Home >> Editorial >> Columns

Columns

 • अलीकडेच जेईईची परीक्षा झाली, अाता सीईटीचे अाव्हान विद्यार्थ्यांसमाेर अाहे. या पार्श्वभूमीवर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन करणारा संपादित लेख येथे देत अाहाेत. विद्यार्थ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, यशस्वी झालेल्या व्यक्तींनी यशाचा टप्पा एकाएकी, अचानक गाठलेला नसतो; या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत, जिद्द व चिकाटीने एक-एक पायरी चढलेली असते. त्यासाठी या ध्येयवेड्यांनी आपला मनाशी बांधलेली खूणगाठ व आपले ध्येय आपण साध्य करणार, हा आत्मविश्वास मनात...
  April 18, 07:30 AM
 • सोलापूर- व्यक्तिकेंद्रित प्रवृत्तीचे वाढते स्ताेम, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याविषयी बहुचर्चित ठरलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने संत बसवेश्वर वचन तत्त्वज्ञानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक विश्वनाथ कोरणेश्वर महास्वामीजी (उस्तुरी मठ, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याशी श्री बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद. लिंगायत धर्म तर संत बसवेश्वरांनी आधीच स्थापन केला आहे. आजची धर्माच्या मागणीची चळवळ ही केवळ शासकीय लाभांसाठीच नाही, तर संत बसवेश्वरांच्या...
  April 18, 07:10 AM
 • सिक्कीम सरकारने अ-नैसर्गिक खतांच्या वापरावर घातलेली बंदी. जे जे नैसर्गिक खतांचा वापर करून पिकवले गेले आहे ते आणि तेवढेच सिक्कीमच्या बाजारात विकता येईल, असा आदेश एक एप्रिलला सरकारने काढला. प्रारंभी सिक्कीमच्या नागरिकांना तो एप्रिल फूलचा प्रकार वाटला, पण ते तसे नव्हते. महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक वापरावर घातलेल्या संपूर्ण बंदीचे जे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत, ते वा तसेच पडसाद गेले काही दिवस सिक्कीमच्या भाजी बाजारात उमटताना दिसत आहेत. याचे कारण आहे सिक्कीम सरकारने...
  April 17, 10:11 PM
 • महात्माजींचा हा अस्पृश्यताविरोधी मोहिमेचा वारसा किती व कसा गांधीवाद्यांनी जपला? गेल्या चार वर्षांत गोवंश हत्याबंदीनंतर दलितांवर देशाच्या विविध भागांत हल्ले झाले. त्यात काही दलित मारले गेले व अनेक जखमी झाले. त्या त्या ठिकाणी जाऊन किती गांधीवाद्यांनी प्रकरणं तडीला नेण्याचा प्रयत्न केला? गांधीवाद्यांनी म. गांधीजींच्या चैतन्यशील विचारांचं कर्मकांड बनवलं. डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनी त्यांचं दैवतीकरण करून टाकलं. त्यामुळे म. गांधी व डॉ. आंबेडकर या दोघांच्या विचारांचं विकृतीकरण करणं...
  April 17, 02:00 AM
 • शेतकरी व कष्टकरी यांचा नाशिक ते मुंबईदरम्यान महामोर्चा काढून पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानभवनाला घेराव घालण्याची घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी केली. आमदारांच्या या इशाऱ्यामुळे येणाऱ्या सहा-आठ महिन्यांत नाशिकसह मुंबईमध्येही लाल वादळ घोंघावू लागले तर त्याचे परिणाम काय होतील? विशेषकरून आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर त्याचा कितपत प्रभाव पडेल? त्याचा फायदा नेमका कोणाला किती अन्् नुकसान झालेच तर ते कोणाचे अधिक होईल आदी मुद्दे नेहमीच्या...
  April 17, 02:00 AM
 • सोशल मीडियाच्या कोट्यवधी वापरकर्त्यांना केब्रिज अॅनॅलिटिका डेटाचोरी प्रकरणाने जबर धक्का बसला. या कंपनीला पाठीशी घालणाऱ्या फेसबुकची प्रतिमा या प्रकरणाने मलिन झाली. आता, वापरकर्त्यांना त्यांच्याकडे झालेल्या चोरीचा तपशील कळवून फेसबुकच्या पातळीवर पापक्षालनाचा प्रयत्न होत असताना या क्षेत्राचा व्याप, त्यातून उद्भवणारे धोके आणि समाजमाध्यमांच्या सुयोग्य वापराच्या दिशा स्पष्ट करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध... भविष्यात मानव जातीला सर्वात मोठा संभाव्य धोका कुठला असू शकतो? अणुयुद्ध?...
  April 17, 02:00 AM
 • खरीप आणि रब्बी हंगाम सुरू होताना शेतकऱ्यांना स्वस्त भांडवल हवे असते हे ओळखणाऱ्या एका चांगल्या योजनेची सुरुवात या आठवड्यात (दि. १९ एप्रिल) तेलंगणा राज्यात होते आहे. देशातील शेती व्यवसायातील आर्थिक ताण कमी करण्यासाठी पथदर्शी ठरू शकणाऱ्या या योजनेचे देशभर अनुकरण झाले पाहिजे. आपल्या देशापुढील सर्वात गंभीर समस्या कोणती, या प्रश्नाची वेगवेगळी तीन-चार उत्तरे येऊ शकतात. ज्यात दारिद्र्य, शेती व्यवसायातील आर्थिक ताण, बेरोजगारी आणि प्रचंड लोकसंख्या ही सर्वमान्य उत्तरे आहेत. थोडा अधिक विचार...
  April 16, 02:00 AM
 • १९४२ मध्ये उस्मानाबादच्या तडवळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वतनदारांची एक परिषद आयोजित केली होती. याच वेळी गावकऱ्यांनी एका बैलगाडीतून बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढली होती. तब्बल ७६ वर्षे उलटून गेली, परंतु आजही ही बैलगाडी गावकऱ्यांनी जपून ठेवली आहे... आजही १४ एप्रिलला बाबासाहेबांचे छायाचित्र ठेवून या बैलगाडीची भव्य मिरवणूक काढली जाते. अशी ही एेतिहासिक ओळख सांगणारा हा दिव्य मराठीच्या वाचकांसाठी खास रिपोर्ताज... उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे कसबे. बार्शी लातूर...
  April 14, 07:20 AM
 • मला यातून धोरणकर्ते, माध्यमे, समाज यांचे या अॅट्राॅसिटीच्या घटनांकडे लक्ष वेधायचे आहे. या प्रश्नात हस्तक्षेप करावा, असे त्यांना वाटले पाहिजे. जातीय अत्याचाराला बळी पडलेल्या न्यायाच्या प्रतीक्षेतील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. वेदना शब्दांमधून मांडता येतात, पण काही त्यापलीकडच्याही असू शकतात. अनेकदा त्या मांडण्यास शब्द अपुरे पडतात. अशा वेदनाही मांडण्याची ताकद तिसऱ्या डोळ्यात म्हणजे कॅमेऱ्यात असते. पण, हा कॅमेरा ज्यांच्या हातांत आहे, ते हात जाणीव-नेणीव जागे...
  April 14, 02:00 AM
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल २०१५च्या फ्रान्स दौऱ्यात सरकार ते सरकार पातळीवर हवाई दलाने याआधीच निवडलेली ३६ रफाल विमाने थेट खरेदी करण्याचे जाहीर केले गेले. ही विमाने खरेदी करत असतानाच त्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे, अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी, भारतीय लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण, विमानांची देखभाल आणि त्यांची खात्रीशीर उपलब्धता इत्यादी मुद्द्यांचा एकाच वेळी विचार करण्यात आला. परिणामी या विमानांची एकूण किंमतही वाढलेली दिसते. भारतीय हवाई दलासाठी...
  April 13, 02:03 AM
 • गडद हिरव्या रंगाची, पिवळ्या पट्ट्यांची डिझाइन असलेली एक ट्रेन २५ मार्चच्या दिवशी चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात आली. ही ट्रेन साधीसुधी नव्हती; तर ती येताना तिच्या अवतीभवती सुरक्षारक्षकांचे एक कोंदण होते. या ट्रेनचा एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला गेला. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. या ट्रेनमधून कोण आलेले असू शकते यावर तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. यात सर्वात चर्चिले जाणारे नाव होते ते म्हणजे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचे. पण, तरीही तेच या ट्रेनचे मुख्य प्रवासी...
  April 12, 06:20 AM
 • आॅडिट हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. काहीही झाले की संबंधित यंत्रणेतल्या उच्च अधिकाऱ्यांकडून आॅडिट करण्याचे आदेश दिले जातात. मुंबईत उंच इमारतीच्या टेरेसवरील हाॅटेलला आग लागली. त्यात तरुण- तरुणींचे मृत्यू झाले. लगेच महापालिकेने उंच इमारतींचे फायर आॅडिट करून घेतले. इमारत कोसळून तेथील रहिवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले की महापालिकेला आठवण येते ती जुन्या पडीक इमारतींच्या सुरक्षिततेबाबतच्या ऑडिटची. लिफ्ट कोसळली की आदेश दिले जातात शहरातल्या लिफ्ट सुरक्षित आहेत किंवा नाहीत, याचे आॅडिट...
  April 12, 06:20 AM
 • आपल्या बँका, त्यातही सरकारी बँका, ९ ते १० टक्के एनपीएने, म्हणजे एकूण कर्जाच्या १२ टक्क्यांहून जास्त एनपीएच्या ओझ्याने त्रासल्या आहेत. आजच्या एनपीएमध्ये अजून दहा लाख रु.ची भर पडण्याची भीती बँकांना हवालदिल करून टाकीत आहे. वाढलेल्या व वाढत्या एनपीएने बँकांची व्याजकमाई घटली आहे व एनपीएच्या तरतुदी मोठ्या प्रमाणात कराव्या लागल्याने नफ्यातील घट वाढून बँकांना वाढत्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. आजची बँकांची परिस्थिती चिंता करावी, अशी आहेच. त्यातच यावर्षी बँकांना सरकारी रोख्यांतील...
  April 11, 07:54 AM
 • सरसकट कर्जमाफीला नाही म्हणणाऱ्या फडणवीस सरकारने काही अटी आणि शर्तींवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस होकार दिला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये ही घोषणा करण्यात आली होती. राज्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे सरकारने जाहीरही केले होते. ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ आणि त्यावरील थकबाकीदारांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे....
  April 11, 07:52 AM
 • भाजपचा ३८ वा पक्षस्थापना मेळावा ६ एप्रिलला मुंबईत पार पडल्यानंतर त्याविषयी उलटसुलट चर्चा झाली. ३८ वर्षांपूर्वी मुंबईत भाजपची स्थापना झाली त्यानिमित्ताने महाराष्ट्र भाजपने शक्तिप्रदर्शन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मेळाव्यातली भाषणं वादग्रस्त ठरली. सत्ताधारी पक्षानं खूप जबाबदारीनं वागलं पाहिजे. या जबाबदारीचा अभाव या मेळाव्यात दिसला, असं निरीक्षण माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी नोंदवलं आहे. या मेळाव्यात अमित शहा, देवेंद्र फडणवीस...
  April 10, 02:16 AM
 • महाराष्ट्रव्यापी वादग्रस्त दौऱ्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर स्थानापन्न झाले खरे, पण त्यांच्या आजवरच्या ऐकिवात असलेल्या कार्यशैलीनुसार नाशिक तीर्थक्षेत्रीदेखील त्यांनी धडाका सुरूच ठेवला आहे. म्हणतात ना, एखादा नवनियुक्त ठाणे अंमलदार रुजू झाल्यानंतर सुरुवातीला दंडुका जोराने आपटतो अन् आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ही झाली प्रचलित वाक्प्रचारातील एक नेहमीची म्हण. नवनियुक्त आयुक्त याला अपवाद म्हणता येतील. कारण, त्यांनी पहिल्या...
  April 10, 02:16 AM
 • सर्वच देशांनी आपापल्या बाजारपेठा संरक्षित करण्यासाठी आयात शुल्क वाढवत नेले तर जागतिक महागाईचा भडका उडायला वेळ लागणार नाही व याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे. त्यामुळे अर्थातच सर्वच राष्ट्रांचा विकास दर घटेल, रोजगार वाढण्याऐवजी त्यात उत्तरोत्तर घट तर होईलच, पण स्पर्धा न करू शकल्याने अनेक उद्योगही बंद पडतील. म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्थाच ढासळू लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी मालाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ करून व्यापार...
  April 9, 02:00 AM
 • कृषी क्षेत्रात एक खूप मोठे परिवर्तन आले आहे. या क्षेत्रात भाज्या आणि फळांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. सध्या भाज्या आणि फळांच्या किमती इतर अन्न-धान्याच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. शेतकऱ्याला भाज्या आणि फळांच्या शेतीत खूप फायदाही आहे. आजकालच्या वृत्तपत्रांमध्ये शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, आंदोलने यांच्या बातम्या प्रचंड प्रमाणात असतात. या बातम्यांवरून देशाच्या कृषी क्षेत्रातील व्यापक त्रुटी, उणिवा स्पष्ट होतात. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतीतील जीडीपी...
  April 7, 02:00 AM
 • उच्चपदस्थ व्यक्तींचा भ्रष्टाचार हा खूप गाजतो. परंतु, सामान्य माणसाला पावलोपावली जो भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, त्याचे काय? कोणत्याही सरकारी कामासाठी कार्यालयात जा, विनापैशाने काम झाले तर आश्चर्य वाटेल. मोठे विषय मोठ्या बातम्या तयार करतात. सामान्य माणसाच्या पदरात त्यातून काही पडत नाही. अण्णांनी सामान्य माणसाच्या पदरात काही पाडण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. समाजाचा नैतिक स्तर वाढेल या प्रकारचे वातावरण निर्माण केले पाहिजे. तेच भ्रष्टाचारविरोधाचे उत्तम कवच आहे. मोठा गाजावाजा...
  April 6, 02:00 AM
 • भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे हे पक्षाच्या वाटचालीचे प्रारंभापासूनचे साक्षीदार आहेत. भाजपचा पक्ष म्हणून एकंदरीत राजकीय प्रवास कसा झाला हे त्यांनी जवळून पाहिले अाणि अनुभवले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याच अंधेरा छटा, सूरज उगा, कमल खिला.. या शब्दांत खा. दानवे यांनी यांनी व्यक्त केलेले मनोगत. भारतीय जनता पक्षाचा ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महामेळावा होत आहे. केंद्रात आणि २१ राज्यांत सत्ता असणारा,...
  April 6, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED