Home >> Editorial >> Columns

Columns

 • उच्चपदस्थ व्यक्तींचा भ्रष्टाचार हा खूप गाजतो. परंतु, सामान्य माणसाला पावलोपावली जो भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, त्याचे काय? कोणत्याही सरकारी कामासाठी कार्यालयात जा, विनापैशाने काम झाले तर आश्चर्य वाटेल. मोठे विषय मोठ्या बातम्या तयार करतात. सामान्य माणसाच्या पदरात त्यातून काही पडत नाही. अण्णांनी सामान्य माणसाच्या पदरात काही पाडण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. समाजाचा नैतिक स्तर वाढेल या प्रकारचे वातावरण निर्माण केले पाहिजे. तेच भ्रष्टाचारविरोधाचे उत्तम कवच आहे. मोठा गाजावाजा...
  April 6, 02:00 AM
 • भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे हे पक्षाच्या वाटचालीचे प्रारंभापासूनचे साक्षीदार आहेत. भाजपचा पक्ष म्हणून एकंदरीत राजकीय प्रवास कसा झाला हे त्यांनी जवळून पाहिले अाणि अनुभवले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याच अंधेरा छटा, सूरज उगा, कमल खिला.. या शब्दांत खा. दानवे यांनी यांनी व्यक्त केलेले मनोगत. भारतीय जनता पक्षाचा ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महामेळावा होत आहे. केंद्रात आणि २१ राज्यांत सत्ता असणारा,...
  April 6, 02:00 AM
 • पुरुष व महिलांना समसमान पदकांच्या स्पर्धा-शर्यती असतील, हे २३ व्या राष्ट्रकुल क्रीडांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य. चार वर्षांपूर्वी ही तफावत ५१.५ - ४८.५ अशी तीन टक्क्यांवर आणली गेली होती. यंदा हे प्रमाण ५०-५० असं समसमान आहे. १३३ सुवर्णांसाठी चुरस पुरुषांत, तशीच महिलांत. चला, लागा कामाला : लाडू-लड्डू तयार ठेवा. फटाकेही आणून ठेवा. भारतीय नसले तरी चालतील; चीनमधून येतच असतात ते जमवून ठेवा. चला, जग जिंकूया, असे नारे द्यायची रंगीत तालीम सुरू करा. माझा भारत महान, अशा ब्रँडचे टी शर्ट व बनियन यांचं वाटप...
  April 5, 02:00 AM
 • जे भगवान शिवाचे उपासक आहेत, जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा (उगादी), मकर संक्रांत, होळी, नागपंचमी आदी सण-उत्सव साजरे करतात, बारा ज्योतिर्लिंगे, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना श्रद्धास्थान मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माहून वेगळे कसे? असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, १४ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री...
  April 5, 02:00 AM
 • कर्नाटक सरकारने लिंगायत हा स्वतंत्र धर्म घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची घोषणा करून तमाम लिंगायत समाजबांधवांशी अप्रतिम बनवेगिरी केली. याचे महत्त्वाचे कारण असे की, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तास्थानापर्यंत जायचे असेल तर कर्नाटकात लिंगायत मतपेढीशिवाय पर्याय नाही या राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन घेतला गेलेला हा ठराव आहे. वास्तविक पाहता कर्नाटक सरकारने घेतलेल्या या ठरावाचा लिंगायत धर्माला काही लाभ होईल याची सुतराम शक्यता नाही. म्हणून या ठरावाने...
  April 5, 02:00 AM
 • १९३५ ते २०१५ या ८० वर्षांत ईशान्य भारतात जवळपास एक हजार चित्रपट तयार झाले आणि राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट निर्माते, कलाकार ईशान्य भारताने सिनेमा जगताला दिले. आज या विषयाची आठवण होण्याचं मुख्य कारण म्हणजे २० ते २२ मार्चदरम्यान इटानगरातील दोरजी खांडू कन्व्हेन्शन हॉलमध्ये भरलेला पाचवा अरुणाचल फिल्म फेस्टिव्हल. सोशल मीडियावर आधारित तसेच वेब सिरीजवर आधारित काही वेगळे प्रयोग या वेळी सादर करण्यात आले. ईशान्य भारताच्या सांस्कृतिक इतिहासातलं एक ठळक पान...
  April 4, 02:00 AM
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कोणाचाही अनुनय न करता समाजातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मुद्रा योजना हा या धोरणाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणता येईल. स्त्रिया स्वावलंबी होईपर्यंत त्यांचे सक्षमीकरण होणार नाही. समाजातील सर्वांत तळागाळातील महिला सर्वांत प्रगत योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहे, यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट दुसरी काय असणार? आज समाजातील वंचित वर्गही विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावण्यासाठी आणि त्याचे लाभ घेण्यासाठी पुढे येत आहे. देशाचा...
  April 4, 02:00 AM
 • धाेरण अाखणारा उच्चपदस्थ नोकरशहा, पात्र तरीही धोरण आखणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेने वेढले गेलेले सरकारातील दिशाहीन मंत्री, कॉर्पोरेट जगताशी हातमिळवणी करत येऊ घातलेल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल संस्कृतीला सुखासुखी वर येऊ देण्याकरिता समाजहिताच्या विरोधात जाऊन तयार करण्यात अालेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलासारख्या येऊ घातलेल्या कायद्यांतील तरतुदी बघितल्या आणि भविष्यात हा कायदा अस्तित्वात आल्यावर सर्वसामान्यांच्या आरोग्यव्यवस्थेची कशी परवड केली जाईल, हे लक्षात आल्यावर समाजकारणी लोकांनी या...
  April 4, 02:00 AM
 • पुरातत्त्वशास्त्र (आर्किओलॉजी) हे प्रचलीत आणि लोकप्रिय विद्याशाखांमधले काहीसे अनवट क्षेत्र मानले जाते. संशोधन, सतत चिंतन, अभ्यास, संदर्भ, वैचारिक आणि तर्कशुद्ध मांडणीची अपरिहार्यता त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासाची गरज.. हे सारे पुरातत्त्वशास्त्राशी निगडीत विषय असल्याने ही विद्याशाखा तथाकथित लोकप्रिय नाही. पण माणूस म्हणून आपले अस्तित्व, आपली पाळेमुळे, आपल्या अस्मिता, जाणिवा आणि परंपरांचा मागोवा घेण्यासाठी पुरातत्त्वशास्त्राला पर्याय नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. या...
  April 3, 06:48 AM
 • घटनेतील अनुच्छेद १०२(१)(अ)अन्वये केंद्र सरकारच्या अथवा कोणत्याही राज्य सरकारांच्या अखत्यारीतील कोणतेही लाभाचे पद एखाद्या व्यक्तीने धारण केलेले असेल तर सदरची व्यक्ती कोणत्याही सभागृहाचे सदस्य बनल्यास अपात्र ठरते. अशाच प्रकारची तरतूद विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या बाबतीत घटनेच्या कलम १९१(१)(अ)मध्ये केलेली आहे. लाभाचे पद कोणते याची व्याख्या सदर कलमात करण्यात आलेली नाही. ते ठरवण्याचा अधिकार संसद व विधिमंडळाच्या विवेकावर सोडलेला आहे. संसदीय सचिव हे लाभाचे पद...
  April 3, 06:39 AM
 • सेवा क्षेत्रात रोजगारवाढीची किती प्रचंड संधी आहे हे ओला, उबेरने साडेचौदा लाख चालकांना रोजगार देऊन दाखवून दिले आहे. १३० कोटींच्या या देशात अशा धाडसांकडे सकारात्मकदृष्ट्या पाहूनच रोजगार आणि क्रयशक्ती वाढणार आहे. ओला, उबेर या खासगी कंपन्या आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाविषयी गेली चार वर्षे आपल्या देशात उलटसुलट चर्चा होत असली तरी रोजगारसंधी वाढीसाठी आसुसलेल्या आपल्या देशाला आता त्यांच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खासगी कंपन्यांशी संबंधित संप झाला आणि मोठ्या समूहाला त्याचा त्रास...
  April 2, 06:45 AM
 • राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनांचे सत्र सुरू आहे. वेगवेगळ्या संघटना, समाज, संस्था, कर्मचारी, प्रलंबित मागण्या पुढे करत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. कोणतेही क्षेत्र व्यवस्थेत सुस्थितीत नाही का, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत. हा समान आरोप सगळीकडे होताना दिसतो आहे. प्रश्न सुटलेच पाहिजेत, जे अनावश्यक असतील तेही मिटले पाहिजेत. खरेच एखादी अन्यायकारक गोष्ट घडत...
  March 31, 12:36 AM
 • कधी काळी लष्करी सैनिक असलेल्या आणि त्यानंतर ग्रामीण भागात सामाजिक प्रश्नांची नव्याने प्रेरणादायी उकल करणाऱ्या अण्णांनी पहिले आंदोलन १९८० मध्ये केले होते. गावास वेठीस धरणाऱ्या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांनी एका दिवसातच यंत्रणेला झुकवले. महाराष्ट्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याकरिता राळेगण सिद्धीत अण्णांचे दुसरे यशस्वी उपोषण ७ -८ जून १९८३ रोजी झाले....
  March 31, 12:33 AM
 • शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात १२ मार्च २०१८ रोजी प्रथमच सरकारने ९५ टक्के मागण्या मान्य केल्याने हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. सरकारने कृषी प्रश्न सोडवण्यासाठी चार पावले पुढे टाकली, यासाठी सरकारचे आभार मानत किसान सभेचे अभिनंदन केले पाहिजे. अडचण झालीय ती ऐनवेळी संधी साधण्यासाठी पाठिंबा देणाऱ्यांची. कारण आंदोलन चिघळण्याच्या आशा मावळल्या आहेत. खरे तर शेतकरी, आदिवासी, कष्टकरी यांचे प्रश्न मार्गी लागण्याचा आनंद व समाधान सर्वांना वाटला पाहिजे. या मोर्चाने पुन्हा ९ मागण्या ऐरणीवर आणल्या. या...
  March 29, 10:21 PM
 • सध्या रशियाविरोधात संपूर्ण युरोप एकत्र झाला आहे. यात एकेकाळी रशियाचे उपग्रह राष्ट्र असलेले पोलंड, हंगेरीसारखे पूर्व युरोपातील देशही आहेत. त्यांनी यापूर्वीच रशियाच्या विस्तारवादाचा अनुभव घेतलेला आहे. त्यांना या विस्तारवादाची भीती वाटते. दुसरीकडे जपानसारख्या संरक्षणासाठी अमेरिकेवर पूर्ण अवलंबून असणाऱ्या देशाला रशियाबरोबरच्या आपल्या प्रादेशिक समस्या सामोपचाराने सोडवणे आता आणखी कठीण झाले आहे. रशियात या महिन्यात नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन हे...
  March 29, 06:20 AM
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्वानंतर महाराष्ट्रातील दलित व सामाजिक चळवळीचे नेतृत्व पानतावणे सरांनी त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाने केले, असे माझे मत आहे. वैयक्तिक संदर्भ देऊन एक आठवण मला आवर्जून सांगितली पाहिजे. १९८८ मध्ये अस्मितादर्शचा मेळावा जळगाव येथे आयोजिण्यात आला होता. या मेळाव्यात दुसऱ्या दिवशी मी अधिकृत वक्ता म्हणून निमंत्रित होतो. पहिल्या दिवशी कॉम्रेड शरद पाटील यांचे भाषण सुरू झाले. पाटील यांचे भाषण ऐकत असताना मी पानतावणे सरांना कागदाच्या चिठोऱ्यावर एक छोटी ओळ लिहून...
  March 28, 07:04 AM
 • गेले अर्धशतकभर दलित जाणिवेला मूल्यवाचक प्रतिष्ठा व अस्मिता बहाल करणाऱ्या व अशा अभिव्यक्तीचे सकस, दर्जेदार वाङ्मयीन मुखपत्र म्हणून सातत्याने आणि व्रतस्थपणे चालवल्या गेलेल्या अस्मितादर्श या नियतकालिकातून डॉ. गंगाधर पानतावणे यांनी हजारो वर्षांपासूनच्या मूक अभिव्यक्तीला जे विचारपीठ निर्माण करून दिले ती केवळ मराठी वा भारतीय संदर्भातच नव्हे, तर जागतिक संदर्भातच मोलाची व ऐतिहासिक महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. सामाजिक न्यायाच्या व सांस्कृतिक परिवर्तनाच्या दृष्टीनेही त्यांच्या या...
  March 28, 02:00 AM
 • डॉ. गंगाधर पानतावणे यांचे साहित्यविषयक काम हे स्वत:च्या लेखनापेक्षाही इतरांना लिहिते करणे आणि जाणून घेणे होते. अभिरुचीचे संपादक पुरुषोत्तम आत्माराम चित्रे, वाङ््मय सभेचे संपादक द. के. केळकर, सत्यकथेचे संपादक श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत, प्रतिष्ठानचे संपादक डॉ. सुधीर रसाळ इत्यादींच्या कामाइतकेच अस्मितादर्शचे संपादक म्हणून डॉ. पानतावणे यांचे काम महत्त्वाचे आहे. नव्याने उत्साहित झालेल्या दलित तरुण लेखकांना त्यांनी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मिलिंद महाविद्यालयात प्राचार्य म....
  March 28, 02:00 AM
 • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्याख्यानातून, लिखाणातून सतत त्याच माणसाला जोडत चळवळीला गतिमान करण्याचे कार्य आयुष्यभर डॉ. गंगाधर पानतावणे सरांनी केले. १० ऑक्टोबर १९६८ ला अस्मितादर्शची सुरुवात झाली. अस्मितादर्शच्या कुटुंबाला प्रस्थापित समाजव्यवस्थेशी लढा देण्यासाठी पानतावणे सरांनी संमेलनात वैचारिक परिसंवाद, या परिसंवादातून बोलणारा वक्ता, त्या वक्त्यांची वैचारिक बांधणी करण्याचे कर्तव्य मनापासून पार पाडले. सरांचे...
  March 28, 02:00 AM
 • डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठी साहित्य सारस्वतामधील एक पूजनीय व्यक्तिमत्त्व. त्यांनी साहित्यातील समसरतेचा विचार उक्तीने आणि कृतीने सार्थ बनवला. माझी आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांची पहिली भेट १९७३ मध्ये मराठवाडा विद्यापीठात झाली. एक पाणवठा या डॉ. बाबा आढाव यांच्या पुस्तकावरील परीक्षण मी अस्मितादर्शमध्ये प्रथम लिहिले. त्यावर अनेक पत्रं आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वृत्तपत्रीय सिद्धांत असा लेख अस्मितादर्श दिवाळी अंकात लिहिला होता. लेखनातील शिस्त, अनुशासन आणि विचारांची तर्कशुद्धता हे...
  March 28, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED