Home >> Editorial >> Columns

Columns

 • निर्विचार समाधीमध्ये नैपुण्य प्राप्त झाल्यावर अध्यात्म प्रसाद मिळतो. निर्विचार या स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका-कुशंका असतात. निर्विचार राहणं शक्य आहे की नाही? एखाद्या जागी काही न करता ढिम्म बसून राहणं वगैरे गोष्टी आहेत त्या कशा काय करता येतील? आपल्याला हे शक्य नाही असे विचार मनात येतात व साधना करण्याचा विचार बाजूला ठेवण्यात येतो. या सायाचा अंगीकार आपल्याला सहज करता येईल अर्थात प्रयत्न हवेत. माणसाच्या मानसिकतेच्या जडणघडणीविषयीची विस्तृत चर्चा एकूणच मानवजातीला धरून या...
  July 16, 12:31 AM
 • शाळेची चाचणी परीक्षा चालू होती. मी नेहमीप्रमाणे सगळ्या वर्गांना भेटी देत होते. प्राथमिक विभागाची छोटी मंडळीदेखील शांतपणे पेपर लिहीत होती. काही पेपर दाखवून कौतुक करून घ्यायला येत होती. मी दुसरीच्या वर्गात गेले. सगळाच वर्ग अगदी हुशार चुणचुणीत मुलांचा! सगळा वर्ग अगदी शांत होता. मागच्या बाजूला दोन मुले बोलत होती. एक जण दुस-याला त्याचा पेपर दाखवत होता. मी जरा आवाज चढवून म्हटलं, काय चाललाय रे तुमचं? परीक्षा चालू आहे ना? त्यावर दोघं गप्प ! मी जरा समजावणीच्या सुरात म्हटलं, अरे, परीक्षा चालू असताना...
  July 16, 12:29 AM
 • विद्यार्थीच सुमार तेव्हा त्याला दर्जेदार शिक्षकाची शिकवणी हवीच कशाला? पुन्हा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होईल याची हमी द्यावयास तो शिक्षक तयार नाही आणि गुरुजींची फी तशी अधिकच! अन्य मागण्यादेखील बयाच तेव्हा विद्यार्थ्यांच्या दर्जास साजेसाच शिक्षक बरा. हे आहे ऑस्ट्रेलियन हॉकी प्रशिक्षक मायकेल जॅक नॉब्स यांच्या नियुक्तीमागचे नेमके कारण. ज्या विद्यार्थ्याचे गेल्या चार वर्षांतले प्रगती पुस्तक त्याच्यात सुधारणा होईल असे यत्किंचितही दर्शवीत नाही त्या विद्यार्थ्याला ऑलिम्पिक...
  July 16, 12:28 AM
 • आइसलँडमधल्या हुसाविक नामक मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात एक संग्रहालय आहे. केवळ आणि केवळ प्राण्यांची लिंगं असलेलं हे जगातलं एकमेव संग्रहालय. १९९७ मध्ये त्याची स्थापना झाली. आजमितीस त्यात ४६ प्राणिजातींची तब्बल २७६ लिंगं आहेत. त्यापैकी ५६ केवळ व्हेल माशांच्या विविध प्रजातींचीच असून त्यातील एका लिंगाची लांबी जवळपास ६७ इंच इतकी आहे. सीलसारख्या जलचर प्राण्याची ३५ लिंगं आहेत, तर जमिनीवर वावरणा-या सस्तन प्राण्यांची ११८ लिंगं या संग्रहात आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लिंगं मिरवणा-या...
  July 16, 12:25 AM
 • दहशतवाद्यांनी १३ जुलै रोजी घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली. या घटनेत मोठी मनुष्यहानी झालीच, त्याशिवाय अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांमधील मुख्य आधारस्तंभही बळी पडले. या हिंसक घटनेबद्दल समाजात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र निषेध व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निरनिराळी होती. या संदर्भात दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी मला खूपच सूचक वाटली. या बॉम्बहल्ल्याचे वृत्त देताना वृत्तवाहिन्यांनी जो उथळपणा दाखवला, परस्परांतील...
  July 16, 12:20 AM
 • विचाररहित स्थिती म्हणजे पूर्णत: पक्व अवस्था हा अध्यात्माचा प्रसाद आहे असं या सूत्रात सांगितलं आहे. अमुक एखादी गोष्ट केलीस तर मी तुला अमुक एक देईन ही आचारसंहिता प्रत्येकाच्या जीवनाशी जन्मापासून मृत्यूपर्यंत लागू करून देण्यात आली आहे. आता अमुक एक देईन या परिमाणातील अमुक हे आपल्या आवडीचे आहे किंवा असतं, म्हणून त्यासाठी आपण जिवाचं रान करतो आहोत. फळरहित कर्माला काही अर्थच नाही, ध्येयविरहित कर्म म्हणजे एक निरर्थक क्रिया ठरेल. पण त्याचबरोबर ध्येय म्हणजे हव्यास नाही. कारण हव्यास या संकल्पनेत...
  July 15, 05:57 AM
 • प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईबाबांचे खूप विशिष्ट स्थान असते. मुलींच्या बाबतीत तर आईचे स्थान फारच खास असते. माझ्याकरिता पण आईबाबांचे स्थान खूप मोठे आहे. आईच्या आॅफिसचे तास बाबांच्या आॅफिसच्या तासांपेक्षा जास्त असल्यामुळे मी आणि माझी बहीण बाबांशी कायम जास्त क्लोज राहिलो. लहानपणी पडल्यावर अगं आई गं म्हणण्याऐवजी अहो बाबा, बघा न काहीतरी लागले आहे मला असेच आपसूक म्हटले जायचे आणि आमचे बाबा सुपरहीरोसारखे सगळ्या अडचणी सोडवून दाखवायचे. आज बाबा नाहीत. त्यांचे निधन झाल्याला नुकताच १ महिना...
  July 15, 05:56 AM
 • प्रत्येक व्यक्तीला गुरू असतो. स्वामी विवेकानंदांनी गुरूची व्याख्या अत्यंत सोपी करून ठेवली आहे. ज्या व्यक्तीकडून किंवा घटकाकडून आपणास चांगला गुण शिकावयास मिळतो, तो आपला गुरू होय.भारतीय संस्कृतीत व हिंदंूच्या जीवनपद्धतीमध्ये गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला गुरू असतो. स्वामी विवेकानंदांनी गुरूची व्याख्या अत्यंत सोपी करून ठेवली आहे. ज्या व्यक्तीकडून किंवा घटकाकडून आपणास चांगला गुण शिकावयास मिळतो, तो आपला गुरू होय. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला - मग ती कोणत्याही...
  July 15, 05:55 AM
 • गोव्यामध्ये सध्या चालू असलेल्या मराठी आणि कोकणी माध्यमातील प्राथमिक शाळांतील वीस विद्यार्थ्यांच्या पालकांनी लेखी मागणी केली तर तेथे इंग्रजी वर्ग सुरू होईल, पहिली ते चौथी इयत्तांचे इंग्रजीकरण एकाच वर्षी करता येईल, अशी तरतूद सरकारने केली आहे.अजीब हैं यह गोवा के लोग... पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एकदा गोव्यात आले होते, तेव्हा त्यांनी केलेले हे विधान बरेच गाजले. गोवेकर राज्यकर्त्यांना ते रुचले नाही. परंतु महत्त्वाच्या विषयांवरून...
  July 15, 05:50 AM
 • विदेशातील नागरिकांनी भारतात येऊन भरीव सामाजिक कार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मदर तेरेसा, लॉरी बेकर अशी काही नावे वानगीदाखल सांगता येतील. हिमाचल प्रदेशमधील मॅकलोदगंज परिसरातील पर्वतशिखरांच्या आसमंतात स्वच्छता अभियान राबवणारी तसेच पर्यावरण रक्षणासाठी अविरत झटणारी ब्रिटिश नागरिक ज्योडी अंडरहिल हिच्या कार्याबद्दल तिला अलीकडेच सिमला येथे झालेल्या एन्व्हॉयर्नमेंट फिल्म फेस्टिव्हल दरम्यान ग्रीन हीरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही बातमी मनाला सुखावणारी आहे. या संदर्भात नवी...
  July 15, 05:47 AM
 • मुंबईत झालेल्या तीन स्फोटांनंतर आता गंभीर चेहरे बनवून काय उपयोग, खोटी सांत्वन करू नका. श्रद्धांजली वाहू नका आणि पाकिस्तानचे नावही घेऊ नका. खासकरून त्यांना पुरावे देण्याचे मवाळ वक्तव्य करू नका. आपातकालीन बैठक घेत राहा. मात्र, त्यामध्ये किती ठोस निर्णय घेतले, हे नागरिकांना सांगू नकातुम्ही सरकार कसेही चालवा, पण आमच्यासारख्या सामान्य जनतेला कोणतीही स्वप्नं दाखवू नका. दहशतवाद्यांविरोधात युद्ध करण्याचा दावा तर चुकूनही करू नका. मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांनंतर निर्भयपणे बोलणाऱयांना बोलू...
  July 14, 10:14 AM
 • केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी समलिंगी संबंध हा एक आजार आहे, असे सांगून एक जुन्याच वादाला नव्याने तोंड फोडण्याचे काम केले आहे. मूलत: माणसाच्या एखाद्या वर्तनाला नॉर्मल म्हणायचे की अॅबनॉर्मल हा वाद वैद्यकशास्त्रात विशेषत: मनोविकृतीशास्त्रात नेहमीचाच आहे. कारण नॉर्मल किंवा अॅबनॉर्मल ठरवण्याच्या निकषांमध्ये मतभिन्नता आढळून येऊ शकते. एखादे वर्तन योग्य की अयोग्य हे ठरवताना त्या वर्तनाकडे समाज आणि संस्कृतीच्या गवाक्षातून पाहिले जाते. उदा. १) आदिवासी स्त्री व पुरुष केवळ...
  July 14, 05:48 AM
 • नॅसकॉम या संस्थेने इंजिनिअरिंगचे देशातील ७५ टक्के विद्यार्थी रोजगारक्षम नाहीत, असे एका अहवालात नमूद केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हे जर वास्तव असेल तर इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला प्रवेशाचे अविवेकी अडसर घालून हे वास्तव बदलणार आहे का? हे वास्तव बदलायचे असेल तर मूलत: विचार व्हायला हवा. शिक्षण आणि व्यावसायिकतेचा, अभ्यासक्रमांचा, सक्षम स्टाफचा-शिक्षकांचा, शैक्षणिक वातावरणाचा, सोयीसुविधांचा, मूल्यमापन पद्धतीचा, विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी प्रवेश देताना समान संधीचा...इंजिनिअरिंग...
  July 14, 05:47 AM
 • दोन दशकांपासून भारत दहशतवादी हल्ल्यांना सातत्याने बळी पडत असतानाही भारताने अद्याप आपले दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण आखलेले नाही. अमेरिकेवर २००१ साली हल्ला झाल्यानंतर प्रथम देशांतर्गत सुरक्षा विभाग बनविण्यात आला. राष्ट्रीय गुप्तचर संचालनालय निर्माण करण्यात येऊन संपूर्ण गुप्तचर यंत्रणेत समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला. २००४ मध्ये ऐतिहासिक गुप्तचर सुधारण आणि दहशतवाद निर्मूलन कायदा तयार करण्यात येऊन अमेरिकेतील सोळा प्रमुख गुप्तचर संघटनांना अधिकाधिक उत्तरदायी बनविण्यासाठी...
  July 14, 05:44 AM
 • वीर शिवा काशीदचा जन्म ५ मे १६६० रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाया नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रमच होता. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच शिवरायांनी त्यांची हेर खात्यात नेमणूक केली होती. शिवा काशीदचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी...
  July 13, 05:52 AM
 • जुलैच्या अखेरच्या पंधरवड्यात भारतातल्या मुंबई आणि दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांतल्या रस्त्यांना न भूतो असा स्लटवॉक पाहायला मिळणार आहे. अर्थात, विथ इट्स ओन देसी व्हर्जन. संपूर्णत: पाश्चात्त्य स्त्रीवादी चळवळीचं अपत्य असलेल्या स्लटवॉकचं मुंबईतलं नाव असेल सिटी बजाओ, तर दिल्लीतलं बेशरमी मोर्चा. स्लटवॉकच्या आयोजनकर्त्यांना त्याचं असं देशीकरण करायची पश्चातबुद्धी झाली, हे आपल्या देशातल्या सामाजिक चळवळींचं सुदैवच म्हणायला हवं. ढोबळमानाने विचार केला तर जगातल्या स्त्रीजातीला...
  July 13, 05:50 AM
 • महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. तेथील प्रकल्पांसाठी वापरण्यात येणा-या तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे कामही या संस्थांकडून केले जात असते. मात्र या तंत्रज्ञानाचा हवा तसा उपयोग ग्रामीण भागातील जनतेला होत नाही. याची विविध कारणे आहेत. ग्रामीण भागात विविध प्रकल्पपूर्तीसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे बहुतांश शहरकेंद्री असते. काही क्षेत्रे वगळता ग्रामीण भागातील व शहरी भागातील जनतेच्या गरजांमध्ये फारसा फरक नसतो हे...
  July 12, 05:16 AM
 • बारा जुलैच्या रात्री पानशेत धरण फुटले. त्यातून सुटलेल्या पाण्याच्या तडाख्याने खडकवासला धरणाला भगदाड पडले आणि सकाळी ११ वाजता पुणे शहरात पानशेतचे पाणी घुसले! अर्धे पुणे उद्ध्वस्त झाले! त्याच्या सत्यासत्य, कल्पित-अकल्पित कहाण्या नंतर बराच काळ प्रसृत होत राहिल्या. पुणे शहराची पुनर्मांडणी करण्यासाठी स. गो. बर्वे यांच्यासारखा कर्तबगार अधिकारी नेमला गेला. त्या वेळी पुण्याबाहेर नव्या पेठेत, दत्तवाडी वगैरे भागात फेकले गेलेले पूरग्रस्त आता पुणे महानगराच्या मध्यभागी, कोट्यवधी रुपये...
  July 12, 04:57 AM
 • २०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याची शक्यता असल्याची साधार भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे झाले तर त्याचा भारताच्या विकासावर थेट विपरीत परिणाम होऊ शकतो. जागतिक महाशक्ती म्हणून आपला देश पुढे येत असताना लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखणे अतिशय आवश्यक आहे. देशातील राज्यांमधील लोकसंख्यावाढीचा ,विशेषत: महाराष्ट्राचा अभ्यास केला तर काही बाबी समोर येतात. देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांक उत्तर प्रदेशचा व दुसरा क्रमांक...
  July 11, 01:39 AM
 • यिंगल्यूक शिनवात्राच्या रूपात प्रथमच थायलंडमध्ये एक स्त्री पंतप्रधानपदी आरूढ होत असताना लोकांच्या मनात नाना प्रश्न उभे राहिले आहेत. विशेषत: यिंगल्यूकचं सरकार आल्यावर माजी पंतप्रधान आणि यिंगल्यूकचे भाऊ थाकसिन शिनवात्रा हे पुन्हा थायलंडमध्ये परतणार का याबद्दल प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच आता तरी देशात शांतता नांदेल का हा या ठिकाणी कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. यातील दुसरा मुद्दा हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने, त्यातही विशेषत: भारतीयांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा...
  July 11, 01:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED