Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा बालेकिल्ला आहे. या पट्ट्यात साखर कारखाने आणि दूध संघांचे मजबूत जाळे आहे. या माध्यमातून येथील अर्थकारण आणि पर्यायाने राजकारणावर राष्ट्रवादी मांड ठोकून आहे. सन २०१४ च्या मोदी लाटेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हक्काच्या या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीची वाताहत झाली. बालेकिल्ल्यातच जिथे पायाखालची वाळू सरकली तिथे मराठवाडा आणि खान्देशात बसवलेल्या नव्या बस्तानाची काय कथा? एकूणच नाव राष्ट्रवादी असलेल्या या पक्षाची...
  May 3, 01:00 AM
 • महाराष्ट्र राज्य मोठ्या आवर्तनातून जात आहे. देशातले सर्वात पुढारलेले, अनेक राजकीय-सामाजिक विचारांचा वारसा लाभलेले, मोठी सांस्कृतिक व वैचारिक पार्श्वभूमी लाभलेले, निसर्गाने समृद्ध असलेले हे राज्य समाधानी वाटत नाही. देशातील सर्वाधिक शहरांची संख्या या राज्यात आहे, शहरे बकाल असली तरी शहरांना जागतिकीकरण, उदारीकरण व ग्राहकवादाचा चेहरा मिळालेला आहे. लोकांच्या खाण्या-पिण्या-कपड्यांच्या सवयी निश्चितच बदललेल्या दिसतात. इंटरनेट व मोबाइलमुळे तर ग्रामीण व शहरी असा भेद अस्पष्ट होत चालला आहे....
  May 1, 03:42 AM
 • दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण कम्युनिस्ट पार्टी अंकित करून शी जिनपिंग यांनी स्वत:ला चीनचे तहहयात अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर असे वातावरण तयार झाले होते की चीन अधिक आक्रमक होईल व आपल्या शेजारी राष्ट्रांशी, विशेषत: भारताशी तो दुजाभाव करू लागेल. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शी जिनपिंग यांच्यात जी अनौपचारिक चर्चा झाली, त्यावरून स्पष्ट लक्षात येते की, चीनला भारताशी कोणत्याच प्रकारचा दीर्घ स्वरूपाचा संघर्ष करण्याची इच्छा नाही किंवा त्यांना...
  April 30, 02:00 AM
 • एक सीमा, एक भाषा, एक वंश असलेल्या दोन देशांतील कमालीचे, कट्टर शत्रुत्व संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठीची राजकीय पातळीवरची शिष्टाई ही प्रत्यक्ष युद्धनीतीसारखी गुंतागुंतीची असते. कारण अशा शिष्टाईमध्ये संशय, मत्सर निवळण्यासाठी शब्दांचे खेळ करावे लागतात, सलोख्याचे वातावरण तयार करण्यासाठी कोणाची तरी वा पडद्यामागून मध्यस्थी घ्यावी लागते. उभय देशांमधील जनभावनांचा अंदाज घ्यावा लागतो. त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे १९५३ पासून परस्परांचे कट्टर...
  April 28, 02:00 AM
 • अजूनही विशेषतः ग्रामीण भागातल्या मोठ्या वर्गाची धडपड शासकीय नोकरदार होण्याची असते. सरकारी खात्यात चिकटले की बदलीची घाई सुरू होते. बक्कळ वरकमाईची संधी, विशिष्ट कार्यालय, हव्या त्या गावात-शहरात नोकरी यासाठीचा अट्टहास आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ गाय दारात बांधण्यासारखी असते. अर्थात जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या बाबतीतला मुद्दा वेगळा आहे. कारण या नोकरीत बक्कळ वरकमाईचा मुद्दा येत नाही. विद्यादानाचे कार्य लाभाचे नसते. यांच्यासाठी सर्वात जटिल मुद्दा असतो तो श्री व सौ शिक्षक या जोडप्याला...
  April 27, 01:00 AM
 • आसाराम बापू या धार्मिक थोतांडाला मरेपर्यंत गजाआड राहावे लागणार आहे. धर्माची झूल पांघरून अल्पवयीन मुली-स्त्रियांचे शोषण केलेल्या या भाेंदूबाबाला आणखी कठोर शिक्षा झाली असती तरी कोणत्याही सुसंस्कृत माणसाला आनंदच झाला असता. आसारामच्या मुलावरही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. आसारामचे आश्रम स्त्रीशोषणाची केंद्रे बनली होती, असे असूनही त्याचा प्रभाव चार राज्यांमध्ये होता. सन २०१३ पासून आसाराम तुरुंगात गेल्यावरही त्याच्या भक्तांची संख्या कमी झाली नाही. मनाच्या दुर्बलतेचे आणि अंध...
  April 26, 02:18 AM
 • कोकणात नाणार येथे होऊ घातलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला खोडा घालण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या राजकारणाला धरून हे सर्व होत आहे. शिवसेनेच्या विरोधामागे ना अभ्यास आहे, ना कोकणवासीयांची खरीखुरी काळजी. भाजपला विरोध करून आपले अस्तित्व दाखवून देण्याची केविलवाणी धडपड यापलीकडे या प्रयत्नांना किंमत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ज्या मिजाशीत कमळाबाई म्हणून भाजपची थट्टा होत होती, ती मिजास मोदींसमोर संपली. भाजपने निवडणुका जिंकत मुंबईत तोडीस तोड जागा मिळवल्या....
  April 25, 12:00 AM
 • नरेंद्र मोदी व अमित शहा ही जोडी बेसावध राहणारी नाही. देशातील वारे सत्ताधारी पक्षाला अनुकूल नाहीत याची जाणीव त्यांना झाली आहे. मोदींनी रविवारी खासदार व आमदारांशी साधलेल्या संवादाकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे. या संवादातून मोदींचे धोरण व त्यांच्यापुढील अडचणी याची कल्पना येऊ शकते. मोदींनी खासदार-आमदारांशी संपर्क साधला तो अॅपच्या साहाय्याने. प्रचाराची ही नवी पद्धत अनेक राजकीय पक्ष सध्या वापरत आहेत. वृत्तपत्रे व अन्य माध्यमांतून एकमार्गी प्रचार करता येत नाही. जाहिराती महाग असतात...
  April 24, 06:53 AM
 • अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद सरकारने केली आहे. देशातील बँकांना गोत्यात आणून परदेशात सुखेनैव वास्तव करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूदही दुसऱ्या एका कायद्यात करण्यात आली. सध्याच्या कायद्यातील तरतूद पुरेशी कडक नाही, असे मत प्रगट होत होते व कायदे बदलण्यासाठी आग्रह धरला जात होता. कठुआ व उन्नाव येथील प्रकरणांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. उन्नाव व कठुआ, त्यातही कठुआ येथील प्रकरण शहारे आणणारे व शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. सरकार पक्षातील...
  April 23, 02:00 AM
 • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालवण्याचा आततायी उद्योग तडीस नेण्याचा चंग काँग्रेसमधील काही नेत्यांनी बांधला आहे. राहुल गांधींवरील निष्ठा व्यक्त करण्याचा जुन्या नेत्यांचा हा नवा मार्ग असावा. मार्क्सवादी पक्षात सध्या बहिष्कृत झालेल्या सीताराम येचुरी यांची ही मूळ कल्पना आता काँग्रेसने उचलून धरली. काल जस्टिस लोया यांच्या मृत्यूची फेरचौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाभियोगाचा अर्ज राज्यसभा अध्यक्षांपुढे सादर होणे हा...
  April 21, 02:00 AM
 • जस्टिस लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालावर अर्थातच शंकेखोर समाधानी नाहीत. या प्रकरणावरून गेले काही महिने ज्या पद्धतीने वादळ उठवले जात होते व राहुल गांधींसह काही नेते त्यामध्ये उतरले होते ते पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त होण्याची अपेक्षा नव्हती. हे प्रकरण जरी एका न्यायमूर्तीच्या मृत्यूचे असले तरी त्याला राजकीय रंग चढला होता. याचिका दाखल करणारे उघडपणे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसले तरी त्यांचा...
  April 20, 02:00 AM
 • भारतातील काही राज्यांतील एटीएमवर नोटांचा खडखडाट झाल्यावर देशभर चर्चेला उधाण आले. कोणतेही संयुक्तिक कारण दिसत नसताना नोटांची टंचाई का निर्माण व्हावी, हा प्रश्न आहे. नोटबंदीच्या काळात सरकारनेच नोटा काढून घेतल्या होत्या. यावेळी तसे काहीही झालेले नाही. ही टंचाईही, सर्वत्र नव्हे तर काही भागातच आली. नोटबंदीसारख्या कारणामुळे ही टंचाई आली असती तर ती सर्वत्र आली असती. तसे घडलेले नसल्यामुळे यामागे वेगवेगळी कारणे संभवतात. अर्थशास्त्रीय वृत्तपत्रात त्याची व्यवस्थित चर्चा झाली आहे. गेल्या तीन...
  April 19, 02:00 AM
 • १८ मे २००७ रोजी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसरातील मक्का मशिदीत बॉम्बस्फोट होऊन ९ जण ठार झाले होते. हा स्फोट झाला तेव्हा पोलिसांचा संशय बांगलादेशी दहशतवादी संघटना हुजीवर होता. पण जेव्हा पोलिस खोलात गेले तेव्हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराने पछाडलेल्या काही जणांचा कट असल्याचे उघडकीस आले आणि देशभर हलकल्लोळ माजला. त्या वेळच्या यूपीए सरकारने ही घटना म्हणजे हिंदू दहशतवाद असल्याचा आरोप केला आणि या आरोपाने देशातील राजकीय वातावरण तप्त झाले. त्याअगोदर एक वर्ष मालेगावमध्ये, नंतर...
  April 18, 02:00 AM
 • भारतीय क्रीडा क्षेत्र सातत्याने नवे काैशल्य अाणि अात्मविश्वास साध्य करत असतानाच क्रीडा क्षितिजावर नव्या प्रतिभावंतांचादेखील उदय हाेत अाहे, ही बाब दिलासादायक ठरावी. विशेषत: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. कौटुंबिक अाेढाताण, लैंगिक विषमतेचा अडसर पार करत त्यांनी भारताला लाैकिक मिळवून दिला. टेबल टेनिसमध्ये सिंगापूरसारख्या मजबूत संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पराभूत करणे म्हणजे जणू अाॅलिंपिकमध्ये चीनवर मात केल्यासारखेच. भारतीय प्रशिक्षक...
  April 17, 02:00 AM
 • गेली काही वर्षे सिरियातील असाद सरकारला नेस्तनाबूत करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न नाटो गटाकडून होत आहेत. पण त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. सिरियाच्या विरोधात थेट युद्ध पुकारणे हे नाटोला परवडणारे नाही व त्यातून तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती असल्याने अमेरिका छोट्या स्वरूपाच्या लष्करी कारवायांवर भर देत आले आहे. अमेरिकेने आजपर्यंत ज्या देशांवर हवाई हल्ले वा लष्करी कारवाया केल्या आहेत त्याआधी अमेरिका हल्ले करण्यामागचे सबळ कारण शोधत असते. या कारणाच्या आडून अमेरिका स्वत:च्या...
  April 16, 02:00 AM
 • २०१९ जवळ येत चालले आहे, तशा राजकीय पक्षांच्या हालचाली स्वाभाविकपणे वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि विरोधातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांची स्वत:ची निश्चित मतपेढी आहे. प्रत्येकाचे स्वत:चे प्रभावक्षेत्र आहे. परंतु, १९९५ पासूनच्या एकाही निवडणुकीत काेणत्याही एका पक्षावर जनतेने संपूर्ण विश्वास दाखवलेला नाही. परिणामी युती-आघाडी ही सत्तासंपादनाची पूर्वअट बनली आहे. वैचारिकता, नीतिमत्ता वगैरेच्या फार फंदात न पडता त्यातल्या त्यात सोईच्या...
  April 14, 02:00 AM
 • दोन वेगळ्या राज्यांतल्या घटना. एका राज्यात भाजप सत्तेतला भागीदार, तर दुसरीकडे प्रचंड बहुमत. दोन्ही राज्यांतल्या जनतेला परिवर्तन हवे होते. नवी पारदर्शी व्यवस्था हवी होती. भ्रष्टाचाररहित, गुन्हेगारमुक्त, जगण्याचे स्वातंत्र्य असलेली. आपल्या मुलाबाळांना खुलेपणाचा श्वास देणारी. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगू देणारी. त्यांच्या स्वप्नांना उभारी देणारी. म्हणून त्यांनी यांना निवडून दिले. पण धर्माच्या, झुंडशाहीच्या राजकारणात या साऱ्या केवळ कल्पनाच राहिल्या. स्वप्नं उद्ध्वस्त...
  April 13, 02:00 AM
 • राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय नवा नाही. मात्र, अहमदनगर येथे महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडामुळे तो पुन्हा चर्चेत आहे. विशेष म्हणजे, या मुद्द्यावरून टीकेची राळ उडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींना निवडून न देण्याचा आत्मनिग्रह जनतेलाही करावा लागेल, अशी भूमिका एका मुलाखतीदरम्यान व्यक्त करून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे खापर जनतेवरच फोडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे...
  April 12, 06:12 AM
 • प्रतिस्पर्ध्यावर त्याचेच अस्त्र उचलायचे, ही रणनीती राजकारणात नरेंद्र मोदी-अमित शहा दुकली यांनी केव्हाच आत्मसात केली आहे. म. गांधींच्या सत्याग्रहरूपी नि:शस्त्र प्रतिकारापासून आताची काँग्रेस चार हात लांब आहे. नव्हे, ती अनभिज्ञ आहे. पण गांधीजींनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात केलेल्या राजकीय चाली-क्लृप्त्या मोदी व शहांना आठवतात. वाचकांना आठवत असेल की गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी काही तास अन्न वर्ज्य करून उपोषण केले होते व मीडियाला त्याचे मोठे अप्रूप वाटले होते. कारण...
  April 11, 07:51 AM
 • एकाग्रता व धाडस ही वाघाची वैशिष्ट्ये. वाघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपली शिकार लपूनछपून करतो. जंगलात वाघाला स्वत:चे मित्र नसतात. असतात ते त्याचे शत्रूच. शिवसेना स्वत:ला वाघ समजते व आपल्या कार्यकर्त्यांना मावळे. वाघाला जे वन्यप्राण्यांमध्ये ग्लॅमर आहे तसे राजकारणात आपल्याला आहे, असा शिवसेनेचा समज आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास शिवसेना हा राजकारणात नेहमीच दुय्यम पक्ष राहिला आहे. १९९५ वा २०१४ ची निवडणूक असो, भाजपशी त्यांना सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. त्यामुळे...
  April 10, 02:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED