जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Columns

Columns

 • अण्णा रोज नव्या मागण्या करू लागले आहेत आणि त्यांचे भक्त अण्णांचे उपोषण कमाल मर्यादेपर्यंत कसे वाढेल हे पाहत आहेत. त्यांच्यापैकी कोणी एक दिवसही उपोषण करीत नाही. यात अण्णांचा बळी गेला तर ही मंडळी त्यांचे स्मारक उभारतील. दिल्लीत रामलीला मैदानाच्या दिशेने लोकांचा प्रचंड ओघ चालू असल्यामुळे अण्णा हजारे व त्यांच्या भोवतालचा गोतावळा यांना बराच कैफ चढल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. किरण बेदी यांनी आपल्या भाषणात अण्णा म्हणजे भारत व भारत म्हणजे अण्णा अशी घोषणा केली. पूर्वी बारुआ यांनी...
  August 22, 11:59 PM
 • २३ ऑगस्ट १९५८ रोजी स्थापन झालेल्या आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सुंदरराव डोंगरकेरी हे होते. ते मराठवाड्याच्या बाहेरचे व मला पूर्णपणे अपरिचित. त्यांची लफ्फेदार सही मात्र मला परिचित होती. कारण ती माझ्या मॅट्रिकच्या १९४७ सालच्या प्रमाणपत्रावर होती. त्या वेळी एस.एस.सी. बोर्ड नव्हते. शालांत परीक्षा मुंबई विद्यापीठ घेत असे नि डोंगरकेरी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव होते. एका राष्ट्रीय पातळीवर व परदेशातही नावाजलेल्या विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचा संपन्न नि यशस्वी अनुभव त्यांच्या...
  August 22, 11:57 PM
 • अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील काही अस्वस्थ करणा-या बाबी मला नमूद केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, टीम अण्णाचे प्रस्तावित विधेयक म्हणजे कायद्याचे पाठबळ लाभलेला निव्वळ राक्षस असेल. त्याच्याकडे कुणाचीही चौकशी करण्याचे वा कुणालाही शिक्षा करण्याचे अधिकार एकवटलेले असतील. तो मात्र कुणासही जबाबदार असणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, अनिच्छेने का होईना, अण्णांनी तडजोडीची भूमिका स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. पण आंदोलनाबाबतचे त्यांचे उजवेपण लोकशाही...
  August 21, 11:26 PM
 • एकविसाव्या शतकातसुद्धा रेडिओ-दूरचित्रवाणीवरून स्त्री भ्रूणहत्येविरोधात जाहिराती कराव्या लागणे किंवा स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायदे करावे लागणे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांना आदेश द्यावे लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. स्त्रीस्वातंत्र्याच्या, समानतेच्या आणि स्त्रीमुक्तीच्या कितीही गप्पा मारल्या तरीही परिस्थितीत काहीही बदल न झाल्याचेच यावरून लक्षात येते. रोज २०००, दरवर्षी १० लाख आणि गेल्या वीस वर्षांत एक कोटी हे आकडे आहेत आपल्याच देशातील स्त्री...
  August 21, 11:24 PM
 • मानसिक कणखरपणाअभावी गेली दोन-तीन दशके भारतीय हॉकी संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरत होते हे वास्तव अंशत: का होईना, हॉकीच्या प्रशासकांनी स्वीकारलेले दिसते. एका महिला मानसशास्त्र चिकित्सिकेची हंगामी नेमणूक करून ऑलिम्पिकसाठी संघ पात्र व्हावा यासाठी हरत-हेचे प्रयत्न केले जात आहेत. हे स्वागतार्ह असले तरी पुढील महिन्याच्या सुरुवातीला होणा-या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेला संघ पाहता येत्या उण्यापु-या सहा महिन्यांत निर्धारित लक्ष्य आपण गाठू की कसे, याविषयी...
  August 20, 01:21 AM
 • अशी अनेक माणसे आहेत की ज्यांना मी प्रत्यक्षात भेटलेलो नसूनही त्यांच्याशी माझा संपर्क आहे. अर्थात अशी माणसे कमीच आहेत. हरियाणातील पंचकुला येथे राहणारे दीपक टंडन त्यांच्यापैकीच एक. देशातील अतिशय विद्वान व्यक्तिमत्त्वांपैकी एक. जणू चालताबोलता विश्वकोशच. सर्व भाषांमधील साहित्यिक आणि जागतिक घडामोडींविषयी ते आस्था बाळगून आहेत. त्यांना माहीत नाही असे जगाच्या पाठीवर काहीही नाही. त्याचे प्रत्यंतर मला नुकतेच मिळाले. काही आठवड्यांपूर्वी मी प्रसिद्ध स्त्री गुप्तहेर माताहारीचा एका...
  August 20, 01:17 AM
 • कोणत्याही स्पीडब्रेकरविना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत विक्रीच्या सुसाट वेगाने ३० टक्के वाढीची नोंद करणा-या वाहन विक्रीचा वेग जून महिन्यात एकदम मंदावला. मारुतीच्या मानेसार प्रकल्पातील संप, इंधनांच्या वाढलेल्या किमती, चढे व्याजदर या एकामागून एक आलेल्या अडथळ्यांनी मोटार कंपन्यांच्या विक्रीला करकचून ब्रेक लागला आणि गेल्या तीन वर्षांतली विक्रीतील सर्वात मोठी घसरण वाहन उद्योगाने जुलै महिन्यात अनुभवली. महागाईला लगाम घालण्यासाठी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून...
  August 19, 03:13 AM
 • दलाई लामा यांनी नजीकच्या काळात त्यांच्या तिबेटी सरकारचे राजकीय प्रमुखपद सोडत असल्याची घोषणा केली व त्याप्रमाणे लगेच त्यांनी त्या घोषणेची अंमलबजावणीदेखील केली आहे. चीनमधून भारतात आश्रयाला यावे लागलेल्या तिबेटींना भारताने नाखुशीनेच आश्रय दिला होता. त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दलाई लामा यांना त्यांच्या पहिल्याच भेटीत आपणाला हे समजायला पाहिजे की भारत तुम्हाला मदत करू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याचबरोबर तुम्ही आपल्या देशात परत जाऊन तेथे...
  August 19, 03:11 AM
 • महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण या हंडीसाठी मनोरे रचताना जायबंदी झालेले गोविंदा सोडले तर या उत्सवामध्ये लक्षात राहण्यासारखे काही नाही. अण्णा हजारे, त्यांच्या भोवतालचे तथाकथित बुद्धिवाद्यांचे कोंडाळे आणि त्यांना पाठिंब्याचे आवाहन करणारी टीव्ही चॅनल्स यांनी मिळून जन्माला घातलेल्या जनलोकपाल चळवळीची अवस्था या जायबंदी होणा-या गोविंदांसारखी होण्याची शक्यता आहे. अण्णांनी ही चळवळ जन्माला...
  August 18, 04:00 AM
 • आजचे जग नवनवीन संशोधनाचे आहे. या संशोधनातून तंत्रज्ञान अधिकाधिक अद्ययावत बनत असते व त्यामुळे आपले जीवन अधिक सुकर व सुंदर होत असते. मात्र या सर्व सुविधा उपलब्ध करीत असताना निसर्गाची जी हानी होते ती आपल्या कल्पनेपलीकडची असते. आपला परिसर, वास्तू, व्यक्तिमत्त्व, वस्तू आणखी आकर्षक दिसाव्या म्हणून माणसाची अनादिकाळापासून सातत्याने धडपड सुरू आहे. त्यासाठी तो नवनवे मार्ग शोधत असतो. आधुनिक काळातील शहरांचा वेध घेतला तर लक्षात येते की, तेथे...
  August 18, 03:57 AM
 • अण्णा हजारे यांनी १६ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याचे ठरवल्यापासून लोकपाल विधेयकाच्या मुद्द्याव्यतिरिक्त जोरदार वादंग माजले ते उपोषण कोठे करावे, किती लोकांना जमा करावे याबाबत. हा वादाच्या पोटातील वाद इतक्या अटीतटीने लढवला जात आहे की उद्दिष्टाइतकेच महत्त्व बाह्य उपचारांना आहे काय, असा प्रश्न पडावा. अण्णांना हा उपोषणस्थळाच्या निवडीचा मुद्दा इतका झोंबला की त्यांनी थेट हुकूमशाहीचा आरोप पंतप्रधानांवर केला. महात्मा गांधींच्या...
  August 17, 02:14 AM
 • राज्यात खासगी विद्यापीठांना परवानगी देणारा कायदा संमत झाल्याने महाराष्ट्र येत्या काही वर्षांत एज्युकेशन हब होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे राज्य विधानसभेत याविषयीचे विधेयक कोणतीही चर्चा न होता संमत झाले. सत्ताधा-यांबरोबर राज्यातील विरोधी पक्ष सदस्यांनाही या विषयावर चर्चा करावीशी वाटली नाही ही खेदजनक बाब म्हटली पाहिजे. फक्त काही सदस्यांनी या विद्यापीठात आरक्षण ठेवावे असा मुद्दा मांडला....
  August 17, 02:12 AM
 • भ्रष्टाचार हा केवळ राजकारणतच नाही तर संपूर्ण समाजात तो व्याप्त आहे. राजकारणातील लोक हे सर्वांच्या समोर असतात, त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार सर्वप्रथम सगळ्यांच्या डोळ्यांवर येतो. परंतु प्रश्न असा आहे की हा भ्रष्टाचार येतो कुठून ? अण्णा हजारे म्हणतात की ते निवडणूक जिंकू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे काळा पैसा नाही आणि वाटण्यासाठी दारूही नाही. मग अण्णांनी हे ही सांगितले पाहिजे की त्यांना काळा पैसा आणि दारू कोणासाठी पाहिजे ? निवडणुकीत दारू किंवा पैसा कोण घेतं ? राजकारणात येणारी मंडळी...
  August 15, 04:05 PM
 • देशातील कायद्यांची रचना केली गेली तेव्हा त्यातील प्रत्येक तरतुदीवर दूरगामी विचार करण्यात आला होता. पण बदलती सामाजिक परिस्थिती या तरतुदींवरच आसूड फिरवणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बनावट चकमकींमध्ये गुंतलेल्या पोलिसांना थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी असे सुचवीत सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज अलीकडेच व्यक्त केली आहे. थेट सर्वोच्च न्यायालयानेच ही सूचना केल्याने कायद्याच्या चौकटीच्या व्यापकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय गुन्ह्यांचे निकषच...
  August 15, 01:59 AM
 • दसरा, गणपती, दिवाळी, पाडवा, होळी, संक्रांत, ईद, ख्रिसमस, मोहरम... कोणत्याही धर्माचे सण किंवा उत्सव असोत, सर्वजण ते अतिशय उत्साहात साजरे करीत असतात. गेल्या दोन दशकात अशा सणांना व्यापारी महत्त्वही देण्यात आले आहे. कारण अशा निवडक दिनांचे औचित्य साधून नागरिक विविध वस्तू खरेदी करीत असतात. सोने, चांदी, वाहने, घर, फर्निचर, गृहोपयोगी उत्पादने इत्यादींच्या खरेदीवर विशेष भर असतो. अलीकडच्या काळात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन असे राष्ट्रीय उत्सवदेखील यास अपवाद...
  August 15, 01:55 AM
 • क्रिकेट खेळासाठी उभारण्यात आलेली स्टेडियम्स पांढरा हत्ती ठरतात, हा अनुभव तमाम क्रिकेट विश्वाचा आहे. मात्र हा पांढरा हत्ती पोसण्यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांनी अनेक अभिनव उपक्रम त्यावर राबवले. त्यामुळे बहुतांश स्टेडियममध्ये वर्षाचे बाराही महिने काहीतरी उपक्रम सुरूच असतात. त्यायोगे पैसा येण्याचा एक मार्ग सुरू होतो. आपण भारतीय मात्र क्रिकेट सामन्यांच्या वेळी तुडुंब भरणार्या स्टेडियम्सकडे पाहून खुश होतो. वर्षभर स्टेडियम रिकामे ठेवतो. त्यातील सर्व यंत्रणा...
  August 13, 04:03 AM
 • भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध सौहार्दपूर्ण व सलोख्याचे ठेवणे हे दोन्हीही देशांचे उद्दिष्ट असायला हवे. दुर्दैवाने हे उद्दिष्ट आपण आतापर्यंत साध्य करू शकलेलो नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन्ही देशांदरम्यान तीन युद्धे झाली. भारतीय उपखंड कायम युद्धरत अवस्थेत असते. त्याचे मूळ विश्वासाच्या अभावात आहे. पण तो विश्वास आपल्या परीने वाढवण्याचे काम दोन्हीही देशांमधील काही जण करत असतात. पाकिस्तानच्या बाजूने अस्मा जहांगीर असा प्रयत्न करताना दिसतात. त्या वारंवार...
  August 13, 03:30 AM
 • पिंपरी-चिंचवड परिसरात ९ आॅगस्ट २०११ रोजी पेटलेल्या जलवाहिनीविरोधी आंदोलनास हिंसक वळण लागून तीन शेतकरी गोळीबारात मरण पावले, तर काही पोलिस जखमी झाले. या कथित संघर्षात शेतकरी विरुद्ध पोलिस लढले असले तरी खरा लढा सत्ताधारी घटक आणि विरोधी राजकीय घटक यांच्यातच असल्याचे आंदोलकांच्या हाती असणा-या झेंड्यावरून दिसून येत होते. सारे आंदोलन शांततेने, अहिंसात्मक मार्गाने चालत असल्याचे दावे केले गेले; पण मोर्चा हिंसक होता म्हणून गोळीबार केला असे गोळीबारवाद्यांनी सांगितले. अर्थात यानंतर...
  August 12, 04:15 AM
 • जगातील सर्वच शेअर बाजार सध्या घसरणीला लागले आहेत. निमित्त आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा पतदर्जा घसरल्याचे. अर्थातच या घसरणीतून भारतीय शेअर बाजार काही सुटलेला नाही. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल १४ महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा १७ हजारांच्या खाली कोसळला आहे. कोणताही शेअर निर्देशांक कोसळायला लागतो त्या वेळी एकूणच गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक मूड तयार होतो आणि निर्देशांक आणखी घसरणार अशी एक हवा तयार होते. आता सेन्सेक्स १७ हजारांच्या खाली गेल्यावर तो १५ हजारांच्या खाली...
  August 12, 04:10 AM
 • मुंबईमध्ये सायलीकडे (माझ्या मुलीकडे) मी आलो असताना एकदा राजभवनातून दूरध्वनी आला. राज्यपाल बोलू इच्छित होते. पी. सी. अलेक्झांडर यांचा व माझा पूर्वपरिचय नव्हता. संयुक्त राष्ट्रसंघातले एक कार्यक्षम अधिकारी आणि पंतप्रधान इंदिरा गांधींचे चिटणीस अशी त्यांची कारकीर्द ऐकून माहीत होती. आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. औरंगाबादच्या डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया चालू होती. कुलगुरूंची निवड करणाया शोधसमितीवर अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करावे अशी माझी इच्छा...
  August 11, 01:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात