Home >> Editorial >> Columns

Columns

 • राज्याची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरासमोरचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न कोणते, असा प्रश्न जर कोणी केला तर इतर सर्व कळीचे प्रश्न बाजूला ठेवून पुणे शहराभोवतीचे टोलनाके हाच महत्त्वाचा प्रश्न सांगण्याचा मोह अनेकांना होईल. गेल्या आठवड्यात बंगळुरू हमरस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर जे काही घडले, ते तरी हेच सांगते. एका हमरस्त्यावरच्या टोलनाक्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथे जे जे काही घडले ते आमच्या देशाची प्रशासकीय, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती किती खालावली...
  June 5, 03:53 AM
 • आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या नोबेल, मॅगसेसे, राइट लाइवलीहूड बुकर, ऑस्कर, पुलिट्झर, अशा विविध पुरस्कारविजेत्या भारतीयाच्या नावांमध्ये आपल्या बुिद्धवादी वारशाचा, प्रागतिक विचारसरणीचा, साहित्यिक कर्तृत्वाचा, वैज्ञानिक परंपरेचा आणि सामाजिक कार्याच्या परंपरेचा अभिमान बाळगणार्या मराठी भाषिकांपैकी एकाचेही नाव नाही.सामाजिक क्षेत्रात मराठी नेतृत्वाने काहीशी बाजी मारलेली असली तरी या यादीतले शेवटचे मराठी नाव 1996 सालचे पांडुरंगशास्त्रींचे आहे. त्यानंतर परत मराठी नाव नाही....
  June 5, 03:51 AM
 • आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! अशी अवस्था सध्या औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलाची झाली आहे. 1993 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. येथे अद्ययावत क्रीडा सुविधा नाहीत, धावपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक नाही. आहे ते एक भलेमोठे पॅव्हेलियन. विभागीय क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांच्या सोई-सुविधा असताना, क्रीडा प्रेक्षागृह, क्रीडा संकुल असूनही राष्ट्रीय शालेय स्पर्धादेखील छावणीतील मैदानावर घ्याव्या लागतात, असा हा अजब प्रकार आहे.1993 मध्ये औरंगाबादचे क्रीडा...
  June 4, 04:34 AM
 • पक्ष्यांना पिंजर्यता बंदिस्त करून ठेवणे म्हणजे त्यांच्या आकाशात उडण्यावर बंदी घालणे. हे सरळ सरळ पक्ष्यांच्या जन्मसिद्ध अधिकारावर आक्रमण असून ते न्यायतत्त्वाला धरून नसल्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने दिला. या निर्णयाचे मी स्वागत करतो. कारण या निर्णयामुळे बंदिस्त असलेल्या हजारो पक्ष्यांना उडण्यास मोकळे आकाश मिळाले आहे. ते स्वातंत्र्याची नवी अनुभूती घेत आहेत. पक्ष्यांना पिंजर्यता बंदिस्त करण्यासंदर्भात माझी स्वत:ची एक भूमिका आहे. मला वाटते की, ज्या पक्ष्यांना एखाद्या घरात रोज...
  June 4, 04:32 AM
 • रोमन साम्राज्यात प्राचीन ग्रीसचे राज्य समाविष्ट झाले तो काळ आहे ख्रिस्तपूर्व ६व्या शतकाचा. त्याला हेनेलिस्टिक पिरियड असेही म्हणतात. याच कालावधीपासून ग्रीक तत्त्वज्ञांचा मोठ्या प्रमाणावर दबदबा निर्माण झाला. राजकीय तत्त्वज्ञान, नैतिक मूल्ये, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये ग्रीक विचारवंतांनी मूलगामी चिंतन व विचारमंथन केले. ग्रीस देशातील विद्वानांची परंपरा, तसेच तेथील सम्राट अलेक्झांडर यांचा भारतीयांना चांगलाच परिचय आहे. एकेकाळी...
  June 3, 04:40 AM
 • आरक्षणाचा प्रवास एकतृतीयांशापासून निम्म्यापर्यंत झाला असला, तरी निवडून आलेल्या महिलांपुढचे मूळ प्रश्न कायमच आहेत. निवडून आलेल्या प्रतिनिधींना घटनात्मक अधिकार आहेत; मात्र त्यासंबंधीची जाणीव त्यांना नाही. संसदेत राष्ट्रपतींनी ४ जून २९ रोजी महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा इरादा जाहीर केला आणि ७३ व्या - ७४ व्या घटना दुरुस्तीने मिळालेल्या एकतृतीयांश आरक्षणाने पुढचा टप्पा गाठला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा तीन पातळ्यांवर मिळून ११ लाख...
  June 3, 04:36 AM
 • अब्दुल कादर मुकादमसंपूर्ण भारतीय मुस्लिम समाज हा एकसंध आहे हा दुसरा गैरसमज! काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते बंगालपर्यंत विखुरलेल्या मुस्लिम समाजाचा इस्लाम हाच धर्म असला तरी प्रादेशिक सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत त्यांच्यात बरीच भिन्नता आहे. नुसता महाराष्ट्रापुरता विचार केला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील मुस्लिम समाज, सामाजिक चालीरीती, भाषा, इतकेच काय पण धार्मिक कर्मकांडे पाळण्याच्या पद्धती या बाबतीत एकमेकांपासून बराच भिन्न आहे. मराठवाड्याशी इस्लामचा...
  June 2, 04:00 AM
 • अमेरिकेने ओसामा बिन लादेनला संपविण्यासाठी पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली. तशाच स्वरूपाची कारवाई भारताने पाकिस्तानात दाऊद इब्राहिम किंवा भारताला हव्या असणार्या इतर दहशतवाद्यांना संपविण्यासाठी करावी अशा स्वरूपाच्या मागणीने गेल्या काही दिवसांमध्ये जोर पकडला आहे. मात्र देशांतर्गत आणि परराष्ट्र व्यवहारातील समस्या हाताळण्यासाठी आवश्यक व्यापक राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या अभावामुळे अशा कारवाई संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संरक्षणविषयक तज्ज्ञ, लष्करी अधिकारी, राजकीय पक्ष,...
  June 2, 03:56 AM
 • कोणताही देशाच्या प्रगतीबाबत विचार करताना तेथील जनतेचे राहणीमान कितपत सुधारले आहे हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. अर्थात गरीब आणिश्रीमंत तसेच मध्यमवर्गीय हे वर्ग जवळपास प्रत्येक देशात दिसून येतात. पण यातील गरिब आणि श्रीमंतामधील अंतर वाढत आहे का कमी होत आहे या प्रश्नाचा विचार प्राधान्याने करावा लागतो. या संदर्भात भारताचा विचार करायचा तर गरिब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालल्याचे दिसते. गरीब अधिक गरिब होत आहेत तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. कोट्यवधींची संपत्ती काही ठराविक वर्गाकडेच...
  June 1, 08:50 PM
 • चलन फुगवट्याच्या भस्मासुराचा सामना करण्याचे एक प्रभावी अस्त्र म्हणून सोन्याची ख्याती आहे. इंग्लंडमध्ये १५९६ ते १९९७ पर्यंतच्या ४ वर्षांच्या काळातील सोन्याच्या भावामधील चढउताराचा अभ्यास केल्यावर असे निष्पन्न झाले, की १ औंस सोन्याच्या भावात १५९६ साली ज्या आवश्यक वस्तू उपलब्ध होत्या, तितक्याच १९९७ मध्येही खरेदी करता येत होत्या. सर्वसाधारणपणे शेअर बाजारात तेजी असली की सोन्याचा भाव घटतो आणि त्या बाजारात मंदी आली की सोन्याचा भाव वधारतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याचा विचार...
  June 1, 08:38 PM
 • ताज्या प्राथमिक जनगणना अहवालानुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येत (११ कोटी) दोन कोटींहून अधिक भर पडली असली तरीही, मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या एक कोटी १९ लाखांवरून एक कोटी २४ लाख अशी नोंदली गेली आहे. म्हणजेच २१ च्या तुलनेत मुंबईच्या लोकसंख्येत पाच लाखांची (वर्षाला २ हजार या दराने चार टक्के) वाढ झाली आहे. यात असेही निरीक्षण मांडण्यात आले आहे की, गेल्या दशकात मुंबईतल्या लोकसंख्येत ५.७५ टक्के, तर उपनगरात ८.१ टक्के दराने वाढ झाली.दोन वर्षांपूर्वी 'फायनान्शियल टाइम्सऍ'ला दिलेल्या एका मुलाखतीत...
  May 31, 05:10 PM
 • पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांच्या विरोधात पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि या दोघांच्याही विरोधात लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी असा त्रिकोण पाकिस्तानात सध्या अस्तित्वात आहे. लोकशाही सरकार आणखी किती दिवस तग धरू शकेल, असाही प्रश्र या पाश्र्वभूमीवर अनेकांच्या मनात आहे.पाकिस्तानमध्ये जे सरकार आहे ते आजवरचे सर्वात कमकुवत आणि भ्रष्टाचारात आघाडीवर आहे. अध्यक्ष झरदारी यांना त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात न्यायालयात उभे राहण्यापासून कायद्याने सूट देण्यात आली...
  May 31, 04:44 PM
 • महाराष्ट्राची ओळख ही वर्षानुवर्षे येथील सहकार क्षेत्र आणि त्यातून गाव पातळीवर झिरपलेला विकास ही झाली आहे. महाराष्ट्रातील विशेषत: साखर कारखाने, दूध महासंघ, व्यावसायिक शेती व अनुषंगाने होणारे असंख्य उद्योग हे सहकारातून साकार झालेले आहेत. सहकाराचा वापर त्या त्या क्षेत्रातील निवडणुकांचे रण जिंकण्यासाठी सातत्याने केला जातो. मात्र याच सहकारातून शेतकऱ्याचा झालेला उत्कर्ष दुर्लक्षून चालणार नाही. महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर अवलंबून आहे, त्या बॅंकेवरच...
  May 30, 08:41 PM
 • फ्युचरॉलॉजिस्ट म्हणजे ज्योतिषी नव्हे, तर विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक नि आर्थिक वास्तवाचा आढावा घेऊन भविष्याचा वेध घेणारे जिनियस. एल्विन टॉफ्लर या आद्य फ्युचरॉलॉजिस्टने 'थर्ड वेव्ह' या ग्रंथात म्हटले होते, की जगातली पहिली क्रांती कृषी क्रांती होती. ह्या क्रांतीची लाट आशियातून युरोपकडे गेली. तर दुसरी क्रांती औद्योगिक क्रांती. ही पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरत गेली. तिसरी क्रांती उत्तर औद्योगिक क्रांती अर्थातच माहिती तंत्रज्ञानाची क्रांती. याच तंत्रज्ञानामुळे पुढे...
  May 30, 08:36 PM
 
जाहिरात

RECOMMENDED