Home >> Editorial >> Columns

Columns

 • नोटाबंदीचा निर्णय घेताना जास्तीत जास्त करपात्र व्यक्तींना प्राप्तीकराच्या जाळ्यात आणणे व प्राप्तीकराचा पाया अधिक व्यापक करणे, हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. नोटाबंदीनंतर प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत झालेली मोठी वाढ व त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रत्यक्ष कर संकलनात मोठ्या प्रमाणात झालेली वृद्धी लक्षात घेता नोटाबंदीचे महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य झालेले आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. त्यामुळे...
  October 26, 02:57 AM
 • सुरेश जैन खान्देश आणि जळगावच्या राजकारणात सक्रिय होते तोपर्यंत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर ते सांगतील तो सभापती आणि त्या गटाचे वर्चस्व राहत आले आहे. हीच परिस्थिती महापालिका असो की जिल्हा बँक या महत्त्वाच्या संस्थांवरदेखील होती. मात्र, महापालिकेतील करोडो रुपये घोटाळ्याच्या आरोपात जैनांना तुरुंगात जावे लागले आणि हळूहळू त्यांच्या सत्ता स्थानांना सुरुंग लागले. पक्ष आणि संस्थेपेक्षा व्यक्ती लहान असते, हे खरे असले तरी जैनांच्या बाबतीत जळगावकरांनी हे विधान खोटे ठरवले होते. कारण...
  October 25, 05:14 AM
 • आपले बँकिंग बरेच बरे आहे, असे आजवर आत्मविश्वासाने व बरेचसे अभिमानाने बोलले व मानले जायचे. पण गेल्या वर्ष- दीड वर्षात आपल्या बँका बऱ्याच प्रमाणात अधोगतीकडे झुकत असल्याचे (उगीच) सांगायला बरेच जण सरसावले आहेत. एवढेच नाही, एकूण आर्थिक वाढीला उतरणीला लावण्यास बँकांचे कर्तव्य किंवा अकार्यक्षमता कारणीभूत आहे, असाही हेत्वारोप केला जातो आहे. हे मात्र अतिच होते आहे. असे आरोप बँका, बँकेचे कर्मचारी/अधिकारी यांच्यावर कळत नकळत अन्याय करणारे आहे. सध्या बँकांचे मुख्य दुखणे/त्रास आहे, तो वाढलेल्या व...
  October 25, 05:11 AM
 • श्वापदं जंगलाचा हक्काचा अधिवास सोडून गावाकडे वा शहराकडे येऊ लागली तर काय हाहाकार माजतो याची प्रचिती सध्या नाशिक जिल्ह्यातील बव्हंशी गावं घेत आहेत. जंगलात सोडलेली मोकाट कुत्री अशा श्वापदांच्या भुकेवरील कदाचित एक पर्याय ठरू शकतील, पण याच्या नेमके उलटे चित्र पंचक्रोशीत अनुभवाला येत आहे. विशेषत्वाने, बिबट्यांचा जो काही प्रचंड सुळसुळाट येथे झाला आहे अन् त्यांच्याकरवी नुसतीच मोकाट कुत्री वा पाळीव प्राणी जसे गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांचाच बळी घेतला जातो असे नाही तर चक्क लहान...
  October 24, 03:00 AM
 • एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. हा भ्रष्टाचार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं सुखेनैव चालू दिला. तीन वर्षांपासून भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारनेही त्यावर काही रामबाण उपाय काढलेला नाही. त्यामुळे एसटीचा तोटा वाढत चाललाय. आता या संपाने सव्वाशे कोटी रु.ची त्यात भर पडलीय. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कामगारांच्या संपात हस्तक्षेप केल्याने अखेर चौथ्या दिवशी संप मिटला. भाऊबीजेच्या दिवशी एसटी कामगार आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. एसटीच्या चाकांना...
  October 24, 03:00 AM
 • इस्लाम गतकाळच्या काल्पनिक वैभवात रमत आजचा वर्तमान दूषित करत असेल तर ते इस्लामियांच्या भविष्यासाठी अनिष्ट आहे हे सर्वसामान्य मुस्लिमांनाच समजावून घ्यावे लागेल. मुस्लिमांना दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यास त्यांचे अतिरेकी धर्मप्रेम आणि त्यांना तशाच अवस्थेत ठेवू इच्छिणारे मुल्ला-मौलवी हेच सर्वात मोठी अडचण आहे असे तटस्थ निरीक्षण केल्यावर सहज लक्षात येईल. इस्लामचे नाव निघाले की लागोपाठ फतवा आठवावा एवढ्या प्रमाणात आणि कधी कधी तर अत्यंत विनोदी व विसंगत फतवे काढले जात असतात. नुकताच...
  October 23, 05:26 AM
 • औरंगाबाद शहरावर आलेले कचऱ्याचे संकट तीन महिन्यांसाठी का असेना पुढे ढकलले गेले आहे. मावळते महापौर भगवान घडमोडे यांनी त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. एक वर्षाच्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवसांत शहराची कचराकुंडी बनवून पायउतार व्हावे लागते की काय, या विवंचनेत ते सापडले असताना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत घालून त्यांची सुटका करवून दिली. आता तीन महिन्यांनंतर जे काही व्हायचे ते होईल, असे ते म्हणत असतील. ऐन दिवाळीत नारेगावच्या ग्रामस्थांनी...
  October 23, 05:22 AM
 • दिवाळीचा धार्मिकतेशी संबंध असेल तर तो दीपोत्सवाशी. आपली संस्कृती तमसोमा ज्योर्तिगमयाची आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे हा आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. म्हणून दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असतो. सर्वाेच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबरला दिल्लीत फटाके विक्री बंदीचा आदेश दिला आहे. याचे कारण देताना दिवाळीतील फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण प्रचंड प्रमाणात होते, लोकांच्या आरोग्यावर त्याचे अत्यंत अनिष्ट परिणाम होतात, असे सांगण्यात आले. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयावर उलटसुलट...
  October 20, 03:00 AM
 • कोणता तरी असा मुद्दा उपस्थित करायचा की त्यातून जातीयतेच्या आधारे दोन्ही बाजूंचे लोक उचकवले जातील. त्याच वाद‑विवादात लोकांना गुंतवून ठेवण्याची सवय भाजपला विरोधात असतानाही होती. आता केंद्रात आणि बऱ्याच राज्यात सत्ताधारी झाल्यानंतरही ती खोड अजून थांबलेली नाही. रयतेच्या मूळ प्रश्नांवर चर्चा घडवून ते सोडवण्याच्या ऐवजी त्याच त्या मुद्यांमध्ये लोकांना गुंगवण्याचा खेळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये करत अाहेत. प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये सोडून दिलेल्या पोळ सारखे...
  October 19, 03:00 AM
 • परीक्षेतील अमेरिकन पेपरमध्ये ०-३, कोलंबियन पेपरमध्ये १-२ व घानाच्या पेपरमध्ये ०-४. ही कामगिरी जगातील पंचखंडातून आलेल्या २४ विद्यार्थ्यांत २४ वी व तळाची. ती इतकी खराब की उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम अशा शेवटच्या चार पेपर्समध्ये परीक्षेस बसण्यासही दहावीतली भारतीय पोरं अपात्र! पोरं हुश्शार, कष्टाळू अन् मन लावून अभ्यास करणारी. त्यांच्या साहेबांना अचानक फिफाची लॉटरी लागली. परीक्षा केंद्र लाभलं अन् त्यासह १७ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे १११ कोटी रु.चा लाभ झाला. फिफाची...
  October 19, 03:00 AM
 • राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला सोमवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. सुमारे ४० दिवसांपूर्वी कर्मचारी संघटनांनी राज्यशासनाला संपाबाबत बजावले होते, त्यानंतरही समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे संप पुकारावा लागला, असे संघटना प्रतिनिधींचे म्हणणे आहे. एसटी बसच नाही म्हटल्यावर गावाकडे जाणाऱ्या सामान्य प्रवाशांचे ऐन दिवाळीत हाल झाले. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री...
  October 18, 03:00 AM
 • युरोपच्या साह्याने क्लीन एनर्जीचे उत्पादन वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक हवामान बदल आणि अपारंपरिक ऊर्जेसंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे संयुक्त पत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, स्वच्छ भारत अभियान, गंगा सफाई अभियान यासाठीदेखील मदत देण्याचे युरोपने मान्य केले आहे. किंबहुना त्या दृष्टीचा सामंजस्य करारदेखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील शिखर परिषद पार पडली....
  October 18, 03:00 AM
 • आपलं देशहित सांभाळण्यास अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी प्राधान्य दिलं आणि विशेष म्हणजे तालिबानच्या ताब्यात गेली पाच वर्षेअसलेल्या त्या कुटुंबाची सुटका करण्यास हातभार लावणं, यातच आपलं देशहित आहे, हे पाकलाही वाटलं. कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्टं काय असतं किंवा काय असायला हवं? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्याच्या वक्तव्यामुळे. पाकिस्तानशी असलेल्या आमच्या संबंधात सुधारणा होऊ लागली आहे आणि ते आणखी आशयघन होतील, अशी मला...
  October 17, 03:00 AM
 • ये रे.. ये रे पावसा म्हणून वरुणराजाला साकडे घातले जाते. त्याला पैशाचे आमिष दाखवले जाते. एवढेच नाही तर मान्सून वेळेत दाखल व्हावा यासाठी खान्देशात धोंडी.. धोंडी पाणी दे... म्हणून गावभर मिरवणूक काढली जाते. कधी पंढरीच्या विठोबाला साकडे, तर कधी गोदातीरावर देवच पाण्यात बुडवून ठेवल्याची उदाहरणे आहेत. ही स्थिती वा वातावरण गेल्या वर्षापर्यंत राज्यात सार्वत्रिक होते. विशेषत: मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अन् पश्चिम महाराष्ट्राच्या बव्हंशी भागात होते. यंदा पावसाला जा रे.. जा रे, लवकर जा...
  October 17, 03:00 AM
 • दिवाळी दारात येऊन उभी ठाकली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना साडेअकरा महिन्यांपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या अग्नितांडवाचे स्मरण वारंवार होते आहे. पोलिस प्रशासनालाही तो अग्निप्रपात विसरता येण्यासारखा नसल्यामुळे यंदा ताकही फुंकून पिण्याची भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे. परिणामी अयोध्यानगरीतील मैदान या एकाच ठिकाणी शहरातील नागरिकांना फटाके खरेदीसाठी जावे लागणार आहे. वाळूजसाठी स्वतंत्र फटाका मार्केटला परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दरवर्षी शहरात विविध भागात...
  October 16, 03:02 AM
 • सर्वांनाच आनंदाच्या कवेत घेईल, असा एक सण होऊ दे... बाबा आमटे यांच्या कवितेतील या ओळी उद्याच्या दिवाळीच्या तोंडावर आठवण्याचे कारण म्हणजे असा सण आपण अजून साजरा करू शकलेलो नाही. खरे म्हणजे अशा सणाची व्याख्याच करता येणार नाही, पण या भावनेच्या जास्तीत जास्त जवळ जात राहिले पाहिजे, असे जगातील प्रत्येक सुसंस्कृत समाज मानत आला आहे. त्यासाठी अनेक विचारसरण्यांची जगाने कास धरली, पण अत्याधुनिक काळातही जगाला ते साध्य करण्यात यश आलेले नाही. असा सण म्हणजे केवळ भौतिक गरजा पूर्ण होणे नव्हे, हे तर सर्वांनाच...
  October 16, 03:01 AM
 • कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे यवतमाळ जिल्ह्यात २०, तर आजूबाजूच्या जिल्ह्यांतही अनेक शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. शेकडो विषबाधितांवर आजही उपचार सुरू आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेला प्रकार मृतांचा आकडा १८ वर पोहोचताच चांगलाच गाजला. विरोधी पक्ष, शेतकरी नेत्यांनी रान उठवले. या प्रकाराला बंदी असलेल्या बियाण्यांचा आणि कीटकनाशकांचा तसेच चिनी पंपाचा वापर कारणीभूत आहे, असे सांगितले गेले. हा सगळा प्रकार होत असताना सरकारी अधिकारी काय करत होते, असे प्रश्न विचारले...
  October 14, 03:00 AM
 • योगी आदित्यनाथ यांना कदाचित मोदींच्या पुढे जाण्याची घाई असावी म्हणून त्यांनी आपल्या राजवटीत ताजचे अस्तित्व कसे खुजे करता येईल यावर अधिक जोर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनक्षोभ होताच रिटा बहुगुणा यांनी, ताजमहाल ही वास्तू आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि ताजच्या विकासासाठी १५६ कोटी रुपयांची योजना बनवली असून त्यावर येत्या ३ महिन्यांत कार्यवाही सुरू होईल; असं सांगत सारवासारव केली. उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन अत्यंत छोट्या घटना. पहिली घटना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच...
  October 14, 03:00 AM
 • इराक- गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला उत्तर इराकमधील अरबिल या शहरात क्षेत्रीय सरकारची स्थापना झाली. या सरकारने कुर्दिस्तान हा नवा देश बनवण्यासाठी जनमत संग्रहाची मोहीम राबवली. इराकला शिया, सुन्नी आणि कुर्द या तीन भागांंत विभाजित करण्याचे षडयंत्र यामागे आहे. मध्य पूर्वेतील देशांना विभाजित करण्याचा डाव विचारपूर्वक खेळला गेलेला आहे. १४ आॅगस्ट १९४७ रोजी झालेल्या भारताच्या फाळणीची आठवण झाली की आजही अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. आमच्या डोळ्यांसमोर भारत पुन्हा अखंड होऊ दे, अशी...
  October 13, 06:41 AM
 • १५ ते १८ या वयोगटातील मुस्लिम मुलींना भारतीय कायद्यातील धर्मनिरपेक्ष तरतुदींचे संरक्षण आहे की नाही? मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात वयात आलेल्या मुलीचे लग्न कायदेशीर समजले जाते. भारतीय विवाह कायद्यात मात्र मुलीचे वय १८ पूर्ण झालेले असल्याशिवाय ते लग्न कायदेशीर समजले जात नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर परवा एका खटल्यात असा प्रश्न उपस्थित झाला की, कायदेशीररीत्या पत्नी असलेल्या स्त्रीचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पतीने तिच्याबरोबर केलेला संभोग हा बलात्काराचा गुन्हा समजावा की नाही?...
  October 13, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED