जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • निम्म्या महाराष्ट्रात, म्हणजे ३५८ पैकी १७९ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे सरकारने आज जाहीर केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती या सर्व तालुक्यांत लागू झाल्या आहेत. ज्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस याबाबतीत घोषणा करत होते त्या वेळी त्यांच्याच मित्रपक्षाचे नेते उद्धव ठाकरे त्यांच्यावर याच मुद्द्यावरून टीका करत होते. दुष्काळसदृश परिस्थितीऐवजी थेट दुष्काळाचीच घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही, असा त्यांच्या टीकेचा सूर होता. वास्तविक दुष्काळ...
  October 24, 08:49 AM
 • काही वर्षांपूर्वी सीबीआयमधील पराकोटीचा सत्तासंघर्ष व या संस्थेवरील सरकारचा अंकुश पाहून ही संस्था सरकारी पोपट आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. वास्तविक सीबीआय स्वायत्त गुन्हे तपास यंत्रणा आहे. परंतु, सीबीआयची एकूणच कामगिरी पाहता या संस्थेची स्वायत्तता व विश्वासार्हता हे मुद्दे चर्चेतून केव्हाच गायब झाले. सीबीआयचे काही अधिकारी भ्रष्ट आहेत. सत्ता कोणाचीही असो, सत्ताधारी या संस्थेचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम करण्यासाठी करत असतात, यातही आता नावीन्य...
  October 23, 09:23 AM
 • दसऱ्याच्या दिवशी झालेल्या अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील बळींची संख्या ६०च्या पुढे गेली आहे आणि हा अपघात नेमक्या कुणाच्या हलगर्जीपणाने, बेजबाबदारपणाने वा निष्काळजीपणाने घडला. याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासन, पोलिस व स्थानिक प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकाच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मानले तर चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो. रेल्वेचे म्हणणे आहे की, ज्या रेल्वेमार्गाच्या ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम सुरू होता त्याची अधिकृत माहिती रेल्वे...
  October 22, 09:42 AM
 • भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज चित्रपट दिग्दर्शक होऊन गेले. थेट ऑस्करपर्यंत बाजी मारणारे चित्रपटही इथल्या इंडस्ट्रीने दिले आहेत. तरीही शोमॅन म्हटले की समोर येतात ते फक्त राज कपूर. लोकांना काय हवं आहे हे त्या माणसाने पक्के ओळखले होते. नुसते ओळखलेच नव्हते, तर त्यांच्यासमोर त्यांच्या अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक चमकदार आणि आकर्षकपणे त्यांनी ते त्यांच्या चित्रपटांमधून सादरही केले. बऱ्याचदा चित्रपटांच्या कथांची नक्कलही केली. पण तरीही आपल्या चित्रपटाची कथाच खरी मूळ कथा आहे आणि तीच...
  October 20, 10:30 AM
 • स्वातंत्र्योत्तर भारतात केरळ हे एकमेव राज्य होते जिथे पहिले कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले होते. नंतर केरळमध्ये आलटूनपालटून काँग्रेस व डावे सत्तेवर येत असले तरी तो डाव्यांचा गड म्हणून पाहिला जातो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत हिंदी भाषिक राज्ये भाजपकडे वळली असताना पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या मोठ्या राज्यांनी मात्र मोदी लाट थोपवून धरली होती. गेली चार वर्षे भाजप पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये घुसखोरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यातल्या त्यात केरळमधील...
  October 19, 09:51 AM
 • अाज दसरा... या दिवसाचे, विशेषत: उत्सवी वातावरणात साजऱ्या हाेणाऱ्या सीमाेल्लंघनाचे जसे अनेक पाैराणिक संदर्भ अाहेत तसेच ते अाधुनिक वर्तमानातही दडलेले अाहेत. सीमाेल्लंघन केवळ पांडवांनीच केले असे नव्हे, तर अापणही दैनंदिन जीवनात ते करीत असताे. कुरुक्षेत्र तर सामान्यांच्या वाट्याला कायमचेच अाले अाहे. अापल्या देशातील ८० टक्के लाेक जीवनाच्या कुरुक्षेत्रावर दरराेज हातघाईची लढाई लढत असतात. काहींचा जय तर काहींचा उरस्फाेट हाेताे. म्हणूनच अापल्याही प्रश्नांची साेडवणूक करणारा श्रीकृष्ण भेटावा...
  October 18, 08:03 AM
 • उन्हाळ्याच्या झळा जशा वाढत जातात तसा मराठवाडा आणि नाशिक-नगर जिल्ह्यातील पाणी तंटाही तीव्र होत जातो हा आजवरचा अनुभव. यंदा मात्र ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागताच पाणीवाटपाच्या वादाला तोंड फुटले आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या बैठकीत पाणीसाठ्याच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप करीत वादाला सुरुवात झाली आहे. पाणी हा सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्यावरचा तोडगा आक्रस्ताळेपणातून नव्हे तर समन्यायी भूमिकेतूनच निघू शकतो, हे सर्वप्रथम समजावून घ्यायला हवे. या वर्षी...
  October 17, 08:54 AM
 • २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल घोषित झाली आहे. महिनाभरातच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्यापैकी तीन हिंदी हार्टलँड अशी म्हणता येतील- राजस्थान, मध्य प्रदेश,छत्तीसगड. सध्या हाती आलेल्या आकडेवारीवरून तरी या तीन राज्यांमध्ये भाजप काँग्रेसच्या मागे असल्याचा अंदाज लावता येईल. सीव्होटरच्या सर्वेक्षणात राजस्थानमध्ये काँग्रेसची आगेकूच झाली. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये खूप कमी फरकाने काँग्रेस पुढे आहे. पण सध्याच्या काळात राजकारणातील एक आठवडाही खूप मोठा असतो. ही तर...
  October 17, 08:45 AM
 • लोकनियुक्त सरकारने राज्यघटना-कायद्याबरोबर नैतिकता पाळावी हा संकेत असतो. एखाद्या मंत्र्यावर गंभीर आरोप लागल्यानंतर त्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही संसदीय राजकारणातील नैतिकता आहे. त्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने तो मंत्री दोषी ठरतो असा त्याचा अजिबात अर्थ नसतो. आरोपांची शहानिशा पोलिस व न्यायव्यवस्था करत असते. न्यायव्यवस्थेचा निर्णय अंतिम असतो. लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असताना एका रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी...
  October 16, 05:07 PM
 • #metoo या नावाने अमेरिकेत सुरू झालेली, लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणारी चळवळ आज ना उद्या भारतापर्यंत पोहाेचणारच होती. भारतातल्या महिलांना त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी झालेल्या अत्याचारांबद्दल, छळाबद्दल आवाज उठवावासा वाटला, याचं स्वागत करायला हवं. गेल्या आठवड्यात अभिनेता नाना पाटेकर याने १० वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर कसा छळ केला होता याची अभिनेत्री तनुश्री दत्ताने जाहीर वाच्यता केली आणि भारतीय महिलांनी इतके दिवस दाबून ठेवलेल्या अनुभवांवरचं झाकण उघडलं. यात मुख्यत्वे पत्रकार...
  October 11, 09:20 AM
 • आत्मविश्वास ही बहुतांश वेळा दाखवण्याचीच बाब असते. राजकारण्यांमध्ये तर ती तेवढ्यासाठीच असते असा पक्का समज आहे. निवडणुका जसजशा जवळ यायला लागतात तसतसे आत्मविश्वासाचे प्रदर्शन वाढत जाते. दाखवला जात असलेला आणि प्रत्यक्षात असलेला आत्मविश्वास यातला फरक इतरांना कळत असतो. पण त्याचे भान राजकारणात ठेवायचे नसते. या कलेत जो जास्त मातब्बर तो पक्का राजकारणी असे म्हणतात. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही मातब्बरी सिद्ध करण्याची स्पर्धा करताहेत, असे सध्याचे चित्र आहे. राज्यातल्या लोकसभेच्या...
  October 10, 07:31 AM
 • नवे उद्योगधंदे देशात प्रस्थापित होताना दिसत नाहीत. व्यापारउदीम मंदावलेला आहे. परिणामी रोजगार निर्मिती थंडावली आहे. परकीय गुंतवणूकदार भारतातली गुंतवणूक काढून घेत आहेत. इराण-रशियासोबतच्या व्यापारी आणि संरक्षणविषयक संबंधांमुळे अमेरिकेची वक्रदृष्टी पडण्याची चिन्हे आहेत. रुपयाच्या ऐतिहासिक गटांगळ्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा चढू लागल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी समाधानकारक फारसे काही घडताना दिसत नाही. हे कमी की काय म्हणून...
  October 8, 10:17 AM
 • युद्ध असो वा यादवी यात पुरुषत्व गाजवण्याची एक विकृत मानसिकता जेत्यांकडून दिसून येते. स्त्रियांवर बलात्कार करून एखाद्या समाजामध्ये भय निर्माण करणे, त्या समाजाचा अवमान करणे हे गोळी मारण्यापेक्षा सोपे असते. आफ्रिकेतील उत्तर कांगो व आशिया खंडातील उत्तर इराक हे वांशिक हिंसाचाराला, यादवीला बळी पडलेले भूप्रदेश. इथे धर्म, अस्मितेच्या नावावर केवळ माणसे मारली गेली नाहीत, तर हजारो स्त्रियांवर-मुलींवर बलात्कार केले गेले, आयुष्यभर लक्षात राहील अशा रीतीने हजारो स्त्रियांच्या कमरेखाली शारीरिक...
  October 6, 08:03 AM
 • आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे बोट दाखवत अखेर केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात पाच तर -डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली. हे पाऊल इराण-अमेरिका संबंधात वेगाने येणारी कटुता पाहता अगोदर टाकले असते तर आज मोदी सरकारविरोधात जो मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक संताप निर्माण झाला आहे तेवढा वाढला नसता. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींनी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे आमच्या हातात नाही, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत, असे उद्दाम उत्तर दिले होते. त्यांचे अर्धे...
  October 5, 09:00 AM
 • भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या औरंगाबादमधील सभेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. तो अपेक्षितही होता. कारण या आघाडीसाठी ही प्रतिष्ठेची सभा होती. ज्या बहुजन आणि मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवून ही आघाडी तयार झाली आहे ती मतपेटी सर्वाधिक मोठी औरंगाबादमध्येच आहे. इथेच सभा फसली असती तर आघाडीच्या अपेक्षाच संपल्या असत्या. त्याहीपेक्षा तसे झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक आनंद झाला असता. कारण ही आघाडी मुळात स्थापनच या दोन्ही काँग्रेसला...
  October 4, 08:54 AM
 • राजकारणात वेळ महत्त्वाची असते. वेळ पाहून वादग्रस्त, संभ्रम वाढवणारे विधान करण्याची व अशा विधानांनंतर यू टर्न घेण्याचीही तयारी असावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजूबाजूला काय घडतेय याचा अदमास घेत वेळ पाहून वक्तव्य करण्यात तरबेज आहेत. तसेच ते यू टर्न घेण्यातही तत्पर असतात. ते अमित शहा यांच्यासारखे भारतीय राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जात नसले तरी देशाच्या राजकारणातले कसलेले नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. अमित शहा भाजपच्या व्यूहरचना रचतात, तर पवार इतर पक्षांच्या...
  October 3, 10:25 AM
 • वसुधैव कुटुंबकम या सिद्धांतावर भारताचा दृढ विश्वास अाहे. हेच तत्त्व अाधारभूत मानून संयुक्त राष्ट्र संघाचा कारभारदेखील एखाद्या कुटुंबाप्रमाणे चालवण्याची किंबहुना त्या धर्तीवर या अांतरराष्ट्रीय मंचाची भूमिका निश्चित करण्याची वेळ अाली अाहे. काेणतेही कुटुंब सततच्या कलहाने नव्हे, तर समंजसपणा, समन्वय अाणि विश्वासाच्या अाधारावर टिकते. मात्र काही राष्ट्रांच्याच हिताचे निर्णय संयुक्त राष्ट्र संघात, सुरक्षा परिषदेत हाेत असतात. त्यामुळे अविकसित, विकसनशील देशांसमाेरील प्रश्न...
  October 1, 08:45 AM
 • सर्वाेच्च न्यायालयाने सलग दुसऱ्या दिवशी महिलांचे अधिकार अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक वयाेगटातील महिलांना शबरीमला मंदिरातील प्रवेशाचा मार्ग शुक्रवारी खुला करत असताना सामाजिक परिवर्तन रुजवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नव्हे, तर या निमित्ताने धर्माशी निगडित अावश्यक मुद्द्यांच्या संदर्भात न्यायालयाने व्याख्या करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला अाहे. केरळच्या शबरीमालामधील शैव अाणि वैष्णवांचा समन्वय अतिशय अद््भुत असाच अाहे. तथापि, येथे १० ते ५०...
  September 29, 08:20 AM
 • आधुनिक मूल्ये ही मत आणि व्यक्तिस्वातंत्र्याशी अधिक निगडित असतात. समाज प्रवाही राहण्यासाठी माणूस बंधनातून मुक्त असण्याची गरज असते. मुक्त असणे म्हणजे स्वैराचार नव्हे. मुक्त म्हणजे व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाजात सुसंवाद, सलोखा, समता असणे गरजेचे आहे. समाजाच्या वर्तनाला नियंत्रित करण्यासाठी कायद्याची गरज असते. पण कायद्याने माणसाचे जगणे नियंत्रित करणे, त्याच्यावर देखरेख ठेवणे हे आधुनिक मूल्य नव्हे. गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना परवानगी देणारे ३७७ कलम,...
  September 28, 09:45 AM
 • आधार कार्डाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सारासार विचाराचे चांगले उदाहरण आहे. निकालातील काही मुद्दे गोंधळात पाडणारे असले तरी असे मुद्दे एक-दोनच आहेत. आधार कार्डाला राज्यघटनेचा आधार आहे की नाही, हा वादाचा मुख्य मुद्दा होता. गेली दोन वर्षे लहानसहान कामांसाठीही आधार क्रमांक अनिवार्य केला जात होता. हे हास्यास्पद तसेच त्रासदायकही होते. आधार क्रमांक सांगण्याची वा तो क्रमांक घेण्याची सक्ती हे नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आक्रमण आहे, अशी टीका होत होती. काँग्रेस या...
  September 27, 09:29 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात