जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • जन्म कोल्हापूरचा, शिक्षण पुणे येथे, डॉक्टरेट अमेरिकेमध्ये आणि जवळजवळ बहुतेकसे व्यावसायिक आयुष्य दिल्लीमध्ये; पण त्यांचा स्वभाव मात्र अस्सल साध्यासुध्या मराठी माणसाचा होता. अनेकदा मराठी माणूस स्वत:ची ओळख मोडेन पण वाकणार नाही अशी करून देतो. तेंडुलकर तशा प्रकारच्या अभिनिवेशातही कधी नव्हते. त्यांनी त्यांचा स्वाभिमान आणि व्यासंग जपला तो एखाद्या ज्ञानतपस्व्याप्रमाणे. असे तपस्वी आताच्या चमको विश्वात विरळाच!बहुतेक मराठी माणसांना सुरेश तेंडुलकर यांचे नाव माहीत नव्हते. ते विजय तेंडुलकर...
  June 22, 03:42 AM
 • शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीमुळे सामाजिक समरसतेला चालना मिळणार असेल, तर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण विळ्या-भोपळ्याचा हा नवा राजकीय अवतार लोकांच्या अजूनही पचनी पडलेला नाही. राज्यात आपणच सर्वात शक्तिशाली दलित नेते आहोत हा आठवले यांनी फुगवलेला फुगा फुटणार आहेच; पण या राजकीय जुगाराचा शिवसेनेला फार फायदा होईल, अशीही परिस्थिती नाही.शिवसेनेचा विद्यापीठाच्या नामांतराला कधीही विरोध नव्हता, असे प्रमाणपत्र खुद्द रामदास आठवले यांनीच दिल्यामुळे कदाचित शिवसेनाही संभ्रमात पडली असेल!...
  June 21, 12:42 AM
 • काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या दोन लघुकादंब-यांचा संग्रह हे कमल देसाइंचे उच्चतम साहित्य होते. त्यांनी स्वत: उभ्या आयुष्यात कधी डोक्यावर हॅट घातली नसेल. पण तशा रूपात आपल्या समाजात वावरणा-या नायिकेची कल्पना करणे आणि तिच्या तोंडून, तिच्या खास शैलीत एक विलक्षण कहाणी समजून घेणे हा सुजाण वाचकांसाठी अविस्मरणीय अनुभव होता. ही हॅट घालून मुक्तपणे वावरणारी आणि आपल्या पद्धतीने जीवनाचा अनुभव देणारी स्त्री म्हणजे जणू कमल देसाइंची प्रतिभा होती. तिला मोजकेच पण रा. भा. पाटणकर, श्री. पु. भागवत, जी. ए....
  June 20, 01:26 AM
 • अयमान अल जवाहिरी या इजिप्तमधल्या एका नेत्रतज्ज्ञाची जगभरातील लोकांनी दखल घ्यावी, असे त्याचे नक्की कोणते योगदान आहे? डॉ. जवाहिरीने लाखो दृष्टिहीनांना दृष्टी दिली आहे, किंवा लाखांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून गोरगरिबांचा दुवा मिळवला आहे, तर असे काहीही नाही. मात्र तरीही त्याची दखल जगभरातील राज्यकर्त्यांना आणि प्रसिद्धी माध्यमांना घ्यावी लागली. कारण गेली ४० वर्षे ओसामा बिन लादेनचा प्रमुख सहकारी असलेल्या जवाहिरीच्या ताब्यात ओसामाच्या मृत्यूनंतर अल कायदाची सर्व सूत्रे आली आहेत....
  June 18, 12:41 AM
 • कधी नव्हे ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हातात वेताची छडी घेऊन देशवासीयांची पुन्हा पुन्हा शाळा घ्यावी लागत आहे आणि आपल्याच जनतेला त्यांच्या लायकीची जाणीव करून द्यावी लागत आहे. सब प्राइम घोटाळ्यानंतर गटांगळ्या खाणा-या अस्थिर नि अस्वस्थ अमेरिकी अर्थव्यवस्थेचे गाडे अद्यापही रुळावर आलेले नाही याचे हे निदर्शक आहेच; पण बेरोजगारीने गळपटलेला अमेरिकी तरुणवर्ग सावरण्याच्या स्थितीत नाही, याचेही ते व्यवच्छेदक लक्षण आहे. मुलाने स्वत:हून नोकरीचा शोध घेण्याऐवजी बापानेच मुलाच्या...
  June 17, 12:07 AM
 • हरिद्वार येथील गंगेच्या पात्रात धुडगूस घालणा-या वाळू माफियांविरोधात उपोषणाला बसलेले परंतु उपचारादरम्यान प्राणास मुकावे लागलेले स्वामी निगमानंद हे अनेक अर्थाने दुर्दैवीच म्हणायला हवेत. खरे तर निगमानंद आणि बाबा रामदेव हे एकाच संन्यासी कुळातले. दोघांची कर्मभूमीही एक. दोघांवर उपचार झालेले रुग्णालयही एक आणि उपचारांची वेळही तीच. पण फेब्रुवारी महिन्यापासून आमरण उपोषणाला बसलेल्या निगमानंद यांची ना संघपरिवाराने वास्तपुस्त केली, ना भाजपच्या सुषमा स्वराज आदी परफॉर्मर मंडळींनी...
  June 16, 12:38 AM
 • किरण दराडे सोमवारी सकाळी घर सोडून, आईचा निरोप घेऊन कोचिंग क्लाससाठी निघाली तेव्हा तिच्या मनात नक्कीच काही स्वप्ने असतील. बारावीत प्रवेश घेऊन लगेचच किरणने ट्यूशन लावली होती. लोक झोपेतून उठलेही नसतील तेव्हा ही होतकरू मुलगी सायकलवरून क्लासला जात होती. निश्चितच तिला शिकून मोठ्ठं व्हायचं होतं, तिच्या मनात तेच स्वप्न तरळत असेल... पण नियतीला ते मान्य नव्हतं. किरणचं उमलतं आयुष्य त्या नराधम ट्रक ड्रायव्हरने अत्यंत निर्दयपणे एका फटक्यात संपवून टाकलं आणि औरंगाबादकर हळहळत राहिले! काळाचे हे...
  June 15, 02:02 AM
 • नाहीतरी गांधीजी काही पाहू शकणार नव्हतेच. त्यामुळे त्यांचा चष्मा चोरीला गेल्याने कुणाचेच काही बिघडण्याचा संभव नाही. आणि समजा, मुन्नाभाईला बापू जसे भेटले तसे ते खरोखरच पुन्हा अवतरले, तर सध्या जे काही चालू आहे ते पाहून त्यांची प्रतिक्रिया काय होईल, हे सांगणे जरा कठीणच आहे. कारण सध्या त्या महात्म्याच्या नावाला आणि प्रतिमेला एकदम महत्त्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या झेरॉक्स वा हल्ली प्रचलित नसलेल्या कार्बन कॉप्या घेऊन बरेच गांधी आपापली दुकाने चालवीत आहेत. अण्णांनी तर १६...
  June 15, 12:01 AM
 • ज्योतिर्मय डे यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीदेखील आपल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिल्याने आता राज्य पोलिसांवर या खुनाची उकल लवकरात लवकर करण्याचे दडपण आहे. अशा प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले आणि पत्रकारांच्या निर्घृण हत्या लोकशाहीची बीजे न रुजलेल्या पाकिस्तानात वरचेवर होत असतात. वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांची गळा चिरून झालेली हत्या असो वा सलीम शहजाद यांची...
  June 14, 12:54 AM
 • योगगुरू बाबा रामदेव यांचा गेले ९ दिवस सुरू असलेला देशातील एक मोठा रिअॅलिटी मॅडनेस शो काही ठोस निर्णय न होताच अखेर संपला. बाबांनी हे उपोषण मागे घेतले असले तरी भ्रष्टाचारविरोधातील त्यांची लढाई सुरूच राहील, अशी बाष्कळ बडबड त्यांचे निकटचे अनुयायी बालकृष्ण यांनी जाता-जाता केली. त्यातच श्री श्री रविशंकर, मोरारी बापू, कृपालू महाराज आणि इतर आध्यात्मिक नेत्यांच्या आग्रहामुळे बाबांनी हे उपोषण मागे घेत असल्याचे सांगून अनेकांना बुचकळ्यात पाडले. उपोषण मागे घ्यावे, अशी महत्त्वाची सूचना राष्ट्रीय...
  June 13, 01:25 PM
 • भांडवलशाही व्यवस्था आभास निर्माण करते असे म्हणतात. त्या अर्थाने आठवले आणि पवार दोघेही प्रस्थापितांचेच प्रतिनिधी आहेत.गेल्या दोन दिवसात सेना-भाजप अधिक रिपाइं यांचा महायुती मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्ताने झालेली सामाजिक परिवर्तन हक्क परिषद ही मुंबईत झालेली दोन शक्तिप्रदर्शने या शहराच्या इतिहासाला साजेशी आहेत. परंतु त्यात सामाजिक परिवर्तन किती आणि त्याचा आभास किती हे लोक प्रत्यक्षात अनुभवीत आहेतच. रामदास आठवले हे धर्मांध शक्तींच्या विरोधात लढणारे...
  June 11, 12:56 AM
 • शृंगाराचे प्रतीक बनलेली स्त्री आणि वेग-ऊर्जेचे प्रतीक असलेला अश्व यांच्या एकत्रित परिणामातून साधलेला हुसेन इफेक्ट भल्या-भल्यांना भुरळ पाडायचा.ज्या लंडन शहराने वैश्विक प्रवाहांना जन्माला घालणा-या विविध विचारप्रवृत्ती आणि प्रतिभांना उदार मनाने आश्रय दिला, ज्या लंडन शहराने चार्ल्स डार्विनपासून कार्ल मार्क्सपर्यंत आणि आल्फ्रेड हिचकॉकपासून अॅना एरीपर्यंतच्या जगावर छाप सोडणा-या प्रतिभावंतांचा प्रेमाने सांभाळ केला, त्या दोन हजार वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या,...
  June 9, 11:29 PM
 • राजकारणाच्या माध्यमातून माल आणि मत्ता (म्हणजे धन आणि सत्तेचा माज) जमा करण्याची प्रवृत्ती सर्व देशांत असली तरी भारतात त्या प्रवृत्तीने अधिकच ओंगळ थैमान घातलेले आहे.पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फतवा जाहीर केला आहे की, केंद्रातील सर्व मंत्र्यांनी त्यांची संपत्ती, विविध उद्योगधंद्यांत असलेली गुंतवणूक, कुटुंबीयांचे आर्थिक हितसंबंध, विशेषत: पत्नीच्या (वा पतीच्या) नावावर असलेली मिळकत वा उत्पन्न हे ३१ आॅगस्टच्या आत जाहीर करावे. हा फतवा फक्त काँग्रेसच्या नव्हे, तर मंत्रिमंडळातील सर्व...
  June 8, 11:42 PM
 • यमाजी मालकर - दिव्य मराठी चे सल्लागार संपादक१००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका, अशी रामदेव बाबांनी मागणी केली आहे. मात्र, रामदेव बाबा आणि सरकारही या मागणीविषयी पुढे काही का बोलत नाहीत, यामागील गुपित समजून घेतले पाहिजे.काळ्या पैशांच्या विरोधातील आंदोलनात १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका, अशी अतिशय रास्त मागणी करण्यात येत आहे; मात्र या मागणीचा आगापिछा समजून घेतल्याशिवाय तिचे महत्त्व कळू शकणार नाही. या नोटा रिझर्व्ह बँकेने चलनात का वाढविल्या आणि आता पुरेशा...
  June 8, 11:32 PM
 • जयप्रकाश नारायण यांच्या एक टक्काही नैतिकता नसलेल्या रामदेव बाबांपासून भाजपपर्यंतच्या सगळ्यांचेच अंतिम लक्ष्य देशाचे शुद्ध चारित्र्य नव्हे, राजसत्ता आहे. रामदेवबाबांनी आपले संपूर्ण राजकीय अवकाश व्यापावे आणि मीडियातील सर्व चर्चा याच योगी माणसाच्या आत्मनिष्ठ आंदोलनावर जवळजवळ एक आठवडाभर चालू राहावी यावरून आपले राजकारण किती सवंग आणि संदर्भहीन झाले आहे, हे लक्षात येईल. त्यांनी उपस्थित केलेले भ्रष्टाचाराचे व काळ्या पैशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याबद्दलची त्यांची मांडणी शुद्ध...
  June 7, 11:41 PM
 • आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळे लावायचे तंत्रज्ञान अजून निर्माण झालेले नाही. दिल्लीतील यूपीए सरकारची अवस्था सध्या आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांपैकी कुणीही ते आभाळ शिवायला पुढे आले नाही. याची मुख्यत: दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे साधू, योगी, बाबा यांचे आणि तथाकथित सिव्हिल सोसायटीचे आंदोलन हे सर्व मुख्यत: सत्तेचे राजकारणच आहे, हेच त्यांच्या लक्षात आले नसावे. दुसरे कारण म्हणजे हे सरकार...
  June 7, 08:44 AM
 • सलीम शहजादच्या शोधपत्रकारितेतून एक गोष्ट स्पष्ट होत होती की तालिबानी व अल कायदाच्या दहशतवादाचा धोका भारत वा अमेरिकेपेक्षाही पाकिस्तानलाच अधिक आहे. कारण त्या दहशतवाद्यांना तेथील संपूर्ण नियंत्रण हवे आहे.पाकिस्तानमधील पत्रकारिता म्हणजे थेट विस्तवाशी खेळ आहे. दहशतवादाने पोखरलेल्या त्या देशात त्याच दहशतवादाच्या विरोधात लिहिणे वा बोलणे, आणि तालिबानी वा अल कायदासारख्या संघटनांचे प्रशासनात वा पाकिस्तानी सेनादलात कसे जाळे विणलेले आहे हे जाहीर करणे जिवावर उदार होऊनच करावे लागते....
  June 6, 04:27 AM
 • अहिंसा, शांतता याच मार्गाने जनता बदल घडवू इच्छिते. पण याचा अर्थ ही शांतता म्हणजे जनतेचा षंढपणा समजू नये. या देशातील जनतेला भगतसिंगांचा मार्ग अपरिचित नाही, हे लक्षात घ्यावे.अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून आंदोलन केले ते यशस्वी झाले. भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केले त्यात यश मिळाले. का? मिळाले तर नेमके काय? हजारो- लाखो लोकांनी इ-मेल व फेसबुकवरून पाठिंबा दिला. पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार कमी झाला का? लोकपाल विधेयकाबाबत चर्चा सुरू झाली, पण हे विधेयक भिजत घोंगडे राहणार. जर...
  June 5, 03:57 AM
 • कोणत्याही परिस्थितीत आमरण उपोषण खरोखरच अखेर मरणापर्यंत जाऊ दिले जाणार नाही. पण समजा, वाटाघाटी पुन्हा फिसकटल्या तर रामदेवबाबांना खरोखरच मरणाला सामोरे जावे लागेल. तसे अघटित काही घडले तर सरकार अडचणीत येईल, कारण बाबांचे तथाकथित १ कोटी अनुयायी हंगामा करतील. सुमारे ६५ वर्षांपूर्वी ऑर्थर कोस्लर या जगप्रसिद्ध हंगेरियन विचारवंत लेखकाने एक निबंध लिहिला होता. त्या निबंधाचे नाव होते, 'द योगी अॅण्ड द कोमिसार'. याच नावाने पुढे त्यांचा निबंधसंग्रह प्रसिद्ध झाला. या निबंधाचे स्मरण होण्याचे कारण...
  June 4, 04:41 AM
 • लोकपाल नेमून ज्याप्रमाणे पश्न सुटणार नाही त्याच प्रमाणे उपोषणसदृश आंदोलनामुळे मीडियातून हवा निर्माण करण्यापलीकडे फारसे काही साध्य होणार नाही. सध्या भारतात उपोषणांची एक साथ आलेली दिसते. आता बाबा रामदेव शनिवारी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांचा रोख आहे देशातील काळ्या पैशाच्या अफाट विस्तारावर आणि त्या काळ्या पैशामुळे पूर्णपणे पोखरल्या गेलेल्या समाज व राजकीय व्यवस्थेवर. म्हणजेच भ्रष्टाचारावर. गेल्या महिन्यात याच मुद्द्यावर अण्णा हजारे दिल्ली येथे उपोषणाला बसले होते. त्या...
  June 3, 04:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात