Home >> Editorial >> Columns

Columns

 • सर्वच अडचणींवरील उपाय हे निवडणुकीत झालेल्या विजयावर अवलंबून आहेत, असे चित्र उभे आहे. न्यायालयीन प्रणालीपासून बौद्धिक वर्गापर्यंत सर्वत्र असंतोष आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटीत विनाकारण निर्माण झालेल्या मुद्द्यांवरून विद्यार्थी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळाला नाही, म्हणून शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या सर्व गंभीर प्रश्नांपुढेही निवडणूक हेच सर्वकाही असेल तर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची हार हे सरकारसाठी खबरदारीचे असे संकेत आहेत, असे मानायला हरकत...
  May 23, 02:00 AM
 • पंढरपूर मेळाव्यातून राज्याला एक राजकीय संदेश देण्याचा डाॅ. प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न दिसतोय. धनगर समाजाला बरोबर घेऊन अकोला पॅटर्न राज्यभर राबवू. तिसरी आघाडी करून सत्तेचं समीकरण जुळवू, हा तो संदेश दिसतो. अकोला पॅटर्नमध्ये धनगर समाजासह इतर छोट्या- मोठ्या ओबीसी जाती, मुस्लिम आणि दलित यांची बेरीज घडवून सत्ताधारी वर्गाच्या कब्जातून सत्ता हिसकावून घेण्याचं सूत्र आहे. आरक्षणाचा प्रश्न जसजसा लांबतोय तसा धनगर समाजातला असंतोष वाढत चाललाय. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत हा समाज...
  May 22, 05:23 AM
 • सत्तास्थापनेची घाई झाली तरी तो घटनाभंग नव्हे वा लोकशाहीचा खून नव्हे. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे ही लोकशाहीची हत्या असेल तर आपल्याच आमदारांना कोंडून ठेवून मुक्त मतदान करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालणे ही न्याय्य लोकशाही व्यवस्था आहे का? आपल्या आमदारांत राजकीय निष्ठा नाही, अशी कबुली यातून काँग्रेस देत होती. राजकीय निष्ठा नसलेल्या आमदारांबद्दल राज्यपालांना संशय वाटला तर त्यात असंवैधानिक काय आहे? राजकीय पक्षांबाबतची आपली आवडनिवड बाजूला टाकून कर्नाटकी...
  May 21, 02:00 AM
 • भारतात ई. सी. जी. सुदर्शन यांच्यासारखे अतिशय गाढे अभ्यासक, सैद्धांतिक, वैज्ञानिक जन्माला येतात; पण त्यांची आणि त्यांच्या वैज्ञानिक कार्याची प्रेरक माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आपले कर्तृत्व दाखवायला अशा थोर व्यक्तींना भारताबाहेर जावे लागते.विज्ञान म्हणजे काही तरी वस्तूचे मॉडेल करूनदाखवणे अशी धारणा शालेय जीवनापासून मांडली जाते. त्या मर्यादेत आपल्याकडे केवळ कारागीर बनतील. खरे तर आहे त्या विज्ञानापलीकडच्या शोधांची प्रेरणा मिळाली तर आपण विज्ञानात प्रगती करू शकू. पुंज प्रकाश...
  May 19, 02:00 AM
 • सिक्कीम हे एकमेव राज्य की जे स्वातंत्र्याला ७० वर्षं पूर्ण होऊनही भारताच्या हवाई नकाशावर नव्हतं. सिक्कीमला जायचं झालं तर एक तर कोलकात्याहून बागडोगराला विमानानं जाऊन पुढे सव्वाशे किलोमीटर अंतर रस्त्यानं कापावं लागायचं किंवा भूतानमधल्या पारो विमानतळावरून रस्त्यानं जात साडेतीनशे किलोमीटर अंतर कापावं लागायचं. आता ती गरज उरलेली नाही. आता कोलकात्याहून थेट पाक्योंगलाच विमानानं जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वोत्तर भारताच्या विकासातलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल गेल्या आठवड्यात...
  May 18, 02:00 AM
 • कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी भाषकांच्या पट्ट्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्ण पराभव झाला. मराठी भाषकांच्या बालेकिल्ल्यात बेळगाव जिल्ह्यातील तीन जागा समितीने लढवल्या होत्या. परंतु तीनही ठिकाणी समितीचा पराभव झाला. मराठी भाषकांसाठी कन्नडिगांसमोर सातत्याने लढणाऱ्या व एक ना एक दिवस आपला परिसर महाराष्ट्रात सामावला जाईल, या आशेने तग धरून असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला हा मोठा धक्का आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण बेळगाव व खानापूर या दोन मतदार संघातून निवडून आलेले...
  May 17, 07:50 AM
 • कर्नाटक विधानसभेच्या निकालांतून काही निश्चित निष्कर्ष निघू शकतात व काही भ्रम दूर होऊ शकतात. पहिली बाब म्हणजे हे निकाल ऐतिहासिक नाहीत. कर्नाटकमधील राजकीय चित्र, म्हणजे प्रत्येक पक्षाचे बलाबल हे बऱ्याच प्रमाणात होते तसेच राहिले आहे. काही जागा कमी-जास्त झाल्या असल्या तरी फार मोठा फेरफार झालेला नाही. निकालांतील आकडेवारी पाहता ही बाब थोडी धक्कादायक वाटेल. पण मागील निकालांशी व्यवस्थित तुलना केली तर कर्नाटकातील चित्र फारसे बदलले नसल्याचे लक्षात येईल. मागील निवडणुकीत काँग्रेसला १२२ जागा...
  May 17, 06:51 AM
 • भाजपने अाक्रमकपणे मुसंडी मारत कर्नाटक विधानसभेच्या सर्वाधिक जागा पटकावल्या अाणि काँग्रेसच्या सुमारे ५० जागा कमी झाल्या. अर्थातच नरेंद्र माेदींच्या शिरपेचात खाेवले गेलेले हे अाणखी एक माेरपीस म्हणता येईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले हाेते. बहुतेक सारे मंत्री, मुख्यमंत्री, प्रमुख खासदार अाणि अामदार कैक दिवस कर्नाटकात तळ ठाेकून हाेते. पंतप्रधान माेदी अाणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. कर्नाटकचा प्रत्येक काेपरा अमित शहा यांनी धुंडाळून...
  May 16, 03:13 AM
 • महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये प्रत्येक वर्षी कमीअधिक प्रमाणात दुष्काळाचे सावट असते. पाऊस कमी होत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न गेल्या काही वर्षांत कमालीचे घटले आहे. केवळ शेती हाच एकमेव उद्योग असलेल्या शेतकऱ्यांना तर शेतीने पुरते कर्जबाजारी केले आहे. त्यामुळे देशभरात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रातदेखील हा आकडा वाढताच आहे. ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, त्याच महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या गावांमधील शेतकरी मात्र सधन होतोय. आता या...
  May 16, 03:10 AM
 • हा लेख लिहिताना कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या बहुमतावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झालेले नाही. कारण आकडे अजूनही खाली-वर होतायत. पण काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. याबरोबरच नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी राहुल गांधी तुल्यबळ नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या निवडणुकीचे निकाल स्पष्टच होते, पण या निवडणुकांनी शक्तिशाली अखिल भारतीय नेत्याच्या रूपात मोदींचा उदय झाला, हे सिद्ध करून दाखवले. भारताच्या राजकारणात यापूर्वी असे दोनच नेते झाले. नेहरू आणि इंदिरा गांधी. मोदी हे तिसरे. म्हणूनच हे...
  May 16, 01:06 AM
 • कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं सूप वाजलं आहे. हा स्तंभ आज प्रसिद्ध होत असताना मतमोजणीची धामधूम सुरू झाली असेल. कोणाच्या पारड्यात मतदार आपलं वजन टाकतील? कर्नाटकातील सामना हा तिरंगी आहे. सत्ता काँग्रेसच्या हातात आहे. भाजप ती हिसकावून घेऊ पाहत आहे आणि या दोन राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेते प्रादेशिक पक्ष असलेला जनता दल (सेक्युलर) हा राज्यात मोजक्या काही ठिकाणी आपला जम बसवून आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या या पक्षाला किती जागा मिळतात, यापेक्षा तो काँग्रेस व भाजप...
  May 15, 07:30 AM
 • निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खाेब्रागडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास अाठवले भाजपला सरेंडर झाल्यामुळे अांबेडकरवाद्यांची मुस्कटदाबी हाेत अाहे, असे विधान दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत केले हाेते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवलेंचा पक्ष म्हणजे एक दुकान असून अाठवलेंनी भाजपसाेबत स्वार्थ साधण्यासाठी दुकानदारी केली अाहे, असा अाराेप करताना काँग्रेसवासी ज्येष्ठ सनदी अधिकारी उत्तम खाेब्रागडे यांनी काँग्रेस पक्ष हा डाॅ. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष...
  May 15, 12:55 AM
 • भारत हा केवळ मागणारा नव्हे तर जगाशी हस्तांदोलन करणारा देश होतो आहे, त्याचा भारतीय नागरिक म्हणून आपल्याला अभिमानअसला पाहिजे. पण त्यासाठी, आपण किती वाईट आहोत, या टोकाच्या आत्मवंचनेच्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. विकसित देशांच्या तुलनेत आपला देश किती मागे आहे आणि आपण कशी त्यांची बरोबरी करू शकत नाही, असे विवेचन करण्याची आपल्या देशातील काही तज्ज्ञांमध्ये स्पर्धा लागलेली असते. पण ही जी टोकाची आत्मवंचना आहे, तिचा सारखा उच्चार करून कोणताच देश किंवा समाज पुढे वाटचाल करू शकत नाही, हे ते...
  May 14, 02:00 AM
 • शुक्रवारी मध्यरात्रीनंतर किमान सात तास जुने औरंगाबाद शहर हिंस्र जमावांच्या कह्यात गेले होते आणि पोलिस यंत्रणा हतबल होऊन तो खेळ पाहत होती. दोन जमाव एकमेकांवर प्रचंड दगडफेक करीत होते. संधी मिळेल त्या घराला आग लावत होते. दिसेल ते दुकान ठरवून लुटत होते आणि नंतर जाळून टाकत होेते. त्यातच एका सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला गंभीर जखमी करण्यात आले. इतर १० पाेलिसही जखमी झाले. दोन निष्पाप व्यक्तींचा यात बळी गेला. त्यात एक अपंग वृद्ध आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अर्थात, जिथे जिथे...
  May 14, 02:00 AM
 • आत्महत्या करणाऱ्या माणसाचं मनोगत आपल्याला कधीच कळू शकत नाही. आत्महत्येचा प्रयत्न करून जिवंत राहणाऱ्यांचं मनोगत कळू शकतं. पण ते प्रयत्न असफल झालेल्या व्यक्तीचं असतं, आत्महत्या करणाऱ्या नव्हे, अशा अर्थाचं प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. डेव्हिड गुडाल या १०४ वर्षांच्या आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने मागच्या आठवड्यात स्वित्झर्लंडमध्ये तिथल्या इच्छामरणाला मान्यता देणाऱ्या कायद्यानुसार स्वत:चं आयुष्य संपवलं, त्यांचं मनोगत आपल्याला नक्की माहीत आहे. गेली अनेक वर्षं ते या...
  May 13, 04:05 AM
 • मोदी आणि महाथीर यांच्या व्यक्तिरेखेत असणारे साम्य पाहू जाता महाथीर यांनी आयुष्यभर उजव्या विचारसरणीकडे झुकता झुकता सत्ता काबीज करण्यासाठी कट्टरता कमी करून मधला मार्ग निवडण्याचे जे डावपेच लढवले तेच मोदीदेखील लढवतील, अशी शक्यता वाटते. मलेशियाच्या राजकारणात मोदी, अडवाणी, वाजपेयी यांच्याशी साम्य असणारी ही राजकीय मंडळी जशी आढळतात तद्वतच काँग्रेस आणि भाजपच्या आघाड्यांसारख्या आघाड्याही आढळतात. मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे....
  May 12, 02:00 AM
 • शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने १४ मे रोजी राज्यभर जेल भरो सत्याग्रह केला जाणार आहे. हुतात्मा अभिवादन शेतकरी यात्रेत या आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. दोन लाख शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी १ जूनला संप यशस्वी केला होता. त्या पार्श्वभूमीवर १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. १२० संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभाग घेत...
  May 12, 02:00 AM
 • अांध्र प्रदेशने नैसर्गिक शेतीला प्राधान्य अाणि त्यास अधिक प्राेत्साहन देण्याचा व्यापक कार्यक्रम सुरू केला अाहे.रायथु साधिकारा सम्स्था या नावाच्याया कार्यक्रमात २०१७-२०२२ या काळात सर्व १३ जिल्ह्यांच्या ५ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा उद्देश अाहे. सगळेच पुरावे समाेर अाहेत. शेतजमिनीतील उत्पादकता कमी हाेते अाहे, गरजेपेक्षा अधिक उपसा केला जात असल्याने भू-जलसाठे काेरडे पडत चालले अाहेत. कीटकनाशकांसह अनेक प्रकारची रसायने पर्यावरणात माेठ्या प्रमाणात विष कालवत अाहेत...
  May 11, 02:00 AM
 • दरवर्षी बाेर्डाच्या परीक्षेतील त्याच त्या चुकांच्या पुनरावृत्तीमुळे न्यायपूर्ण परीक्षांची स्वप्नपूर्ती असंभव असेल तर अशा बोर्डाची बरखास्ती हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो ही जनभावना रास्त नव्हे काय? बोर्डच बरखास्त करा ही भावना निश्चितपणे वेदनादायी असली तरी केवळ परीक्षांचा खेळखंडोबाच होणार असेल तर विद्यार्थी, पालकांनी हा अन्याय किती दिवस सहन करायचा? हादेखील एक प्रश्नच आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या वेळेस चूक झाली तर समजू शकते, पण ती जर संस्कृतीच ठरणार असेल तर ते अक्षम्यच ठरत नाही...
  May 10, 04:31 AM
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक भेट जरी तत्काळ फार मोठा बदल घडवून आणणारी नसली तरी भारत-चीन संबंधांच्या सौहार्दपूर्णतेच्या वाटचालीची नांदी मात्र ठरू शकते, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनच्या वूहन शहरात नुकतीच अनौपचारिक सदिच्छा भेट झाली. भारत-चीन संबंधांच्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. २१ वे शतक हे आशिया खंडाचे शतक समजले जाते. भारत आणि चीन या दोनही...
  May 10, 03:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED