Home >> Editorial >> Columns

Columns

 • अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याने व तेथील व्याजदर वाढल्याने नव्या बाजारपेठांत गुंतवणूक करण्यापेक्षा ती स्वदेशातच वळवणे अधिक किफायतशीर ठरत असल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी नव्या बाजारपेठांमधील गुंतवणुकी काढून घेणे सुरू केले. भारतीय अर्थव्यवस्था स्थिर व विकासशील असल्याचे कोणतेही चित्र भारत उभा करू न शकल्याने भारतातीलही गुंतवणूक काढली जात आहे. म्हणजेच डॉलर्स बाहेर जात आहेत. गेल्या काही काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सातत्याने ढासळत असून आता ती ७० रु.च्या आतबाहेर...
  August 27, 08:46 AM
 • मुदतीत म्हणजे सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या कोल्हापुरातील १९ नगरसेवकांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द धोक्यात आले आहे. हा प्रश्न सार्वत्रिक आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आल्यावर सहा महिन्यांत जे जे लोकप्रतिनिधी वैधता प्रमाणपत्र मुदतीत देऊ शकले नाहीत, त्यांच्यावरही टांगती तलवार आहे. राज्यात २७ महानगरपालिका, ३६४ नगरपालिका, ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत...
  August 25, 07:49 AM
 • कार निकोबारवरील तळ, मलाक्काची सामुद्रधुनी आणि त्यापलीकडे दक्षिण चीन सागरातील सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावेल. अंदमान-निकोबारमधील हवाई तळांच्या आधुनिकीकरणामुळे तसेच तेथे लढाऊ विमाने तैनात केल्यामुळे हिंदी महासागराच्या पूर्वेकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर हवाई दलाच्या तळांचा विस्तार करून तेथे लढाऊ विमाने आणि अन्य महत्त्वाची साधनसामग्री तैनात करण्याची योजना आखली आहे. मलाक्काच्या...
  August 25, 07:38 AM
 • ज्येष्ठ पत्रकार अटलजी सामान्य कुटुंबात जन्मले, सामान्य शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे जीवनही सामान्यपणेच झाले, हे सामान्यत्व ते कधीही विसरले नाहीत. हा राजनेता सामान्य माणसाला कधीही नारळाच्या झाडासारखा उंच वाटला नाही. गेली पंधरा वर्षे अटलबिहारी वाजपेयी सक्रिय राजकारणात नव्हते. त्यांचे कुठे भाषणही झाले नाही किंवा घडामोडींवर त्यांचे भाष्यही कधी प्रकट झाले नाही. त्यांचे वयदेखील (९३) झाले होते आणि वार्धक्याने त्यांचे निधन झाले. या दोन्ही गोष्टींचा...
  August 24, 08:59 AM
 • सात्त्विक, पुरोगामी महाराष्ट्र आज उग्र आंदोलकांची भूमी बनला आहे. मराठा क्रांती आंदोलन अगदी टिपेला आहे. राज्यात धनगर समाजाचेही मोठे आंदोलन उभे राहते आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे बारामती (जि. पुणे) शहरात आंदोलन झाले हाेते. भाजप सत्तेत आल्यावर पंधरा दिवसांत धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देऊ, असे लिखित आश्वासन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा दिले होते. विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तसा...
  August 23, 01:00 AM
 • गजानन अर्जुन जायभावे (रा.सावखेड तेजन, जिल्हा बुलडाणा) थकबाकी ७० हजार, बँकेचा पीककर्जास नकार, उसनवारीने पीकपेरणी केली. पण नापिक झाली. कर्जमाफी यादीत नांव नाही. हतबलतेने विषप्राशन व त्यानंतर खात्रीशीर मरणासाठी चिता रचून आत्महत्या. पुन्हा एकदा हळहळीचा हलकल्लोळ, व कुटुंबीयांच्या वाट्याला वैराण जगणे. अशा या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. आपल्या कृषीप्रधान भारतात १९९६ ते २०१८ या काळांत ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पुरोगामी महाराष्ट्रात ५१ हजार शेतकऱ्यांनी हतबल होत जीवन...
  August 23, 12:08 AM
 • कोणताही राजकीय वारसा नसताना काँग्रेससारख्या पक्षात येऊन सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण पदे भूषवण्यास मिळणे सोपे नाही. परंतु माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी हा पराक्रम करून दाखवला होता. विद्यार्थिदशेपासूनच काँग्रेस विचारधारा अंगीकृत करून गुरुदास कामत यांनी आपला प्रवास सुरू केला होता. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटचे म्हणून ओळखले जाणारे गुरुदास कामत, मात्र गेल्या काही काळापासून मुंबई काँग्रेसच्या राजकारणाला ते कंटाळले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम...
  August 23, 12:06 AM
 • कुस्ती म्हणजे; समर्पण, निष्ठा, भक्ती, युक्ती, सातत्य अाणि शक्तीचा संगम, असे हिंदकेसरी मारुती माने म्हणत असत. ते खरंच अाहे. याच गुणांच्या बळावर विनेश फाेगट अाशियायी महिला कुस्तिगीरांमध्ये पहिली सुवर्ण कन्या ठरली. अाॅलिंपिकमध्ये ब्राँझ पदक कमावलेली साक्षी मलिक, पूजा ढांडा यांच्याकडून पदकाची अपेक्षा जरूर हाेती. दाेघींनीही उपान्त्य फेरी गाठली, परंतु पदकापर्यंत अापली ताकद पणाला लावण्यात त्या अपयशी ठरल्या. किर्गिजस्तानच्या एसुलू टिनिबेकाेवासमाेर साक्षीचे डाव कमकुवत ठरत राहिले....
  August 22, 08:56 AM
 • आज विरोधकांचे हाल गर्भगळीत, शून्यात हरवलेल्या आत्ममग्न, एकाकी पडलेल्या व्यक्तीसारखे झाले आहेत. याचा ज्वलंत दाखला राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत मिळाले. काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांना समर्थक मतांच्या अंदाजानुसार, जेवढी मते मिळायला हवी होती, तेवढीही मिळाली नाहीत, तर एनडीएच्या हरिवंश यांना भाजपच्या मित्रपक्षांच्या संख्येच्या तुलनेत जास्त मते मिळाली. सत्तापक्षासमोर विरोधकच नसतील तर ते एकतंत्री सरकार होईल. भारतात सत्ताधारी पक्षांना कधीही मनमर्जीप्रमाणे वागू दिले जात नाही,...
  August 22, 08:44 AM
 • युद्धापासून दंगलींपर्यंत, बायकोला मारण्यापासून प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या हिंसेला संपूर्ण मान्यता देणारी कुटुंब, समुदाय संस्कृती प्रतिष्ठित मानली जाते, अशा समाजात आत्महत्यांची लागण पसरते आहे. त्यामुळे आज मराठा आरक्षणाची ठिणगी असली, तरी उद्या दुसरी ठिणगी पेटणारच नाही, याची खात्री देता येणार नाही. ३ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १४ सुशिक्षित तरुणांनी आत्महत्या करून स्वतःला संपवले आहे. काकासाहेब शिंदे या २९ वर्षीय तरुणाने...
  August 21, 06:19 PM
 • आर्थिक सामिलीकरणाची मोहीम म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांना बँकिंग करण्याची संधी देणे. तब्बल १.५५ लाख कार्यालये आणि भारतीयांचा प्रचंड विश्वास असणाऱ्या टपाल खात्यावर ही जबाबदारी सोपवली तर ? उद्याच्या (दि.२१) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या प्रारंभामुळे त्या मोहिमेस खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे. भारत सरकारने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले त्याला गेल्या १९ जुलै रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली. देशाचा सुनियोजित आर्थिक विकास करण्यासाठी आणि संपत्तीच्या वितरणासाठी सरकारला हे आवश्यक वाटले. शेती...
  August 20, 07:12 AM
 • गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यासह राज्यातील इतर काही भागाला दुष्काळी परिस्थितीचा कायम सामना करावा लागत आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशी स्थिती त्या त्या भागाने अनुभवली आहे. गतवर्षी निसर्गाच्या साथीमुळे विदर्भातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली नाही. यावर्षी नेमके काय होणार, हा प्रश्न सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना होता. यंदाचा मान्सून सरासरीएवढाच असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मान्सूनचा परिणाम...
  August 18, 09:00 AM
 • पार्कर हा उपग्रह आजवर कोणत्याही उपग्रहाने न केलेली कामगिरी पार पाडणार आहे. तो सूर्याच्या अत्यंत जवळ जाणार आहे. आणखी ११ आठवड्यांनी पार्करची सूर्याशी पहिली लगट झालेली असेल. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर साधारण १४,९०,००००० किलोमीटर इतके आहे. पार्कर जेव्हा सूर्याच्या जवळ जाईल तेव्हा या दोघांतील अंतर अवघे ६१ लाख किलोमीटर इतके असेल. आजवर मानवनिर्मित कोणतीही वस्तू सूर्याच्या इतक्या जवळ जाऊ शकली नाही. आपल्याला आकाशात सर्वत्र तारे व तेजोमेघ अव्यवस्थितपणे पसरलेले दिसतात. जिथे ते दाट दिसतात...
  August 18, 08:59 AM
 • अटलजींच्या मनाचा माेठेपणा अाणि समयसूचकता अशी की, त्यांनी अापली भूमिका बहुमताशी जुळवून घेतली. गाेव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळच्या जाहीर सभेत तर त्यांनी एक प्रकारे माेदी यांचे समर्थन केले. ते म्हणाले, भारत प्राचीन काळापासून सेक्युलर अाहे. अगदी इस्लाम व ख्रिस्ती धर्म इथे येण्याअाधीपासून. इस्लामची दाेन रूपे अाहेत. एक अाहे शांतिपाठ देणारा अाणि दुसरा मूलतत्त्ववादी व दहशतीला प्राेत्साहन देणारा. जेथे मुस्लिम बहुसंख्याक असतात तेथे ते शांततामय सहजीवन अशक्य करून टाकतात... हा...
  August 17, 11:40 AM
 • शर्टाची कॉलर वर करून राजहंसाच्या रुबाबदार चालीने खेळपट्टीवर येणारे अजित वाडेकर पाहणे म्हणजे एक अभूतपूर्व योग असायचा. त्यांच्या भात्यातील कव्हर्स व स्क्वेअरच्या पट्ट्यातील ड्राइव्हज पाहणे म्हणजे मेजवानी होती. उजव्या यष्टीबाहेरील चेंडू ज्या सफाईने स्वीप करायचे त्या फटक्याची तुलना फक्त एका दर्जेदार शतकाशीच होऊ शकेल. त्यांच्या धावांच्या पासबुकातील प्रत्येक धावेवर फलंदाजीच्या फटक्यांच्या सौंदर्याची मोहोर होती. अजित वाडेकर संघात आले आणि परदेशातील कसोटी जिंकण्याचा आनंद काय असतो...
  August 17, 09:19 AM
 • सत्तरच्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या अजित वाडेकरांची कारकीर्द जेमतेम दहा वर्षांची आणि ३७ कसोटी सामन्यांची. तिसऱ्या क्रमांकावर डावखुरी फलंदाजी करणाऱ्या वाडेकरांची सरासरी ३१ ही तशी सामान्यच. पण बहुतेक वेळा आकड्यांमधून खरे मूल्यमापन होत नसते. वाडेकरांच्या धावा कोणत्या परिस्थितीतल्या, संघाचे मनोबल उंचावण्यात, भारताला विजयी करण्यात त्यांचे योगदान काय, हे निर्जीव आकडे सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ १९७१ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यातला पहिलाच कसोटी सामना सबिना पार्कच्या...
  August 17, 09:03 AM
 • १९५० मध्ये भारताचा जीडीपी ९३.७ अब्ज रुपये हाेता, ताे २०१७ मध्ये १२२ लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला हाेता. पण ही प्रगती सर्व क्षेत्रांपर्यंत समसमान पद्धतीने पाेहाेचली का? अखेर स्वतंत्र भारतात १९४७ पासून अातापर्यंतच्या प्रवासात आपण कुठवर पाेहाेचलाे अाहाेत? १९८० च्या दशकात अाम्ही चीनच्यादेखील खूप पुढे हाेताे. अामची धाेरणे बराेबर हाेती, परंतु अाज चीनची धाेरणे अापल्या तुलनेत पाचपट अधिक पुढे अाहेत. निश्चितच यावर विचार करायला हवा की, हे का झाले? अाणि अाता अाम्हाला काय करायला हवे? १९४७...
  August 15, 09:25 AM
 • उत्सवात वेळोवेळी धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या ध्वनी पातळीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होते हे सारे जाणतात. परंतु धर्मवादी पक्ष व संघटना संस्कृतीच्याच नावाखाली या मर्यादा ओलांडतात..नव्हे, नागरिकांनी त्या ओलांडाव्यात, अशी जाहीर वक्तव्ये करतात. नव्हे, तसे घडवून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतात, पण स्वत:च्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा हेच नेते वेगळी भूमिका घेतात. कायद्याचे रक्षण कायद्याने नव्हे, तर कायदा पाळणाऱ्या सुज्ञ नागरिकांमुळे होते. कायद्याचा सन्मान करण्याची...
  August 14, 09:12 AM
 • भारताबद्दल सर्वंकष लिखाण करताना नायपॉल यांनी नक्की भारतीय की परकीय म्हणून भूमिका ठेवली. हा प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणूनच समीक्षकांच्या मते, नायपॉल त्यांच्या लिखाणातून त्रिनिदादबाबतचा भ्रमनिरास, भारताबाबतची निराशा आणि बेघर असल्याची काळजी, यांचे विविध टप्पे प्रतिबिंबीत होतात. नायपॉल यांनी रंगवलेले भारताविषयी नकारार्थी चित्र वाचकांना धक्का व क्लेश देऊन जाते. कारण विविध मतप्रवाहांनुसार भारतातील विकासाचा आशादायी किरण दुर्लक्षित करून लेखकाने फक्त अाजूबाजूचा नकारार्थी अंधार...
  August 13, 07:08 AM
 • ४२०० वर्षांपूर्वी हवामानात अचानक बदल झाले व सारे वातावरण कोरडे बनले. त्या काळात शिथिल झालेल्या मान्सूनमुळे मेसोपोटेमियाचे अकादियन राज्य, इजिप्तचे साम्राज्य व हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. भारतात मेघालय राज्यातील गुहांमध्ये या काळाचे संदर्भ शास्त्रज्ञांना सापडले आहेत. त्यामुळे ४२०० ते आजचा हा कालखंड आता मेघालयीन एज या नावाने ओळखला जाईल. पृथ्वीचे वय काही शतकांपूर्वी अनुमानाने ठरवले जात होते व नंतर ते अधिक शास्त्रीय पद्धतीने ठरवले जाऊ लागले. भूशास्त्रीय कालमान किंवा जिऑलॉजिकल...
  August 11, 08:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED