जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • पंजाबमधील डेरा नानक साहिब या सीमेवरील शेवटच्या गावापासून ते पाकिस्तानच्या सीमेपर्यंत विशेष कर्तारपूर काॅरिडाॅर विकसित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह ठरावा. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीचे अाैचित्य साधून शीख भाविकांना ही अागळी भेट देण्याचा विचार जितका प्रशंसनीय अाहे, तितकेच भारत-पाक मैत्रीचा अाणखी एक राजमार्ग ठरू जाणाऱ्या या काॅरिडाॅरवरील धाेका अाेळखणेदेखील महत्त्वाचे ठरते. वस्तुत: या काॅरिडाॅरसाठी पुढाकार काेण घेणार याविषयी भारत अाणि पाकिस्तान सरकार...
  November 24, 06:22 AM
 • राज्यपालपद घटनात्मक असले तरी प्रशासकीय कामे वगळता केंद्र सरकारकडून आलेल्या राजकीय आदेशांचे काटेकोर पालन करणे, विरोधी पक्षांच्या राजकारणात खो घालणे असे राज्यपालांचे एक काम असते. सहा महिन्यांपूर्वी भाजपने अचानक पीडीपीचा पाठिंबा काढून घेत जम्मू -काश्मीरची विधानसभा अनिश्चित काळासाठी निलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी भाजपने, काश्मीरमधील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता तेथे राज्यकारभार चालवणे कठीण असल्याचे कारण दिले होते. वास्तविक याच भाजपने जम्मू-काश्मीरच्या विधानसभा...
  November 23, 06:14 AM
 • मराठा अारक्षणाच्या मुद्द्यावरून खदखदणारा राजकीय अंतर्विराेध अखेर चव्हाट्यावर अाला. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या तर शिवसेनेने भाजपच्या भूमिकेशी विसंगत पवित्रा घेतल्यामुळे अाघाडी अाणि युतीतदेखील किती विसंवाद अाहे, हे स्पष्टच झाले. राज्य मागासवर्ग अायाेगाचा अहवाल विधिमंडळात मांडण्याचा अाग्रह काँग्रेसने धरला; मात्र घटनात्मक पेच निर्माण हाेणार असेल तर ताे सभागृहात मांडू नये, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली. याशिवाय मुस्लिम समाजाला धर्माच्या अाधारावर अारक्षण देता येणार नाही, असे...
  November 22, 06:27 AM
 • रिझर्व्ह बँक अाणि केंद्र सरकारमध्ये रंगलेल्या मानापमान नाट्यावर अखेर समेटाचा पडदा पडला. भारतीय अर्थकारण प्रवाही राखण्याच्या दृष्टिने हे शुभचिन्ह ठरावे. वस्तुत: कुठलीही संस्था ही कार्यरत व्यक्तीपेक्षा माेठी असते. काही वेळा अशी गल्लत हाेते की, व्यवस्थेतील मंडळी सत्ताधिशांचे बाहुले बनतात. अर्थातच ही भूमिका वठवणे जेव्हा या मंडळीच्या अंगलट येवू लागते, तेव्हा राजकारण्यांना दाेष देवू लागतात. रघुराम राजन यांना नाकारलेली मुदतवाढ, उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी वर्णी, केंद्र सरकार-रिझर्व्ह...
  November 21, 06:18 AM
 • पंजाब तूर्त शांत असला तरी बंडखाेरीला पुन्हा हवा देण्याचे, खतपाणी घालण्याचे बाहेरून प्रयत्न हाेत अाहेत. यासंदर्भात वेळीच कारवाई केली नाही, तर फार उशीर झालेला असेल, असे संकेत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिले आहेत. त्यास फारसा कालावधी लाेटत नाही ताेच अमृतसर जवळील निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना काश्मिरप्रमाणे ग्रेनेड हल्ला झाला. पंजाबमध्ये जी खदखद सुरू अाहे, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही त्याचीच ही परिणीती म्हणावी. वस्तुत: देशभरात जी राजकीय खदखद, सामाजिक असंताेष दिसून येताे,...
  November 20, 07:02 AM
 • फ्लिपकार्टचे सहसंस्थापक-सीईअाे बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्याने भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात संशयाचे एक नवे पीक आणले आहे. फ्लिपकार्ट कंपनीला विकत घेऊन ज्या अमेरिकन वाॅलमार्ट कंपनीने बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांना अब्जाधीश बनवून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली त्याच वाॅलमार्टने बिन्नी यांच्या प्रतिमेवर मोठा डाग असल्याचे दाखवून त्यांना कुप्रसिद्धी देण्याचे काम केले आहे. बन्सल यांनी राजीनामा दिला असला तरी त्या मागचे खरे कारण काय, असा प्रश्न भारतीय कंपनी विश्वात विचारला जाऊ...
  November 17, 06:23 AM
 • मराठा समाजाला शैक्षणिक व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची शक्यता असलेला शिफारस अहवाल गुरुवारी अखेर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे सुपूर्द केला. या अहवालात मराठा समाज मागास आहे असा निष्कर्ष आयोगाने काढल्याचे बोलले जाते. त्याने मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काल शनिशिंगणापूर येथे मुख्यमंत्र्यांनी येत्या १५ दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी ग्वाही देत १ डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा असे आश्वासनही दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन हा पूर्ण राजकीय खेळ...
  November 16, 06:18 AM
 • देशात सध्या रफाल कराराचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडत आहेत. देशातील विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसने या मुद्द्यावरून रान उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांच्यावर झालेल्या व्यवहारावरून दररोज टीकास्त्र सोडले जात आहे. या वेळी केल्या जात असलेल्या टीकेची पातळी हाही एक वादाचा मुद्दा आहेच. सरकारने मात्र यावर सावध पवित्रा घेतलेला आहे. एरवी विरोधकांनी आरोप केले की त्यांच्यावर तुटून पडणारी सत्ताधाऱ्यांची यंत्रणा या...
  November 15, 06:35 AM
 • मराठवाडा असे प्रांतीय नाव असलेल्या नियतकालिकाचे संपादक असूनही समस्त मानव कल्याणाचीच भाषा बोलणारे आणि त्यासाठीच आयुष्यभर लेखणी झिजवणारे संपादक अनंत काशीनाथ भालेराव यांचा आज ९९ वा जन्मदिवस. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होतो आहे. नियतकालिक मोठे की त्याचा संपादक मोठा, या प्रश्नाला नि:संदिग्धपणे संपादक मोठा असे उत्तर देता यावे, अशा काळात अनंतरावांनी पत्रकारिता केली. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून अा.कृ. वाघमारे यांनी हे साप्ताहिक सुरू केले होते....
  November 14, 06:35 AM
 • २८ जून १९१४ रोजी युगोस्लाव्हची राजधानी साराएव्हो येथे ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा वारसदार आर्च ड्यूक फर्डिनांड याची एका माथेफिरूने हत्या केली. ही हत्या पहिल्या महायुद्धाची ठिणगी म्हणून कारणीभूत ठरली. बलाढ्य ऑस्ट्रियाने सर्बियाच्या विरोधात युद्ध पुकारले आणि बघता बघता हे युद्ध संपूर्ण युरोपात पसरत गेले. फ्रान्स, रशिया, ब्रिटन ही दोस्त राष्ट्रे विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी ही राष्ट्रे असे दोन तट पडले. इटली ऐनवेळी दोस्त राष्ट्रांकडे वळाला. ऐन मोक्याच्या वेळी अमेरिकेने दोस्त...
  November 13, 10:28 AM
 • केंद्र शासनाने जाहीर केलेला उसाचा हमी दर, त्याच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारचे मिळमिळीत धोरण, उच्च न्यायालयाचे आदेश, साखर आयुक्तालयाची कृती आणि सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या स्तरावर होणाऱ्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष स्थिती या साऱ्या मुद्द्यांचा एकत्रित विचार केला तर ऊस दरातील गफलत शेतकऱ्यांना कशी भोवते आहे, याचा उलगडा होईल. दोन्ही सरकारे, प्रशासन आणि कारखानदार या तिन्ही स्तरांवर सध्या चालू असलेला आकडेवारीचा खेळ शेतकऱ्यांना नुकसानीत टाकणारा होतो आहे. गतवर्षीच्या...
  November 12, 06:30 AM
 • नोटबंदीच्या दोन वर्षपूर्तीनंतरही ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य का अयोग्य यावरची चर्चा अजूनही चालूच आहे. नोटबंदीचे समर्थक आणि विरोधक हे दोघेही बंदीच्या एक वर्षानंतर जे दावे-प्रतिदावे करत होते, त्यात आकडेवारीशिवाय फारसा बदल झालेला नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गैरसोईच्या मुद्द्यांबद्दल एक अवाक्षरही काढलेले नाही. चर्चा व्हायलाच हवी. निवडणुकांमुळे ती वाढेलही. पण ती देशाची अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून गुणवत्तेच्या आधारे व्हायला हवी. त्याचे भान ना सत्ताधाऱ्यांना आहे ना...
  November 10, 09:42 AM
 • भारतीय राजकारणास या दिवाळीने दाेन संदेश दिले अाहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशात दीपाेत्सव अयाेध्या २०१८च्या निमित्ताने भाजपने केलेली धूम, दुसरे कर्नाटकातील लाेकसभेच्या तीन, विधानसभेच्या दाेन जागांसाठीच्या पाेटनिवडणुकीत काँग्रेस-जद (नि) अाघाडीने ४-१ अशा फरकाने भाजपवर मिळवलेल्या विजयाचा जल्लाेष. एकीकडे धर्म अाणि राजकारणाचे भ्रामक एेक्य, दुसऱ्या बाजूला स्थिरतेचा संभ्रम निर्माण करणाऱ्या विराेधी पक्षांच्या अाघाडीची अाश्वासक एकता. एका अर्थाने भारतीय लाेकशाहीची ही दोन रूपे या दिवाळीने...
  November 8, 06:30 AM
 • नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर मंगळवारी उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत लक्षलक्ष दिव्यांच्या साक्षीने फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या ठेवण्याची घोषणा केली. अयोध्येत अद्ययावत विमानतळ व मेडिकल कॉलेजही उभे करण्याची त्यांनी घोषणा केली. मेडिकल कॉलेजचे नाव दशरथ तर विमानतळाचे नाव श्रीराम असावे अशी आपली इच्छा असल्याचे योगी म्हणाले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशात रामराज्य यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली नाही. कदाचित त्यांच्या दृष्टीने ते मुख्यमंत्री झाले म्हणजे...
  November 7, 06:44 AM
 • मानव अाणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष भविष्यात कळीचा मुद्दा ठरणार अाहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, राळेगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या अवनी वाघिणीच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा अधाेरेखित झाली. अवनीसंदर्भात राज्य अाणि केंद्र सरकार तसेच न्याययंत्रणा काय भूमिका घेते याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले हाेते. मात्र, या निमित्ताने जाे गहजब माजला त्यावरून आपल्याकडे वास्तवाचे भान अतिशय ताेकडे असल्याची प्रचिती अाली. यातील महत्त्वाचा भाग असा की, १९७२ नंतर वन्यजीवांच्या शिकारीवर अालेली...
  November 5, 06:33 AM
 • दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय जेव्हा अमलात आणला तेव्हाच सरकार व रिझर्व्ह बँकेदरम्यान संवादाचा पूल नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नोटांना कागज के तुकड्याची उपमा देणारा तुघलकी निर्णय रिझर्व्ह बँकेचा नव्हता, तर तो सत्तेत बसलेल्या काही मोजक्याच नेत्यांच्या सुपीक मेंदूतून आणि या सत्तेला सल्ला देणाऱ्या अर्थसल्लागारांच्या अज्ञानातून आला होता हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले. गेल्या शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात, जे...
  November 1, 06:13 AM
 • वसंतराव नाईक हे आतापर्यंत सलग सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले राजकीय नेते. त्यांच्यानंतर हा विक्रम केला तो विलासराव देशमुख यांनी. पण दोघांच्या कालखंडात मोठा फरक आहे. वसंतराव ११ वर्षे दोन महिने सलग मुख्यमंत्री होते, तर विलासरावांना चार वर्षे एक महिना सलग या पदावर राहता आले होते. महिनाभरानंतर हे दुसरे स्थान विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार आहे. कारण आज त्यांनी आपल्या पदावर सलग चार वर्षे काम करून तिसरे स्थान मिळवले आहे. शिवसेनेकडून मनोहर...
  October 31, 06:27 AM
 • काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेचे सध्याचे पदच्युत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे पदावर असताना भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीला एक आठवडा पूर्ण हाेण्याच्या आत गेल्या शुक्रवारी त्यांची राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी पंतप्रधानपदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी माजी पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांना पुन्हा बसवले. हे सगळे सत्तानाट्य इतके अनपेक्षितपणे घडले की, या सत्तांतरामागे चीन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्या...
  October 30, 06:17 AM
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निमंत्रणाला अखेर ठेंगा दाखवला. अर्थात हे अगदीच अनपेक्षित नव्हते. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा दाेन वेळा भारत दाैऱ्यावर अाले अाणि प्रजासत्ताक दिन साेहळ्यात सहभागी झाले. त्या वेळीदेखील जानेवारीमध्ये स्टेट अाॅफ द युनियन अॅड्रेस प्रस्तावित हाेते. परंतु त्यांनी अमेरिकेतील सर्व कार्यक्रम स्थगित केले हाेते. उल्लेखनीय म्हणजे ट्रम्प यांना फेब्रुवारीमध्येही भारत भेटीचे निमंत्रण देण्यात अाले तरीही त्यांनी अव्हेर...
  October 29, 07:30 AM
 • सीबीआयमधील यादवीकडे सर्वोच्च न्यायालय कोणत्या नजरेतून पाहते व त्यावर नेमका काय आदेश देते हा सरकार, भारतीय पोलिस सेवा व विरोधी पक्ष यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय होता. कारण सीबीआयचे प्रमुख संचालक आलोक वर्मा व क्रमांक दोनचे विशेष महासंचालक राकेश अस्थाना हे दोघे भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्यात सेवाज्येष्ठता वा अन्य पदावरून संघर्ष नव्हता, तर अस्थाना यांच्यावर मोदी सरकारने टाकलेल्या जबाबदारीवर, त्यांच्या सचोटीबद्दल, वकुबाबद्दल वर्मा यांचा आक्षेप होता....
  October 27, 06:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात