Home >> Editorial >> Columns

Columns

 • तंत्रज्ञानाचा वापर आयुष्य अधिक सुकर करण्याऐवजी मुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून केला जातो. समाजातील दुबळ्या घटकाला, त्यात महिला, मुले, मागास जाती यांचा प्रामुख्याने समावेश होतो, त्यांची पिळवणूक करून वर्चस्व सिद्ध करण्याची धडपड सतत जाणवते.मुलींच्या जन्मदरात झालेली घट, अहमदनगर येथील वीरगावामध्ये गेल्या महिन्यात दोन बहिणींवर झालेला सामूहिक बलात्कार आणि दिल्लीला अलीकडेच झालेला स्लट वॉक या तिन्ही घटना महिलांच्या जीवनाचा जवळून परिचय देतात. मुळात मुलगी जन्माला येऊ नये म्हणून तिला गर्भातच...
  August 5, 03:29 AM
 • आपल्या मुलाबाळांना राजकारणात आणून योग्य ठिकाणी स्थानापन्न करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय नेत्यांची मोठी धडपड सुरू असते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर गोव्याच्या मुख्यमंत्री बनल्या. हा एक अपवाद वगळता घराणेशाही अथवा राजकीय घराण्यांचे प्रतिनिधी असा प्रकार गोव्यात त्यानंतरच्या काळात प्रबळ झाला नव्हता. आता मात्र गोव्याच्या राजकारणातील प्रभावशाली कुटुंबांमध्ये झपाट्याने भर पडू लागली आहे. विधानसभेचे सभापती...
  August 5, 03:25 AM
 • प्रत्येक देशाचा टॅक्स फ्रीडम डे वेगळा तर असतोच, पण तो दरवर्षी वेगळा दिवस असतो. भारतात हा दिन ३ ऑगस्ट रोजी होऊन गेला. समाजस्वास्थ्य बिघडवणा-या सध्याच्या करप्रणालीत मूलभूत बदल झाले पाहिजेत, याचा जागर जगभर यानिमित्ताने केला जातो.जेव्हा फळ पिकते, तेव्हाच ते तोडावे आणि प्रजेकडे क्षमता असते, तेव्हाच महसूल वसूल करावा. जर फळ परिपक्व नसताना खुडले आणि महसूल परिपक्व नसताना वसूल केला तर त्याचे मूळ कायमचे दुखावले जाऊ शकते आणि ते भविष्यात फारच त्रासदायक ठरू शकते. ज्याप्रमाणे जळू, वासरू आणि मधमाशा आपले...
  August 3, 10:50 PM
 • माणूस, पाळीव प्राणी हरवणे या नित्य घटना आहेत. पण एखाद्या राज्यातील हजारो हेक्टर वनजमीन सरकारी रेकॉर्डमधून गायब झाली असेल व त्याचा शासनाला पत्ताच नसेल तर ती नक्कीच धक्कादायक गोष्ट आहे. नेमकी हीच गोष्ट महाराष्ट्रात घडलेली आहे. महाराष्ट्रामधील वनजमिनींच्या सद्य:स्थितीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी गोदावरम यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या एका याचिकेवर उत्तर देताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्र सरकारने हे वास्तव मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर वनजमिनींबाबत...
  August 3, 10:45 PM
 • नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर काही दिवस का होईना देशाच्या सुरक्षेची, दहशतवादाची,सरकारच्या व तपास यंत्रणांच्या अकार्यक्षमतेची चर्चा घडत राहील. काही दिवसांनीच या गोष्टी विस्मरणात जातील. तापलेली हवा क्रमाक्रमाने कोमट ते गार व हितसंबंधांचे तवे गरम होत जातील. तसे व्हायच्या आत या सर्वांशी थेटपणे जोडलेल्या काही गोष्टींची चर्चा करण्याचा या लेखाचा हेतू आहे. दहशतवाद कुठल्या तरी पोकळीतून अवतरत नाही. वर्षानुवर्षे बिनदिक्कतपणे रुजलेल्या गुन्हेगारीशी व हिंसेशी त्याचा संबंध...
  August 3, 12:36 AM
 • दहशतवादाला आळा घालण्यासाठी गुप्तचर यंत्रणांची सारी दारोमदार ही स्थानिक हितसंबंधांकडून मिळणाया माहितीवर अवलंबून असते. पोलिस यंत्रणा अद्ययावत, तत्पर, सखोल माहिती मिळवणारी बनवणे गरजेचे आहे. १३ जुलै रोजी मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी दिल्ली हादरली आहे. महागाई, भ्रष्टाचार, दिशाहीनता याच्या जोडीला आता दहशतवादाचे भूत परत एकदा सरकारच्या मानगुटीवर बसू पाहत आहे. मागील वर्षी पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट आणि आता मुंबईत एकापाठोपाठ एक झालेल्या तीन स्फोटांनी गृह मंत्रालयाने अमलात...
  August 3, 12:34 AM
 • गिरणी संपानंतर प्रामुख्याने गेल्या वीस वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा पार बदलून गेलाय. मुंबई व तिच्या परिसरातील औद्योगिक पट्टा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. हात काळे करून कष्ट करणारा कामगार आता मुंबईत फारच थोड्या संख्येने शिल्लक राहिला आहे.गिरणीचा भोंगा वाजला की मुंबईला जाग यायची आणि केवळ गिरण्याच नव्हे तर देशाच्या या आर्थिक राजधानीतील प्रत्येक उद्योगाची चाके फिरू लागायची. अर्थात ही स्थिती होती तीस वर्षांपूर्वीची. म्हणजे गिरणी संप १९८२ मध्ये सुरू होण्यापूर्वीची. गिरणी संप सुरू झाला आणि...
  August 1, 11:29 PM
 • अलीकडे सर्वत्र आलेली आधुनिकता शिक्षण संस्थांमध्येही आली.त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही उंचावला. मात्र आजच्या शिक्षण पद्धतीने ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी अशी एक दरी निर्माण होत असल्याचे चित्र उभे राहत आहे. त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल की, जिल्हा परिषदेच्या वा कमी दर्जाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यामध्ये खूप मोठे अंतर पडणार आहे. याविषयी कुणालाही काही देणे-घेणे नाही. मात्र ग्रामीण विद्यार्थी जेव्हा दर्जेदार शिक्षण घेतलेल्या...
  August 1, 11:26 PM
 • लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांनी तो हेतुत: मुसलमानांविरुद्ध सुरू केल्याची हाकाटी करण्यात आली होती. तरीही गणेशोत्सवाच्या या कल्पनेमागे मोहरमच्या मिरवणुकांची प्रेरणा होती असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांनी तो हेतुत: मुसलमानांविरुद्ध सुरू केल्याची हाकाटी करण्यात आली होती. तरीही गणेशोत्सवाच्या या कल्पनेमागे मोहरमच्या मिरवणुकांची प्रेरणा होती असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही. मोहरमच्या मिरवणुकीत...
  August 1, 12:17 AM
 • १८ जुलै १९७० रोजी अस्मितादर्शच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पहिला स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मी अण्णा भाऊंनी लिहिलेल्या अकलेची गोष्ट या वगनाट्याचा प्रयोग सादर केला. माझ्या या प्रयोगाला अमेरिकन विदुषी एलनॉर झेलियट, प्रा. नरहर कुरुंदकर, प्रा. भगवंतराव देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्वत: अण्णा भाऊंनी लिहिलेल्या वगनाट्याचा त्यांच्यानंतर महाराष्ट्रातून केलेला हा पहिलाच प्रयोग होता. पुढे अनेक वर्षे मी अण्णांच्या...
  August 1, 12:14 AM
 • भारतीय हॉकीतली अनिश्चितता संपली! भारतीय हॉकी फेडरेशन (आयएफएच) आणि हॉकी इंडिया (एचआय) यांच्यातील सामंजस्य करार (म्हणजे विलीनीकरण-एकत्रीकरण नव्हे) यामुळे भारतीय हॉकीचे प्रश्न मार्गी लागतील, असे अनेक निष्कर्ष गेल्या काही दिवसांमध्ये काढले गेले व पुढेही काढले जातील. गेले काही महिने हॉकीमधले वाद संपुष्टात आणण्यासाठी देशाच्या क्रीडा मंत्रालयाने प्रयत्न करताना क्रीडामंत्री अजय माकन यांनी पुढाकार घेतला व हा यक्षप्रश्न सोडवला, असे चित्रही रंगवले जात आहे. क्रीडामंत्र्यांनी दोन्ही...
  July 30, 02:51 AM
 • आत्मघातकी बॉम्बजो मनुष्य स्वत:च्या आयुष्याची कदर करत नाही, त्याला दुसयांच्या आयुष्याचीही किंमत नसते. त्याची परिणती अतिविनाशक आत्मघातकी बॉम्बमध्ये होणे अटळ असते. स्वत:चा जीव गमावताना इतरांचा जीव घेण्याविषयी त्याला काहीही वाटत नाही. त्यामुळे हिंदू असो वा मुस्लिम अथवा शीख... कुणाला मारण्यासाठी त्याचा धर्म कधीच त्याला प्रेरणा देत नाही. तर आपल्या धर्माची होणारी चिकित्सा सहन न होऊन तो स्वत:च हे पाऊल उचलतो. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीत विमान घेऊन स्वत:सोबत विमानातील...
  July 30, 02:44 AM
 • काल-परवा जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या तिमाही धोरणाने त्रिफळा उडाल्यासारखी अवस्था झालेली आहे. डोळ्यासमोर स्वप्न ठेवले गेले ८% विकासदराचे, चलनवाढीचा दर ९.४४% झाल्याने हे स्वप्न भकास झाले आणि प्रत्यक्षात धोरणानुसार व्याजदर .५० इतके वाढवल्याने सर्वसामान्य पुरते उदास झालेले आहेत. गेल्या मार्चपासून रिझर्व्ह बँकेने केलेली ही अकरावी दरवाढ (खरे म्हणजे हा स्कोअर मोजण्यासाठी स्कोअरर असायला हवा!) खरे तर रिझर्व्ह बँक दरवाढ करणार हे तज्ज्ञांना ठाऊक होते. पण त्यांच्या अंदाजापेक्षा अधिक दरवाढ...
  July 29, 02:48 AM
 • आज २५ वर्षांनी पुन्हा मुंबईत गिरणी कामगारांचा आवाज घुमला. ज्या गिरणी कामगारांनी मुंबईच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वाला दिशा दिली, त्या गिरणी कामगारांची पार दुर्दशा झाल्यामुळे तो आता केवळ डायनोसॉरसारखा कधीतरी डिस्कव्हरी चॅनलवर दिसू लागेल असे वाटत होते. मात्र पुन्हा एकदा या रावणाच्या लंकेप्रमाणे असलेल्या मुंबई नगरीत ज्या जमिनीवर घाम आणि रक्त गाळले त्या ठिकाणी राहण्यासाठी हक्काचा आसरा मिळावा म्हणून गिरणी कामगार जागा झाला आहे. तो केवळ जागा झालेला नाही तर तो आता गर्जनाही करू...
  July 29, 02:45 AM
 • आदिवासींचा विकास हा एक गुंतागुंतीचा प्रश्न असून त्याकडे आजवर दिले त्यापेक्षा अधिक काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नही विभिन्न स्वरूपाचे आहेत. राज्याची जसजशी आर्थिक प्रगती होत जाईल तसतसे येथील आदिवासी क्षेत्राचाही विकास आपोआप होत जाईल अशी एक धारणा होती. मात्र तसे काही घडल्याचे दिसलेले नाही. महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे यासारखी शहरे उत्तम प्रगत झाली. मात्र...
  July 28, 03:03 AM
 • प्रागैतिहासिक काळापासून माणसाने आपल्या जीवनशैलीत सातत्याने प्रगतीच केली आहे. चौकस बुद्धिमत्ता, त्यातून लावलेला नवनवीन गोष्टींचा शोध आणि त्यातून आयुष्य अधिक सुकर आणि सुखदायी करण्यासाठी निर्माण केलेल्या सुविधा असा हा सारा प्रवास आहे. आधी रानावनात, मग गुहांमध्ये आणि कालांतराने पक्क्या घरांमध्ये राहायला लागलेला माणूस हा निसर्गातील प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला कोणत्याही अडचणी न येता निवास करता येईल अशी निवासस्थाने बांधू लागला व कालांतराने त्यात गडबड-घोटाळेही करू लागला. आधुनिक...
  July 28, 02:57 AM
 • महाराष्ट्रामध्ये १९ व्या शतकापासून समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तसेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या काळात राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी उत्तम कार्य केलेले आहे. काळाच्या ओघात स्वयंसेवी संस्थांच्या कारभारातही काही उणिवा जरूर निर्माण झाल्या, केवळ सरकारी तसेच विदेशातून येणारा निधी पदरात पाडून घेण्यासाठीही अनेकांनी नावाला स्वयंसेवी संस्था सुरू करण्याचे प्रकारही घडले आहेत. असे असतानादेखील...
  July 27, 03:01 AM
 • झारखंडसारख्या छोट्या राज्याची निर्मिती काही वर्षांपूर्वी झाली. तेलंगणा या आणखी एका छोट्या राज्याच्या स्थापनेसाठी उग्र आंदोलन सुरू आहे. विदर्भ वेगळा काढून त्याचे राज्य बनवण्याची मागणी अधूनमधून उचल खात असते. ही प्रक्रिया एकीकडे सुरू असताना तिकडे ममता बॅनर्जींनी गोरखालँड विभागाला स्वायत्तता देण्याचा करार करून पश्चिम बंगालच्या विभाजनाची धग कमी केली. पोर्तुगीज राजवटीतून झालेल्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असलेले गोवा हे तर अगदीच इटुकले राज्य. छोट्या राज्याचे फायदे आणि तोटे...
  July 27, 02:55 AM
 • माझे मोठे भाऊ डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ३० जुलै २००५ रोजी आम्ही आयोजित केला होता. या ध्वनिमुद्रिकेची मूळ प्रत आम्ही औरंगाबादेतील सिल्व्हर ओक्स या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये तयार केली होती. आता त्या मूळ ट्रॅकच्या प्रती कमी कालावधीत व माफक दरात मुंबईतील अंधेरी उपनगरातील मोगरापाडा या भागात असलेल्या एका कारखान्यात केल्या जातील, या माहितीच्या आधारावर आपल्याला उद्या म्हणजेच २४ जुलै २००५ रोजी जावे लागेल, असे मला भावाने त्याच्या आदल्या दिवशी...
  July 26, 12:07 AM
 • भारतामध्ये उत्पादित होणाऱया एकूण अन्नधान्यांतील, भाजीपाला आणि फळांपैकी सुमारे ४० टक्के उत्पादन बाजारापर्यंत पोहोचू शकत नाही. ते वाया जाते. ऑस्ट्रेलियातील वार्षिक धान्योत्पादन आणि इंग्लंडमध्ये उत्पादित होणाया भाजीपाला व फळांपेक्षाही ही नासाडी मोठी आहे.भारतात मुख्य आव्हान अन्नसमस्येचे आहे. अन्नाची नासाडी हा त्या समस्येचा केवळ एक पैलू आहे. शेती, पायाभूत सुविधा, चलनवाढ, भ्रष्टाचार आणि कल्पकतेचा अभाव या आणखीही काही समस्या आहेत. वार्षिक ८ टक्के दराने प्रगती करणारी जगातील एक तगडी...
  July 25, 11:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED