Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • एकाग्रता व धाडस ही वाघाची वैशिष्ट्ये. वाघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपली शिकार लपूनछपून करतो. जंगलात वाघाला स्वत:चे मित्र नसतात. असतात ते त्याचे शत्रूच. शिवसेना स्वत:ला वाघ समजते व आपल्या कार्यकर्त्यांना मावळे. वाघाला जे वन्यप्राण्यांमध्ये ग्लॅमर आहे तसे राजकारणात आपल्याला आहे, असा शिवसेनेचा समज आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास शिवसेना हा राजकारणात नेहमीच दुय्यम पक्ष राहिला आहे. १९९५ वा २०१४ ची निवडणूक असो, भाजपशी त्यांना सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. त्यामुळे...
  April 10, 02:10 AM
 • संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अारंभ अाणि अखेर गदाराेळातच झाली. सर्वसाधारण अर्थसंकल्पातील तरतुदी, त्यावरील कपात प्रस्ताव, विस्तृत चर्चा असे काहीच न हाेता वित्त विधेयक मंजूर केले गेले. उल्लेखनीय म्हणजे काेणत्याही एका तरतुदीवर किमान मिनिटभरदेखील चर्चा न हाेता संसदेत अर्थसंकल्प मंजूर झाला. हा अापल्या संसदीय इतिहासातील कदाचित पहिलाच प्रसंग ठरावा. या वित्त विधेयकात राजकीय पक्षांना विदेशातून मिळणारी देणगी पूर्वलक्षी प्रभावाने कायदेशीर करणे, उद्याेगपतींनी दिलेल्या राजकीय...
  April 9, 02:00 AM
 • २००२ मध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली अरब लीग शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या माध्यमातून सौदी अरेबियाने अरब लीगच्या वतीने एक शांतता प्रस्ताव इस्रायलपुढे ठेवला होता. या प्रस्तावात १९६७च्या युद्धात इस्रायलने जेवढा काही भाग (गोलन खिंडीसह) बळकावला आहे तेथून त्यांनी आपले सैन्य माघारी बोलावण्याची तरतूद ठेवली होती व भविष्यात असा संघर्ष पुन्हा उफाळू नये, अरब लीग इस्रायलशी शांतता करार करण्यास तयार असल्याची अट होती. अर्थात, या प्रस्तावावर ठोस असे काहीच घडले नाही, पण...
  April 7, 02:00 AM
 • राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणात आरोपी असलेल्या सिनेअभिनेता सलमान खान यास सुनावण्यात आलेली पाच वर्षांची शिक्षा या देशात न्याय अजून शिल्लक असल्याचे द्योतक आहे. १९९८ मध्ये सलमान व त्याचे चार अन्य सहकारी काळवीट शिकार प्रकरणात सापडले होते व त्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले. हे प्रकरण घडण्याअगोदर सलमान चिंकारा शिकार प्रकरणात अडकला होता, पण या खटल्यातून त्याची राजस्थान उच्च न्यायालयात निर्दोष सुटका झाली होती. त्यामुळे काळवीट प्रकरणात सलमान पुराव्याअभावी निर्दोष सुटेल, अशीच भावना...
  April 6, 02:00 AM
 • सामान्य कुवतीच्या माणसांच्या हाती सत्ता दिली की, ती अतिसामान्य पद्धतीने वागू लागतात. स्मृती इराणी हे याचे उदाहरण. कार्यक्षमतेच्या गप्पा करणाऱ्या मोदींना या बाईंचे काय कौतुक आहेे कोण जाणे? काळ-वेळेचे भान यांना कधीही नसते. हेकेखोरपणे सत्ता राबवणे इतकेच या बाईंना समजते. शैक्षणिक पात्रतेवरून कोणाचे मूल्यमापन करणे बरोबर नाही. कमी पात्रता असूनही उत्तम कारभार करणारे अनेक नेते देशात होऊन गेले. कारण या नेत्यांची समज व्यापक होती, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करण्याची वृत्ती होती. इराणी बाईंकडे...
  April 5, 02:00 AM
 • माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्याच अायुष्याला मर्यादा असते; हे आपण जाणतो. पण जे काही क्षण लाभतात त्या प्रत्येक क्षणाचे सार्थक करणारा भाई वैद्य यांच्यासारखा कार्यकर्ता, संघटक, नेता आणि मार्गदर्शक महादुर्लभ असतो, याची जाणीव भाईंच्या निधनामुळे ठळक बनली आहे. ९० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य भाईंना लाभले आणि त्यातील प्रत्येक क्षण भाईंनी कृतिशील ठरवला. रिकामे बसलेले भाई, असे दृश्य त्यांच्या उभ्या अायुष्यात तरी कुणी पाहिलेले नाही. निवांतपणा भाईंच्या कोशातच नव्हता. त्यांच्या पायाला...
  April 4, 02:00 AM
 • माझा मुलगा मरण पावला आहे; पण दुसऱ्या घरातला मुलगा मारला जावा, त्याचे घर जाळले जावे अशी माझी इच्छा नाही. मी ३० साल इमाम म्हणून काम करतोय. माझे काम समाजात शांतता, सौहार्द प्रस्थापित करायचे आहे. माझ्या मुलाच्या हत्येचा बदला म्हणून तुम्ही हिंसाचारावर येणार असाल तर हे शहर मी कायमचे सोडून जाईन. आपला १६ वर्षांचा मुलगा सिब्तुल्ला राशिदी याची आसाममधील आसनसोल शहरात जमावाने हत्या केल्यानंतर इमाम असलेल्या त्याच्या वडिलांनी संतप्त जमावापुढे केलेले हे वक्तव्य. या वक्तव्याने हिंदू-मुसलमान धर्मांतील...
  April 3, 06:39 AM
 • बँकिंग व्यवस्थांमधील कोट्यवधी, अब्जावधी रुपयांचे घोटाळे सहजपणे उघडकीस येत आहेत. ज्या व्यवस्था सामान्य माणसाच्या बचतीवर, क्रयशक्तीवर, विश्वासावर उभ्या राहिल्या आहेत, तेच त्या व्यवस्थेचा भरभक्कम पाया आहेत, अशा व्यवस्थेत उंचावर बसलेले बिनबोभाट भ्रष्टाचार करताना, देशाबाहेर पळून जाताना दिसताहेत. भारतातील सर्वच बँकिंग व्यवस्था भ्रष्टाचार, वशिलेबाजी व लोभी भांडवलशाहीच्या आवर्तनात सापडली आहे. म्हटले तर कायदा, पोलिस चौकशी, प्रसारमाध्यमांचा दबाव आहे, राजकीय नेते घोटाळेबहाद्दरांना अटक...
  April 2, 06:45 AM
 • सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी पुन्हा केंद्र सरकारच्या न्याययंत्रणेतील हस्तक्षेपाविरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात त्यांनी व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कारभाराबाबत जाहीर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकार न्यायव्यवस्थेवर दडपण आणत नियुक्तीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. २१ मार्चच्या...
  March 31, 12:28 AM
 • यंदाच्या महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ आणि अखेरसुद्धा वादंगानेच झाली. प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण झाले, परंतु अमराठी राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद वेळेत उपलब्ध करून देण्याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. वरकरणी मुद्दा साधा वाटतो. मराठी राज्याच्या दृष्टीने मात्र ही दिरंगाई सरकारी बेफिकिरीचे दर्शन घडवणारी होती. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प होता. निवडणुकीमुळे पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्याची संधी या सरकारला मिळेल...
  March 30, 03:00 AM
 • कर्नाटक राज्य हे दक्षिणेतील तसे प्रगत राज्य. उदारीकरणाच्या या २५ वर्षांच्या काळात कर्नाटकाने ग्रामविकासापासून तंत्रज्ञानविस्तारापर्यंत बरेच पल्ले गाठले आहेत. हे राज्य काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांपैकी एक. १९७७ मध्ये देशभरात काँग्रेसचा पराभव होत असताना कर्नाटकात मात्र पक्षाला २८ पैकी २६ जागा मिळाल्या. नंतर १९८३ मध्ये राज्यात काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. नंतर १९९८-९९ नंतर राज्यात काँग्रेस-भाजप-जनता दल अशी तिरंगी स्पर्धा दिसू लागली. ती १२ मे रोजी होणाऱ्या विधानसभा...
  March 29, 06:20 AM
 • दलित साहित्य म्हणजे स्वातंत्र्याची घोषणा आहे, असे म्हणत या घोषणेला दूरदूरपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्य वेचणारे प्राध्यापक डाॅ. गंगाधर पानतावणे अनंतात विलीन झाले. एका अर्थाने दलित साहित्याचा आवाजच लोपला आहे. नुकताच त्यांना पद्मश्री हा देशाचा नागरी सन्मान जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी त्यांनी अाजारपणातून लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा त्यांचे लाखो चाहते करत होते. पण ते घडायचे नव्हते. घरातच झालेल्या एका लहानशा अपघाताचे निमित्त होऊन ते अंथरुणाला खिळले आणि नंतर उठलेच नाहीत. आज त्यांच्या...
  March 28, 02:01 AM
 • नव्वदच्या दशकातली गोष्ट. सार्वकालिक महान क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन याने सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहिली आणि सहज तो बोलून गेला, अरे, हा मुलगा तर अगदी माझ्यासारखेच खेळतो की. प्रतिस्पर्धी संघातल्या तरुण खेळाडूबद्दल डॉनने दाखवलेला उमदेपणा ऑस्ट्रेलियन चाहत्यांना अजिबात रुचला नाही. या चुकीपायी दैवत असणाऱ्या डॉनवरही त्यांनी टीका केली. प्रत्येक देशाचा एक स्वभाव असतो. जसे की कॅरेबियन बेटांनी निसर्गदत्त गुणवत्तेचे अनेक महान खेळाडू क्रिकेटला दिले. परंतु, त्या बेटांवरच्या...
  March 27, 02:00 AM
 • पारदर्शकता, प्रामाणिकपणाचा गलबला सुरू असतानाही नव्या तंत्रज्ञानाच्या अाधारे नागरिकांच्या व्यक्तिगत डेटावर नकळत डल्ला मारला जात अाहे, हे फेसबुक वादाने सिद्ध केले. २०११ मधील अण्णा हजारे यांचे अांदाेलन, २०१४ मधील लाेकसभा, २०१८ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अशाच डेटाचा प्रभाव हाेता, यावरून वादंग पेटले असले तरी त्यातील सत्यता अद्याप समाेर यायची अाहे. ताेच मार्क झुकेरबर्गच्या कबुलीने डेटा घाेटाळ्यावर शिक्कामाेर्तब केले. भारतासह ब्राझील, अमेरिकेच्या अागामी सार्वत्रिक निवडणुकीत...
  March 26, 02:00 AM
 • गेल्या ६ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी निवडणूक सुधारणा, लाेकपाल-लाेकायुक्त कायद्याची अंमलबजावणी याचसाेबत शेतकऱ्यांशी निगडित ७ प्रमुख मागण्या या नव्या मुद्द्यांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानास पुन्हा एकदा कुरुक्षेत्र बनवण्याचा निर्धार केलेला दिसताे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या चार वर्षांत ४२ वेळा अण्णांनी माेदी सरकारकडे याच मागण्यांविषयी पाठपुरावा केला. मात्र, काहीही उत्तर मिळाले नाही. माेदींना अहंकाराची बाधा झाली की काय? असा प्रश्न त्यांना...
  March 24, 06:36 AM
 • अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या मदतीने मिळवलेला विजय व ब्रेक्झिटवर ब्रिटनमध्ये झालेले मतदान या दोन घटना जगाच्या राजकारणाला वळण देणाऱ्या ठरल्या. अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी, उदारमतवादी देशात कट्टर उजव्या, धर्मांध राजकारणाचे नेतृत्व करणाऱ्या ट्रम्प यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, तर दुसरीकडे वसाहतवादातून भांडवलशाही पसरवणाऱ्या ब्रिटनने स्वत:चीच बाजारपेठ वाचवण्यासाठी संरक्षणवादी भूमिकेचे समर्थन करणे आणि त्यासाठी स्थलांतराविरोधातही आक्रमक भूमिका...
  March 23, 02:00 AM
 • अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल झालेल्यांना, विशेषत: सरकारी नोकरांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला दिलासा महत्त्वाचा आहे. या कायद्यासंदर्भात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादात हा निर्णय मैलाचा दगड ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदर्श गोयल आणि उदय ललित यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या निर्णयानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना अॅट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला म्हणून थेट अटक करता येणार नाही. जे सरकारी...
  March 22, 06:32 AM
 • भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून २०११मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर अण्णा हजारेंचे उपोषण अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेने आयोजित केले होते. तो काळ असा होता की, अण्णा हजारे, रामदेवबाबा, किरण बेदी, भूषण पिता-पुत्र आणि केजरीवाल अशी पंचकडी लोकपाल विधेयक व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून यूपीए-२ सरकारवर तुटून पडत होती. त्यांच्याकडून जागोजागी संसद सदस्यांची खुलेआम गलिच्छ पातळीवर टिंगलटवाळी केली जात होती. सर्व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. हे आरोप करण्यात...
  March 21, 06:58 AM
 • पंतप्रधान मोदी यांचे दिवस सध्या बरे नाहीत. त्रिपुरातील विजय एकाच आठवड्यात कापरासारखा उडून गेला. भाजपची दिल्लीतील नवी वास्तू भाग्यशाली आहे, कारण त्या वास्तूमध्ये ईशान्येकडून (त्रिपुरा) विजयाने प्रवेश केला आहे व ईशान्य दिशा ही वास्तुशास्त्राप्रमाणे भाग्योदयाची दिशा समजली जाते, असे मोदी म्हणाले होते. उगवता सूर्य भगवा असतो, असेही त्यांनी खुशीत म्हटले. पण ईशान्येतून उगवलेला भगवा उत्तर प्रदेशातच मावळला. वास्तुशास्त्रापेक्षा संघटनशास्त्र ही भाजपची ताकद. पण तीसुद्धा उत्तर प्रदेशात कामी...
  March 20, 04:25 AM
 • २००९ च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक आत्मसंतुष्ट पुढाऱ्यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला बहुमत मिळेल, अशा बढाया मारण्यास सुरुवात केली होती. पण देशातील लोकसभा मतदारसंघांवर नजर टाकल्यास काँग्रेसला हिंदी पट्ट्यापेक्षा तेव्हाचा आंध्र व महाराष्ट्रातून बळ मिळाले होते. देशातल्या शहरी भागात काँग्रेसने मुसंडी मारली होती. म्हणजे सत्तासोपानासाठी उत्तर प्रदेश, बिहार या हिंदी बेल्टची गरज लागते तेथून काँग्रेसला बळ न मिळता यूपीए-१मधील...
  March 19, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED