Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • घटनेला अभिप्रेत असलेल्या तत्त्वांना अनुसरून देशाची व्यवस्था सुरळीत चालवली जावी यासाठी कायदे करण्याचा आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचाही अधिकार संसदेला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील २० मार्च २०१८ पूर्वीच्या तरतुदी पुन:प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव लवकरच संसदेसमोर येणार आहे. या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. ज्यासाठी देशभर आंदोलने झाली आणि १५ पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राणही गमावले त्याच या तरतुदी...
  August 3, 08:18 AM
 • अंडरडॉग्ज जिंकावेत ही बहुतेकांची भावना असते. म्हणूनच क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यातील फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर क्रोएशियाच्या पाठीराख्यांमध्ये वाढ झाली. आकाराने मराठवाड्याएवढा नसलेला आणि लोकसंख्येने पुण्यापेक्षाही कमी. क्रोएशियाने फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारावी याचे क्रीडाप्रेमींना कौतुक वाटले. क्रोएशियाने खेळही तसाच जिगरबाज केला. पिछाडीवर पडल्यानंतरही मोक्याच्या वेळी गोल करून अशक्य वाटणारे विजय मिळवले. अंतिम...
  August 2, 05:03 PM
 • भारतावर सर्वंकष सत्ता राबवण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी येथील एकूण साधनसंपत्तीचा अभ्यास करण्यासाठी विविध क्षेत्रांची आकडेवारी गोळा केली. त्यात जनगणना होती. तो वारसा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण स्वीकारला. अशा जनगणनेतून नागरिकांच्या जगण्याचे सुस्पष्ट चित्र हाती येते. सरकारी योजना समाजातल्या कोणत्या थरापर्यंत पोहोचल्या आहेत, त्याने नागरिकांच्या जीवनशैलीत काय फरक पडला आहे, नैसर्गिक व कृत्रिम संसाधनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान कसे सुधारता येईल याचा एक माहितीस्रोत हाती...
  August 2, 09:15 AM
 • कायदा आणि परिस्थिती कळत असूनही समाजाचे पाठबळ मिळणार नाही किंवा राहणार नाही या भीतीपोटी आपल्याच समाजाला सत्य न सांगू शकणाऱ्या नेत्यांच्या मांदियाळीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे वेगळे ठरले आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टींची जाणीव आपल्या समाजातील आंदोलकांना करून देण्याचे काम त्यांनी सोमवारी केले. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. या आंदोलनाला पेटते ठेवत आपली नेतेगिरीची हौस भागवू इच्छिणाऱ्यांनाही त्यांनी समाजासमोर उघडे करण्याचा प्रयत्न केला. आज ही महाराष्ट्राची गरज आहे आणि राणे यांनी ती...
  August 1, 08:17 AM
 • भारतात जाे पक्ष सत्तेवर असताे, ताे मुक्त अर्थव्यवस्थेचा कट्टर पुरस्कर्ता असताे. मात्र सत्तेवरून पायउतार झाला की मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने बाेटे माेडायला लागताे, हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जाेशी यांनी सांगितलेले मार्मिक सत्य अाजही तंताेतंत लागू पडते. पी.व्ही. नरसिंह राव यांनी १९९१ मध्ये खुल्या अार्थिक धाेरणांचा पुरस्कार केला, डाॅ. मनमाेहन सिंग यांनी प्रामाणिकपणे ताे राबवला. भाजप अाणि संघ परिवाराने त्या वेळी घेतलेली भूमिका अाता काँग्रेस बजावत अाहे. १९९८ ते २००४ या काळात मुक्त...
  July 31, 08:45 AM
 • गेल्या आठवड्यात पाकिस्तानात नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकांत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने बाजी मारली असली तरी हा पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक अशा (१३७ जागा) २१ जागांनी दूर असल्याने अन्य पक्षांशी जुळवाजुळवीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी काही जागांचे निकाल वादग्रस्त असल्याची तक्रार केल्याने अंतिम जागांची घोषणा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने केली नव्हती. मात्र शनिवारी त्यांनी इम्रान खान यांच्या पीटीआयला ११५ जागा...
  July 30, 08:00 AM
 • मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाविषयीचा अहवाल तयार करण्याच्या कामाला अधिक गती द्यावी, अशी विनंती करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. हे सरकारच्या वतीने उशिरा टाकलेले योग्य पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण आरक्षणासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलण्यात हे सरकार दिरंगाई करते आहे, हाच मुख्य आरोप सध्या केला जातो आहे. वातावरण तापायला आणि मराठा तरुणांचा संताप प्रकट व्हायला तेच कारण ठरले आहे, असे म्हटले तर वावगे...
  July 28, 07:35 AM
 • अनेक राजकीय व निवडणूक विश्लेषकांचे अंदाज चुकवत पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदाची माळ माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळ्यात पडली आहे. या निकालाची अधिकृत घोषणा आज पाकिस्तानचा निवडणूक आयोग करणार आहे. पण मतदानाचे कल इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. इम्रान खान यांच्या नया पाकिस्तान या घोषवाक्याला मतदारांनी मनापासून प्रतिसाद दिला आहे. इम्रान खान यांच्या विजयावर सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले असले तरी पाकिस्तानच्या निवडणूक...
  July 27, 08:51 AM
 • राजस्थानमध्ये गोहत्येच्या संशयावरून आणखी एकाची हत्या झाल्यानंतर लोकसभेत आक्रमक चर्चा झाली. झुंडशाहीवर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर केंद्र सरकारने दोन समित्या नेमल्या. लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना, झुंडशाही रोखण्यासाठी आवश्यक वाटल्यास वेगळा कायदा करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या वैचारिक भूमिकेमुळे देशात झुंडशाहीची लाट आल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच हे सरकार नाझी विचारांनी भारलेले आहे,...
  July 26, 08:45 AM
 • मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन दुसऱ्या दिवशी अपेक्षेनुसार तीव्र झाले असले तरी आंदोलकांनी आंदोलनाला दंगलीचे स्वरूप येऊ दिले नाही. बुधवारी राज्याच्या अन्य भागात बंद पाळण्यात येणार आहे. या मोठ्या शहरांतही मराठवाड्याप्रमाणे संयम पाळला जाईल असे वाटते. अन्यथा आंदोलनाला गालबोट लागेल. मुंबईसारख्या शहरात हिंसाचार घडला तर त्याचे पडसाद सर्वदूर पडतात. त्यामध्ये आंदोलनाचेच नुकसान होईल. त्यामुळे आंदोलकांचे नेते काळजी घेत असले तरी त्यांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. काळजीची बाजू आणखी...
  July 25, 07:06 AM
 • लाखोंची उपस्थिती असूनही कमालीची शिस्त आणि संयम हे मराठा आरक्षण मोर्चाचे वैशिष्ट्य असल्याचे गेल्या वर्षात सिद्ध झाले होते. हरियाणा व गुजरातमधील आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा संयम महाराष्ट्राची उच्च संस्कृती दाखवून देणारा होता. महाराष्ट्रातील सर्व ५८ मोर्चे शांततेत पार पडले. कोणत्याही राजकीय नेत्याचा वा पक्षाचा आधार न घेता हे मोर्चे निघत होते. यातून मराठा तरुणांमधील अस्वस्थता प्रगट होत होती. मुंबईतील मोर्चासमोर सरकारतर्फे काही घोषणा करण्यात आल्या. स्कॉलरशिपसाठी मार्कांची...
  July 24, 08:12 AM
 • नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातला अविश्वासदर्शक ठराव फेटाळला जाणार याची कल्पना तेलुगू देसम आणि काँग्रेसला पक्की होती. मोदी सरकारलाही हा ठराव मंजूर होण्याची भीती नव्हती तरी दोन्ही बाजूंनी १२ तासांचा खेळ देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरात खेळला. भाजपप्रणीत एनडीएने ३२५ खासदारांचा घसघशीत पाठिंबा मिळवून दाखवला आणि विरोधी आघाडी जेमतेम १२६ पर्यंतच मजल मारू शकली. यामुळे कशासाठी केला अट्टहास, हा प्रश्न सार्वत्रिक झाला. भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे आडाखे मात्र वेगळे होते....
  July 23, 05:58 AM
 • आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञान प्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील दृकश्राव्य क्षण नुकतेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतनासाठी सुपूर्द केले ही बाब कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला सुखावणारी आहे. डाॅ. नारळीकर यांच्यासारख्या ख्यातनाम संशोधकाच्या आयुष्यातील हे दृकश्राव्य क्षणांचे फुटेज सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा ठरतील यात शंका नाही. यानिमित्ताने जतन-संवर्धन-दस्तऐवजीकरण या कळीच्या मुद्द्याचे पुनर्जागरण झाले...
  July 21, 08:06 AM
 • अविश्वास ठराव मांडला गेला असला तरी नरेंद्र मोदी सरकार पडणार नाही याची खात्री गुरुवार सायंकाळीच पटली होती. तरीही एनडीएचे संख्याबळ किती हे जाणण्याची उत्सुकता होती. त्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन मोदींनी बाजी मारली. याचबरोबर उत्सुकता होती ती सत्ताधारी व विरोधी पक्षातील आरोप-प्रत्यारोपांच्या जुगलबंदीची. अविश्वासाचा ठराव हा क्रिकेट सामन्याप्रमाणे कोट्यवधी भारतीयांनी पाहिला. जुगलबंदीचा आनंद त्यांनी मनमुराद लुटला. ११ तासांचे भरभक्कम मनोरंजन नेटफ्लिक्सवरील खळबळजनक मालिकाही...
  July 21, 06:16 AM
 • दगडधोंड्यांच्या देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा हे एरवी कविकल्पनेत ठीक असले तरी शेतीवर अवलंबून ५५ टक्के मराठीजनांसाठी हे वास्तव आव्हान निर्माण करणारे आहे. हमखास पावसाचा प्रदेश महाराष्ट्रात तोकडा आणि अवर्षणप्रवण, दुष्काळी तालुक्यांची भरमार ही वस्तुस्थिती आहे. पावसावर अवलंबून शेती ८० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ओलिताची सोय असणारी जेमतेम १९ ते २० टक्के. त्यामुळे बिनपाण्याची शेती हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सर्वात मोठे आणि परंपरागत, शतकानुशतकांपासूनचे दु:ख आहे. पंजाब-हरियाणाचे...
  July 20, 06:20 AM
 • केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात झुंडशाहीला कधी नाही ते बळ मिळाले. झुंडशाहीच्या घटना पूर्वीचे सरकार असताना घडल्या नव्हत्या असे नाही, पण त्या झुंडशाहीच्या घटनांमध्ये धर्मांधतेचा, जातीयतेचा वास नसे. विद्यमान मंत्री त्याचे समर्थन करत नसत. झुंडशाहीबरोबर फोटो काढत नसत. झुंडशाहीला चिथावणी देणाऱ्यांना निवडणुकांची तिकिटे दिली जात नसत. पण केंद्रात बहुमताने भाजपचे सरकार आल्याने हिंदुत्ववादी शक्तींमध्ये आपण देशात कुठेही-काहीही करण्यास मोकळे आहोत, असा भलताच आत्मविश्वास आला आहे. आपल्याच...
  July 19, 01:11 PM
 • सहकारी आणि खासगी दूध संघ सध्या जो दर दूध उत्पादकांना देतात त्या दरात दुग्धोत्पादन करणे म्हणजे राहत्या घराची खांडे-दांडे रोज काढून विकण्यासारखे आहे. दुसरीकडे दूध विकत घेणाऱ्या ग्राहकांना किफायती दरात दर्जेदार दूध मिळते का, या प्रश्नाचे उत्तरही अत्यंत नकारात्मक आहे. निर्भेळ, सकस दूध किफायती दरात मिळणे हे उंबराच्या फुलापेक्षाही दुर्मिळ आहे. एवढेच काय, पण सध्याच्या सरासरी चाळीस रुपयांपेक्षा जास्त प्रति लिटर दराने विकले जाणारे दूधसुद्धा विकत घेणे सामान्यांना परवडत नाही. म्हणजेच दूध...
  July 18, 07:40 AM
 • लोकसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना अर्थव्यवस्थेपुढच्या समस्या व बेरोजगारीच्या प्रश्नावर आपली पाच वर्षांतील कामगिरी जनतेपुढे ठेवण्यापेक्षा मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रश्न आणि राम मंदिर हे मुद्दे राजकारणात पेटत ठेवल्यास होणारे ध्रुवीकरण आपल्या फायद्याचे असल्याची खात्री भाजपला पटली आहे. त्या दृष्टीने भाजपची शिस्तबद्ध पावले पडायला सुरुवात झाली आहे. तसा नारळच भाजपच्या मोदी, शहा, निर्मला सीतारमण या तीन शीर्ष नेत्यांनी - शिलेदारांनी फोडला. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे...
  July 16, 07:49 AM
 • समलैंगिकतेला गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवायचे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या विषयावर मोदी सरकारकडून ठामपणे प्रागतिक, विज्ञानवादी भूमिका न्यायालयापुढे मांडणे शक्य नव्हते. कारण लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने रोज नवनवे कल्पक धार्मिक अजेंडे पोतडीतून बाहेर येत आहेत. अशा काळात समलैंगिक संबंधांचे कलम ३७७ रद्द करावे ही स्पष्ट भूमिका घेऊन सनातन्यांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयानेच ते योग्य की अयोग्य ठरवावे, हा पळपुटेपणा सरकारला सोयीचा वाटला....
  July 14, 08:06 AM
 • १९९५ मध्ये काेकणवासीयांना एन्राॅनने अाणि त्यापाठाेपाठ जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाने अस्वस्थ केले. अाता नाणारच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची भर पडली. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अामदारांनी या प्रकल्पाला विराेध दर्शवत विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांतील कामकाज दाेन दिवसांपासून बंद पाडले अाहे. सत्तारूढ शिवसेनेने केलेली राजदंडाची पळवापळवी हा तर पाेरकटपणाच ठरावा. उल्लेखनीय म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेने प्रकल्पाबाबत काेणताच अाक्षेप नाेंदवला नाही, मात्र...
  July 13, 07:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED