Home >> Editorial >> Columns

Columns

 • आत्मघातकी बॉम्बजो मनुष्य स्वत:च्या आयुष्याची कदर करत नाही, त्याला दुसयांच्या आयुष्याचीही किंमत नसते. त्याची परिणती अतिविनाशक आत्मघातकी बॉम्बमध्ये होणे अटळ असते. स्वत:चा जीव गमावताना इतरांचा जीव घेण्याविषयी त्याला काहीही वाटत नाही. त्यामुळे हिंदू असो वा मुस्लिम अथवा शीख... कुणाला मारण्यासाठी त्याचा धर्म कधीच त्याला प्रेरणा देत नाही. तर आपल्या धर्माची होणारी चिकित्सा सहन न होऊन तो स्वत:च हे पाऊल उचलतो. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीत विमान घेऊन स्वत:सोबत विमानातील...
  July 30, 02:44 AM
 • काल-परवा जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या तिमाही धोरणाने त्रिफळा उडाल्यासारखी अवस्था झालेली आहे. डोळ्यासमोर स्वप्न ठेवले गेले ८% विकासदराचे, चलनवाढीचा दर ९.४४% झाल्याने हे स्वप्न भकास झाले आणि प्रत्यक्षात धोरणानुसार व्याजदर .५० इतके वाढवल्याने सर्वसामान्य पुरते उदास झालेले आहेत. गेल्या मार्चपासून रिझर्व्ह बँकेने केलेली ही अकरावी दरवाढ (खरे म्हणजे हा स्कोअर मोजण्यासाठी स्कोअरर असायला हवा!) खरे तर रिझर्व्ह बँक दरवाढ करणार हे तज्ज्ञांना ठाऊक होते. पण त्यांच्या अंदाजापेक्षा अधिक दरवाढ...
  July 29, 02:48 AM
 • आज २५ वर्षांनी पुन्हा मुंबईत गिरणी कामगारांचा आवाज घुमला. ज्या गिरणी कामगारांनी मुंबईच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वाला दिशा दिली, त्या गिरणी कामगारांची पार दुर्दशा झाल्यामुळे तो आता केवळ डायनोसॉरसारखा कधीतरी डिस्कव्हरी चॅनलवर दिसू लागेल असे वाटत होते. मात्र पुन्हा एकदा या रावणाच्या लंकेप्रमाणे असलेल्या मुंबई नगरीत ज्या जमिनीवर घाम आणि रक्त गाळले त्या ठिकाणी राहण्यासाठी हक्काचा आसरा मिळावा म्हणून गिरणी कामगार जागा झाला आहे. तो केवळ जागा झालेला नाही तर तो आता गर्जनाही करू...
  July 29, 02:45 AM
 • आदिवासींचा विकास हा एक गुंतागुंतीचा प्रश्न असून त्याकडे आजवर दिले त्यापेक्षा अधिक काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नही विभिन्न स्वरूपाचे आहेत. राज्याची जसजशी आर्थिक प्रगती होत जाईल तसतसे येथील आदिवासी क्षेत्राचाही विकास आपोआप होत जाईल अशी एक धारणा होती. मात्र तसे काही घडल्याचे दिसलेले नाही. महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे यासारखी शहरे उत्तम प्रगत झाली. मात्र...
  July 28, 03:03 AM
 • प्रागैतिहासिक काळापासून माणसाने आपल्या जीवनशैलीत सातत्याने प्रगतीच केली आहे. चौकस बुद्धिमत्ता, त्यातून लावलेला नवनवीन गोष्टींचा शोध आणि त्यातून आयुष्य अधिक सुकर आणि सुखदायी करण्यासाठी निर्माण केलेल्या सुविधा असा हा सारा प्रवास आहे. आधी रानावनात, मग गुहांमध्ये आणि कालांतराने पक्क्या घरांमध्ये राहायला लागलेला माणूस हा निसर्गातील प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला कोणत्याही अडचणी न येता निवास करता येईल अशी निवासस्थाने बांधू लागला व कालांतराने त्यात गडबड-घोटाळेही करू लागला. आधुनिक...
  July 28, 02:57 AM
 • महाराष्ट्रामध्ये १९ व्या शतकापासून समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तसेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या काळात राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी उत्तम कार्य केलेले आहे. काळाच्या ओघात स्वयंसेवी संस्थांच्या कारभारातही काही उणिवा जरूर निर्माण झाल्या, केवळ सरकारी तसेच विदेशातून येणारा निधी पदरात पाडून घेण्यासाठीही अनेकांनी नावाला स्वयंसेवी संस्था सुरू करण्याचे प्रकारही घडले आहेत. असे असतानादेखील...
  July 27, 03:01 AM
 • झारखंडसारख्या छोट्या राज्याची निर्मिती काही वर्षांपूर्वी झाली. तेलंगणा या आणखी एका छोट्या राज्याच्या स्थापनेसाठी उग्र आंदोलन सुरू आहे. विदर्भ वेगळा काढून त्याचे राज्य बनवण्याची मागणी अधूनमधून उचल खात असते. ही प्रक्रिया एकीकडे सुरू असताना तिकडे ममता बॅनर्जींनी गोरखालँड विभागाला स्वायत्तता देण्याचा करार करून पश्चिम बंगालच्या विभाजनाची धग कमी केली. पोर्तुगीज राजवटीतून झालेल्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असलेले गोवा हे तर अगदीच इटुकले राज्य. छोट्या राज्याचे फायदे आणि तोटे...
  July 27, 02:55 AM
 • माझे मोठे भाऊ डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ३० जुलै २००५ रोजी आम्ही आयोजित केला होता. या ध्वनिमुद्रिकेची मूळ प्रत आम्ही औरंगाबादेतील सिल्व्हर ओक्स या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये तयार केली होती. आता त्या मूळ ट्रॅकच्या प्रती कमी कालावधीत व माफक दरात मुंबईतील अंधेरी उपनगरातील मोगरापाडा या भागात असलेल्या एका कारखान्यात केल्या जातील, या माहितीच्या आधारावर आपल्याला उद्या म्हणजेच २४ जुलै २००५ रोजी जावे लागेल, असे मला भावाने त्याच्या आदल्या दिवशी...
  July 26, 12:07 AM
 • भारतामध्ये उत्पादित होणाऱया एकूण अन्नधान्यांतील, भाजीपाला आणि फळांपैकी सुमारे ४० टक्के उत्पादन बाजारापर्यंत पोहोचू शकत नाही. ते वाया जाते. ऑस्ट्रेलियातील वार्षिक धान्योत्पादन आणि इंग्लंडमध्ये उत्पादित होणाया भाजीपाला व फळांपेक्षाही ही नासाडी मोठी आहे.भारतात मुख्य आव्हान अन्नसमस्येचे आहे. अन्नाची नासाडी हा त्या समस्येचा केवळ एक पैलू आहे. शेती, पायाभूत सुविधा, चलनवाढ, भ्रष्टाचार आणि कल्पकतेचा अभाव या आणखीही काही समस्या आहेत. वार्षिक ८ टक्के दराने प्रगती करणारी जगातील एक तगडी...
  July 25, 11:58 PM
 • वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे कर भरणाऱया, विविध सरकारी खात्यांकडून कारवाई, चौकशांचा बडगा सहन करणाऱया व्यापारी वर्गाचा समाजाने आणि शासनानेही विचार करावा, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.भारत सरकार आणि राज्य सरकार उत्पन्नाचे स्रोत म्हणून विविध प्रकारचे कर वसूल करते व त्यातून जमलेला निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करते. करदाता प्रामुख्याने व्यापारी, शेतकरी, पगारदार, उद्योगपती, नेता या पाच घटकांत करदाता विभागला जातो. उच्च, मध्यम व अल्प दर्जाचे उत्पन्न असलेले हे करदाते आहेत. शासनाने...
  July 24, 11:55 PM
 • आजपासून सुरू होणाऱया महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांवर होणाऱया राजकीय हल्ल्याच्या वेळी सत्ताधारी बाकांवरून हवालदिल झालेल्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहण्यापलीकडे काहीही हालचाल होणार नाही.गोविंदाग्रजांनी लिहिलेल्या महाराष्ट्र गीतात मराठी मुलखाचे कौतुक करताना या प्रदेशाला सरळसरळ दगडांच्या देशा असे संबोधले आहे. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा, वहाण पायी, अंगी कांबळी उशाखाली धोंडा म्हणजे या मराठी मुलखातील जनतेची अवस्था काय तर वरी, नागली,...
  July 24, 11:46 PM
 • राजकारणी-उद्योगपती-सनदी अधिकारी यांच्या मगरमिठीतून देशातील क्रीडा संघटनांची नजीकच्या काळात सुटका होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. याचे उत्तम उदाहरण ठरते मुंबई क्रिकेटची नुकतीच झालेली निवडणूक. आपल्या खुर्च्या शाबूत ठेवण्यासाठी किंवा त्या नव्याने मिळवण्यासाठी नेमके काय करावे लागते, हे राजकारण्यांपेक्षा अधिक चांगले कोणाला समजत असेल असे दिसत नाही. अगदी शेवटच्या क्षणी मैदानात उतरलेल्यांनी मनी तसेच मॅनपॉवर, तडजोड किंवा कूटनीती यांच्या बळावर गादी सर केली. अगदी अपक्ष...
  July 23, 03:18 AM
 • अनेक वर्षांपूर्वी एका प्रकाशकानं मला पुस्तक दिलं होतं. प्रकाशनाच्या वाटेवरलं पुस्तक होतं ते. त्याच्या सुरुवातीच्या पानांवर काही उतारे होते. पण बाकीची पानं मोकळीच होती. ही मोकळी पानं मी हिंदी, पंजाबी, गुरुमुखी आणि इंग्रजीतल्या माझ्या आवडत्या सुवचनांनी भरून काढण्याचं ठरवलं. त्यातलीच सुभाषितं मी माझ्या स्तंभलेखनासाठी वापरत असे. एके दिवशी ते पुस्तक अचानकच गायब झालं. मित्रांपैकीच कुणीतरी ते लांबवलं असणार आणि ते मला पुन्हा पाहायला मिळणार नाही, अशी मी मनाची समजूत घातली. एका संध्याकाळी...
  July 23, 03:11 AM
 • बारावीची परीक्षा. पहिलाच पेपर इंग्रजीचा. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर पोटात गोळा, हातापायांना मुंग्या असलं काही काही व्हायला लागलं होतं. पण मी थोडी स्कॉलर वर्गात मोडत असल्यानं तसं फार टेन्शन नव्हतं. नंबर शोधून पदग्रहण केलं...तोच त्याची दारातून एंट्री झाली. योगेंद्र यदुवंशी... कॉलेजमधला सगळ्यात टग्या पोरगा... हा आपल्याच वर्गात कसा आला एवढा विचार करेपर्यंत महाशय नंबर शोधत शोधत थेट मागच्याच बाकावर विराजमान झाले. बसल्या बसल्या लगेच हाय अशी लाडीक हाकही आली. गुर्मी दाखवायची आयती संधी मला...
  July 22, 03:16 AM
 • महाराष्ट्रामध्ये १९९० पासून फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये ख-या अर्थाने क्रांतिकारक कार्य सुरू झाले व त्याचे अनुकरण पुढे देशातील इतर राज्यांनी केले. १९८९-९० मध्ये राज्यामध्ये बाजारपेठेत, रस्त्यांवर विशिष्ट हंगामात विशिष्ट फळेच विकत मिळायची. विविध प्रकारची फळे राज्यात फलोत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागली. १९९० मध्ये राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेतले....
  July 22, 03:13 AM
 • गुरुदास कामत जेव्हा संतापाच्या भरात यूपीए मंत्रिमंडळातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना मंत्रिमंडळात जमादारांचे खाते म्हणवून हिणवल्या जाणा-या पेयजल खात्याचा पदभार स्वीकारून स्वत:चा अपमान करून घ्यायची इच्छा नव्हती, अशी कुजबूज काँग्रेसच्या वर्तुळात होती. खास निर्माण करण्यात आलेले पेयजल आणि स्वच्छता खाते त्यांना देण्यात आले होते. पण कॅबिनेटपदी बढती न मिळालेले कामत कमालीचे नाराज होते. अगोदरच्या खात्याचा जरी त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार असला तरी ते राज्यमंत्रीच होते. पाच वेळा...
  July 22, 02:53 AM
 • परभणी जिल्ह्यामध्ये २३ हजार बनावट शिधापत्रिका सापडल्याचे दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त नक्कीच खळबळजनक आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१० या कालावधीत पुरवठा खात्याच्या वतीने बनावट शिधावाटप पत्रिका शोधमोहीम राबवण्यात आली होती. एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका सापडत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची संख्या किती असेल, याची कल्पनाच करवत नाही. सार्वजनिक शिधावाटप यंत्रणा ही खरे तर या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदानच आहे....
  July 21, 02:49 AM
 • तस्थापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज: समाधि:।। हे सूत्र म्हणजे पदातील अंतिम सूत्र आहे. ऋतंभरा प्रज्ञेच्या संस्कारांमुळे अन्य संस्कारांना प्रतिबंध होतो. या अवस्थेतूनच निर्बीज समाधी प्राप्त होते. ही निर्बीज समाधी अवस्था म्हणजेच योगाचे अंतिम साध्य. सर्वच वृत्तींचा निरोध झाल्यामुळे निर्बीज किंवा असंप्रशात समाधी अवस्थेत चित्त विलीन होते हा कळसाचा भाग आहे. अनुभव नसताना केवळ ऐकीव व वाचीव माहितीवर भारंभार बोलणारे आपण पाहिलेले आहेत. आपण सतत समाधी अवस्थेतच असतो असा आविर्भाव या मंडळींच्या...
  July 21, 02:47 AM
 • देशातील नागरिकांना ज्याप्रमाणे युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक दिले जाणार आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात गुराढोरांनाही असेच विशेष क्रमांक देण्याची योजना नजीकच्या भविष्यकाळात अमलात येणार आहे. महाराष्ट्र लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट बोर्डाने ही प्रस्तावित योजना आखली असून गुराढोरांच्या कानाजवळ किंवा शरीरावर अन्यत्र विशेष क्रमांक नमूद केलेली मायक्रोचिप बसवली जाणार आहे. आवश्यक माहितीकरिता ही मायक्रोचिप ज्या वेळी स्कॅनरमार्फत तपासली जाईल त्या वेळी त्या संबंधित प्राण्याची सर्व माहिती...
  July 21, 02:40 AM
 • आपल्या संवाद साधायच्या पद्धती फार झपाट्याने बदलायला लागल्या आहेत. कोणे एकेकाळी पोस्टमनची वाट बघणारे लोक आता कोणत्याही क्षणी आपल्या जिवलगांशी तत्काळ संपर्क साधू शकतात ही फार मौजेची गोष्ट म्हणावी लागेल. कबुतराद्वारे आपले संदेश पाठवणारे, समुद्रात बंद बाटलीमध्ये संदेश लिहून तो लाटांवर पाठवून प्रत्युत्तरासाठी दैवावर विसंबून राहणारे जीव काही शतकांतच किती प्रभावीपणे माध्यमांचा शोध लावून मनासारखे जलदगतीने संपर्क साधू लागले याची कहाणी विस्मयकारक आहे. मनुष्य हा सामाजिक भान असलेला...
  July 21, 02:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED