जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • देशात असहिष्णुता वाढत चालल्याची ओरड काही काळापासून सातत्याने होत असून जागतिक पातळीवरील वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची झालेली घसरण एकप्रकारे त्याचाच प्रत्यय देणारी आहे. जनसामान्यांचा आवाज म्हणून लोकशाहीत वृत्तपत्र तसेच अन्य माध्यमांकडे पाहिले जाते. असे असताना जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवणारा आपला देश जर अशा प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात आपले स्थान बळकट करणे तर दूरच, पण टिकवूनही ठेवू शकत नसेल तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या ते प्रगल्भपणाचे...
  April 20, 10:12 AM
 • देशातील पहिली खासगी विमान कंपनी जेट एअरवेजने बुधवारी रात्री अखेरच्या उड्डाणानंतर तात्पुरती विश्रांती घेतली. किंगफिशरनंतर गेल्या दशकात बंद होणारी ती दुसरी भारतीय विमान कंपनी ठरली. दिवसाला ६५० विमानांचे उड्डाण करणाऱ्या जेटचे बंद होणे धक्कादायक आहे.जेटवरील संकट एकाएकी आलेले नाही. याची सुरूवात २००७ पासूनच झाली होती. जेटने कर्जात बुडालेल्या एअर सहाराला १४५० कोटी रूपयात विकत घेऊन जेटलाईट असे नाव दिले. जेटलाईट फायद्यात आलीच नाही. परिणामी कर्जाची रक्कम २० हजार कोटींवर पोचली. जेटला इएमआय...
  April 19, 09:22 AM
 • इस्लामची पहिली मशीद काबात आहे. तिथे महिला आणि पुरुष सोबतच नमाजपठण करतात. कोणताही धर्म विषमता मानत नाही. पण, धर्माचा अन्वय लावणारे धर्ममार्तंड मात्र धर्माचा वापर करून आपले हितसंबंध सांभाळत असतात. त्यातूनच मग महिलांना कधी मंदिरात, कधी मशिदीत प्रवेश नाकारला जातो. अशा वेळी मुस्लिम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दाखवली आहे. एरवी एकमेकांच्या जिवावर उठणारे धर्मांध स्त्रियांच्या शोषणाच्या...
  April 18, 10:22 AM
 • लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेने कानपूर ते कन्याकुमारीपर्यंत घामाच्या धारा वाहत आहेत. अशा वातावरणातच भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीने यंदा देशात पाऊस सरासरी गाठणार (९६ टक्के ) असा अंदाज वर्तवत सर्वांनाच दिलासा दिला आहे. यंदा अल निनोचे सावट फारसे राहणार नाही, असे सांगत आयएमडीने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्यांवर सुखद शिडकावा केला आहे. मुळात मान्सूनचा पाऊस म्हणजे निव्वळ जुगार असे म्हणतात. मान्सूननेही याचा प्रत्यय वारंवार दिला...
  April 17, 09:19 AM
 • स्वायत्त निवडणूक आयोग हे भारतीय लोकशाहीचे व्यवच्छेदक वेगळेपण. आपल्या लोकशाहीत दोष नाहीत, असे नाही. मात्र, निवडणूक आयोग आजवर एवढ्या संशयाच्या भोव-यात कधी सापडला नव्हता. अनेक दिग्गजांना मतदारांनी पराभवाची धूळ चाखली आहे. आज हा आयोगच पराभूत मानसिकतेत आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करताना सर्वच पक्षांच्या नेत्यांची स्थिती उचलली जीभ लावली टाळ्याला अशी झाली आहे. आचारसंहितेमधील बंधने पाळायचीच नाहीत, असे त्यांनी ठरवल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, मनेका...
  April 16, 10:12 AM
 • बड्या कंपन्यांच्या ब्रँडना टीआरपीत चक्क राजकीय पक्षांनी मागं टाकलं आहे. लाज कशी वाटत नाही? ही काँग्रेस-राष्ट्रवादीची टॅगलाइन सध्या प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडतेय. तर सत्ताधाऱ्यांची फिर एक बार मोदी सरकार ही जाहिरातसुद्धा लक्षवेधी ठरलीय. देशातल्या प्रसिद्धिमाध्यमांत सध्या मोठं क्रिएटिव्ह वाॅर पेटलंय. लोकसभा निवडणुकीचा एक टप्पा संपलाय. अजून आठ टप्पे बाकी आहेत. त्यामुळे जाहिरातींचा हा युद्धज्वर उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षाच्या टॅगलाइन निश्चित...
  April 13, 10:45 AM
 • चैत्रातील उन्हाचा कडाकाही सौम्य भासावा एवढे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना त्या पक्षात जशी लहानमोठ्या कारणांवरून सतत साठमारी चालायची तशीच काहीशी स्थिती सध्या सत्तेच्या सावलीला चटावलेल्या भाजपमध्ये पाहावयास मिळते. अमळनेरमध्ये बुधवारी भाजपच्या मेळाव्यात झालेला राडा त्याचाच प्रत्यय देतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक अशी ख्याती मिळवणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने थेट व्यासपीठावरच माजी...
  April 12, 09:54 AM
 • शेतीचे प्रयोग आणि तेल अवीवसारख्या स्मार्ट सिटीसाठी इस्रायल भलेही प्रख्यात असो, तिथले अंतःप्रवाह वेगळे आहेत. ८० लाख लोकसंख्येच्या इस्रायलच्या दुप्पट आपली एकटी मुंबई आहे. इस्रायलच्या प्रयोगांचे गोडवे गायला हरकत नाही. पण, तिथल्या राजकीय संस्कृतीशी नाते सांगायला लागू, तर ते कमालीचे विसंगत ठरणार आहे. इस्रायलमध्ये जे घडते आहे, ते काळजी वाढवणारे आहे. अर्थात, जन्मापासूनचा प्रवास पाहिला, तर इथे आणखी काही वेगळे घडणे अपेक्षितही नव्हते. इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन...
  April 11, 09:31 AM
 • लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या रणधुमाळीचा धुरळा सायंकाळी शांत झाला. महाराष्ट्रात या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघ आहेत. सर्वसमान्य माणूस हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. या निवडणुकीत हा सामान्य माणूस फार बोलत नाही. मात्र मतामधून बोलण्याची संधी तो सोडणार नाही. राष्ट्रवादीचे हेवीवेट माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रातील राज्यमंत्री हंसराज अहीर या तिघांमुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांकडे...
  April 10, 09:24 AM
 • राष्ट्रवाद आमची प्रेरणा आहे. दुर्बल घटकांचे सबलीकरण आमची दृष्टी आहे व पारदर्शक कारभार आमचा मंत्र आहे, अशा सारांशासह भाजपचा २०१९चा लोकसभा निवडणुकांचा जाहीरनामा काल जाहीर झाला. भाजपचा जाहीरनामा काँग्रेसच्या न्यायला जोरकस उत्तर असेल असा अंदाज होता. पण त्यांनी जाहीरनाम्यातून नोटबंदीनंतर ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला तेजीचा डोस न देता राष्ट्रवाद, राममंदिर निर्माण, समान नागरी कायदा, जम्मू व काश्मीरसंदर्भातले कलम ३५ रद्द करणे, दहशतवाद व पारदर्शक कारभार अशीच अफू पाजली आहे. भाजपची पारंपरिक...
  April 9, 09:39 AM
 • ४ एप्रिल १९७९ रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना फाशी देण्यात आली. कायद्याच्या भाषेत ती फाशी असली तरीही प्रत्यक्षात होती ती हत्याच. या हत्येला परवा ४० वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानात ठिकठिकाणी भुत्तोंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तान पीपल्स पार्टीने भुत्तोंच्या कार्याची आठवण, त्यांच्या राजकीय वारशाचे स्मरण म्हणून देशव्यापी कार्यक्रम घेतले होते. पण जे विरोधी पक्ष होते त्यांचे या घटनेबाबत मौन होते. भुत्तोंवर आरोप होता एका...
  April 6, 09:42 AM
 • केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल आपला उमेदवारीचा अर्ज अखेर दाखल केला. राहुल गांधी यांनी त्यांच्या पारंपरिक अमेठी मतदारसंघाशिवाय केरळमधला मतदारसंघ का निवडला यावर अनेक बाजूंनी चर्चा सुरू होती. भाजपच्या मते अमेठीत पराभव दिसत असल्याने राहुल यांनी केरळमधील वायनाडची निवड केली आहे. पण देशव्यापी वलय असलेला नेता दोन ठिकाणांहून अर्ज भरत असतो तेव्हा त्याला त्याच्या भविष्यवेधी राजकारणाची दिशा पक्षाबरोबर मतदारांपुढेही मांडायची असते. भारताच्या...
  April 5, 09:29 AM
 • बड्या कंपन्यांची कर्ज प्रकरणे वेळेत निपटावीत म्हणून रिझर्व्ह बँकेने १२ फेब्रुवारी २०१८ रोजी जारी केलेले परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्दबातल केल्याने कर्जवसुलीच्या बँकांच्या प्रयत्नांना जबर हादरा बसला आहे. बुडीत कर्जांचा विषय हाताबाहेर गेला असतानाच रिझर्व्ह बँकेने असा निर्णय दिल्याने उद्योग क्षेत्राने उसासे टाकले असले तरी थकलेल्या कर्जाच्या वसुलीचे जे प्रयत्न बँकिंग व्यवस्था नेटाने करत होती त्यांचे प्रयत्न वाया गेले असे म्हणावे लागेल. वास्तविक वाढत्या बुडीत...
  April 4, 09:34 AM
 • काँग्रेसने किमान उत्पन्न योजना जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये टाकण्याची भाजपची योजना चर्चेतून एकदम गायब झाली. वास्तविक फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्री जेटलींनी शेतकरी व मध्यमवर्ग केंद्रित धरून जो अर्थसंकल्प सादर केला तेव्हा भाजप हा कर्जबाजारी, दुष्काळपीडित शेतकऱ्यांबरोबर मध्यमवर्गाचीही मते सहज खेचू शकेल, असे दावे अनेक पत्रपंडितांकडून मांडले जात होते आणि बऱ्याच अर्थविचारवंतांनी भाजपला हा अर्थसंकल्प तारून नेईल, असेही विधान केले होते. पण...
  April 3, 09:32 AM
 • केबल वाहिन्या पाहण्याचा पसंतीक्रम सादर करण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ग्राहकांपुढे ठेवलेल्या ३१ मार्च मुदतीला ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी प्रतिसाद दिला नसल्याने ट्रायला नेमके काय साधायचे आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. ट्रायकडून अशी मुदतवाढ तिसऱ्यांदा देण्यात आली आहे. पण डीटीएच, केबलचालक व ट्राय यांच्यात कोणताच समेट होण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या वर्षी कोणत्या वाहिन्या पाहायचा याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना देण्याच्या दृष्टीने...
  April 2, 09:54 AM
 • भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर महिलांचा विशेष प्रभाव वाढणार आहे, आणि येत्या निवडणुकांपासूनच त्याची सुरुवात हाेणार आहे. देशभरातील साऱ्या महिलांना सुखावणारी, उत्साहवर्धक ठरावी अशीच ही बाब म्हणता येईल. भारतात हाेऊ जात असलेली सार्वत्रिक निवडणूक आणि देशाचे एकूणच अर्थकारण याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. अनेक संस्था निरनिराळ्या पद्धतीने या अनुषंगाने अभ्यास करीत आहेत. कार्नेगी एन्डाेव्हमेंट फाॅर इंटरनॅशनल पीस ही वाॅशिंग्टनमधील संस्थादेखील अपवाद ठरली नाही. या संस्थेचे वरिष्ठ...
  April 1, 10:12 AM
 • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सध्या त्यांच्या द थर्ड पिलर या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून भांडवलशाहीचे सद्य:स्वरूप, संपत्तीचे मोजक्यांकडे झालेले केंद्रीकरण व वेगाने पसरत जाणारी सामाजिक विषमता, असंतोष असा मोठा कॅन्व्हास लोकांपुढे मांडत आहेत. राजन यांचे सद्य:स्थितीतल्या भांडवलशाहीबद्दलचे मत यासाठी महत्त्वाचे आहे की, २००८ मध्ये जग आर्थिक मंदीने ग्रासले जाईल असे भाकीत त्यांनी केले होते आणि असे भाकीत करणारे ते जगातल्या मोजक्याच अर्थतज्ज्ञांपैकी एक होते. राजन आजच्या...
  March 30, 09:10 AM
 • भाजपचे ज्येष्ठ नेते व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण भाजपने हे प्रयत्न मोडून काढण्यासाठी व सरकार स्थिर करण्यासाठी बुधवारी पहाटेपासून प्रादेशिक पक्षांसोबत जे कुरघोडीचे राजकारण सुरू केले त्यामुळे सामान्य माणूस हतबद्ध झाला. बुधवारी पहाटे अडीच वाजता भाजपने आपल्याच सरकारमध्ये सामील असलेल्या महाराष्ट्र गोमंतक पक्षात फूट पाडली. त्या पक्षाच्या तीनपैकी दोन आमदारांना पक्षात सामील करून घेतले आणि...
  March 29, 09:20 AM
 • निवडणुका जवळ असताना एकाएकी ध्रुवीकरणाची लाट तयार करण्याचे भाजपचे प्रयत्न नवे नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशात जेव्हा काही विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असे तेव्हा राष्ट्रवाद उफाळून यावा म्हणून नाट्य घडवून आणण्याचे भाजपकडून प्रयत्न झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असाच एक ड्रामा केला. (योगायोगाने काल जागतिक रंगभूमी दिवसही होता.) आपण राष्ट्राला उद्देशून बोलणार असल्याचे संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून गेले आणि तासभर देश एका तणावपूर्ण परिस्थितीत गेला. २०१६मध्ये मोदींनी...
  March 28, 09:58 AM
 • पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ या प्राचीन मंदिराला हिंदू भाविकांना भेट देता यावी, यासाठी भारताने पाठवलेल्या प्रस्तावाला पाकिस्तानने संमती दिली आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील शीख भाविकांसाठी कर्तारपूर मार्गिका सुरू केल्यानंतर पाकिस्तानचे हे अन्य धर्मीयांविषयी सद्भावना व्यक्त करणारे पाऊल ठरावे. ही घटना घडली असतानाच होळीच्या दिवशी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण अाणि नंतर त्यांचे धर्मांतर करून विवाह लावणाऱ्या एका मौलवीलाही भारताच्या...
  March 27, 09:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात