Home >> Editorial >> Columns

Columns

 • गुरुदास कामत जेव्हा संतापाच्या भरात यूपीए मंत्रिमंडळातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना मंत्रिमंडळात जमादारांचे खाते म्हणवून हिणवल्या जाणा-या पेयजल खात्याचा पदभार स्वीकारून स्वत:चा अपमान करून घ्यायची इच्छा नव्हती, अशी कुजबूज काँग्रेसच्या वर्तुळात होती. खास निर्माण करण्यात आलेले पेयजल आणि स्वच्छता खाते त्यांना देण्यात आले होते. पण कॅबिनेटपदी बढती न मिळालेले कामत कमालीचे नाराज होते. अगोदरच्या खात्याचा जरी त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार असला तरी ते राज्यमंत्रीच होते. पाच वेळा...
  July 22, 02:53 AM
 • परभणी जिल्ह्यामध्ये २३ हजार बनावट शिधापत्रिका सापडल्याचे दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त नक्कीच खळबळजनक आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१० या कालावधीत पुरवठा खात्याच्या वतीने बनावट शिधावाटप पत्रिका शोधमोहीम राबवण्यात आली होती. एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका सापडत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची संख्या किती असेल, याची कल्पनाच करवत नाही. सार्वजनिक शिधावाटप यंत्रणा ही खरे तर या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदानच आहे....
  July 21, 02:49 AM
 • तस्थापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज: समाधि:।। हे सूत्र म्हणजे पदातील अंतिम सूत्र आहे. ऋतंभरा प्रज्ञेच्या संस्कारांमुळे अन्य संस्कारांना प्रतिबंध होतो. या अवस्थेतूनच निर्बीज समाधी प्राप्त होते. ही निर्बीज समाधी अवस्था म्हणजेच योगाचे अंतिम साध्य. सर्वच वृत्तींचा निरोध झाल्यामुळे निर्बीज किंवा असंप्रशात समाधी अवस्थेत चित्त विलीन होते हा कळसाचा भाग आहे. अनुभव नसताना केवळ ऐकीव व वाचीव माहितीवर भारंभार बोलणारे आपण पाहिलेले आहेत. आपण सतत समाधी अवस्थेतच असतो असा आविर्भाव या मंडळींच्या...
  July 21, 02:47 AM
 • देशातील नागरिकांना ज्याप्रमाणे युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक दिले जाणार आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात गुराढोरांनाही असेच विशेष क्रमांक देण्याची योजना नजीकच्या भविष्यकाळात अमलात येणार आहे. महाराष्ट्र लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट बोर्डाने ही प्रस्तावित योजना आखली असून गुराढोरांच्या कानाजवळ किंवा शरीरावर अन्यत्र विशेष क्रमांक नमूद केलेली मायक्रोचिप बसवली जाणार आहे. आवश्यक माहितीकरिता ही मायक्रोचिप ज्या वेळी स्कॅनरमार्फत तपासली जाईल त्या वेळी त्या संबंधित प्राण्याची सर्व माहिती...
  July 21, 02:40 AM
 • आपल्या संवाद साधायच्या पद्धती फार झपाट्याने बदलायला लागल्या आहेत. कोणे एकेकाळी पोस्टमनची वाट बघणारे लोक आता कोणत्याही क्षणी आपल्या जिवलगांशी तत्काळ संपर्क साधू शकतात ही फार मौजेची गोष्ट म्हणावी लागेल. कबुतराद्वारे आपले संदेश पाठवणारे, समुद्रात बंद बाटलीमध्ये संदेश लिहून तो लाटांवर पाठवून प्रत्युत्तरासाठी दैवावर विसंबून राहणारे जीव काही शतकांतच किती प्रभावीपणे माध्यमांचा शोध लावून मनासारखे जलदगतीने संपर्क साधू लागले याची कहाणी विस्मयकारक आहे. मनुष्य हा सामाजिक भान असलेला...
  July 21, 02:37 AM
 • जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणात बड्या उद्योगांबरोबरच छोट्या उद्योगांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्राहकांची रोडावलेली संख्या, ऑर्डरमध्ये झालेली घट यावर मात करत पुरवठ्याचे नवनवीन उपाय योजून नव्या बाजारपेठांमध्ये शिरकाव करण्याचे मार्ग शोधून आणीबाणीच्या परिस्थतीला या क्षेत्राने खंबीरपणे तोंड दिले. सकल राष्ट्रीय उत्पन्नात सातत्याने ६ टक्के तर एकूण उत्पादनात ४५ टक्के वाटा उचलणारे एसएमई क्षेत्र आज भारतीय उद्योगाचा एक मुख्य आधारस्तंभ बनलाय. पण आजही या क्षेत्रातील...
  July 20, 01:15 AM
 • पाणी तारक आहे, पाणी विध्वंसकही आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत आपण पाण्याच्या नैसर्गिक समतोलामध्ये ढवळाढवळ करीत नाही, तोपर्यंत पाणी अतिशय विवेकी आहे. प्राचीन संस्कृती, जसे सिंधु-मोहेंजोदडो संस्कृती असो की काही शे-दीडशे वर्षांपूर्वीचे संतवाङ्मय असो, प्रत्येक ठिकाणी जलसंस्कृतीचे एक अढळ अस्तित्व दिसते. आता काही सर्वांना माहीत असणा-या सत्याचा थोडा परामर्श घेणे अनुचित ठरणार नाही. आपल्या शरीराचा ६० टक्के भाग, मेंदूचा साधारण ७० टक्के भाग आणि रक्ताचा सुमारे ८० टक्के भाग...
  July 20, 01:11 AM
 • देशात केरळ या राज्यामागोमाग सर्वाधिक साक्षरता महाराष्ट्रामध्ये आहे. तिचे प्रमाण ७७.२७ टक्के इतके आहे. १९९० सालापासून ते आजतागायत राबवलेल्या विविध योजना तसेच उपक्रमांमुळे महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढली. राज्याच्या शहरी भागामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले हे उत्तमच आहे. मात्र ग्रामीण भागातही या दृष्टीने विशेष प्रगती झाल्याचे ध्यानात येईल. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी होण्यासही हातभार लागला आहे. २००१ च्या जनगणनेच्या हवाल्यानुसार...
  July 19, 12:01 AM
 • केरळ येथील पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघरात सापडलेली एक लाख कोटी रुपयांची संपत्ती हा विषय गेले काही दिवस वृत्तपत्रांपासून ट्विटरपर्यंत चर्चेचा झाला आहे. त्यातच काल ही संपत्ती बाहेर यावी म्हणून न्यायालयामध्ये याचिका करणारे टी. पी. सुंदरराजन यांचे निधन झाले. ते आयपीएस अधिकारी होते व त्यांचे वडील केरळच्या शाही खानदानाचे सल्लागार. या शाही खानदानानेही मोठ्या देणग्या पद्मनाभस्वामी मंदिराला दिल्या होत्या. त्यामुळे तो सर्व खजिना लोकांसमोर उघड करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्याआधी...
  July 18, 11:59 PM
 • साधना सातत्यानं केल्यावर फलप्राप्ती होते हे आपण पाहिलं. काय आहे ती फलप्राप्ती? महर्षी पतंजली म्हणतात, ऋतंभरा तत्र प्रज्ञा. अध्यात्माचा प्रसाद म्हणून ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होणं असा या सूत्राचा अर्थ आहे. प्रज्ञा याचा अर्थ प्रकर्षाने जाणणारी बुद्धी. प्रज्ञा किंवा बुद्धी आम्हाला नाही की काय, असा प्रश्न स्वाभाविक मानता येईल. आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीच्या बाबतीत बुद्धीचा जो वापर करतो ती सामान्य बुद्धी आहे. अथक प्रयासातून चित्तातील सर्व वृत्तींचा निरोध करून इंद्रियांना वेसण घालून...
  July 18, 05:11 AM
 • सकाळीच अजून एक इंग्रजी पुस्तक वाचून हातावेगळं केलं. फाइव्ह लव्ह लँग्वेजेस गेरी चॅपमन (मानववंशशास्त्रज्ञ). हे पुस्तक खरं तर मला कोणीच सुचवलं नव्हतं. एक मैत्रीण पुण्यात आलेली असताना, तिला घेऊन आम्ही आमच्या आवडत्या बुक स्टॉलला गेलो होतो. संध्याकाळ संपत आली होती. दुकानाची मालकीण ओळखीची असल्याने आमच्याशी गप्पा करत होती. तेवढ्यात तिने, त्यांच्याकडे अधूनमधून पाहुणचाराला येणारे एक फुलपाखरू एका पुस्तकात गढून गेलेले दाखवले. (हेच ते पुस्तक! पण मुद्दा इथे संपत नाही तर सुरू होतो!) इतक्या वर्षांत,...
  July 18, 05:11 AM
 • समाजात अनैतिक प्रवृत्ती सदैव डोके वर काढत असतात. त्यातूनच अनैतिक धंदे बोकाळतात. दिल्लीमध्ये देहव्यापार करणा-या एका रॅकेटचा भंडाफोड तेथील पोलिसांनी केल्याची बातमी दिव्य मराठी मध्ये वाचनात आली. त्या रॅकेटमधील कॉलगर्लला महिन्याला दीड लाख रुपये पगार मिळत होता हे वाचून जोरदार धक्का बसला. माणूस पैसे मिळवण्यासाठी इमानेइतबारे काम करण्याऐवजी चुकीच्या मार्गाला जातो. तो इतका घसरतो की आपल्या वाईट वर्तणुकीचा त्याला पश्चात्तापही वाटेनासा होतो. त्याचा मतलब असतो फक्त पैशापुरता. जगण्यासाठी पैसे...
  July 18, 05:10 AM
 • महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी दिलेला राजीनामा ही गोष्ट फारशी अनपेक्षित नसली तरी शासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणणारी आहे. या राजीनाम्यानंतर चपळगावकर आणि मराठी भाषा विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांच्यात घडणाया आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी दुर्दैवी तर आहेतच, पण मराठीबद्दल पुळका दाखवणाया सगळ्या राजकीय वर्गाचे आणि अभिजन वर्गाचे पितळही उघडे पाडणाया आहेत. प्रशासनाने सहकार्य केले नाही म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असे चपळगावकरांनी...
  July 18, 05:09 AM
 • १३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईतील गजबजलेल्या काही भागात नव्याने बॉम्बस्फोट झाले. मुंबई हादरली. १८ नागरिक त्यात मरण पावले, तर १३० पेक्षा अधिक जखमी झाले. हे वृत्त जगभर गेले. दहशतवाद्यांच्या नावाने पुन्हा बोटे मोडली गेली. सरकारला शिव्या घालून झाल्या. पुढारी आले आणि गेले. विद्यमान पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले, असे हल्ले पुन्हा होऊ देणार नाही. तर पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणाले, दहशतवादी हल्ले होतच राहणार. सायांनी फटाफट पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्याच्या प्रसारमाध्यमांनी फटाफट...
  July 18, 05:06 AM
 • निर्विचार समाधीमध्ये नैपुण्य प्राप्त झाल्यावर अध्यात्म प्रसाद मिळतो. निर्विचार या स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका-कुशंका असतात. निर्विचार राहणं शक्य आहे की नाही? एखाद्या जागी काही न करता ढिम्म बसून राहणं वगैरे गोष्टी आहेत त्या कशा काय करता येतील? आपल्याला हे शक्य नाही असे विचार मनात येतात व साधना करण्याचा विचार बाजूला ठेवण्यात येतो. या सायाचा अंगीकार आपल्याला सहज करता येईल अर्थात प्रयत्न हवेत. माणसाच्या मानसिकतेच्या जडणघडणीविषयीची विस्तृत चर्चा एकूणच मानवजातीला धरून या...
  July 16, 12:31 AM
 • शाळेची चाचणी परीक्षा चालू होती. मी नेहमीप्रमाणे सगळ्या वर्गांना भेटी देत होते. प्राथमिक विभागाची छोटी मंडळीदेखील शांतपणे पेपर लिहीत होती. काही पेपर दाखवून कौतुक करून घ्यायला येत होती. मी दुसरीच्या वर्गात गेले. सगळाच वर्ग अगदी हुशार चुणचुणीत मुलांचा! सगळा वर्ग अगदी शांत होता. मागच्या बाजूला दोन मुले बोलत होती. एक जण दुस-याला त्याचा पेपर दाखवत होता. मी जरा आवाज चढवून म्हटलं, काय चाललाय रे तुमचं? परीक्षा चालू आहे ना? त्यावर दोघं गप्प ! मी जरा समजावणीच्या सुरात म्हटलं, अरे, परीक्षा चालू असताना...
  July 16, 12:29 AM
 • विद्यार्थीच सुमार तेव्हा त्याला दर्जेदार शिक्षकाची शिकवणी हवीच कशाला? पुन्हा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होईल याची हमी द्यावयास तो शिक्षक तयार नाही आणि गुरुजींची फी तशी अधिकच! अन्य मागण्यादेखील बयाच तेव्हा विद्यार्थ्यांच्या दर्जास साजेसाच शिक्षक बरा. हे आहे ऑस्ट्रेलियन हॉकी प्रशिक्षक मायकेल जॅक नॉब्स यांच्या नियुक्तीमागचे नेमके कारण. ज्या विद्यार्थ्याचे गेल्या चार वर्षांतले प्रगती पुस्तक त्याच्यात सुधारणा होईल असे यत्किंचितही दर्शवीत नाही त्या विद्यार्थ्याला ऑलिम्पिक...
  July 16, 12:28 AM
 • आइसलँडमधल्या हुसाविक नामक मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात एक संग्रहालय आहे. केवळ आणि केवळ प्राण्यांची लिंगं असलेलं हे जगातलं एकमेव संग्रहालय. १९९७ मध्ये त्याची स्थापना झाली. आजमितीस त्यात ४६ प्राणिजातींची तब्बल २७६ लिंगं आहेत. त्यापैकी ५६ केवळ व्हेल माशांच्या विविध प्रजातींचीच असून त्यातील एका लिंगाची लांबी जवळपास ६७ इंच इतकी आहे. सीलसारख्या जलचर प्राण्याची ३५ लिंगं आहेत, तर जमिनीवर वावरणा-या सस्तन प्राण्यांची ११८ लिंगं या संग्रहात आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लिंगं मिरवणा-या...
  July 16, 12:25 AM
 • दहशतवाद्यांनी १३ जुलै रोजी घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली. या घटनेत मोठी मनुष्यहानी झालीच, त्याशिवाय अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांमधील मुख्य आधारस्तंभही बळी पडले. या हिंसक घटनेबद्दल समाजात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र निषेध व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निरनिराळी होती. या संदर्भात दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी मला खूपच सूचक वाटली. या बॉम्बहल्ल्याचे वृत्त देताना वृत्तवाहिन्यांनी जो उथळपणा दाखवला, परस्परांतील...
  July 16, 12:20 AM
 • विचाररहित स्थिती म्हणजे पूर्णत: पक्व अवस्था हा अध्यात्माचा प्रसाद आहे असं या सूत्रात सांगितलं आहे. अमुक एखादी गोष्ट केलीस तर मी तुला अमुक एक देईन ही आचारसंहिता प्रत्येकाच्या जीवनाशी जन्मापासून मृत्यूपर्यंत लागू करून देण्यात आली आहे. आता अमुक एक देईन या परिमाणातील अमुक हे आपल्या आवडीचे आहे किंवा असतं, म्हणून त्यासाठी आपण जिवाचं रान करतो आहोत. फळरहित कर्माला काही अर्थच नाही, ध्येयविरहित कर्म म्हणजे एक निरर्थक क्रिया ठरेल. पण त्याचबरोबर ध्येय म्हणजे हव्यास नाही. कारण हव्यास या संकल्पनेत...
  July 15, 05:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED