक्षात घ्यावे.अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून आंदोलन केले ते यशस्वी झाले. भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केले त्यात यश मिळाले. का? मिळाले तर नेमके काय? हजारो- लाखो लोकांनी इ-मेल व फेसबुकवरून पाठिंबा दिला. पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार कमी झाला का? लोकपाल विधेयकाबाबत चर्चा सुरू झाली, पण हे विधेयक भिजत घोंगडे राहणार. जर...
  June 5, 03:57 AM
 • कोणत्याही परिस्थितीत आमरण उपोषण खरोखरच अखेर मरणापर्यंत जाऊ दिले जाणार नाही. पण समजा, वाटाघाटी पुन्हा फिसकटल्या तर रामदेवबाबांना खरोखरच मरणाला सामोरे जावे लागेल. तसे अघटित काही घडले तर सरकार अडचणीत येईल, कारण बाबांचे तथाकथित १ कोटी अनुयायी हंगामा करतील. सुमारे ६५ वर्षांपूर्वी ऑर्थर कोस्लर या जगप्रसिद्ध हंगेरियन विचारवंत लेखकाने एक निबंध लिहिला होता. त्या निबंधाचे नाव होते, 'द योगी अॅण्ड द कोमिसार'. याच नावाने पुढे त्यांचा निबंधसंग्रह प्रसिद्ध झाला. या निबंधाचे स्मरण होण्याचे कारण...
  June 4, 04:41 AM
 • लोकपाल नेमून ज्याप्रमाणे पश्न सुटणार नाही त्याच प्रमाणे उपोषणसदृश आंदोलनामुळे मीडियातून हवा निर्माण करण्यापलीकडे फारसे काही साध्य होणार नाही. सध्या भारतात उपोषणांची एक साथ आलेली दिसते. आता बाबा रामदेव शनिवारी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांचा रोख आहे देशातील काळ्या पैशाच्या अफाट विस्तारावर आणि त्या काळ्या पैशामुळे पूर्णपणे पोखरल्या गेलेल्या समाज व राजकीय व्यवस्थेवर. म्हणजेच भ्रष्टाचारावर. गेल्या महिन्यात याच मुद्द्यावर अण्णा हजारे दिल्ली येथे उपोषणाला बसले होते. त्या...
  June 3, 04:44 AM
 • मागणी वाढली की दर्जाही खालावतो. दर्जा खालावला की विश्वासार्हताही कमी होते, हे व्यापार-व्यवहाराचे तर्कशास्त्र मेधा पाटकर या व्यक्तीबाबतही दुर्दैवाने खरे ठरले आहे. अमिताभ बच्चन, लालकृष्ण अडवाणी आणि मेधा पाटकर या तिघांमध्ये विलक्षण साम्य आहे. 'जंजीर', 'दीवार'सारख्या चित्रपटांनी अमिताभ बच्चनला अँग्री यंग मॅनची इमेज दिली. या इमेजमध्ये तो इतका अडकला की, एकेकाळी 'इंद्रजित', 'मृत्युदाता', 'लाल बादशाह'सारख्या दर्जाहीन चित्रपटांत काम करून त्याने स्वत:चे हसे करून घेतले. भाजपचा 'मुखवटा' बनलेले...
  June 2, 04:06 AM
 • समाजात जे अराजक असते त्याचेच प्रतिबिंब ठळक व फिकट स्वरूपात तुरुंगात किंवा अगदी वेड्यांच्या इस्पितळातही उमटते. बिहारमधील गोपालगंज येथील तुरुंगात काही कैद्यांनी तेथील डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी आणि नंतर त्याचे डोके भिंतीवर आपटून ठार मारल्याच्या बातमीने देशभर एकच थरार व्यक्त झाला. एका बातमीनुसार, त्या डॉक्टरने काही कैद्यांना आजारपणाचे खोटे सर्टिफिकेट द्यायला नकार दिला होता. त्यामुळे ते कैदी संतप्त होते. डॉक्टरला तशा धमक्याही येत होत्या, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे....
  June 1, 08:20 PM
 • रामदास आठवले शिवसेनेच्या गडावर दाखल झाले तेव्हाच काही चाणाक्ष राजकीय निरीक्षक म्हणाले की, ही पण शरद पवारांची नवी खेळी असणार. दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर सादर केला जाणार आहे. 'दिव्य मराठी'च्या पहिल्याच अंकात प्रस्तुत बातमी प्रसिद्ध झाल्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली. रामदास आठवलेंनी 'शिवशक्ती'चा सल्ला न घेताच दादरचे नाव 'चैत्यभूमी'...
  May 31, 04:28 PM
 • रामदास आठवले शिवसेनेच्या गडावर दाखल झाले तेव्हाच काही चाणाक्ष राजकीय निरीक्षक म्हणाले की, ही पण शरद पवारांची नवी खेळी असणार. दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर सादर केला जाणार आहे. 'दिव्य मराठी'च्या पहिल्याच अंकात प्रस्तुत बातमी प्रसिद्ध झाल्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली. रामदास आठवलेंनी 'शिवशक्ती'चा सल्ला न घेताच दादरचे नाव 'चैत्यभूमी'...
  May 31, 06:35 AM
 • महेंद्रसिंग धोनी आणि जयललिता यांच्यात फारसे साम्य नाही. दोघांचीही ज्योतिषी आणि गुरू यांच्यावर नितांत श्रद्धा आहे हे खरे, पण ते ज्योतिषी आणि गुरूही वेगवेगळे आहेत. पण या घडीला धोनी आणि जयललिता दोघेही 'चेन्नई चॅम्पियन्स' झाले आहेत. जयललितांचा सनसनाटी विजय काही दिवसांपूर्वीचाच. धोनीला त्यामुळे असे वाटू शकेल की अण्णाद्रमुकचा विजय हा एक शुभशकु न होता. जयललितांचा सामना फक्त करुणानिधी कुटुंबीयांच्या विरोधात नव्हता, तर ज्या द्रमुकने जयललितांचा अखंडपणे द्वेष केला, त्या संपूर्ण द्रमुकच्या...
  May 30, 08:21 PM
 
जाहिरात

RECOMMENDED