Home >> Editorial >> Columns

Columns

 • नागरीकरणाच्या दबावामुळे भारतातील अनेक शहरे अस्ताव्यस्त वाढली आहेत. केवळ रोजगारासाठी ग्रामीण भागातून प्रचंड प्रमाणात लोकसंख्येचे स्थलांतर होत असल्याने राहण्याच्या जागेसह आरोग्य, पर्यावरण, वाहतूक, नागरी सुविधा आदींवर ताण पडत चालला आहे.संयुक्त राष्ट्राने ५ वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या एका लोकसंख्याविषयक अहवालात, २०३० पर्यंत भारतातील ४० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहणारी असेल. त्याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई आणि कोलकाता या शहरांतील स्थलांतर मंदावून याच शहरातील लोक...
  June 27, 03:09 AM
 • वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. या संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ दिली नाही. या वारकयांमध्ये सर्व जातींचे संत होऊन गेले.वारी करणारा तो वारकरी. इतर तीर्थक्षेत्रांची नित्यनियमाने वारी करणाया लोकांना वारकरी म्हणत नाहीत; पण पंढरपूरला समुदायाने जाणा-या भक्तगणांनाच वारकरी म्हणून संबोधले जाते. आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशा पंढरपूरच्या मुख्य वा-या आहेत. यापैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची...
  June 27, 03:06 AM
 • हॉकी इंडियाची स्थापनाच मुळी चुकीच्या मार्गाने झाली व त्या संघटनेला मान्यता मिळवून देण्यात भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) आणि मुख्यत्वे त्यांचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचा हात होता.सुवर्णयुग अनुभवलेल्या भारतीय हॉकीच्या भल्यासाठी एकत्रीकरण किंवा विलीनीकरण हे आम्हाला तत्त्वत: मान्य आहे. भारतीय हॉकी महासंघ (आयएचएफ) आणि हॉकी इंडिया या गेली तीन वर्षे एकमेकास पाण्यात बघताना देशातील हॉकीच्या प्रशासनाची सूत्रे आपल्या हाती राहावीत यासाठी चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन दाद मागणाया या...
  June 25, 04:43 AM
 • उजेड आणि अंधार ३१ मेच्या सकाळी शकुंतला खोसला यांच्या मुलाने फोन करून कळवले की आईचे निधन झाले आहे. तेव्हा मला फार हताश वाटले. त्यांनी मला निष्कारण मागे टाकले आहे, अशी माझी भावना झाली आहे. सर्वात जास्त शकुंतलाने.यंदाच्या ३१ मेच्या मंगळवारी, शकुंतला खोसला (काही वर्षांपूर्वी दिवंगत झालेले न्या. जी. डी. खोसला यांच्या पत्नी) यांच्या निधनाने ७० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या गाढ दोस्तीची समाप्ती झाली. त्यांच्या आयुष्याची अखेर झाली तेव्हा शकुंतला १०१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पतीपेक्षा स्वत:...
  June 25, 04:31 AM
 • फ्री मेसनरी हा स्वतंत्र धर्म नाही; परंतु निश्चितपणे धार्मिक आहे. सर्व धर्मांवर विश्वास व त्यांचा नितांत आदर करणारी ही संस्था आहे.जगातील प्रत्येकाने स्वत:ला सुधारले तर आपोआप सर्व जग सुधारेल, अशी फ्री मेसनरीची धारणा आहे.रवी कुलकर्णी, सुधीर कायदेप्रत्येक वर्षी २४ जून हा दिवस जगात विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. विश्वबंधुत्व, दु:खापासून मुक्ती व सक्ती ही तीन प्रमुख तत्त्वे आचरणारी फ्री मेसन ही एक जगातील सर्वात प्राचीन व मोठी संस्था आहे. २४ जून २०११ रोजी ही संस्था आपल्या ऐतिहासिक...
  June 24, 03:50 AM
 • एक काळ असा होता, की पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना अमेरिकेकडून पसंती दिली गेल्यावरच त्यांची नेमणूक होत असे; पण आता तसे घडू शकेल की नाही हे अमेरिकन धुरीणच सांगू शकत नाहीत. कयानी कदाचित अमेरिकेच्या मर्जीतले शेवटचे लष्करप्रमुख ठरू शकतात.पाकिस्तानात सध्या घडणाया घडामोडींकडे अतिशय काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्याविरुद्ध पंतप्रधान युसूफ रझा गिलानी असा संघर्ष काही दिवसांपासून होता तेव्हा त्यांना तुम्ही नीट काम करा; अन्यथा आपल्याला वेगळा...
  June 24, 03:46 AM
 • दहावीचे वर्ष हे संपूर्ण शैक्षणिक जीवनाचा आणि एकंदरीतच पूर्ण आयुष्याचा एक भाग आहे; परंतु जीवनात चांगल्या मूल्यांनिशी स्वत:ची एक ओळख निर्माण करणं, ही खरी परीक्षा आहे. मुलांना त्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा... ब-याच दिवसांनी मुलीच्या पाळणाघरातल्या आजींना भेटायला गेले होते. येता येता तिथल्या ओळखीच्या बायका, मैत्रिणी सगळ्यांना भेटून आले. सगळ्यांच्या गप्पांची सुरुवात अगदी सारखी होती. काय! सुटलात ना दहावीच्या वर्षातून! आता सुटी अगदी एन्जॉय करा! सगळं टेन्शन दोन महिने विसरून जा. मग आहेच....
  June 23, 06:07 AM
 • एखाद्या देशात विकास होतो, पण त्यामुळे तेथील मनुष्यबळ महाग होते. ते महाग झाले की उद्योगांचा उत्पादनखर्च वाढून उत्पादन घेणे अशक्य ठरते. मग त्या देशातील गुंतवणूकदारांचा उत्साह कमी होतो. आणि ते स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असणाया देशाकडे धाव घेतात. असे झाल्यावर या देशाची प्रगती खुंटते. सध्या भारतात अशीच परिस्थिती दिसून येत आहे.देशाच्या प्रगतीची सतत चर्चा होत आहे. विशेषत: जागतिक मंदीच्या काळातही या देशाने घेतलेली झेप कौतुकास्पद मानली जात आहे. ही देशवासीयांसाठी समाधानाची बाब आहे. त्यातही देशात...
  June 22, 03:39 AM
 • दहा वर्षांमध्ये राज्यातल्या उपयुक्त पशूंची संख्या जवळपास ३० हजारांनी कमी झाली आहे. याचा परिणाम साहजिकच दूध उत्पादनावर झाल्यामुळे दूधदुभत्या महाराष्टाला उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब या राज्यांनी मागे टाकले आहे.जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून भारताची खास ओळख आहे. पण अलीकडच्या काही वर्षांत दुधाची वाढती मागणी आणि पुरवठा यात निर्माण झालेली पोकळी, सकस आणि पुरेशा पशुखाद्याचा आणि चा-याचा तुटवडा लक्षात घेता ही ओळख पुसली जाणार का अशी भीती निर्माण झाली आहे. दूध तुटवड्याचे संकट...
  June 22, 03:37 AM
 • रामदास आठवले यांना शिवसेना-भाजपाकडे ढकलण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आहे. आठवलेंनी स्वीकारलेले धक्कातंत्र यशस्वी होऊन आगामी निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी अर्थातच उभय काँग्रेसची असणार आहे.रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे आगामी मुंबई तसेच राज्यातील अन्य महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपाशी युती करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आठवले म्हणत आहेत, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आपण वीस वर्षे साथ दिली; पण...
  June 21, 12:39 AM
 • मेडिकल टुरिझम वाढले तर देशाच्या गंगाजळीतील परकीय चलनाचे प्रमाण वाढेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.यातून उभा राहिलेला पैसा देशातील ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी वापरता येईल.देशामध्ये इको तसेच अॅग्रो टुरिझमप्रमाणेच मेडिकल टुरिझम ही संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. अमेरिकेत राहाणाया एखाद्या रुग्णाला तिथे उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी जितका खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात तेच उपचार त्याला अन्य देशांत उपलब्ध होत असतील तर तो रुग्ण साहजिकच तेथे...
  June 21, 12:32 AM
 • महाराष्ट्रामधील तिवराच्या (मॅनग्रोव्ह) जंगलांची गेल्या काही वर्षांत पद्धतशीरपणे तोडणी केली जात आहे. मुंबई शहर व परिसरात या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मीरा-भार्इंदर परिसरात वसई खाडीच्या पट्ट्यातील सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील तिवराचे जंगल साफ करण्यात आले. मुंब्रा-दिवा परिसरातही हीच दारुण स्थिती आहे. या परिसरात झपाट्याने होणारी नव्या इमारतींची बांधकामे, बिल्डरांना जमिनींची मोठ्या प्रमाणावर सुटलेली हाव यांच्या तडाख्यातून तिवराची जंगलेही सुटलेली...
  June 20, 01:49 AM
 • पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारीच सिंगूरमधल्या विस्थापितांना सुमारे ४०० एकर जमीन परत करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी या प्रस्तावाचा आधी वटहुकूम काढला आणि नंतर विधानसभेत प्रस्ताव मांडला. यासाठी त्यांच्यावर टीका झाली होती. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेले जमीन परत करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या कार्यकालाच्या सुरुवातीलाच पूर्ण केल्याने सिंगूरमधील शेतकरी निश्चितच आनंदात असतील. ही ४०० एकर जमीन अशा नाखूश शेतक-यांना दिली...
  June 20, 01:43 AM
 • जून महिना उजाडताच शैक्षणिक प्रश्न आणि उत्तरांचा सिलसिला सुरू झाला आहे. हे प्रश्न वैयक्तिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विचारले जात आहेत. अडचणीचे प्रश्न अडगळीत टाकून सोयीच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत. घरोघरी केजी टू पीजी प्रवेशाची, नव्या अभ्यासक्रमाची अन् अभ्यासाच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. ज्यांचे लग्न चार-पाच वर्षांपूर्वी झाले त्यांनाही आपल्या मुला-मुलींच्या बालवाडी प्रवेशाचा प्रश्न सतावतो आहे, तर दुसरीकडे दहावी-बारावी उत्तीर्णांचे पालक अभ्यासक्रमांची निवड...
  June 18, 12:59 AM
 • अनेकदा असं होतं की तुम्हाला अनेक गोष्टी माहीत नसतात, पण त्याची उत्तरं तुम्हाला देण्याची वेळ येते. गेल्या महिन्यात माझ्या घरी इन्नी कौर आली होती. इन्नी कौरचा जन्म कुवेतमधला. शीख आई-वडिलांच्या पोटी जन्मास आलेल्या इन्नीचे आडनाव धिंग्रा. इन्नीचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात झाले. त्यानंतर ती अमेरिकेत गेली आणि तेथील एका शीख युवकाशी तिनं लग्न केलं. सध्या ती फेअरफिल्ड, कनेक्टिकट येथे राहते व तेथे ती पब्लिक रिलेशन फर्म चालवते. आपला व्यवसाय करत असतानाच इन्नीने...
  June 18, 12:51 AM
 • राजा राममोहन रॉय हे भारतीय प्रबोधनाचे जनक, तर गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे शिल्पकार समजले जातात. १७ जून १८९५ रोजी वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी निधन पावलेले आगरकर धार्मिक, सामाजिक सुधारणांचे अग्रणी होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात १०० वर्षांपूर्वी जे आदर्श निर्माण झाले त्यात आगरकरांच्या कार्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आगरकरांच्या ठायी उत्तम ग्रहणशक्ती असणारी तीव्र बुद्धिमत्ता, तत्त्वनिष्ठ स्वभाव, धैर्य, परखड मांडणी हे गुण होते. एकदा वर्गात उशीर...
  June 17, 12:34 AM
 • बाबा रामदेव यांचे प्रकरण हाताळताना केंद्र सरकारची बरीच धावपळ झाली. १ जून रोजी त्यांना केंद्रीय मंत्र्यांकडून रेड कार्पेट वागणूक देण्यात आली व त्यानंतर उपोषण करणा-या बाबा रामदेव व त्यांच्या अनुयायांविरोधात पोलिस कारवाई करण्यात आली. १ ते ४ जून यातील तीन दिवसांत या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर कशा प्रकारे निर्णय होत गेले हे पाहण्यासारखे आहे.बाबा रामदेव यांचे विमानतळावर जाऊन केंद्रीय मंत्र्यांनी स्वागत करणे ही चूकच होती. यातूनच पुढच्या चुकाही घडत गेल्या. केंद्र सरकारमधील दुसया क्रमांकाचा...
  June 17, 12:21 AM
 • मकबूल फिदा हुसैन यांनी रंगविलेल्या देवतांच्या चित्रांमध्ये उपटसुंभ धर्मवाद्यांना बीभत्सता दिसली आणि तीही सदर चित्रे प्रकाशित होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतर!मकबूल फिदा हुसैन हे आधुनिक भारताचे सर्वश्रेष्ठ पण परागंदा चित्रकार मायदेशापासून हजारो मैल दूर, विलायतेमध्ये मरण पावले. आपल्या अद््भुत आणि संघर्षमय कलाजीवनात यशाची अनेक शिखरे हुसैन यांनी पादाक्रांत केली होती. हे दुर्मिळ भाग्य हुसैन यांना लाभले तरी मायभूमीला परतण्याची त्यांची इच्छा मात्र शेवटी अपुरीच राहिली. आपल्या जन्मभूमीची...
  June 16, 12:53 AM
 • अण्वस्त्रसज्जतेतून लष्करी सामर्थ्याचा समतोल निर्माण झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष कमी व्हायला हवा होता. युद्धाची शक्यता कमी व्हायला हवी होती. तथापि, तसे घडले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील प्रलंबित प्रश्न- काश्मीरपासून ते दहशतवादापर्यंत- जर युद्धाच्या किंवा लष्करी मार्गाने सोडविता येणार नाहीत, तर त्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग कोणता यावर विचार व्हायला हवा. पाकिस्तानविषयी पर्यायी धोरण ठरविताना भारताने पाकिस्तानच्या बाबतीतली काही सत्यं लक्षात घेतली पाहिजेत. पहिले म्हणजे...
  June 16, 12:47 AM
 • जतन केलेल्या मूलपेशींचे (स्टेम सेल्स) रोपण करून गुंतागुंतीच्या विविध आजारांनंतर संबंधित रुग्णांना नवजीवन मिळवून देणे आता काही प्रमाणात शक्य झाले आहे. आजवर जन्मनाळ, मातेचे दूध, रक्त यामधून मूलपेशी मिळविता येत होत्या. मात्र आता लहान मुलांच्या दातांमधूनही मूलपेशी मिळवून त्या जतन करणे सहजसाध्य झाले आहे. एरवी, जन्मानंतरच या प्रक्रियेची सुरूवात होेते. मात्र ती वेळ निघून गेली तरीही निष्णात दंतवैद्य लहान मुलांच्या दातांमधून मूलपेशी मिळवू शकतात. इतकेच नव्हे, तर २० वर्षांपर्यंत त्या जतनही...
  June 15, 12:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED