Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • संयमाचा अभाव व सत्तेचा उन्माद यामुळे कर्नाटकात भाजपची फजिती झाली. येदियुरप्पा यांना विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला. त्यांना याची सवय आहे व सवयीप्रमाणे भावनांना हात घालणारे भाषण त्यांनी केले. अशा भाषणांचा परिणाम होण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी सर्व धडपड होती हे जनतेला माहीत आहे. त्यामध्ये बहुसंख्य जनता, विशेषत: भाजपचे समर्थक काही गैर मानीत नाहीत. काँग्रेसबाबतही असेच म्हणता येते. सत्तास्पर्धेचा खेळ दोन्ही बाजूंनी चालला व त्याच्या...
  02:00 AM
 • सर्व विचारधारांमध्ये सहमती असावी व त्यातून आपल्या हिताचे राजकारण राजकीय पक्षांनी करावे, असा ढोबळ जनादेश कर्नाटकच्या जनतेने निवडणुकांतून दिला होता. पण गेले तीन दिवस भाजप व काँग्रेस-जेडीएस यांच्यामधील तुफान रणकंदन पाहता ही लोकशाही आहे की झंुंडशाही आहे, असा प्रश्न पडू लागला आहे. संपूर्ण देश आमदारांचा होणारा संभाव्य घोडेबाजार, रिसॉर्ट राजकारण यामुळे संतप्त झाला आहे. सोशल मीडियातून याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्या राजकारण्यांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा ठेवली जाते त्यांनीच...
  May 19, 06:50 AM
 • विविध सरकारी खात्यांमध्ये वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या पदांपैकी तब्बल ३६ हजार पदे तातडीने भरण्यास मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मान्यता दिली. यामुळे सरकारी नोकरीची आस लावून बसलेल्या युवकांना काहीसा दिलासा मिळाला तरी बेरोजगारीचे दाहक वास्तव समजावून घेतल्यास ही घोषणा मृगजळाचाच नमुना ठरण्याची शक्यता अधिक दिसते. बेरोजगारीच्या दिवसेंदिवस उंचावत चाललेल्या आलेखासमोर हा आकडा म्हणजे दर्या मे खसखसअसाच प्रकार आहे. त्यामुळे केवळ लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा अधिकाधिक नोकऱ्या आणि रोजगार कसे...
  May 18, 07:07 AM
 • कर्नाटकात निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीवर घटनात्मक व संसदीय मूल्यांच्या चौकटीत तोडगा काढण्याचे कठीण काम अप्रत्यक्षपणे केंद्रातील मोदी सरकारवर आले आहे. गोवा, मणिपूर व मेघालयमध्ये बहुमत नसताना भाजपने ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले त्यामुळे विरोधी पक्ष भाजपवर खवळले आहेत. तशी पुनरावृत्ती कर्नाटकात होऊ नये यासाठी काँग्रेस-जेडीएस सावधपणे पावले उचलत आहेत. कर्नाटकच्या राजकीय इतिहासात दोन वेळा राज्यपालांच्या भूमिकेविषयी प्रचंड गदारोळ उडाला होता. ८०च्या दशकात रामकृष्ण हेगडे...
  May 17, 06:48 AM
 • ७० च्या दशकात कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना देवराज अर्स यांनी लिंगायत, वोक्कलिगा व इतर मागास जाती यांच्यात समतोल साधत गरीब व मागासवर्गीय जातींना राजकारणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले होते. पण नंतरचे मुख्यमंत्री गुंडू राव यांना हा समतोल राखण्यात अपयश येत गेले. त्यांनी लिंगायतांना आकर्षित करताना या समाजाला मागासवर्गात समाविष्ट करून वोक्कलिगांना नाराज केले. पण त्याने लिंगायतांमधील एक घटकही अस्वस्थ झाला होता. त्यामुळे झाले असे की, या दोन्ही जाती काँग्रेसपासून जपूनच राहिल्या....
  May 16, 07:19 AM
 • पोखरणमध्ये भारताने दुसरी अणुचाचणी केली त्याला वीस वर्षे पूर्ण झाली. पहिली अणुचाचणी इंदिरा गांधींच्या काळात झाली होती, तर दुसरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. जागतिक शक्तींचा दबाव झुगारून देत अणुचाचणी करण्याचे धैर्य इंदिराजी व वाजपेयी यांनी दाखवले आणि जगाबरोबर पुन्हा सौदार्हाचे संबंधही प्रस्थापित केले. भारताचा आत्मविश्वास वाढवणारी मुत्सद्देगिरीची ही उत्तम उदाहरणे. सध्या प्रत्येक घटनेला राष्ट्रप्रेमाशी जोडण्याची अहमहमिका लागलेली असते. अणुचाचणीच्या वीस वर्षांच्या निमित्ताने...
  May 15, 07:28 AM
 • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी डॉन या पाकिस्तानमधील प्रतिष्ठित दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिली आहे. शरीफ यांच्या अशा कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची जी मोहीम गेली दहा वर्षे सातत्याने सुरू आहे त्याला लगेचच बळ मिळेल असे नाही, त्याचबरोबर चीन आपल्या जवळ येईल याचीही शाश्वती नाही. शरीफ यांनी मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित...
  May 14, 02:00 AM
 • महासत्तेचे छोटे-मोठे निर्णय हे त्या महासत्तेपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचा परिणाम जगावर होतो. प्रत्येक देश आपल्या क्षमतेनुसार हे परिणाम सहन करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या अणुकरारातून अमेरिकेला बाहेर काढले. एका झटक्यात त्यांनी हा निर्णय घेतला. आधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबरोबर करार केला होता. त्यानुसार शांततेसाठी अणु कार्यक्रम आखण्यास इराणला मुभा मिळाली होती, मात्र अण्वस्त्र बनवण्यावर निर्बंध होते. भारताने ज्याप्रमाणे...
  May 12, 02:00 AM
 • फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स कंपनीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकी वॉलमार्ट रिटेल कंपनीने थोडेथोडके नव्हे, तर १६ अब्ज डॉलर मोजले. खरे म्हणजे समाज म्हणून भारतीयांनी या व्यवहाराकडे वेगळ्या नजरेने पाहिले पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय मध्यमवर्गीय, नवश्रीमंतांचा वाढता टक्का गेल्या दशकभरापासून खेचून घेतो आहे. चहुबाजूंनी अंधारल्याने भारतवर्षाची केवळ अधोगतीच चालू असल्याच्या नकारात्मक वर्णनांचा रतीब एरवी समाज माध्यमांमधून अखंडपणे घातला जातो. मात्र, कर्तृत्वाची जागतिक मोहोर...
  May 11, 02:00 AM
 • मद्यसम्राट विजय मल्ल्याबद्दल भारतीयांना कुतूहल आहे. सार्वजनिक ठिकाणी उत्तान ललनांच्या विळख्यात वावरणारा, स्वतःच्या विमान कंपनीच्या प्रचारासाठी हवाई सुंदरींच्या कमरेत हात घालून उभा राहिलेला, आयपीएलच्या निमित्ताने विविध सेलिब्रिटींना गोळा करून क्रिकेट मॅच पाहणारा अशी मल्ल्याची विविध रूपे भारतीयांच्या मनात ठसली आहेत. छानछौकीचे, अय्याशी आयुष्य जगणाऱ्या मल्ल्याच्या अनेक कथा-दंतकथा चवीने चघळल्या जातात. ही सगळी गंमतजंमत बँकेच्या पैशांवर सुरू असल्याचे लोकांना फार उशिरा समजले. वन...
  May 10, 02:18 AM
 • देशातल्या सर्वात जुन्या आणि सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला तेव्हाच खरे तर चिंता निर्माण झाली होती. लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या संस्था आणि परंपरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हादरे बसू लागल्याचा प्रचार करणारी काँग्रेस स्वतः तेच उद्योग करू पाहते, हे न समजण्यासारखे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करण्याचे काम याआधीच ज्येष्ठ न्यायमूर्तींनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन केले....
  May 8, 10:54 PM
 • गायीच्या दुधाचा खरेदीदर २४ रुपयांवरून २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाचा खरेदीदर ३३ रुपयांवरून ३६ रुपये प्रतिलिटर करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला होता. हा निर्णय झाल्यानंतरही दूध उत्पादक फार खुश नव्हते. त्यांचे म्हणणे असे की, खासगी दूध व्यावसायिकांकडून प्रतिलिटर दुधाला दिला जाणारा दर मुळातच यापेक्षा जास्त म्हणजे २९ (गाय) आणि ३७ (म्हैस) रुपये आहे. खासगी दूध दराचा दाखला देणारे दूध उत्पादक शेतकरी जसे आहेत, तसेच सरकारने जाहीर केलेला दरही सहकारी दूध संघांकडून मिळत नसल्याची तक्रार...
  May 8, 03:00 AM
 • यंदाचा पावसाळा सरासरीइतका ठरण्याची सुवार्ता हवामान विभागाने ऐकवली. उन्हाळ्याचा काळ बेगमीचा असतो. ही तयारी जशी शेतकऱ्यांच्या शेतावर सुरू असते तशी सरकारी पातळीवरही अपेक्षित असते. हे भान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले आहे. सन २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतरच या देशातला शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेलेला नाही. शेतकऱ्यांच्या अधोगतीला लांबवर रुतलेला इतिहास आहे. तोट्यातली शेती आणि गाळात गेलेला शेतकरी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अलीकडच्या काही...
  May 7, 02:00 AM
 • विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य सत्ताधाऱ्यांसाठी त्यातही भाजपसाठी भलतेच डोकेदुखी ठरले आहे. त्यामुळे परिषदेतले संख्याबळ वाढवण्याची संधी भाजप सोडणार नाही. शिवसेनेलाही ताकद दाखवून द्यायची आहे. समोरून दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोघांनीही समयसूचकता दाखवत व्यावहारिक भूमिका घेतली. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
  May 5, 02:00 AM
 • अतिगोडव्याचे दुष्परिणाम देशातल्या ऊस उत्पादक राज्यांत दिसू लागले आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमधले ऊस उत्पादक चिंतेत आहेत. देशाच्या इतिहासात कधी नव्हे इतके साखरेचे उत्पादन ३०० लाख टन इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. गेल्यावर्षी देशात पावसाने सरासरी गाठल्याचा हा परिणाम. पाण्याची उपलब्धता असली की, शेतकरी डोळे झाकून उसाकडे वळतात. या बद्दल अनेक शहरी विचारवंत नाराजी व्यक्त करत असतात. ऊस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न...
  May 4, 02:00 AM
 • पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा बालेकिल्ला आहे. या पट्ट्यात साखर कारखाने आणि दूध संघांचे मजबूत जाळे आहे. या माध्यमातून येथील अर्थकारण आणि पर्यायाने राजकारणावर राष्ट्रवादी मांड ठोकून आहे. सन २०१४ च्या मोदी लाटेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हक्काच्या या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीची वाताहत झाली. बालेकिल्ल्यातच जिथे पायाखालची वाळू सरकली तिथे मराठवाडा आणि खान्देशात बसवलेल्या नव्या बस्तानाची काय कथा? एकूणच नाव राष्ट्रवादी असलेल्या या पक्षाची...
  May 3, 01:00 AM
 • महाराष्ट्र राज्य मोठ्या आवर्तनातून जात आहे. देशातले सर्वात पुढारलेले, अनेक राजकीय-सामाजिक विचारांचा वारसा लाभलेले, मोठी सांस्कृतिक व वैचारिक पार्श्वभूमी लाभलेले, निसर्गाने समृद्ध असलेले हे राज्य समाधानी वाटत नाही. देशातील सर्वाधिक शहरांची संख्या या राज्यात आहे, शहरे बकाल असली तरी शहरांना जागतिकीकरण, उदारीकरण व ग्राहकवादाचा चेहरा मिळालेला आहे. लोकांच्या खाण्या-पिण्या-कपड्यांच्या सवयी निश्चितच बदललेल्या दिसतात. इंटरनेट व मोबाइलमुळे तर ग्रामीण व शहरी असा भेद अस्पष्ट होत चालला आहे....
  May 1, 03:42 AM
 • दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण कम्युनिस्ट पार्टी अंकित करून शी जिनपिंग यांनी स्वत:ला चीनचे तहहयात अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर असे वातावरण तयार झाले होते की चीन अधिक आक्रमक होईल व आपल्या शेजारी राष्ट्रांशी, विशेषत: भारताशी तो दुजाभाव करू लागेल. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शी जिनपिंग यांच्यात जी अनौपचारिक चर्चा झाली, त्यावरून स्पष्ट लक्षात येते की, चीनला भारताशी कोणत्याच प्रकारचा दीर्घ स्वरूपाचा संघर्ष करण्याची इच्छा नाही किंवा त्यांना...
  April 30, 02:00 AM
 • एक सीमा, एक भाषा, एक वंश असलेल्या दोन देशांतील कमालीचे, कट्टर शत्रुत्व संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठीची राजकीय पातळीवरची शिष्टाई ही प्रत्यक्ष युद्धनीतीसारखी गुंतागुंतीची असते. कारण अशा शिष्टाईमध्ये संशय, मत्सर निवळण्यासाठी शब्दांचे खेळ करावे लागतात, सलोख्याचे वातावरण तयार करण्यासाठी कोणाची तरी वा पडद्यामागून मध्यस्थी घ्यावी लागते. उभय देशांमधील जनभावनांचा अंदाज घ्यावा लागतो. त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे १९५३ पासून परस्परांचे कट्टर...
  April 28, 02:00 AM
 • अजूनही विशेषतः ग्रामीण भागातल्या मोठ्या वर्गाची धडपड शासकीय नोकरदार होण्याची असते. सरकारी खात्यात चिकटले की बदलीची घाई सुरू होते. बक्कळ वरकमाईची संधी, विशिष्ट कार्यालय, हव्या त्या गावात-शहरात नोकरी यासाठीचा अट्टहास आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ गाय दारात बांधण्यासारखी असते. अर्थात जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या बाबतीतला मुद्दा वेगळा आहे. कारण या नोकरीत बक्कळ वरकमाईचा मुद्दा येत नाही. विद्यादानाचे कार्य लाभाचे नसते. यांच्यासाठी सर्वात जटिल मुद्दा असतो तो श्री व सौ शिक्षक या जोडप्याला...
  April 27, 01:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED