Home >> Editorial >> Columns

Columns

 • युरोपातील अनेक देशांत भ्रष्टाचाराचे अल्प प्रमाण आहे. अमेरिकेतही खालच्या पातळीवर भ्रष्टाचार होत नाही. विविध देशांच्या कंपन्या विदेशात व्यापार करताना भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतात. त्यासंदर्भात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार या प्रकारच्या देशांत भारताला 19 वे स्थान देण्यात आले आहे. भारतातही सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उदंड चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या संकल्पनेविषयी ज्या गफलती आहेत त्यांचा यानिमित्ताने विचार करणे आवश्यक वाटते.नैतिक आणि...
  November 15, 12:11 AM
 • आपल्या घरी ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज जन्मावेत, नाहीतर किमान सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर जन्माला यावेत असे सर्वच आईवडिलांना वाटत असते. मात्र पालक म्हणून आपण कसे असायला हवे याचा गांभीर्याने विचारच केला जात नाही असेही चित्र आहे. आपली मुले त्या उत्तुंगतेपर्यंत नाही पोहोचू शकली तरी ती किमान यशस्वी आणि नामवंत व्यक्ती व्हावीत, त्यांनी कीर्ती व पैसा दोन्ही मिळवावा ही अपेक्षा पालकांच्या मनात असतेच. ही भावना अत्यंत नैसगक आहे. पण मग नेमकी माशी कुठे शिंकते? आपण बालकांना मुकी बिचारी कुणी हाका अशी...
  November 14, 06:29 AM
 • पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 14 नोव्हेंबरच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण बाल दिन साजरा करतो. माझ्या लहानपणी मी पंडितजींना मुंबईत वांद्रे येथे पाहिले होते. ती प्रतिमा आजही माझ्या मनावर जशीच्या तशी कोरल्यासारखी आहे. पंडितजी उघड्या गाडीत उभे होते. मुला-माणसांना बघून अभिवादन करीत होते. पण त्यातही लहान मुलांकडे पाहताना त्यांची मुद्रा उजळून निघत होती. मुखावरचे हास्य खुलत होते आणि हात आनंदाने हलत होते. ती उत्फुल्ल मुद्रा, ते विलक्षण देखणेपण आणि पांढर्या कोटावरचा तो लाल गुलाब यातली प्रत्येक...
  November 14, 06:26 AM
 • अमेरिकेमध्ये काही वर्षांपूर्वी डू इट युवरसेल्फ नावाची चळवळ सुरू झाली होती. ही चळवळ म्हणजे आपली छोटी कामे आपणच करायची. त्यासाठी मनुष्यबळ विकत घ्यायचे नाही. ही चळवळ सुरू होण्याची दोन कारणे होती. घरातले आणि बाहेरचे कोणतेच शरीरकष्टाचे काम न केल्यामुळे म्हणजे केवळ बौद्धिक कामामुळे आयुष्य नीरस झाले, असे अनेकांना वाटत होते तर दुसरे कारण होते, ते आपली घरातील कामे इतरांकडून करून घेणे प्रचंड महाग झाले होते. म्हणजे त्या वेळच्या अमेरिकन समाजाच्या उत्पन्नात ते परवडेनासे झाले होते. यातून त्या...
  November 12, 10:03 PM
 • मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणा-या चित्रभूषण पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला निश्चितच भरपूर आनंद झाला आहे. माझ्या चार दशकांच्या नृत्यातील कामगिरीचा हा एक विशेष गौरव आहे, असे मला वाटते. मी जन्माने बंगाली असलो तरी या महाराष्ट्रत मी राहिल्याने या महाराष्ट्रचाच मी एक झालो असून मी स्वत:ला मराठी माणूसच मानतो. मराठी चित्रपटसृष्टीतील कित्येक नामवंत, गुणी कलाकारांसोबत काम करता करता माझी मराठी भाषादेखील खूप सुधारली आहे. मी नृत्यदिग्दर्शन केलेल्या दादा कोंडके-उषा चव्हाण...
  November 12, 10:01 PM
 • मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम व मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची साठ वर्षे गेल्याच आठवड्यात पूर्ण केली. दररोज सुमारे 69 लाख प्रवाशांची वाहतूक करणारी ही उपनगरीय रेल्वे 5 नोव्हेंबर 1951 रोजी अधिकृतरीत्या स्थापन झाली. त्यापूर्वी म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली रेल्वे मुंबई (त्या वेळचे बोरीबंदर) ते ठाणेदरम्यान धावली होती. मात्र, भारतीय रेल्वेच्या स्थापनेनंतर जी. आय. पी. (ग्रेट इंडियन पेनिनस्युलर) रेल्वेच्या काही भागाला निजाम, सिंदिया आणि धवलपूर स्टेट रेल्वेचा भाग जोडून 5 नोव्हेंबर...
  November 12, 09:58 PM
 • भेजा फ्राय या चित्रपटात भाबडी व दुबळी व्यक्ती हेरून तिची अवहेलना करण्याचा नाद असणारे सर्जनशील (?) धनवंत दाखवले होते. दर वेळी नवीन शिकार शोधून हे लोक वीकएंड साजरा करतात. केंद्र आणि राज्य सरकारांचा कारभार तंतोतंत या प्रकारचा आहे. धनाढ्य, नेते व अधिकारी यांच्यासाठीचे कायमचे सावज असंघटित आम आदमी हाच आहे. शेतकरी काही और खुमारी आणत असल्यामुळे तो वारंवार रिंगणात येत असतो. त्याचीही आशा मरत नाही. हा खेळ पुन:पुन्हा खेळला जातो. कधी कापूस, कधी कांदा, तर कधी ऊस पिकवणा-यांचा आळीपाळीने भेजा फ्राय करायचा....
  November 12, 09:56 PM
 • इस्रायल हा छोटा देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येचा हजारावा हिस्सा येथे राहतो. तरीही अनेक बाबतीत इतर देशाच्या तुलनेत हा देश सर्वात पुढे आहे. एका इस्रायल नागरिकाने मोटारोला सेलफोन तयार केला. विंडोजच्या एनटी आणि एक्सपी आॅपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्ट इस्रायल देशाने तयार केले आहे. इंटेलची पेंटियम चिप टेक्नॉलॉजीचे श्रेयही इस्रायल देशाला आहे. पेंटियम चार मायक्रो प्रोसेसर आणि सेंट्रिनो प्रोसेसरच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनाचे श्रेयही इस्रायलला आहे. इंटरनेट व्हाइस मेल तंत्रज्ञान हेही...
  November 12, 07:53 AM
 • माझ्या आठ वर्षांच्या मुंबईतील वास्तव्याच्या काळात रोजच आर. के. लक्ष्मण यांना भेटत असे. माझ्या दृष्टीने तो जगातील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार आहे. त्याचेदेखील स्वत:विषयी असेच मत आहे. इतर व्यंगचित्रकारांना, विशेषत: त्याच्याच ऑफिसात काम करणा-या मारिओ मारुदाला तो तितके महत्त्व देत नसे. लक्ष्मण हा पापभीरू आणि सालस मनुष्य. तो मला नेहमी घरी बोलावत असे. त्याला दारू फार प्रिय. तेवढेच प्रेम तो आपल्या भावावरही करत असे. त्याचा थोरला भाऊ आर. के. नारायणन याच्याबद्दल त्याला जितका आदर होता, तितका मला...
  November 11, 10:33 PM
 • भारतातील कसोटी क्रिकेट सामन्यांच्या वेळी रिकामी दिसणारी स्टेडियम्स आणि बॉक्सिंग, हॉकी अशा खेळांच्या विश्व मालिकांना भारतात मिळणारा प्रचंड प्रतिसाद भारताच्या क्रीडा क्षेत्रातील भावी क्रांतीचे संकेत देत आहेत. क्रिकेट या खेळाचे लोकांना अजीर्ण होऊ लागले आहे. नव्या पिढीकडे क्रिकेटला देण्याएवढा वेळ नाही. त्यामुळे किमान अवधीत होणारे सामने, क्रीडा स्पर्धा हेच नव्या पिढीचे आकर्षण आणि पसंती असणार आहे. युवा पिढीची ती आवड लक्षात घेऊन हॉकी संघटना वर्ल्ड सिरीज हॉकीच्या आयोजनासाठी पुढे आली...
  November 11, 10:30 PM
 • इंटरनेटच्या मायाजालाने भारतीयांनाही भुरळ घालण्यास सुरुवात केली आहे. संगणकावर एका क्लिकवर माहितीचा साठा आपल्याला काही क्षणांत उपलब्ध होऊ लागल्याने जग अतिशय जवळ आले. साहजिकच इंटरनेटकडे सुरुवातीला विकसित देशातील जनता वळली. अमेरिका व युरोपातील इंटरनेटची बाजारपेठ आता कुंठित होण्याच्या स्थितीत आली आहे. मात्र त्याखालोखाल झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेत आघाडीवर असलेल्या चीन व भारत या देशातील रहिवाशांनी इंटरनेटच्या जास्तीत जास्त जुळण्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता...
  November 10, 10:52 PM
 • पूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडून विशिष्ट पद्धतीने नष्ट केले जायचे. परंतु प्राणिमित्र संघटनांनी, नागरिकांनी न्यायालयीन लढा देऊन ही पद्धत बंद केली. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार असतो हा विचार निश्चितच महत्त्वाचा आहे. भटक्या कुत्र्यांना नष्ट करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर त्यांची संख्या सतत वाढू लागली. दिवसा ही कुत्री फारशी कुठेही दिसत नाहीत, परंतु रात्री बारानंतर गल्ली-गल्लीतून रस्त्यावर फिरताना दिसतात. प्रसंगी सामान्य माणसेही त्यांची शिकार ठरतात. त्यामुळे सरकारने...
  November 10, 10:51 PM
 • मागील दोन-तीन दिवसांत देशातील अग्रणी दैनिकांच्या नवी दिल्ली आणि मुंबईच्या आवृत्तीत एक कॉलम बातमी प्रकाशित झाली होती. जर तुम्ही त्या बातमीला सामान्य घटनेसारखे बघितले तर तुम्हाला त्या बातमीचे महत्त्व वाटणार नाही. पहिल्या बातमीचे शीर्षक होते युवकाने सोन्याची चेन चोरली. दुस-या बातमीचे शीर्षक होते डान्सबारमध्ये मारहाण झाल्यावर विद्यार्थ्याला लुटले. या घटनेबद्दल सांगितले होते की, त्याने एक हि-याचे ब्रेसलेट घातले होते. तिस-या बातमीत मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सामानाच्या चोरीच्या...
  November 10, 08:13 AM
 • भ्रष्टाचारावर बारकाईने नजर ठेवून असलेल्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार परदेशात व्यापारउदीम करण्यासाठी चीन व रशियाच्या कंपन्या सर्वाधिक लाच देतात. या सर्वेक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या यादीत भारत 19 व्या क्रमांकावर आहे. त्यावरून तरी भारतीय कंपन्यांची प्रतिमा काहीशी सुधारल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात लाक्षणिक अर्थाने ही सुधारणा जुजबी असली तरी महत्त्वाची आहे. 1991 पर्यंत आपल्या देशातील व्यापारी बंधनांमुळे व नोकरशाहीच्या एकूणच अनास्थेमुळे...
  November 9, 10:29 PM
 • दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचा विस्तार करण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून त्यानुसार देशात या संस्थेची लखनऊ, कोची व मुंबई येथे तीन नवी कार्यालये उघडण्यात येणार आहेत. या यंत्रणेच्या कर्मचारी वर्गामध्ये अजून 400 ते 900 जणांची वाढ करण्यात येणार आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासकार्याची चर्चा सर्वतोमुखी होऊ लागली. देशामध्ये रॉ, आयबी, सीबीआय तसेच विविध राज्यांतील पोलिस तपास यंत्रणा असताना...
  November 9, 10:27 PM
 • कोका कोला आणि पेप्सिको सारख्या कंपन्या पुढील आठ वर्षामध्ये आपले जागतिक उत्पादन वाढविण्यासाठी काम करत आहे. मागील आठवड्यात नवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान मला त्यांच्या एका योजनेविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. ही कंपनी आपले उत्पादन वाढविणार होती,परंतु त्यांना ही चिंता आहे की, जगातील ग्राहक हे आता ब्रँडवर विश्वास ठेवत नाही. जे की पहिले ठेवत होते. दुस-या ब्रँडच्या तुलनेत कोक कंपनीने या बदलणा-या ट्रेंडला सर्वात पहिले समजून घेतले. काही दिवसांपूर्वी कोक कंपनी सांताक्लॉजसारख्या...
  November 9, 07:51 AM
 • मोहन धारिया यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान केल्यामुळे खुद्द काँग्रेसजनांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्थात धारिया या पुरस्कारासाठी पात्र नाहीत, म्हणून हे आश्चर्य खचितच उद्भवलेले नव्हे. स्वच्छ प्रतिमा असलेले धारिया काँग्रेसचे निष्ठावंत पाईक आहेत. आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लक्षावधी झाडे लावली आहेत. त्यांच्या पुरस्काराची बातमी ऐकून काँग्रेस वर्तुळात भुवया उंचावण्यामागचे कारण वेगळेच आहे. 1975 ते 1977मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या...
  November 9, 03:10 AM
 • 1962 मध्ये भारतावर चीनने केलेल्या आक्रमणाच्या घटनेचे यंदा पन्नासावे वर्ष सुरू आहे. या युद्धापासून आपण काय बोध घेतला? सध्या आपले चीनशी हिंदी-चिनी भाई-भाई संबंध आहेत की चीनशी पुन्हा एकदा लढाई होणार आहे? तसे झाल्यास आपले सरकार व लष्कर कितपत कार्यक्षम आहे? वास्तविक पाहता 1962 च्या युद्धात भारताच्या केवळ 10 टक्के सैन्याने भाग घेतला होता. हवाई दल व नौदल यांचा अजिबात वापर केला नव्हता. गेल्या 7-8 वर्षांत चीन सीमेवरची परिस्थिती गंभीर होत आहे. चिनी सैन्याचे रस्ते (मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या आकाराचे)...
  November 9, 03:09 AM
 • कोणत्याही देशात किंवा समाजात माणूस हाच विकासाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. ज्या राज्याला शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनवादी वैचारिक वारसा लाभलेला आहे, त्या राज्यात तर सर्वसामान्य माणसाचा विकास हाच केंद्रीभूत विचार असलाच पाहिजे. बदलत्या आर्थिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर काळाच्या ओघात आमचे वैचारिक अधिष्ठान बदलले आहे. या बदलाचे दूरगामी परिणाम होत आहेत. त्यामुळे देशातील अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त या...
  November 7, 09:47 PM
 • राज्य सरकारने विभागीय अनुशेष दूर करण्याकरिता विजय केळकर समिती नेमलेली आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या विभागांचा समतोल विकास साधण्यासाठी काही सूत्रे शोधण्याच्या उद्देशाने ही समिती नेमण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. याआधी या विषयावर अनेक समित्या नेमण्यात आल्या व या समित्यांचे अहवाल शासनाकडे पडून आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली असती तर ही समिती नेमण्याची वेळ आलीनसती. मराठवाड्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये विकासाचा असमतोल राहिलेला आहे. मराठवाड्याचा विकास म्हणजे मराठवाड्यातील...
  November 7, 09:46 PM
 
जाहिरात

RECOMMENDED