जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • महाराष्ट्रावर सेवा, त्याग, नि:स्पृहतेचा संस्कार करणारी पिढीच हळूहळू संपुष्टात येत चालली आहे. गेल्या काही वर्षांत तर इतके आघात झाले की संवेदनशील माणसाच्या डोळ्यांपुढे अंधारीच यावी. पण जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यूस सामोरे जावे लागणारच असल्यामुळे हे अंतिम सत्य पचवावे लागते. साधनाताई आमटे यांच्या जाण्याने अशीच काहीशी भावना महाराष्ट्रात आहे. प्रसिद्धी, भौतिक साधने मिळवण्याच्या असंख्य संधी हात जोडून उभ्या असताना ऐन तारुण्यात बाबा आमटे यांनी रुग्णसेवेचे व्रत पत्करले. ज्या जंगलात...
  July 11, 01:33 AM
 • पत्रकारितेच्या विश्वात सध्या हलकल्लोळ माजला आहे. वर्तमानपत्रांनी आणि पत्रकारांनी बातम्या द्यायच्या आणि त्यांचा अर्थ-अन्वयार्थ समजावून सांगणारे भाष्य करायचे, इतपत माफक अपेक्षा मीडियाकडून पूर्वी होती. पण बातमी म्हणजे नक्की काय? ती कशी मिळवायची? ती कशी लिहायची वा दाखवायची? बातमीची सत्यासत्यता कशी व कुणी पडताळून पाहायची? शोधपत्रकारितेच्या नावाखाली भानगड-पत्रकारिता कधी सुरू झाली आणि प्रतिष्ठा पावली? बदनामी आणि चारित्र्यहनन यांना बातमीचा दर्जा कसा मिळू लागला? वृत्तपत्र...
  July 9, 02:31 AM
 • तेलंगण राज्य निर्मितीचा प्रश्न पुन्हा उफाळून आला असून त्या भागातील ११९ आमदारांपैकी १०१ आमदारांनी बुधवारपर्यंत राजीनामे दिले होते. त्यात तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव व त्यांचे अन्य आमदार तसेच काँग्रेस, प्रजाराज्यम, भाजप आदी पक्षांच्या आमदारांचाही समावेश होता. तेलंगणच्या वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदला मिळालेल्या प्रतिसादावरून तेथे या प्रश्नावरून किती असंतोष उफाळून आला आहे याचे दर्शन झाले. देशामध्ये मोठ्या राज्यांतून छोटी...
  July 8, 05:48 AM
 • प्रस्थापित चौक ट झुगारून देण्याची एक झिंग असते. ती झिंग अनुभवणारेही अनेक असतात, परंतु त्या अर्धजागृत अवस्थेतून वेळीच बाहेर पडून स्वत:चे नवे जग तयार करण्याची क्षमता आणि ऊर्मी फार थोड्यांमध्ये असते. भारतीय चित्रपटांचे समांतर जग आकारास आणण्यात मोलाचा वाटा उचललेले मणी कौल हे त्यापैकीच एक चित्रपट दिग्दर्शक होते. बॉक्स ऑफिसवर नजर ठेवून व्यवसायाची गणिते बांधणा-या आताच्या बॉलीवूडला त्यांच्या जाण्याने कितीसा फरक पडणार, हा प्रश्नच असला तरीही चित्रजाणिवा प्रगल्भ झालेली, जागतिक चित्रपटांचे...
  July 6, 11:37 PM
 • सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक शहाणपण या देशात कुणाकडेही नाही असे आता सर्वांनी मान्य केले आहे. तसे मान्य करणे क्रमप्राप्तच आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाशी मतभेद व्यक्त करताना वा त्याच्याशी प्रतिवाद करताना कोणत्या क्षणी न्यायालयाची बदनामी होईल हे सांगता येत नाही. शिवाय तशी बदनामी झाली आहे की नाही हे ठरवण्याचे सर्वोच्च अधिकारही त्यांचेच! कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या संकल्पनेची व्याख्या भारतात जितकी कठोर आहे तितकी इंग्लंड- अमेरिकेतही नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत, त्यांचा...
  July 6, 04:04 AM
 • देशातला भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याचे रेडिमेड उपाय अण्णा हजारे, बाबा रामदेव यांच्याकडे आहेत. स्वीस बँकांत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा खणून तो देशात आणावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे! भ्रष्टाचाराबद्दल नोकरशहा, राजकारण्यांना सरसकट सुळावर चढवण्याची तयारी असलेले अण्णा, बाबा हे धर्मस्थळांच्या कारभारातील भ्रष्टाचाराबद्दल मौन बाळगून आहेत हेही खूपच सूचक आहे. तरी एक बरे झाले की, विदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यासंदर्भात चाललेल्या तपासाच्या प्रगतीवर बारकाईने...
  July 4, 11:38 PM
 • भारताचे कृषिमंत्री शरद पवार अध्यक्ष असतानाच आयसीसीने आपल्या सर्व संलग्न क्रिकेट बोर्डांना राजकारणी व्यक्ती संघटनेवर नसावी असे सूचित केले आहे. प्रत्येक देशाचे क्रिकेट बोर्ड हे स्वायत्त असावे, त्यामध्ये राजकारणी व्यक्तींची लुडबुड असता कामा नये, असे आयसीसीला वाटते. मुळातच मिळमिळीत धोरण राबवणारी आयसीसी एवढ्या कठोर निर्णयापर्यंत कशी येऊन पोहोचली हे एक आश्चर्य आहे. क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत राजकीय हस्तक्षेपाच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे...
  July 3, 11:17 PM
 • प्रेमाचा त्रिकोण हा चावून चोथा झालेला विषय घेऊन हॉलीवूड-बॉलीवूडमध्ये इतके असंख्य चित्रपट निघाले आहेत की त्यांची मोजदाद करणे अशक्य व्हावे. हा विषय अमरपट्टा घेऊन आलेला आहे, पण त्याला एक विषारी किनारही आहे. चित्रपटात अनेकदा वास्तवाचे दर्शन घडते असे म्हटले जाते, पण एखाद्याने आपल्या आयुष्याचाच चित्रपट करायचे ठरविले तर? मग हाती फक्त शोकांतिकाच उरते. नीरज ग्रोव्हर हत्या प्रकरणात नेमके हेच घडले आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हिंसाचार, खूनबाजी होणे हे जगात फार पूर्वीपासूनच घडत आलेले आहे. नीरज...
  July 1, 11:44 PM
 • जकात रद्द करण्याची औरंगाबाद शहरातील व्यापार्यांची आणि उद्योजकांची मागणी अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केली. त्यामुळे निदान एका करातून त्यांची सुटका झाली. गेल्या अनेक वर्षांपासून, विशेषत: व्हॅट, म्हणजे मूल्यवर्धित कर लागू केल्यापासून जकात कर रद्द करण्याची मागणी केली जात होती. व्हॅट लागू केल्यानंतर इतर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही असे राज्य सरकारनेही जाहीर केले होते; परंतु जकातीचे ओझे कायम ठेवण्यात आले. वास्तविक, सरकारचा कोणताही कर उद्योजक किंवा व्यापारी...
  July 1, 04:19 AM
 • चार आणे आता बाजाराच्या व्यवहारात वापरले जात नाहीत म्हणून रिझर्व्ह बँकेने सध्याचे २५पैशांचे नाणे काल व्यवहारातून अधिकृतपणे बाद केले. दु:ख चार आण्याचे नाणे रद्द झाल्याचे नाही. चार आण्यांसोबतचे गेल्या सहा दशकांचे भावविश्वही त्यासोबत पडद्याआड झाले आहे. त्याच्या आठवणी मात्र या भावविश्वात रमलेल्या पिढ्या आणखी काही वर्षे काढत राहतील. एका आण्याची गिन्नी, दोन आण्यांची चवली, चार आणे म्हणजे पावली, आठ आणे म्हणजे अधेली ही भाषा शहरांमधून गेल्या शतकाच्या अखेरीसच इतिहासात जमा झाली असली तरी ग्रामीण...
  July 1, 02:27 AM
 • गेले काही महिने डॉ. मनमोहनसिंग यांची मीडियाने, विशेषत: खासगी टीव्ही चॅनेलवाल्यांनी, अशी प्रतिमा केली होती की ते जणू रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांपैकी एक बाहुली आहेत. शिवाय ही बाहुली बोलकी पण नव्हे- तर पूर्णपणे अबोल! म्हणजे फक्त सोनिया गांधींच्या तालावर नाचणारी आणि यूपीएच्या दोऱ्यांना बांधलेली. ही प्रतिमा देशात आणि देशाबाहेर नेण्यात मीडियाचा कोणताही डाव नसेल कदाचित, पण भाजपचा नक्कीच होता. डॉ. मनमोहनसिंग यांचे सामर्थ्य त्यांच्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या...
  June 30, 05:42 AM
 • भारताचे लष्करी सामर्थ्य पाहता पाकिस्तानला त्याचा मुकाबला करणे शक्य नाही, अशी कबुलीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी दिली आहे. पाकिस्तानातील आर्थिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलेले असले तरी नुकतीच सुरू झालेली भारत-पाकिस्तान सचिव पातळीवरील चर्चा हेदेखील त्यामागील एक कारण आहे. वास्तविक, भारत-पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत झालेली १९४७, १९६५ आणि २००१ (कारगिल) ही तीनही युद्धे काश्मीरवरून झाली आहेत आणि काश्मीर प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे...
  June 30, 03:02 AM
 • नेहमीप्रमाणे खालापूरच्या रेव्ह पार्टीमध्ये अनेक बड्या धेंडांची मुले-मुली सापडली आहेत. ही पार्टी आयोजित करण्यात बियॉण्ड लॉजिक नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा पुढाकार होता हेसुद्धा एका अर्थाने सयुक्तिकच म्हणावे लागेल. वरवर पाहता तरी सर्वच रेव्ह पार्ट्या या अतर्क्य म्हणजेच बियॉण्ड लॉजिक असतात. पण या पार्टीत इतरही काही अतर्क्य बाबी आहेत. त्यांतील एक म्हणजे अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक आणि त्यांचे एक-दोन सहकारीच ही पार्टी आयोजित करण्यात आणि त्यांना चरस, गांजा, कोकेन आदी...
  June 29, 03:00 AM
 • कांशीराम यांच्या तालमीत तयार झालेल्या मायावती या एकविसाव्या शतकातील भारतातील सर्वात धूर्त आणि राजकीय खेळीची वेळ कधीही चुकवू न देणाऱ्या राजकीय नेत्या आहेत.बाबा तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगी पूरा ही घोषणा बहुजन समाज पक्षाची असली तरी यातील मथितार्थाला साजेसा दावा या राज्यातील बहुतांश सर्वच पक्ष करीत असतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर कुठलेही राजकीय कार्य शाहू- फुले-आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय सुरू होत नाही. रिपब्लिकन पक्षाचे अगणित गट, तट आणि त्यांचे उपगट यांच्यावर तर बाबासाहेबांचे...
  June 28, 02:10 AM
 • भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चोहोबाजूंनी कोंडी झाली असतानाही शुक्रवारी सरकारने डिझेल, केरोसीन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवण्याचे धार्ष्ट्य दाखवले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर भाजप, डावे, दक्षिणेतील अण्णाद्रमुकसह सरकारमधील काही घटक पक्षांनी सरकारवर लगेचच हल्ले करण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गॅस सिलिंडरवरील अधिभार कमी करून दरवाढ सुसह्य होईल याची काळजी घेतली; पण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या...
  June 27, 03:11 AM
 • शासन नेहमीच सर्वज्ञ, सर्वेसर्वा आणि मदोन्मत्त असते. जसे दारुड्याच्या फार नादी लागू नये, तसे शासनाच्याही फार नादी लागू नये. पिणायाला कोणतेही निमित्त आणि कोणतीही बाटली चालते. विदेशी मिळाली नाही तर देशी आणि ती न मिळाल्यास गावठी हवीशी वाटते. फेणी किंवा मोहाची; ब्रँडी किंवा रम; बिअर किंवा आणखी काही; पण कधीही कुठेही कोणालाही दारू हवीच. जो दारू पीत नाही तो या जगात जगण्यास नालायक आहे. जे पाणी पितात किंवा दूध पितात किंवा कोल्ड ड्रिंक पितात ते भोळे किंवा खुळे असतात. ड्रिंक म्हटले म्हणजे हॉटच हवे. परवा...
  June 25, 04:20 AM
 • गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे.गोपीनाथ मुंडेंची सीरियल एक आठवडाभर सर्व चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रांमध्ये चवीचवीने चालविली गेली. या पोलिटिकल सीरियलचा टीआरपी सास-बहू आणि सारेगमपपेक्षाही जास्त होता. शिवाय याच्यात कुणीही नट-नट्या नव्हत्या, तर थेट खरीखुरी कॅरेक्टर्स भाग घेत होती. नाही म्हणायला, हल्ली राजकीय नेतेमंडळी बॉलीवूडपेक्षाही अॅक्टिंग करण्यात माहिर झाली आहेत. त्यामुळे या मुंडे की दुनिया सीरियलमध्ये...
  June 24, 03:39 AM
 • अमेरिकेत खासगी हॉस्पिटलनी फार मोठ्या प्रमाणात फी आकारणी सुरू केली. औषधी कंपन्यांनी औषधे महाग केली. डॉक्टरांची फी अव्वाच्या सव्वा वाढली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्यसेवा न परवडणारी झाली व या आरोग्यसेवेचा भार सरकारने उचलला. १४ फेब्रुवारी २०११ ला बराक ओबामा यांनी अमेरिकेचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना नव्या दिशेने जाणारा अर्थसंकल्प म्हणून त्यांनी अमेरिकन जनतेच्या आकांक्षांना अवास्तव उभारी दिली होती. सगळी सोंगे आणता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही...
  June 23, 06:01 AM
 •  एकेकाळी जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणा-या ग्रीसवर आज त्याच जगापुढे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आलेली आहे. ग्रीसमध्ये खिस्तपूर्व काळापासून अभिजात रंगभूमी विकसित झाली व बहरली. त्यातील ‘ट्रॅजिडी’ (शोकांतिका) या नाट्यप्रकाराचा विलक्षण प्रभाव पडून ती ग्रीक ट्रॅजिडी म्हणून मान्यता पावली. ग्रीस देशावर जी आर्थिक दुरवस्था ओढवली हीदेखील एक प्रकारे ग्रीक ट्रॅजिडीच असून तिचा नवा अंक आता जागतिक पटलावर सुरू आहे. अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो अशा महान विचारवंतांची परंपरा सांगणारा,...
  June 23, 05:57 AM
 • एकेकाळी जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाया ग्रीसवर आज त्याच जगापुढे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आलेली आहे. ग्रीसमध्ये खिस्तपूर्व काळापासून अभिजात रंगभूमी विकसित झाली व बहरली. त्यातील ट्रॅजिडी (शोकांतिका) या नाट्यप्रकाराचा विलक्षण प्रभाव पडून ती ग्रीक ट्रॅजिडी म्हणून मान्यता पावली. ग्रीस देशावर जी आर्थिक दुरवस्था ओढवली हीदेखील एक प्रकारे ग्रीक ट्रॅजिडीच असून तिचा नवा अंक आता जागतिक पटलावर सुरू आहे. अॅरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो अशा महान विचारवंतांची परंपरा सांगणारा, पाश्चिमात्य...
  June 23, 05:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात