Home >> Editorial >> Columns

Columns

 • १९५० मध्ये भारताचा जीडीपी ९३.७ अब्ज रुपये हाेता, ताे २०१७ मध्ये १२२ लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला हाेता. पण ही प्रगती सर्व क्षेत्रांपर्यंत समसमान पद्धतीने पाेहाेचली का? अखेर स्वतंत्र भारतात १९४७ पासून अातापर्यंतच्या प्रवासात आपण कुठवर पाेहाेचलाे अाहाेत? १९८० च्या दशकात अाम्ही चीनच्यादेखील खूप पुढे हाेताे. अामची धाेरणे बराेबर हाेती, परंतु अाज चीनची धाेरणे अापल्या तुलनेत पाचपट अधिक पुढे अाहेत. निश्चितच यावर विचार करायला हवा की, हे का झाले? अाणि अाता अाम्हाला काय करायला हवे? १९४७...
  09:25 AM
 • उत्सवात वेळोवेळी धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या ध्वनी पातळीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होते हे सारे जाणतात. परंतु धर्मवादी पक्ष व संघटना संस्कृतीच्याच नावाखाली या मर्यादा ओलांडतात..नव्हे, नागरिकांनी त्या ओलांडाव्यात, अशी जाहीर वक्तव्ये करतात. नव्हे, तसे घडवून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतात, पण स्वत:च्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा हेच नेते वेगळी भूमिका घेतात. कायद्याचे रक्षण कायद्याने नव्हे, तर कायदा पाळणाऱ्या सुज्ञ नागरिकांमुळे होते. कायद्याचा सन्मान करण्याची...
  August 14, 09:12 AM
 • भारताबद्दल सर्वंकष लिखाण करताना नायपॉल यांनी नक्की भारतीय की परकीय म्हणून भूमिका ठेवली. हा प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणूनच समीक्षकांच्या मते, नायपॉल त्यांच्या लिखाणातून त्रिनिदादबाबतचा भ्रमनिरास, भारताबाबतची निराशा आणि बेघर असल्याची काळजी, यांचे विविध टप्पे प्रतिबिंबीत होतात. नायपॉल यांनी रंगवलेले भारताविषयी नकारार्थी चित्र वाचकांना धक्का व क्लेश देऊन जाते. कारण विविध मतप्रवाहांनुसार भारतातील विकासाचा आशादायी किरण दुर्लक्षित करून लेखकाने फक्त अाजूबाजूचा नकारार्थी अंधार...
  August 13, 07:08 AM
 • ४२०० वर्षांपूर्वी हवामानात अचानक बदल झाले व सारे वातावरण कोरडे बनले. त्या काळात शिथिल झालेल्या मान्सूनमुळे मेसोपोटेमियाचे अकादियन राज्य, इजिप्तचे साम्राज्य व हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. भारतात मेघालय राज्यातील गुहांमध्ये या काळाचे संदर्भ शास्त्रज्ञांना सापडले आहेत. त्यामुळे ४२०० ते आजचा हा कालखंड आता मेघालयीन एज या नावाने ओळखला जाईल. पृथ्वीचे वय काही शतकांपूर्वी अनुमानाने ठरवले जात होते व नंतर ते अधिक शास्त्रीय पद्धतीने ठरवले जाऊ लागले. भूशास्त्रीय कालमान किंवा जिऑलॉजिकल...
  August 11, 08:13 AM
 • एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री मुंबईतील नालासोपारा भागातील वैभव राऊत याच्या घरावर तसेच एका दुकानावर छापा टाकला. त्या वेळी तेथे ८ देशी बॉम्ब तसेच २० पेक्षा जास्त बॉम्ब तयार केले जाऊ शकतात एवढी गनपावडर तसेच डिटोनेटरही ही सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तपासात या स्फोटकांची व्याप्ती मोठी असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळपर्यंत याप्रकरणी चाललेल्या कारवाईत या कटात सहभागी असलेले आणखी दोघे ताब्यात घेण्यात आले. यानिमित्ताने राज्यातील मोठा घातपाताचा कट उधळला...
  August 11, 08:10 AM
 • यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढला पाहिजे. मराठा समाजाचा प्रश्न आर्थिक मागासलेपणाचा आहे. त्याचा नीट अभ्यास करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात हजारो कोटी रुपयांची तरतूद शासन करू शकते. ज्याच्या साहाय्याने त्यांचे शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, शेती-धंद्याचे मागासलेपण दूर केले जाऊ शकते. भारताच्या ज्या-ज्या भागात त्यांचे पाय लागले तो भाग भारतात राहिला, जेथे ते जाऊ शकले नाहीत तो भाग पाकिस्तानात गेला. मराठा आंदोलनाने महाराष्ट्र सध्या ढवळून निघालेला आहे....
  August 10, 10:11 AM
 • उत्सवाचे दिवस जवळ येऊ लागले की रस्त्यावरील मंडप आणि ध्वनिप्रदूषण या दोन मुद्द्यांवरून उत्सव मंडळांचे कार्यकर्ते, सार्वजनिक हिताच्या विरोधातील उत्सवातले पायंडे, त्याविरोधात झगडणारे काही लोक आणि राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांमध्ये वाद-प्रतिवादाचे, न्यायालयीन तंबीचे, आदेशांचे मोहोळ उठते. हा नेहमीचा सार्वत्रिक अनुभव बनला आहे. यंदाही गणेशाेत्सवास दीड महिना अवधी असतानाच सार्वजनिक हितरक्षकांनी उत्सवातील या गोष्टींच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर...
  August 9, 07:42 AM
 • महाराष्ट्राप्रमाणेच तामिळनाडू या राज्यातही १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच ब्राह्मणेतरवादी राजकारण सुरू झालेले दिसते. मात्र, महाराष्ट्रात न घडलेल्या आणखी एका गोष्टीची जोड या राजकारणाला मिळाली. ज्यामुळे या दोन्ही राज्यांचे राजकारण पुढे अत्यंत वेगळ्या वाटांनी गेले. ती गोष्ट म्हणजे द्रविडी अस्मितेची उभारणी. एम. करुणानिधी या ज्येष्ठ तामिळ नेत्याचं निधन झालं. त्यांचं स्मरण करत असताना त्यांच्या कोणत्या वारशाविषयी आपण चिंतन करणार आहोत? एक राजकीय नेता म्हणून आपली अमीट छाप त्यांनी...
  August 9, 06:50 AM
 • केवळ निवडणूक जिंकून सत्तेत येणाऱ्याला शक्तिशाली म्हटले जात असेल तर संपूर्ण प्रणालीच यासाठी प्रयत्न करेल. असे असेल तर निवडणूक जिंकणे किंवा जिंकवून देण्याचे कामच सर्वात महत्त्वाचे मानले जाईल. त्याला तेवढे महत्त्वही दिले जाईल. मग जिंकणारा दोषी असला तरी याने फार काही फरक पडणार नाही. हरणारा घटनेचे दाखले देत राहिला तरी काहीही परिणाम होणार नाही. म्हणजेच स्वातंत्र्यावर काही बंधन नसले तरी स्वातंत्र्याची व्याख्याच बदलण्यात आली आहे. पुढील आठवड्यात भारताच्या स्वातंत्र्याला ७१ वर्षे पूर्ण...
  August 8, 09:55 AM
 • अॅट्रॉसिटी अॅक्ट या मुद्द्यावर मध्यममार्ग अवलंबणं सर्व राजकीय पक्षांना सहजशक्य होतं. हा कायदा असूनही दलितांवर अत्याचार होत राहिले आहेत, यात दुमत असावयाचं कारणच नाही. त्याचबरोबर या कायद्याचा दुरुपयोग होत आहे, हेही उघड गुपित आहे. अशा परिस्थितीत कायद्याचा दुरुपयोग थांबावा आणि तो अधिक परिणामकारकरीत्या अमलात आणला जावा, या दृष्टीनं काय करता येईल, याचा विचार सर्व राजकीय पक्षांना सहज करता आला असता. अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा वाद आणि नंतर...
  August 7, 08:48 AM
 • आंध्र प्रदेशमधून तेलंगणा स्वतंत्र झाला. महाराष्ट्रातही स्वतंत्र विदर्भाची मागणी हाेत असते. आता कर्नाटकात स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी जोर धरत आहे. विकास आणि स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावर मठाधीशांसाेबतच, राजकीय नेते अाणि संघटना एकवटल्या आहेत. भाजपने परिस्थितीचा अंदाज घेत या आंदोलनात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला तेव्हापासून त्यांनी उत्तर कर्नाटकावर अन्याय केला आहे. केवळ मंड्या, हसन, रामनगर जिल्ह्यांचाच त्यांनी विचार केला,...
  August 6, 08:09 AM
 • जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या क्रयशक्ती म्हणून जेव्हा अर्थव्यवस्थेत बोनस ठरेल तेव्हा ती देशावरील ओझे होणार नाही. आजच्या जागतिक व्यापारयुद्धात भारतीय ग्राहकशक्ती भारताची ताकद बनली आहे. ती अशीच वाढवत ठेवून जगाच्या केंद्रस्थानी राहण्याची ही एक संधी आहे. बाजार दोनच जाती ओळखतो, एक ग्राहक आणि दुसरी म्हणजे भिकारी. बाजाराला ग्राहक हवाहवासा असतो आणि भिकारी अगदी नकोसा असतो. कारण अगदी स्पष्ट आहे, भिकाऱ्याकडून व्यवहार पूर्ण होत नाही, मात्र ग्राहक असेल तेथे व्यवहार होतोच. व्यवहार...
  August 6, 08:05 AM
 • स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात काँग्रेस या प्रभावी राष्ट्रीय पक्षात कार्यरत असलेल्या काही मंडळींनी हा पक्ष भांडवलदारांचे हित पाहणारा आहे, शेतकरी- कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेचा पक्षालाच विसर पडला आहे, निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासला जात आहे अशा निरीक्षणानंतर वेगळे काही तरी करण्याचा विचार केला आणि समविचारी मंडळींनी एकत्र येत शेतकरी- कामगारांसाठी एक संघ स्थापन केला. या संघाचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने केला, पण...
  August 4, 07:46 AM
 • युरेशियाने पृथ्वीवरील ५,३९,९०,००० चौरस किमी एवढा भूभाग व्यापला आहे. युरेशियामध्ये ४.८ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ७१%) राहतात. हे सर्व लोक एकत्र होवो न होवो, पण त्यांची राजकीय-आर्थिक धोरणे जरी एकझाली तरी उर्वरित जगाला, खासकरून अमेरिकेला मागे हटावे लागणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, लहरी, एककल्ली, मुजोर स्वभावाचे असून त्यांची विचारधारा उजवीकडे कललेली आहे, असं वॉशिंग्टन पोस्टने त्यांची उमेदवारी पक्की होताच म्हटले होते. त्यानंतर गेली दोन वर्षे ट्रम्प व मीडिया...
  August 4, 07:38 AM
 • सरकारने एवढे तरी हमीभाव घोषित केले याचे स्वागत केले पाहिजे. कारण आजवर आश्वासने असायची, आता प्रारंभ होऊन प्रश्न ऐरणीवर आलाय. राजकारण असेल तर असू दे, पण नीट कार्यवाही होऊ दे. आता माघारीची वाट बंद झालीय. शेतकऱ्यांना बाजार व्यवस्थेच्या तोंडी देऊन चालणार नाही. खरीप पीक उत्पादन बाजारात आले की सरकारचा कसोटी काळ सुरू होईल. स्वामिनाथन आयोगाच्या २००६ मधील ए २ प्लस एफएल म्हणजे उत्पादन खर्च अधिक घरच्या राबाची (कुटुंब कष्टांची) मजुरी किंमत सूत्रानुसार पंतप्रधान मोदी यांनी ५ जुलैला १४ खरीप पिकांच्या...
  August 3, 08:51 AM
 • भारताला ज्याप्रमाणे ऊर्जेची गरज आहे त्याचप्रमाणे आफ्रिकन देशांना तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि कुशल तंत्रज्ञ यांची आवश्यकता आहे. चीनने गेल्या काही वर्षांत आफ्रिकेत भरघोस गुंतवणूक करून रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी भारत हा युगांडाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश राहिला आहे. पण, चिनी गुंतवणुकीने हे चित्र बदलले आहे. ही कसर भरून काढणे हे भारतापुढील हे एक मोठे आव्हान आहे. गेल्या आठवड्यात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
  August 2, 09:33 AM
 • राजकारणाचा खेळ कसा खेळला जाईल, कुठवर यशस्वी होईल, याची उत्तरे येणारा काळच देईल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. आगामी निवडणूक तरुण आणि शेतकऱ्याच्या मुद्द्यावर लढवली गेली तर कुणीही जिंकले तरी यात आपल्या देशाचाच विजय आहे. पण हिंदू-मुस्लिमांच्या प्रश्नावर निवडणूक लढवली गेली आणि त्यात कुणीही जिंकले तरी यात भारताची हार निश्चित आहे. कोलगाव येथील पंचायत समितीत बसून मी विचार करत होतो. गेल्या आठवड्यात अलवर जिल्ह्यात ज्या रकबर खानची हत्या झाली, त्याच्या गावात राजस्थान आणि हरियाणातील मेवातहून हजारो...
  August 1, 07:12 AM
 • महाबळेश्वर-पोलादपूर या वर्दळीच्या रस्त्यावरच्या आंबेनळी घाटातील खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये तब्बल ३० जिवांचा बळी गेला. त्याच्याशी संबंधित छायाचित्रे अन् त्यातील मृत प्रवाशांच्या हाडा-मांसाचा चिखल पाहताना अंगावर शहारे येत होते. अलीकडच्या काळात आंबेनळीसारख्या असंख्य घटना देशपातळीवर मोठ्या प्रमाणात घडल्याचे दिसत आहे. उत्तराखंडमधील पिथोरागड येथेही प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळून क्षणार्धात पन्नासहून अधिक प्रवासी मरण पावले. नाशिक जिल्ह्यातच गेल्या...
  July 31, 09:05 AM
 • राज ठाकरे यांनी पुण्यात आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी भूमिका घेऊन मराठा आरक्षणाला फाटा फोडला आहे. मराठा समाजाला सामाजिक मागासवर्गात घालून आरक्षण द्यावे, अशी सर्व पक्षांची एकी झाली असताना राज यांची विपरीत भूमिका पुढे आली आहे. राज हे उत्तम व प्रभावी वक्ते आहेत. ते त्यांना सांगायचा मुद्दा चमकदार, चटपटीत पद्धतीने सांगतात. पण आरक्षण या मुद्द्यावर त्यांचं राजकीय शहाणपण तुटपुंजं असल्याचं दिसतं. कारण आर्थिक निकषांवर आरक्षण कुणालाही देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट...
  July 31, 08:53 AM
 • मराठा आरक्षणाच्या शांततापूर्ण मागणीला सुरुवात झाली ती मराठवाड्यात आणि त्यासाठीची आग पेटली तीही मराठवाड्यातच. हे आंदोलन हिंसक झाल्यानंतर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांची सर्वाधिक हानी झाली आहे तीदेखील मराठवाड्यातच. ही हानी केवळ सांपत्तिकच नाही, मानवी जीविताचीही आहे. मराठवाड्यात आतापर्यंत दोघांनी या मागणीसाठी जीव दिला आहे, तर एक तरुण त्या प्रयत्नात जायबंदी झाला आहे. एका तरुण पोलिसाला आंदोलनाची झळ बसून जीव गमवावा लागला आहे. हा परिणाम मराठवाड्यातच सर्वाधिक का? तर इथला मागासलेपणा. खरे...
  July 30, 07:38 AM
 
जाहिरात

RECOMMENDED