जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • साऱयांनाच चटकन आकर्षित करते ते म्हणजे निखळ, अनुपम सौंदर्य. मग तो रुबाबदार पुरुष असेल किंवा सौंदर्यवती किंवा निसर्गाची सुंदर, विलोभनीय रूपे. ज्याच्या मनात सौंदर्याची जी कल्पना जागती असेल त्याप्रमाणे त्याला हे अवघे जग सुंदर दिसते. उगाच नाही सुंदरा मनामध्ये भरली म्हणत पिढ्याच्या पिढ्या नादावत राहिल्या. सौंदर्याची कल्पना व्यक्तिसापेक्ष असते हेही तितकेच खरे. जातीच्या सुंदराला सारे काही शोभून दिसते असेही म्हणण्याची प्रथा आहे; मात्र हे विधान बरेचसे आभासी आहे. अनेकदा सौंदर्यामागची कुरूपता...
  July 30, 02:33 AM
 • केंद्र सरकारच्या कॅबिनेटने लोकपाल विधेयकाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सरकारने या लोकसभा अधिवेशनात ते विधेयक चर्चेसाठी आणण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून पुरे केले आहे. परंतु त्यामुळे या प्रश्नावरून तापलेले वातावरण निवळेल अशी शक्यता अजिबात नाही. याचे मुख्य कारण आता भ्रष्टाचाराचा मुद्दा नैतिकतेचा वा कायद्याचा राहिलेला नसून तो अस्सल राजकीय साठमारीचा झाला आहे. त्याचप्रमाणे तो तथाकथित टीम अण्णा ऊर्फ अण्णा हजारे संघाच्या समांतर राजकारणाचा मुद्दा झाला आहे....
  July 29, 02:31 AM
 • माणसाला दोन प्रकारची भूक असते. एक पोटाची आणि दुसरी सुख, समाधान आणि आनंद मिळवण्याची. पोटासाठी काही ना काही काम करण्याची गरज असते. माणूस श्रम करतो व त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपली अन्नाची भूक भागवतो. पण सुख आणि समाधान हे काही केवळ पोटाची भूक भागवून मिळवता येत नाही. त्यासाठी आयुष्यात संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष नसेल तर माणूस सुख-समाधानापासून वंचित राहतो. साधारणपणे सुख-समाधान मिळवायला रग्गड पैसा लागतो अशी मानसिकता सर्वांचीच असते. चैनीच्या वस्तूंमधून सुख मिळते, श्रम कमी होतात व...
  July 28, 02:47 AM
 • मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेस म्हणजे एक सर्कस आहे, असे म्हटले आणि मीडियाने लगेच त्यांचा तो शेरा आवर्जून सर्वदूर पोहोचविला. गेले काही महिने काँग्रेसची प्रतिमा इतकी डागाळली गेली आहे की, दोन वर्षांपूर्वी निवडून आलेला हाच तो पक्ष आहे की आणखी वेगळ्याच कुठच्या संघटनेबद्दल आपण बोलत आहोत असा प्रश्न पडावा. त्या लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधान झाले. डाव्यांचा धुव्वा उडाला आणि भाजपच्या पायाखालची वाळू ओसरली. डाव्यांना तिसया आघाडीचे आणि भाजपला एनडीएचे सरकार येणार अशी खात्री...
  July 27, 02:37 AM
 • महाराष्ट्रदेशी एक मोठे संकट समोर उभे ठाकले आहे! चहाच्या पेल्यातील वादळे निर्माण करणाया चहाटळ लोकांना पायबंद घालण्यासाठी समस्त मराठी पृथ्वीवर राज करणारे पुढे सरसावलेत! प्रसंग तसा बाकाच आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांसाठी मुख्यमंत्री एकत्रित चहापानाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. राज्यात अशा अनेक प्रथा आहेत ही त्यापैकीच एक...गेल्या १० ते १५ वर्षांपासून राज्यामधील विरोधकांना सत्ताधायांबद्दलचा संताप व्यक्त...
  July 25, 11:44 PM
 • दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे नॉर्वेत शुक्रवारी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यातून पुन्हा सिद्ध झाले आहे. २०१० मध्ये युरोपीय समुदायातील सर्व राष्ट्रांच्या सुरक्षिततेबाबत युरोपोल या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात युरोप खंडामध्ये उजव्या कट्टरवादी विचारसरणीचा प्रभाव इंटरनेटवरील नेटवर्किंग साइट व आॅनलाइनच्या माध्यमातून वेगाने पसरत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. युरोपमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होईल, हा अंदाज या संस्थेने व्यक्त केला नव्हता. पण शुक्रवारी...
  July 24, 11:42 PM
 • अण्णा हजारे आणि त्यांच्या सहका-यांना समर्थन देताना लोकपाल विधेयकासंदर्भातही अधिकारवाणीने बोलणे हा जणू आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा थाटात हल्ली आपल्याकडील सेलिबे्रटी वावरत आहेत. आम्ही सुचवू त्याच व्यक्ती लोकपाल समितीत असतील, अशी हटवादी (की लोकशाहीविरोधी) भूमिका घेऊन अण्णांनी यापूर्वीच राजकीय पराकोटीची चीड निर्माण होईल, अशी व्यवस्था करून ठेवली होती. आता सुबुद्ध, संवेदनशील आणि सामाजिक भान वगैरे असलेला अभिनेता आमिर खानने लोकपाल समितीत एकही राजकारणी नको, अशी जाहीर भूमिका घेऊन सामान्य...
  July 23, 03:04 AM
 • विश्वचषक स्पर्धेनंतरचा मेगा इव्हेंट म्हणता येईल असा दोन हजारावा कसोटी सामना कालपासून लॉर्ड्स येथे सुरू झाला. योग असा की, भारत आणि इंग्लंड दरम्यानचा हा शंभरावा कसोटी सामना ठरला. क्रिकेटच्या कसोटी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या जाव्यात अशा या घटना. अशा वेळी खरे तर ऐतिहासिक म्हणता येईल अशी ही कसोटी कोण जिंकणार किंवा कोण हरणार, यावर प्राधान्याने चर्चा व्हायला हवी. क्रिकेटप्रेमींमध्ये तावातावाने पैजा लागायला हव्यात, परंतु या क्षणी सर्वाधिक चर्चा होत आहे ती या घटनेला सगळ्यात मोठी...
  July 22, 02:44 AM
 • भारतीयांची जीवनशैली आणि त्यांचा आहार सात्त्विक आहे असा प्रचार आध्यात्मिक साक्षात्कार झालेले भणंग करीत असतात. मात्र या दोन गोष्टींतून जगातील सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेला देश म्हणून भारताला नावलौकिक मिळाला आहे. भारतीय आहारामध्ये तेल व मेद, शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण इतके जास्त असते की ते आपसूकच मधुमेहाला निमंत्रण देतात. आपल्याकडील जीवनशैलीही इतकी परस्परविरोधी आहे की ती कोणाचाही रक्तदाब वाढवते किंवा कमी करते. थोडक्यात, भारत म्हणजे मधुमेह व रक्तदाबाच्या विकाराच्या रुग्णांचे...
  July 21, 02:34 AM
 • राजकीय इच्छाशक्ती, अस्मितांचे राजकारण आणि विकास या त्रयींमध्ये समतोल साधल्यास कित्येक वर्षे चिघळत असलेल्या प्रश्नांवर तोडगा निघू शकतो हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळाल्यानंतर दाखवून दिले आहे. तीन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यापुढे स्वतंत्र गोरखालँडचा गेली तीन दशके धगधगणारा प्रश्न सोडवण्याचे बिकट आव्हान होते. सत्तेवर आल्यावर हा प्रश्न सोडवेन असे आश्वासन त्यांनी गोरखा जनतेला दिले होते....
  July 20, 01:08 AM
 • हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - २ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि जगभरातील हॅरीच्या फॅन्सना पॉटरयुगाचा अंत झाल्याची दु:खद जाणीव झाली. त्यांच्या पोटात खड्डा पडला आणि आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. बरोबर चौदा वर्षे वाचकांनी हॅरीसोबत काढली आणि दहा वर्षे प्रेक्षकांनी. दर दीड वर्षाने एक पुस्तक या गतीने १९९७ ते २००७ या दशकात सात पुस्तके प्रसिद्ध झाली तर २००१ ते २०११ या दशकात आठ चित्रपट आले. म्हणजे सतत पुस्तक तरी येणार किंवा चित्रपट तरी, या आशेवर वय वर्षे सहा ते सोळा...
  July 18, 11:56 PM
 • रेल्वे अपघात, बॉम्बस्फोट अशा एकापाठोपाठच्या घटनांनी समाजात एक प्रकारचे औदासीन्य पसरले असताना देशवासीयांचे मनोबल आणि हुरूप वाढवणारी जीसॅट-१२ उपग्रहाच्या प्रक्षेपणाची यशस्वी घटना घडली. मात्र मुंबई बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी माजवलेल्या शाब्दिक गदारोळामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला एक पाऊल पुढे नेऊ पाहणारी उपग्रह प्रक्षेपणाची घटना केवळ दुर्लक्षित राहिली, इतकेच नव्हे तर समाजात रुजलेल्या विज्ञानविषयक उदासीनतेचेही या निमित्ताने पुन्हा...
  July 18, 05:02 AM
 • गेल्या २० वर्षांत एकाही क्रिकेटपटूला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसता आले नव्हते. या वेळीसुद्धा विलासराव देशमुखांनी बाजी मारली आणि दिलीप वेंगसरकरांचीच विकेट काढली. शरद पवारांनी क्रिकेटच्या मैदानावर कर्तृत्व गाजवलेल्या अजित वाडेकरांना १० वर्षांपूर्वी चीत केले होते. या वेळेस पवारांच्या आशीर्वादानेच विलासरावांना जीवदान मिळाले. जीवदानच म्हणायला हवे. कारण विलासरावांना स्वतंत्रपणे पाठिंबा नव्हताच. शरद पवार यांची प्रतिमा आणि थोडीफार कूटनीती या आधाराने...
  July 16, 12:18 AM
 • मुंबईच नव्हे तर अवघा देश आणि खरे म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंडच अनिश्चिततेच्या तसेच असुरक्षिततेच्या भोव-यात सापडला आहे. काश्मीरपासून पॅलेस्टीनपर्यंत आणि कोलंबोपासून कराचीपर्यंत जे दहशतवादी संघटनांचे प्रचंड जाळे बांधले गेले आहे, त्याचा सर्वात मोठा धोका आपल्या उपखंडाला आहे. या दहशतवादाचा उगम फार पूर्वीचा नाही. म्युनिकमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी १९७२ मध्ये केलेल्या सनसनाटी हल्ल्यानंतर, दरवर्षी अशा हल्ल्यांची तीव्रता आणि व्याप्ती वाढत गेली आहे. तो म्युनिकमधील हल्ला इस्रायली...
  July 15, 05:45 AM
 • अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांचा सावत्र भाऊ अहमद वली करझाई यांची मंगळवारी तालिबान बंडखोरांनी केलेली हत्या ही अफगाणिस्तानच्या सत्तासंघर्षाच्या इतिहासातील आणखी एक दुर्दैवी घटना म्हटली पाहिजे. अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणी कार्यक्रमात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप अहमद वली करझाई यांच्यावर होता. त्याचबरोबर अमेरिकी व नाटो फौजांना दक्षिण अफगाणिस्तानात जम बसवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अमेरिकावादी धोरणांमुळे तालिबान दहशतवाद्यांकडून त्यांच्या जीवाला धोका होता. तसेच...
  July 14, 05:40 AM
 • गुरुदास कामत यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे परिमाणच एकदम बदलले आहे. त्यांची नाराजी ते लपवू शकलेले नाहीत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मात्र कामत यांच्या राजीम्यावर थेट भाष्य करण्याऐवजी, मंत्रिमंडळ फेरबदलानंतर अशी नाराजी व्यक्त होणे स्वाभाविक असते असे ढोबळ विधान केले आहे. गुरुदास कामत यांचे स्वत:बद्दलचे मापन बरेच वरचे आहे हे उघड झाले. स्वत:बद्दलच्या प्रतिमेचे अवास्तव मापन करणायांना टीममध्ये राहणे कठीणच असते. गुरुदास कामत यांना पिण्याच्या पाण्याचे...
  July 13, 05:46 AM
 • सलवा जुडूमवर बंदी आणून या नावाने सुरू असलेल्या तथाकथित समांतर आंदोलनातील आदिवासी तरुणांकडील हत्यारे जप्त करा, असा निकाल गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सलवा जुडूमच्या नावाखाली छत्तीसगढ राज्यात सुरू असलेला हिंसाचार हा एखाद्या आफ्रिकी देशातील आदिवासी टोळ्यांमधील हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे, असेही मत या वेळी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आणि सुरिंदरसिंग निज्जर यांनी नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय लोकशाही अधिक मजबूत करणारा आहे. तसेच...
  July 12, 04:47 AM
 • महाराष्ट्रावर सेवा, त्याग, नि:स्पृहतेचा संस्कार करणारी पिढीच हळूहळू संपुष्टात येत चालली आहे. गेल्या काही वर्षांत तर इतके आघात झाले की संवेदनशील माणसाच्या डोळ्यांपुढे अंधारीच यावी. पण जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यूस सामोरे जावे लागणारच असल्यामुळे हे अंतिम सत्य पचवावे लागते. साधनाताई आमटे यांच्या जाण्याने अशीच काहीशी भावना महाराष्ट्रात आहे. प्रसिद्धी, भौतिक साधने मिळवण्याच्या असंख्य संधी हात जोडून उभ्या असताना ऐन तारुण्यात बाबा आमटे यांनी रुग्णसेवेचे व्रत पत्करले. ज्या जंगलात...
  July 11, 01:33 AM
 • पत्रकारितेच्या विश्वात सध्या हलकल्लोळ माजला आहे. वर्तमानपत्रांनी आणि पत्रकारांनी बातम्या द्यायच्या आणि त्यांचा अर्थ-अन्वयार्थ समजावून सांगणारे भाष्य करायचे, इतपत माफक अपेक्षा मीडियाकडून पूर्वी होती. पण बातमी म्हणजे नक्की काय? ती कशी मिळवायची? ती कशी लिहायची वा दाखवायची? बातमीची सत्यासत्यता कशी व कुणी पडताळून पाहायची? शोधपत्रकारितेच्या नावाखाली भानगड-पत्रकारिता कधी सुरू झाली आणि प्रतिष्ठा पावली? बदनामी आणि चारित्र्यहनन यांना बातमीचा दर्जा कसा मिळू लागला? वृत्तपत्र...
  July 9, 02:31 AM
 • तेलंगण राज्य निर्मितीचा प्रश्न पुन्हा उफाळून आला असून त्या भागातील ११९ आमदारांपैकी १०१ आमदारांनी बुधवारपर्यंत राजीनामे दिले होते. त्यात तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव व त्यांचे अन्य आमदार तसेच काँग्रेस, प्रजाराज्यम, भाजप आदी पक्षांच्या आमदारांचाही समावेश होता. तेलंगणच्या वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदला मिळालेल्या प्रतिसादावरून तेथे या प्रश्नावरून किती असंतोष उफाळून आला आहे याचे दर्शन झाले. देशामध्ये मोठ्या राज्यांतून छोटी...
  July 8, 05:48 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात