Home >> Editorial >> Columns

Columns

 • आपल्या राज्यघटनेने न्यायालयाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असून राज्यघटनेच्या रक्षणाची जबाबदारी पूर्णपणे न्यायालयावर टाकलेली आहे. तिथेजाणारे न्यायाधीश भयापासून आणि कृपेपासून दूर असले पाहिजेत. न्यायालये राजकारणापासून दूर असली पाहिजेत. तरच आपल्या लोकशाहीचे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या अधिकाराचे, जीविताचे, संपत्तीचे, रक्षण होऊ शकेल. नरिमन यांची सर्व हयात न्यायालयात गेलेली आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात- परमेश्वरा, आमच्या सर्वोच्च न्यायालयाचे रक्षण कर तेव्हा हा विषय सहज...
  November 17, 06:31 AM
 • पावसाळा संपण्याआधीच राज्यात दुष्काळी परिस्थितीची चाहूल लागली. पावसाला खंडाने सुरुवात झाल्यामुळे पीक हंगामाचे काय होणार याची चिंता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. अवेळी आलेल्या पावसाने पुन्हा पिकांना मोठा फटका दिला. आणि दुष्काळी वातावरणात राज्यात दुष्काळ जाहीर करावा आणि त्याचा लाभ संबंधितांना मिळावा यासाठी मागणी सुरू झाली. गेल्या काही वर्षांत कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाचा अपवाद होता. गेल्यावर्षी चांगला पाऊसकाळ झाला. पण पीक पेरणीचे नियोजन...
  November 16, 06:30 AM
 • ५९ मिनिटांत एक कोटी रुपयांचे कर्ज या घोषणेमधील इन्स्पेक्टर राज संपवण्यासाठी संगणकीकृत नेमणुका करण्याची योजना भ्रष्टाचार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारआहे. पूर्वी कोणत्या वेळेस कोणत्या उद्योगांची तपासणी होणार आहे याचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जात असत. पण अहवाल सादर करण्यासाठी ४८ तासांची कालमर्यादा आखून दिल्यामुळे तोडपाणी करून प्रकरण मिटवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. अवघ्या ५९ मिनिटांत तब्बल एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाचं वाटप करणारे पोर्टल सुरू...
  November 16, 06:25 AM
 • इंटरनेट व मोबाइलच्या स्मार्टफोन संचावर अॅपद्वारे ज्या काही नवनवीन तांत्रिक सुविधा उपलब्ध होत आहेत, बँकांची एटीएम यंत्रणा यांचा गैरवापर करून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमालीच्या वाढत्या प्रमाणावर होत आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वच स्तरांतील लोक लुटले जातात. तांत्रिक सुविधांच्या आधारे होणाऱ्या गुन्ह्यांव्यतिरिक्त अन्यही प्रकाराने पैशांची फसवणूक होते. सोलापुरात महाराष्ट्र बँकेमध्ये नुकताच १२ लाखांची फसवणूक झाली. मारुती मोटार्सची एजन्सी असलेल्या चव्हाण ऑॅटोमोबाइल्स...
  November 15, 06:43 AM
 • अरुणाचल प्रदेशाने जशी किवी वाइन बनवली तसंच काही नागालँडच्या अननसापासून, मेघालयाच्या आल्यापासून, हळदीपासून, मणिपूरच्या काळ्या तांदळापासून,पॅशन फ्रूटपासून, सिक्कीमच्या बडी इलायचीपासून आणिआसामच्या चहा व मुगा सिल्कपासून बनू शकतं आणि पूर्वोत्तर भारताच्या अर्थकारणाला गती देऊ शकतं याची खूणगाठ चीनमधल्या एक्स्पोने बांधून दिली आहे. पूर्वोत्तर भारताच्या विकासाची खूणगाठ पटवणारी जी अनेकानेक पावलं गेल्या पाच वर्षांत पडत आली त्यातलं सर्वाधिक ताजं पाऊल पडलं ते याच महिन्याच्या प्रारंभी...
  November 15, 06:35 AM
 • राज्यात मुदत संपलेल्या धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक ९ डिसेंबरला होत आहे. या आधी झालेल्या जामनेर नगरपालिकेची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर भाजपने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालघर लोकसभेची पोटनिवडणूक आणि जळगाव महापालिकेची सूत्रे सोपवली होती. पालघरमध्ये जसे त्यांनी राजेंद्र गावित यांना दुसऱ्या पक्षातून आयात करत भाजपची उमेदवारी मिळवून दिली आणि सर्व प्रकारची प्रतिष्ठा पणाला लावत त्यांना निवडून आणले. त्यानंतर जळगाव महापालिकेतही त्यांनी तेच केले....
  November 14, 06:48 AM
 • अकाउंटिंग क्षेत्रात स्टॉक आणि फ्लो या दोन संकल्पना असतात. याद्वारे फर्मचे होल्डिंग (स्टॉक) आणि तिचा नफा-तोटा (फ्लो) कसा आहे, ते कळते. सी-व्होटरने ऑक्टोबर २०१८ मध्ये याच संकल्पना राजकारणात आजमावून पाहिल्या. त्यात पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारसाठी खूप मोठा पॉलिटिकल स्टॉक असल्याचे दिसून आले. पण येथे एक नकारात्मक फ्लोची स्थितीदेखील आहे. ही स्थिती धोक्याचे संकेत देत आहे. मोदी सरकारच्या एकूण ५४ महिन्यांच्या कार्यकाळातील यंदाचा ऑक्टोबर महिना जनतेच्या विश्वासाच्या दृष्टीने सर्वाधिक...
  November 14, 06:42 AM
 • सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्याबाबत दिलेल्या आदेशाचे काटेकोर व अतिशय कठोर पालन नाशिकमध्ये झाल्यामुळे दीपावलीसारख्या सणासुदीच्या काळात कुठेही प्रदूषण हाेऊ शकले नाही. किंबहुना, रात्री-बेरात्री शहराच्या निरव शांततेत अधूनमधून फटाक्यांचे कानठळ्या बसवणारे आवाज घुमत असतानाही त्यांच्या ध्वनीचे इवलुसे कंपनदेखील पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळेही साधा एकही गुन्हा दाखल होऊ शकला नाही. फटाक्यांचा आवाज कुठे झालाच नाही. ज्या यंत्रणेने अर्थात पोलिस व...
  November 13, 10:42 AM
 • अवनीवरून जे काही चाललं आहे, तो बाष्कळपणाचा कळस आहे आणि वन्यजीवन संरक्षणाविषयीच्या अज्ञानातून बालिशपणाची पराकोटी गाठली जात आहे.माणूस व प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत जात असताना, तो कसा कमी करावा, त्याकरिता विविध स्तरांवर काय करता येईल, याचा खरं तर विचार करण्याची गरज आहे. ही घटना आहे सेवाग्राम आश्रमातील. गांधीजींच्या काळातील. एके दिवशी आश्रमाच्या बाहेर एक पिसाळलेला कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्याला चावत होता. या कुत्र्याला आवरायचं कसं? त्याला मारायचं की पकडून दूर नेऊन सोडून द्यायचं? तेथे हा...
  November 13, 10:36 AM
 • नांदेड जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याने शेतात स्वतःचेच सरण रचून धगधगत्या चितेवर उडी घेत स्वतः ला संपवले. कर्जाचा बोजा, दुष्काळी स्थिती, जगण्याची विवंचना अशा चिंतेत त्यांनी आत्महत्या केली. राज्यात कर्जमाफीचा मोठा गाजावाजा झाला. उशिराने का होईना काहींना त्याचे लाभ मिळाले. ते सगळ्यांना मात्र मिळाले नाहीत यावरून सर्वत्र ओरड आहेच. सरकार सगळ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगत पाठ थोपटून घेत आहे. विरोधक मात्र या योजनेवर प्रचंड टीका करत आहेत. स्वतःचे सरण रचून त्यात उडी...
  November 12, 06:52 AM
 • माणसासाठी अटळ असणाऱ्या वृद्धावस्थेचा सन्मान करणारी प्रभावी अशी सामाजिक व्यवस्था असू शकते काय? ज्येष्ठ नागरिकांनाराष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे, असा ज्येष्ठत्वाच्या सन्मानाचा नवा प्रस्ताव अर्थक्रांतीने देशासमोर ठेवला आहे. आजच्या केविलवाण्यावृद्धत्वाची जागा सन्माननीय ज्येष्ठत्वाला देण्यासाठी त्यावर देशव्यापी विस्तृत आणि सखोल मंथन होण्याची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणू शकणाऱ्या अर्थक्रांतीच्या पाच कलमी मूळ प्रस्तावानंतर आणि सहा...
  November 12, 06:40 AM
 • आज ८६ वर्षांनंतर भारतीय हवाई दलात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले भारतीय हवाई दल आता पश्चिमेला होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातापासून दक्षिण चीन सागरापर्यंत तसेच मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत, इतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच आयोजित केल्या गेलेल्या पिच ब्लॅक २०१८ या हवाई दलांच्या आंतरराष्ट्रीय युद्धसरावांमध्ये भारतीय हवाई दलाने आपली क्षमता पुन्हा एकदा...
  November 10, 09:37 AM
 • दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियाच्या ट्रकने चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाला चिरडून मारले. विदर्भातील तीन जिल्ह्यांत दारूबंदी आहे. वर्धा, गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरात एप्रिल २०१५ पासून दारूबंदीला सुरुवात झाली. बेकायदेशीर दारू व्यवसायातील विविध प्रकारचे वाढते गुन्हे हा चंद्रपूर जिल्ह्याला नवीन प्रकार नाही. कारण बंदी सुरू झाल्यापासून दारू माफियांचा दारू उद्योग वरचेवर फोफावतच आहे. तो इतका जबरदस्त वाढलाय की, ते आता कोणालाच बधत नाहीत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी...
  November 8, 06:44 AM
 • या दिवाळीत भाजपला प्रभू रामाची आठवण फारच आलेली दिसते. याअगोदर चार दिवाळ्या आल्या होत्या, पण यंदाच अयोध्येत जाऊन दिवाळी साजरी करण्याचा विचार भाजपने केलेला दिसतो. बाबरी मशीद-राम जन्मभूमीचा वाद गेली आठ वर्षे सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका, असे इशारे दिले जात आहेत. जेव्हा वातावरण रामभक्तीचे होऊन जाते तेव्हा ओळखायचे की निवडणुका जवळ आल्या आहेत. हे वातावरण रामजन्मभूमीपुरते नाही तर लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तसे भाजप या...
  November 8, 06:38 AM
 • जगातील सर्वात मोठा सोने शुद्धीकरण कारखाना स्वित्झर्लंडमधील बलरेना शहरात आहे. इटलीच्या सीमेवर कारखाना उभारण्यात आलेला आहे. दर वर्षाला दोन हजार मेट्रिक टन सोने येथे शुद्ध होते. १९६३ मध्ये स्थापन झालेला हा कारखाना राजेश एक्स्पोर्ट््स या भारतीय कंपनीने २०१५ मध्ये अधिग्रहित केला होता. त्या वेळी ४० कोटी डॉलर (आजच्या किमतीत सुमारे २८८० कोटी रुपये) एवढ्या किमतीत ही खरेदी झाली होती. त्यानंतर ती जगात सर्वाधिक सोने निर्यात करणारी कंपनी बनली. बंगळुरूतील कुमारा कुरूपा पार्कजवळील बताविया...
  November 7, 06:49 AM
 • देशाची राजधानी दिल्लीत दिवाळी पर्व सुरू होण्याआधीच तेथील नागरिकांचा श्वास गुदमरायला लागला आहे. सोमवारी दिल्लीत प्रदूषणाची पातळी सरासरीच्या वीसपट अधिकची नोंदली गेली. दिल्लीकरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये आणि प्रदूषणाची पातळी वाढू नये म्हणून नागरिकांनी या दिवाळीत फटाके न फोडण्याचा निर्धार केला आहे. दिल्लीकरांच्या या निर्णयामुळे फटाके उत्पादक, विक्रेत्यांचे सुमारे पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्थात नागरिकांच्या जिवापेक्षा हे नुकसान फार मोठे नाही. दिल्लीत जे...
  November 7, 06:43 AM
 • नव चैतन्य, तेज अाणि मांगल्याचं पर्व म्हणजे दिवाळी. ही दिवाळीची परंपरा भारतीयांच्या मानसिकतेने पाैराणिक संदर्भविश्वात अलगद बसवलेली आहे. मात्र, दीप लावून दिवाळी साजरी करत असतानाच ज्ञानी हाेऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पेरण्याचा वसा संतविचारांतून भारतीय समाजाला मिळाला. अशा या ज्ञानज्याेतीने उजळलेल्या प्रकाशपर्वात सर्वत्र अानंदाचा अमृतानुभव घेता येताे. कारण दिवाळी खेडे अाणि शहर असा भेदभाव करत नाही. भलेही शहरात झगमगाट पाहायला मिळेल, परंतु खेड्यात दिवाळी उत्साहाने अाेथंबून येते हे...
  November 6, 07:49 AM
 • नाशिक विरुद्ध मराठवाडा, अहमदनगर अथवा जळगाव यांच्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून भडकणारा वाद नवीन राहिलेला नाही. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय धरणातून थेट जलवाहिनी टाकणे हाच आहे. मान्सूनच्या हंगामात पर्जन्यमानाचे चक्र थोडे जरी उलटसुलट फिरले तरी टंचाईची स्थिती निर्माण होऊन वितंडवाद सुरू होतो. त्याची दाहकता एवढी असते की पाणी वाचवण्यासाठी धरणांच्या प्रभावक्षेत्रातील दुखावलेली मंडळी मागचापुढचा विचार न करता तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. त्यातून मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न...
  November 6, 06:39 AM
 • उदारमतवादी संशोधक, प्राध्यापक, विचारवंतांना बिचकवायचं, धमकवायचं, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातून हुसकवायचं हा संघाचा जुना अजेंडा आहे. २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्याआल्या अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळालेले भारताची शान असलेले डॉ. अमर्त्य सेन यांना बिहारातल्या जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातून केंद्र सरकारनं हाकलून लावलं होतं. तोच प्रकार डॉ. गुहा यांच्या बाबतीत केला गेलाय. नुकतीच डॉ. कांचा इलया या विचारवंताची पुस्तकं दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलीत....
  November 6, 06:27 AM
 • पाणीदार माणसं नावाने नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत पाणीविषयक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी मुलांना शाळेत साक्षर करण्याबरोबरच जलसाक्षरही केले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यांच्या दृष्टीने जलसाक्षर याचा अर्थ अधिक व्यापक आहे. किती पाणी उपलब्ध आहे हे पाहून ते कोणी, केव्हा, कसे आणि कशासाठी वापरायचे याची समज असणे म्हणजे जलसाक्षरता, असे ते लिहितात. पोपटराव पवार यांची ही प्रस्तावना आठवण्याचे कारण अर्थातच, मराठवाड्याला पाणी देण्यावरून गोदावरी खोऱ्यातील वरच्या...
  November 5, 06:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED