Home >> Editorial >> Columns

Columns

 • पर्यटन! प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या भटक्याला आवाहन करणारा शब्द. कधी मनात विचार येतो, पर्यटन हा व्यवसाय म्हणून कसा आहे? पर्यटन व्यवसाय हा सेवा क्षेत्रात अंतर्भूत आहे. १९९१ मध्ये भारतात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि परमिट/लायसन्स राज संपुष्टात आले. नव्या आर्थिक धोरणांच्या लवचीकतेचा फायदा उचलत अनेक नवे उद्योग उभारी धरू लागले. सेवा क्षेत्रात मोडणा-या पर्यटन उद्योगानेदेखील या काळात चांगले मूळ धरले. त्या काळात शेती उद्योग किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजपेक्षा सेवा...
  August 31, 03:20 AM
 • श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा धूसर असते असं नेहमी म्हटलं जातं. पण ती धूसर रेषाच थोडी स्पष्ट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या अंधश्रद्धाविरोधी विधेयकाने केला तर त्याला इतका विरोध झाला की गेली पाच-सात वर्षे ते कागदावरच पडून आहे. त्यामध्ये एखाद्या माणसाचे अनिष्ट आणि अघोरी प्रथांच्या माध्यमातून किंवा त्याच्या जाहिरात, प्रचारातून शारीरिक, मानसिक अथवा आर्थिक शोषण, नुकसान होत असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पण ते विधेयक काय आहे हे समजूनच न घेता त्याला धर्मविरोधी,...
  August 30, 12:28 AM
 • समर ऑफ सिक्स्टिनाइन हे माझे आवडते गाणे आहे. मानवी वर्तनाचे मूळ मेंदूऐवजी हृदय असण्याच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. ज्या वेळी मी दिल्लीत आले, तेव्हा शहराच्या कानाकोप-यात सर्वत्र लोकपाल विधेयक आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात चर्चा सुरू होती. अर्थात, टीव्हीवर चर्चेला बोलावल्याशिवाय लोकपालाचा भलाथोरला मसुदा वाचण्याची तसदी आपल्यापैकी अनेकांनी घेतलेली नाही. हमरीतुमरीवर येऊन आक्रस्ताळेपणाने भांडणे करणा-यांमध्ये आणि न्यूज चॅनल्सवरील पॅनेलिस्टांमध्ये काहीही फरक भासत...
  August 30, 12:24 AM
 • सार्वजनिक जीवनातील कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य आणि व्यवहार पारदर्शक असले पाहिजेत. राजकीय नेत्यांची, विशेषत: सत्ताधा-यांची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे, असा आग्रह धरताना प्रशासनातील आणि खासगी क्षेत्रातील अथवा उद्योगातील जे सत्ताधारी असतात, अशा प्रभावशाली उच्चपदस्थांचाही आपण विसर पडू देता कामा नये. एकीकडे लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकांवरील चर्चा सुरू असताना भ्रष्टाचार रोखण्यासाठी संबंधितांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर आणि प्रसंगी त्यांना माघारी बोलावण्याच्या अधिकारावरही...
  August 29, 03:48 AM
 • अण्णांच्या टीमने तयार केलेले जनलोकपाल विधेयक शासनाने स्वीकारावे यासाठी अण्णांनी दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाने, त्यांच्या उठावाच्या स्वरूपाबाबत तसेच समाजातल्या विविध घटकांच्या मानवी हक्कांसाठी कार्यरत असणा-या संस्थांनी या चळवळीशी कशा प्रकारचा संबंध ठेवायचा, या संदर्भात अनेक वाद निर्माण झाले आहेत. जनलोकपाल विधेयकाच्या प्रश्नावर अण्णा हजारेंनी एप्रिल २०११मध्ये अशा प्रकारचे पहिले उपोषण केले होते. याच काळात परदेशी बँकांमध्ये असणारा बेकायदा पैसा भारतात परत आणण्यासाठी रामदेव...
  August 29, 03:46 AM
 • भारतातील सध्याच्या व्यवस्थेत काही मूलभूत बदल केल्याशिवाय सध्याच्या नकारात्मक परिस्थितीत मोठा फरक पडण्याचे काही कारण नाही, ही गोष्ट प्रत्येक विचारी भारतीय माणसाला मान्य करावी लागते. कारण लोकसंख्येत जगात दुसरा, आकारमानात सातवा, जात, धर्म, पंथ,भाषा असे प्रचंड वैविध्य असलेला हा देश म्हणजे एक हत्ती आहे. त्याला चालवायचे तरी आणि वळवायचे असले तरी बरीच तयारी करावी लागते, हे आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. त्यामुळेच आता देशात मोठा बदल होणार, असे कोणी म्हटले तरी त्यावर विश्वास ठेवावा, अशी आज स्थिती...
  August 28, 12:25 AM
 • अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी हाती घेतलेले आंदोलन देशभर पसरले आणि घरोघरी त्याची चर्चा सुरू झाली. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच आपापल्या परीने या चर्चेत सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली. देशातील प्रत्येक घटक या चर्चेच्या वादळात घुसळून निघाला. फरक पडला नाही तो फक्त सरकारी कवचाखाली असलेल्या घटकाला. अधिकारी आणि कर्मचा-यांनी या आंदोलनापासून सोयीस्करपणे सुरक्षित अंतर राखले. त्याने आपली प्रतिक्रिया अजूनही नोंदविलेली नाही. तो दुरूनच आंदोलक आणि...
  August 28, 12:22 AM
 • प्राचीन भारताच्या तसेच मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाची पाने तेजाळली तर शूर योद्धांच्या शौर्यगाथांनी विविध राजवंशांची संस्कृती पचवून भारतीय परंपरा व संस्कृती समृद्ध बनत गेली. भारताच्या या समृद्ध इतिहासातील कर्तृत्ववान व प्रजाहितदक्ष ठरलेल्या अहिल्यादेवीचं किंबहुना होळ ते इंदूर माळव्यातील राजप्रवास म्हणजे होळकरांचं भारताच्या १८ व्या शतकातील इतिहासाचं एक अलंकृत पान. होळकरांचे पूर्वज वाफगावचे. त्यांचे खरे नाव वीरकर. त्यातील काही होळगावी आले. होळ गावावरून पुढे होळकर बनले. खंडोजी...
  August 27, 11:24 PM
 • मला भावलेला प्रतिभावंत विद्वान म्हणजे नभाचे भाई कहानसिंग. त्यांचे साहित्यिक कार्य माझ्यासाठी खरोखरच प्रेरणेचा विषय आहे. लौकिकार्थाने त्यांनी कधीही शिक्षण घेतले नाही; पण संस्कृत, इंग्रजी आणि पर्शियन या भाषांचे जुजबी ज्ञान त्यांनी प्राप्त केले होते. गुरुबानी इंग्रजीत भाषांतरित करण्याच्या कामात मेकॉलिफला मदत करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. आपल्या लंडन येथील वास्तव्यात त्यांनी प्रिव्ही कौन्सिलमध्ये कुठल्या तरी एका खटल्यात नभाचे महाराज हिरा सिंग यांच्या बाजूने साक्ष दिली होती. भारतात...
  August 27, 12:34 AM
 • चार आठवड्यांत भारतीय क्रिकेटमध्ये कमालीचा बदल झाला. विश्वचषक जिंकल्यानंतर टेलिव्हिजनला चिकटून राहिलेला प्रेक्षकवर्ग आता क्रिकेट मॅच सुरू असताना टी. व्ही. सेट बंद तरी करायला लागला किंवा चॅनल बदलायला शिकला. इंग्लंडविरुद्ध मालिकेतील दारुण पराभव कुणीही अपेक्षित केला नव्हता. भारतीय क्रिकेटरसिकांनी तर नाहीच नाही. खेळणा-या खेळाडूंनीही तशी अपेक्षा केली नव्हती. भारतीय क्रिकेट बोर्डही भाबडी आशा बाळगून होते की, नेहमीप्रमाणे भारतीय संघ कधी ना कधी बाजी उलटवून दाखवील; पण सर्वांचा सार्वजनिक...
  August 27, 12:32 AM
 • मोहेंजोदारो, इंका, माया, ऑझटेक (किंवा आस्तेक) आणि अशा कितीतरी संस्कृती मानवी इतिहासाला कोडी घालून गेल्या आहेत. संस्कृती हे वर्णन मिरवण्याइतके समृद्ध असे हे समाज नामशेष का झाले, हा अस्वस्थ करणारा प्रश्न. जॉरेड डायमंड यानं आपल्या कोलॉप्स या पुस्तकात त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कृतीच्या नामशेष होण्याला कारणीभूत झालेल्या/होणा-या घटकांचा त्याने पाचसूत्री आराखडाच मांडला आहे. पर्यावरणाचा हास (वृक्षतोड केल्यामुळे, जंगलं नष्ट झाल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होणं आणि पर्यायानं...
  August 26, 12:42 AM
 • कालच्या आणि आजच्या युवकांमध्ये काही साधर्म्य दिसतेय का...आणि या पिढीतील युवकांची मानसिकता वेगळी आहे का? याचा बारकाईने विचार केला तर स्पष्ट होते की २० वर्षांपूर्वीची युवा पिढी बरीच शांतपणे ( की थंडपणे) जगत होती. आताची युवा पिढी त्या मानाने बरीच जागरूक किंवा डोळसपणे जगतेय..आणि अर्थातच याचे सर्व श्रेय आताच्या माहितीच्या प्रचंड स्फोटाला द्यावे लागेल. क्वचित कधीतरी असेही वाटू लागते की युवकांवर होणा-या माहितीच्या भडिमारामुळे ते संभ्रमित तर झालेले नाहीत ना...? आज जी राजकीय जागरूकता दिसतेय ती...
  August 26, 12:41 AM
 • आपल्या देशाचे औद्योगिक, राजकीय, सामाजिक किंवा आणखी कशा-कशा प्रकारचे विभाग पडत असले तरीही प्रगत इंडिया व ग्रामीण भारत हे दोन तट मात्र पडतातच. संपूर्ण जगाचे लक्ष संपूर्ण भारत देशाकडेच एक संभाव्य बाजारपेठ म्हणून गेले. त्याहीआधी इथे असलेल्या बँकांनी शहरीकरणाचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला व आपला रिटेल ट्रेड घाऊक बँकिंगचा धंदा वाढवला. दुसया बाजूला साबण विकणाया लिव्हरसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी ग्रामीण क्षेत्राकडे मोहरा वळवला आणि बघता बघता लाखो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची ग्रामीण...
  August 25, 06:26 AM
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित-शोषितांच्या आर्थिक उन्नतीसाठी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. आरक्षणामुळे दलित समाजाचा थोडाबहुत आर्थिक विकाससुद्धा झाला. मात्र आरक्षण सुरू होऊन अनेक वर्षे झालेली असली तरी आजही बहुसंख्य एससी, एसटी जनता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचू शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. असे असताना महाराष्ट विधानसभेत खासगी विद्यापीठांना मान्यता देणारे विधेयक संमत करताना त्या विधेयकात आरक्षणाचे बंधन मात्र ठेवण्यात आले नाही. हा...
  August 25, 06:24 AM
 • अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देशाच्या मोठ्या लोकसंख्येला सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक राजकीय व्यवस्थेवर अविश्वास व्यक्त करण्यास भाग पाडले आहे. आता दक्षिण भारतातही तितकाच मोठा धोका राजकीय व्यवस्थेसमोर उभा ठाकला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हे वादळ घोंगावते आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी, नुकतेच सत्तेवरून पायउतार झालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा आणि काँग्रेसविरोधात बंड केलेले जगनमोहन...
  August 23, 11:50 PM
 • पंतप्रधानांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचा-यापर्यंत सर्वांना लोकपालाच्या कक्षेत आणल्यास प्रशासकीय यंत्रणेत पूर्णत: अनागोंदी माजेल. लोकपाल विधेयकातील तरतुदी काळजीपूर्वक वाचल्यास हे लक्षात येईल. माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर हे लोकपाल विधेयकाला उत्तर आहे. लोकपाल ही केवळ मोठी तपास यंत्रणा असेल. भावनेच्या भरात वाहून जाणे हे भारतीयांचे एक प्रमुख लक्षण आहे. जनमानसावर गारुड करील असे व्यक्तिमत्त्व ब-याच कालावधीत भारतीयांनी पाहिलेले नाही. त्या मांदियाळीतल्या इंदिरा गांधी या शेवटच्या....
  August 23, 11:48 PM
 • अण्णा रोज नव्या मागण्या करू लागले आहेत आणि त्यांचे भक्त अण्णांचे उपोषण कमाल मर्यादेपर्यंत कसे वाढेल हे पाहत आहेत. त्यांच्यापैकी कोणी एक दिवसही उपोषण करीत नाही. यात अण्णांचा बळी गेला तर ही मंडळी त्यांचे स्मारक उभारतील. दिल्लीत रामलीला मैदानाच्या दिशेने लोकांचा प्रचंड ओघ चालू असल्यामुळे अण्णा हजारे व त्यांच्या भोवतालचा गोतावळा यांना बराच कैफ चढल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. किरण बेदी यांनी आपल्या भाषणात अण्णा म्हणजे भारत व भारत म्हणजे अण्णा अशी घोषणा केली. पूर्वी बारुआ यांनी...
  August 22, 11:59 PM
 • २३ ऑगस्ट १९५८ रोजी स्थापन झालेल्या आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सुंदरराव डोंगरकेरी हे होते. ते मराठवाड्याच्या बाहेरचे व मला पूर्णपणे अपरिचित. त्यांची लफ्फेदार सही मात्र मला परिचित होती. कारण ती माझ्या मॅट्रिकच्या १९४७ सालच्या प्रमाणपत्रावर होती. त्या वेळी एस.एस.सी. बोर्ड नव्हते. शालांत परीक्षा मुंबई विद्यापीठ घेत असे नि डोंगरकेरी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव होते. एका राष्ट्रीय पातळीवर व परदेशातही नावाजलेल्या विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचा संपन्न नि यशस्वी अनुभव त्यांच्या...
  August 22, 11:57 PM
 • अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील काही अस्वस्थ करणा-या बाबी मला नमूद केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, टीम अण्णाचे प्रस्तावित विधेयक म्हणजे कायद्याचे पाठबळ लाभलेला निव्वळ राक्षस असेल. त्याच्याकडे कुणाचीही चौकशी करण्याचे वा कुणालाही शिक्षा करण्याचे अधिकार एकवटलेले असतील. तो मात्र कुणासही जबाबदार असणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, अनिच्छेने का होईना, अण्णांनी तडजोडीची भूमिका स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. पण आंदोलनाबाबतचे त्यांचे उजवेपण लोकशाही...
  August 21, 11:26 PM
 • एकविसाव्या शतकातसुद्धा रेडिओ-दूरचित्रवाणीवरून स्त्री भ्रूणहत्येविरोधात जाहिराती कराव्या लागणे किंवा स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायदे करावे लागणे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांना आदेश द्यावे लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. स्त्रीस्वातंत्र्याच्या, समानतेच्या आणि स्त्रीमुक्तीच्या कितीही गप्पा मारल्या तरीही परिस्थितीत काहीही बदल न झाल्याचेच यावरून लक्षात येते. रोज २०००, दरवर्षी १० लाख आणि गेल्या वीस वर्षांत एक कोटी हे आकडे आहेत आपल्याच देशातील स्त्री...
  August 21, 11:24 PM
 
जाहिरात

RECOMMENDED