जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • भाजपचे ज्येष्ठ नेते व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण भाजपने हे प्रयत्न मोडून काढण्यासाठी व सरकार स्थिर करण्यासाठी बुधवारी पहाटेपासून प्रादेशिक पक्षांसोबत जे कुरघोडीचे राजकारण सुरू केले त्यामुळे सामान्य माणूस हतबद्ध झाला. बुधवारी पहाटे अडीच वाजता भाजपने आपल्याच सरकारमध्ये सामील असलेल्या महाराष्ट्र गोमंतक पक्षात फूट पाडली. त्या पक्षाच्या तीनपैकी दोन आमदारांना पक्षात सामील करून घेतले आणि...
  March 29, 09:20 AM
 • निवडणुका जवळ असताना एकाएकी ध्रुवीकरणाची लाट तयार करण्याचे भाजपचे प्रयत्न नवे नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशात जेव्हा काही विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असे तेव्हा राष्ट्रवाद उफाळून यावा म्हणून नाट्य घडवून आणण्याचे भाजपकडून प्रयत्न झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असाच एक ड्रामा केला. (योगायोगाने काल जागतिक रंगभूमी दिवसही होता.) आपण राष्ट्राला उद्देशून बोलणार असल्याचे संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून गेले आणि तासभर देश एका तणावपूर्ण परिस्थितीत गेला. २०१६मध्ये मोदींनी...
  March 28, 09:58 AM
 • पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ या प्राचीन मंदिराला हिंदू भाविकांना भेट देता यावी, यासाठी भारताने पाठवलेल्या प्रस्तावाला पाकिस्तानने संमती दिली आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील शीख भाविकांसाठी कर्तारपूर मार्गिका सुरू केल्यानंतर पाकिस्तानचे हे अन्य धर्मीयांविषयी सद्भावना व्यक्त करणारे पाऊल ठरावे. ही घटना घडली असतानाच होळीच्या दिवशी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण अाणि नंतर त्यांचे धर्मांतर करून विवाह लावणाऱ्या एका मौलवीलाही भारताच्या...
  March 27, 09:52 AM
 • येत्या एक एप्रिल रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील सुमारे २ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पडणार आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पवजा लेखानुदानात मोदी सरकारने गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते आणि त्यासाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. एक एप्रिल रोजी बँक खात्यात पडणारा दुसरा हप्ता असून त्या जोरावर भाजप आपली प्रचार यंत्रणा आक्रमक करण्याच्या प्रयत्नात...
  March 26, 09:26 AM
 • साधारण ५६ पक्ष-संघटनांची महाआघाडी स्थापन करत काँग्रेस व राष्ट्रवादीने युतीसमोर आव्हान उभे केले आहे. शनिवारी मुंबईत दणक्यात महाआघाडीचे नेते एकमेकांचे हात वर करून हम सब एक हैंच्या थाटात उभे राहिलेले दिसले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, त्यांची महाआघाडी ५६ इंच नव्हे तर त्यापेक्षा मोठ्या छातीचाही पराभव करण्यास समर्थ आहे, असे विधान केले. या कार्यक्रमाचे प्रसंग असे काही वठवण्यात आले होते की काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल आहे, जागा निश्चित झाल्याने उमेदवारांची...
  March 25, 09:41 AM
 • शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी हातचे राखत आपापल्या उमेदवारांची घोषणा केली खरी. पण युती करताना झालेल्या तडजोडीवरचा पडदा अजून काही उघडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपकडून कोणते तीन लोकसभा मतदारसंघ हिसकावून घेतले आहेत ते कळायला अजून मार्ग नाही. अर्थात, दोन्ही पक्षांना तडजोडीचे हे कोंबडे फार दिवस काही झाकून ठेवता येणार नाही. येत्या काही दिवसांत राज्यातल्या २३ आणि २५ अशा सर्वच उमेदवारांची घोषणा त्यांना करावीच लागणार आहे. विरोधकांना आपले डावपेच आखण्यासाठी कमीत कमी वेळ मिळावा,...
  March 23, 09:36 AM
 • १८ फेब्रुवारी २००७ रोजी दिल्लीहून लाहोर येथे धावणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये दोन आयडी स्फोट होऊन ६९ प्रवासी ठार झाले होते. मृतांमध्ये बहुतांश पाकिस्तानी प्रवाशांचा समावेश होता. या बॉम्बस्फोटानंतर भारत-पाकिस्तानदरम्यानचे संबंध तर बिघडलेच, पण या बॉम्बस्फोटानंतर देशात हिंदू दहशतवाद ही नवी व्याख्या मांडण्यास सुरुवात झाली. या व्याख्येने देशातील हिंदुत्वाचे राजकारण साहजिकच उफाळले त्याला कारण, या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार व कटकारस्थानातील सर्व आरोपी हिंदू होते आणि ते राष्ट्रीय...
  March 22, 12:41 PM
 • होळी रे होळी... अशी हाळी दिली की पोळी, गोळी, झोळी, मोळी, टोळी असे आपापल्या सोईचे यमक जुळवून जो तो पुढचे वाक्य पूर्ण करतो. त्यातून शृंगार, करुण, हास्य, बीभत्स, रौद्र आदी रसरंगांच्या पिचकाऱ्या परस्परांवर उडवल्या जातात. त्यातही या उत्सवातली धुळवड किंवा शिमगा यांची मजा काही औरच. यंदा तर त्याला सार्वत्रिक निवडणुकीची जोड मिळाली मिळाल्याने राजकीय चिखलफेकीला ऊत आला आहे. एरवी उत्तरेत होळीची धूम अधिक असते, पण सध्या राजकीय शिमग्यात महाराष्ट्र उत्तरेच्या काकणभर पुढे दिसतो. राज्यात चार टप्प्यांत मतदान...
  March 21, 10:12 AM
 • हजारो कोटी रुपयांच्या कर्जात अडकलेल्या आपल्या भावाला तुरुंगवास नको, घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून रिलायन्स उद्योगसमूहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी ५५० कोटी रुपयांची मदत अनिल अंबानी यांना केली आहे. आपल्या मोठ्या भावाने मोक्याच्या वेळी पैसे दिल्याने अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे आभारही मानले आहेत. अंबानी घराण्यातील भाऊबंदकी ते बंधुप्रेम असा हा नातेसंबंधांचा एकूण प्रवास आहे तसेच तो भांडवलशाहीत अनुस्युत असलेल्या हितसंबंधांचाही आहे. बडा...
  March 20, 09:43 AM
 • आधुनिक म्हटले जाणारे जग मात्र बुरसट अशा वंशवाद, इस्लामद्वेष व स्थलांतरितांवरच्या हल्ल्यांचा अनुभव घेत आहे. गेल्या वर्षी प्रख्यात इंग्रजी वृत्तवाहिनी सीएनएनने युरोपमध्ये एक सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणाचा विषय होता युरोपमध्ये वाढत असलेला ज्यू द्वेष. या सर्वेक्षणात ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, हंगेरी, पोलंड व स्वीडन या देशांतील सुमारे सात हजारांहून अधिक नागरिकांची ज्यू समाजाविषयी मते अजमावण्यात आली होती. या सर्वेक्षणात हजारहून अधिक युरोपीय नागरिकांनी युरोपच्या आर्थिक व...
  March 19, 09:30 AM
 • देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे, असं विंदा सांगून गेले. मथितार्थ असा की, केवळ दुसऱ्याकडून घेत न राहता, आपणही समाजाचे काही देणे लागताे या भावनेतून स्वत:चेही दातृत्व वाढवा. अलीकडच्या काळात देणाऱ्याचे हात घ्यावे याचा प्रत्यय अधिकाधिक येऊ लागला आहे. विशेषत: ज्या गतीने जगभरात महिलांचे सबलीकरण हाेत आहे, त्यांच्या वाट्याला जाे पैसा येत आहे त्यावरून दानशूरांच्या आगामी पिढीवर महिला राज स्थापित हाेणार, अशी चिन्हे दिसत आहेत. अर्थात ही बाब साऱ्या...
  March 18, 10:28 AM
 • मुंबई मेरी जान असं म्हणत कोण्याकाळी या शहरावर जीव ओवाळून टाकला जाई. पण आता या शहरात कुणाच्या जानचा भरवसा राहिलेला नाही. कोणी मॅनहोलात गुदमरून मरतं, कोणी ढिगाऱ्याखाली दबतं, कोणी आगीत होरपळतं तर कुणी गर्दीत चेंगरतं. प्रत्येकाला अन्नाला लावणारं हे शहर आज जिवावर उठलंय. त्याला कारण इथल्या कारभाऱ्यांचा कारभार आहे. अडीच दशकं या शहरावर भगवा फडकतोय. भूमिपुत्रांचं इथे अधिराज्य आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कारभार हाकणाऱ्या शिवसेनेने या शहरासाठी परक्या इंग्रजांइतकंही काही केलेलं...
  March 16, 09:52 AM
 • काश्मीर खोऱ्यापासून ते संसदेपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले करणाऱ्या जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक मसूद अझहरला चीनने चौथ्यांदा अभय दिले. गेल्या महिन्यात जैशने पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमेरिका-ब्रिटन-फ्रान्स या तीन देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घाेषित करण्यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. बुधवारी चीनने या प्रस्तावावर नकाराधिकाराचा वापर केला. परिणामी भारतीय परराष्ट्रनीतीचे व...
  March 15, 10:14 AM
 • रफाल, नोटाबंदी, बड्या भांडवलदारांना मोदी सरकारने करून दिलेले मोकळे रान याबाबत एकही शब्द न बोलता गुजरातमधल्या एका सभेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मतदारांना जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. जागरूक असणे हीच देशभक्ती असून मत नावाचे मोठे शस्त्र तुमच्या हाती आहे. कोणालाही न दुखावता, शारीरिक नुकसान न करता मोदी सरकारला या शस्त्राने त्यांची जागा दाखवून द्या असे त्या म्हणाल्या. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचे त्यांचे हे पहिले...
  March 14, 09:56 AM
 • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हल्ली व्याख्याने देतात आणि संशोधन करतात. त्यांचे वय आहे अवघे ५७ वर्षे. त्यांच्या दोन्ही मुली, मलाया आणि साशा राजकारणात येतील, अशी शक्यता नाही. भारतातील एखाद्या नेत्याबद्दल असे घडले, तर आपल्याकडे मात्र हे त्याचे जणू अपयशच मानले जाईल. तहहयात राजकारण करावे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचीही व्यवस्था तोवर करुन ठेवावी, हे भारतीय राजकारणाचे व्यवच्छेदकत्व होत चालले आहे. एखाद्या नेत्याचा मुलगा वा मुलगी असणे ही राजकारणात येण्यासाठीची अपात्रता नक्कीच नव्हे. पण,...
  March 13, 09:38 AM
 • राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अर्थात, त्यांनी राज्यातील महिला आणि बालकांसाठी घेतलेल्या एखाद्या क्रांतिकारी निर्णयामुळे नाही, तर त्यांच्या खात्याशी निगडित निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने. पोषण आहाराचे ठेके वादग्रस्त ठरण्याची पंकजा यांच्या कारकीर्दीतील ही तिसरी वेळ. पोषण आहारातील घोटाळ्याचा पहिला प्रकार बाहेर आला तो चिक्की खरेदीत. त्यात त्यांच्याच पक्षाच्या क्लीन चिट फेम मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही...
  March 12, 10:04 AM
 • सर्वसामान्य माणूस हा भारतीय लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. इंग्लंड- अमेरिकेमध्ये मताधिकारासाठीचे संघर्ष अनेक दशके सुरू होते. भारतात मात्र एका फटक्यात सर्वांनाच मताधिकार मिळाला. सर्वसामान्य माणसाला अवकाश मिळाला आणि त्यातूनच लोकशाहीची वाट प्रशस्त होत गेली. सार्वत्रिक निवडणुकांकडे या अंगाने पहायला हवे. अजिंक्य मानल्या गेलेल्या नेत्यांना आणि पक्षांनाही भारतीय मतदारांनी आजवर पराभवाची धूळ चारली आहे. बलाढ्य आणि एकमेवाद्वितीय समजल्या गेलेल्या काँग्रेससारख्या पक्षाला गेली साडेतीन दशके...
  March 11, 10:19 AM
 • लोकसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होईल. पाठोपाठ मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षीय जाहीरनामे, वचननामे यांचा भडिमार सुरू होईल. त्याद्वारे लोकांना भुलवण्यासाठी मग वारेमाप आश्वासनांची खैरातही करण्यास कोणताच पक्ष मागेपुढे पाहणार नाही. कर्जमाफी, व्याजमाफी, अमुक मोफत, तमुक मोफत, याचा भत्ता, त्याचा भत्ता, बँक खात्यांवर थेट पैसे, एक रुपयात पोटभर जेवण... असे अगणित वादे केले जातील. त्यातून वेगवेगळी स्वप्ने दाखवण्याची चढाओढ नेतेमंडळींमध्ये लागेल. पण, शेवटी पब्लिक है, ये सब जानती है हेच...
  March 9, 09:55 AM
 • आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची केंद्रीय भूमिका आहे #balanceforbetter. सुस्थितीसाठी समतोल. आपल्या आजूबाजूला असा समतोल दिसतो का याचा विचार केला तर काय लक्षात येते? वरवर पाहिले तर भारतात महिला मोठ्या संख्येने शिकू लागल्या आहेत, अधिक महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत. (पण कमावणाऱ्या महिलांची संख्या कमी होते आहे, ही चिंतेची बाब डोळ्यांआड करून चालणार नाही.) विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी जी कार्यक्षेत्रे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती, त्यातली बहुतेक कामे महिलाही करू लागल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातही...
  March 8, 11:22 AM
 • दरोडा, सामूहिक बलात्कार आणि खून यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना दिलेली फाशीसारखी शिक्षा रद्द करून संबंधितांची सर्वाेच्च न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली. ती करतानाच या प्रकरणातील आरोपींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने आर्थिक भरपाई द्यावी तसेच संबंधित तपासी अधिकाऱ्यावरही कारवाई करावी, असा ऐतिहासिक निर्णयही दिला. केवळ न्यायालयीन निकाल एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नसून न्यायव्यवस्थेसह तपास यंत्रणा आणि एकुणातच सामाजिक स्तरावरही त्याचे दूरगामी परिणाम...
  March 7, 10:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात