Home >> Editorial >> Columns

Columns

 • नाशिक जिल्ह्यातील शिरवाडेवणी फाट्यावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका क्रूझर गाडीला भीषण अपघात झाला. त्यामध्ये आठ जणांचा हकनाक बळी गेला. मृतांमधील आठपैकी सात महिला होत्या. त्यात एका लहान मुलीचाही समावेश होता. राज्य परिवहन महामंडळाची बस अन्् क्रूझर यांच्यात धडक झाल्यानंतर हा अपघात झाल्याचा खुलासा नेहमीप्रमाणे पोलिसांकरवी केला गेला. पोलिस खात्याच्या शिरस्त्यानुसार तपास सुरू होईल, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, अपघाताची भीषणता व मृतांच्या संख्येमुळे आपसूक प्राप्त होणारी...
  June 26, 07:23 AM
 • पाकमधील सत्तेची समीकरणं आहेत. ती लक्षात न घेता आपण केवळ देशांतर्गत निवडणुकीसाठी पाकचा मुद्दा वापरत राहतो, तेव्हा त्याचा फायदा तेथील सत्तेच्या समीकरणातील निर्णायक घटक असलेल्या लष्करालाच होत असतो, हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? दहशतवादाचा फैलाव १९८० च्या दशकात प्रथम काश्मिरात व नंतर देशाच्या इतर भागांत झाल्यापासून पाकिस्तान हा भारतीय राजकारणातील एक अपरिहार्य घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बनून गेला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून तर गेल्या चार वर्षांत विरोधकांना लक्ष्य...
  June 26, 07:18 AM
 • बांगलादेश नावाचा देश आता गरीब राहिलेला नाही, तो आता विकसनशील देश बनला आहे. त्याचा विकास दर सध्या ७.२८ टक्के आहे. या विकासप्रवासात भारताची साथ महत्त्वाची ठरते आहे. जगात आर्थिक ठसा उमटवणाऱ्या भारताला बांगलादेशासारखे शेजारी मित्र सोबत ठेवावे लागणार आहेत आणि त्यांचेही पोट भरते आहे ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे. भारत जगात दिसतो, त्या बाजूने जगाचा नकाशा पाहिला की आपला शेजारी बांगलादेश जगाच्या मध्यभागी टिकली लावल्यासारखा दिसतो. इंग्रजांनी फाळणी केल्यापासून त्या भागाची वेगळी ओळख झाली...
  June 25, 06:12 AM
 • अमेरिकी सरकारच्या आकडेवारीनुसार ५ मे २०१७ ते ९ जून २०१८ दरम्यान तब्बल २३४२ मुले त्यांच्या आईवडिलांपासून वेगळी केली होती. सुरुवातीच्या काळात उजव्या, राष्ट्रवादाच्या कट्टर पुरस्कर्त्यांनी याची भलावण केली. पण या नियमामुळे मुलांची व त्यांच्या जन्मदात्यांचीही फरपट होऊ लागली. त्यांचे मानवी हक्क हिरावून घेतले जाऊ लागले. जसजसे याचे फोटो प्रसिद्ध होऊ लागले, बातम्या येऊ लागल्या तसतसे अमेरिकेसह जगभरातून ट्रम्प यांच्या या निर्दयी आदेशावर कठोर टीका होऊ लागली. यंदाच्या जूनमध्ये जागतिक...
  June 23, 07:42 AM
 • आपल्या अर्थव्यवस्थेत कृषी, उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रांपैकी कृषी क्षेत्राने प्रचंड धान्य व शेतमाल उत्पादन करून देशाला स्वयंपूर्ण व निर्यातक्षम केले, पण तेच क्षेत्र आज पूर्वीसारखे रोजगार पुरवण्याची क्षमता हरवून बसले आहे. त्यासाठी शेती क्षेत्रवाढ, नवतंत्रज्ञानावर आधारित शेतीत प्रचंड उत्पादनवाढीची उद्दिष्टे योजून जिथल्या तिथे कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार निर्मिती साधली पाहिजे. मार्चअखेर तिमाहीत ७.७ टक्के व २०१७-१८ वर्षात ६.६ टक्के जीडीपीचा दर झाल्याची सुखद वार्ता...
  June 22, 07:45 AM
 • भारतीय राजकारणाला एेतिहासिक वळण देणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून निर्माण झालेला दुरावा पालघरच्या लाेकसभा पाेटनिवडणुकीनंतर अधिकच वाढला. शिवसेनेचे बाेट धरून महाराष्ट्रात भाजपने पक्ष विस्तार जरूर केला; मात्र त्याच वेळी मानलेल्या या माेठ्या भावाला प्रसंगाेपात खिजवणे, दुय्यम लेखणे काही साेडले नाही. अशा परिस्थितीत ताेडीस ताेड प्रत्युत्तर देणे, शिवसैनिकांचे मनाेधैर्य वाढवणे अपरिहार्यच हाेते. म्हणूनच स्वबळाचा नारा देत भाजपला धडा शिकवण्याचा मनसुबा ५२ व्या...
  June 21, 08:55 AM
 • यापूर्वीही अनेकदा उत्तर कोरियाने आण्विक निःशस्त्रीकरणाची आश्वासने देऊ केली आहेत. पण, त्यानंतरही अण्वस्त्रांच्या चाचण्या घेण्याचा कार्यक्रम मात्र थांबवला नव्हता. त्यामुळे यंदा दिलेले आश्वासन तरी उत्तर कोरिया पाळणार का, हा प्रश्नच आहे. यातही उत्तर कोरिया केवळ आपला आण्विक कार्यक्रम थांबवेल की असलेली अण्वस्त्रेही पूर्णपणे नष्ट करेल, हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची १२ जून २०१८ रोजी सिंगापूर येथील सेंटोसा...
  June 21, 08:16 AM
 • देशातील सात मोठ्या नद्यांना जोडणाऱ्या तीन नदीजोड प्रकल्पांच्या लाभ- हानीचा विचार करून प्रत्येक वर्षी कामाचा प्रगती अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या या समितीच्या अहवालाचा अभ्यास करूनच केंद्र सरकारने पुढील योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. विशेष समितीने जुलै २०१६ ते मार्च २०१८ यादरम्यान केलेल्या कामांचा अहवाल केंद्र सरकारला नुकताच सादर केला आहे. हा अहवाल केंद्रीय जलसंपदा...
  June 20, 07:44 AM
 • ७० वर्षांपूर्वी आपण जे तंत्रज्ञान विकासाचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी जे प्रयत्न केले होते, त्याचीच परिणती म्हणजे सध्याच्या सुखसोयी- अत्याधुनिकता आहे. याच अनुषंगाने राजकारण आणि या मुद्द्यांचा परस्पर संबंध असतो. एखाद्या सरकारनेे विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठीच्या निधीत कपात केल्यास जनतेने आपल्या पातळीवर अशा लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. अन्यथा ७० वर्षांनंतर आपल्या पुढील पिढ्या काय भोगतील, हे सांगता येणार नाही. भविष्यात निर्माण होणारा भारत वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असेल,...
  June 20, 07:39 AM
 • २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका शेतीभोवती फिरणार आहेत. साठ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याचे वास्तव ज्या देशात आहे, त्या देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू शेतीच असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून ठेवले आहे. मोअर क्रॉप, पर ड्रॉप असे म्हणत उत्पादनवाढीचे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना दिले. मान्सूनच्या साथीमुळे शेतकऱ्यांनी तूर, हरभरा, उसाचे प्रचंड उत्पादन काढूनही दाखवले. इतके की हा शेतमाल किती किमतीला आणि कुठे विकायचा...
  June 19, 06:54 AM
 • फुले पगडी वारकरी, शेतकरी वर्षानुवर्षे घालतात. संत तुकाराम महाराजही अशी पगडी घालत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काळी टोपी घालतात. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरच्या काळात काँग्रेस कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालत. अलीकडे अण्णा आंदोलनात मी अण्णा लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या प्रतीक बनल्या होत्या. पुणेरी पगडी आणि ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दलचा एक प्रसंग प्रसिद्ध आहे. बाबांचा पुणे मनपाने पुणे भूषण पुरस्कार देऊन गौरव केला...
  June 19, 06:49 AM
 • अापल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाप्रमाणेच उद्याेग-व्यवसाय अाणि व्यवहारांवरदेखील जागतिकीकरणाचा प्रभाव वाढत चालला अाहे. ग्राहकवाद अाता व्यापक अर्थाने विस्तारत चालला असून त्याद्वारे नवसमाजनिर्मिती हाेत चालली अाहे. त्यातच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने हाेत असलेल्या नवनव्या बदलांची भर पडत असल्याने जनजीवनाचा सांस्कृतिक अाकृतिबंध बदलत अाहे. साेबतच व्यापार-उद्याेग, वस्तू, बाजारपेठ, अार्थिक गुंतवणूक अाणि धाेरणे, मनुष्यबळ यांच्यावरही त्याचा परिणाम हाेत चालला अाहे. मुळातच...
  June 18, 04:54 PM
 • वैदिक धर्म भारतात आक्रमणाद्वारे आला नाही तर शरणार्थींच्या माध्यमातून आला आणि धर्मप्रचाराने पसरला हे वास्तव समजावून घेणे वेदाभिमानी विद्वानांना मान्य करणे अवघड जाते. वैदिक संस्कृती येथीलच अणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच हे ठरवण्यासाठी जनुकीय विज्ञानाचा गैरवापर केला जात आहे हे या निमित्ताने लक्षात येते. डीएनएमधून फार तर त्या व्यक्तीची आनुवांशिकी व अन्य जैविक माहिती समजत असली तरी त्यातून भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी अमूर्त बाबी समजत नाहीत. राखीगढी येथे उत्खननात...
  June 18, 05:18 AM
 • ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार, १७ जून २०१८ रोजी नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या वैचारिक भूमिकेचा धावता परिचय करून देणारा हा लेख... दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करत असतानाच आपल्याकडून इतरांवर आणि विशेषत: आपल्याहून दुर्बल असलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. - डॉ. आ. ह. साळुंखे (वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी, एक्सप्रेस...
  June 16, 02:00 AM
 • तुम्ही अल्पसंख्यविरोधी आहात, असे एकाने म्हणायचे आणि दुसऱ्याने तुम्ही अल्पसंख्यकांना कसे वापरले, याचे पाढे वाचत बसायचे, हे संवैधानिक राष्ट्रवादात बसत नाही.जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता, वंश, यांचा राजकारणात वापर करायचा नाही. कारण ते संविधानाला मंजूर नाही. या मर्यादांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. प्रणवदा यांनी भारताचे प्रथम नागरिक या भूमिकेतून जे विचारधन मांडले आहे, त्याचे विपरीत अर्थ काढण्याऐवजी त्यावर सकारात्मक विचार केला जावा. जनभावना उत्तेजित करण्यात प्रसारमाध्यमांची शक्ती...
  June 15, 02:00 AM
 • पूर्वोत्तर भारताच्या विकासात महत्त्वाची पावलं टाकणारं राज्य म्हणून ओळखलं जातं ते सिक्कीम. देशातलं पहिलं शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून सिक्कीमनंच मान्यता मिळवली आणि आता खासगी जमिनींच्या खरेदी-विक्रीवर महत्त्वाचे निर्बंध लादणारं राज्य म्हणून जम्मू व काश्मीरपाठोपाठ सिक्कीमच ओळखलं जाईल, अशी शक्यता निर्माण करणारा एक महत्त्वाचा निर्णय पवन चामलिंग सरकारनं घेतला आहे. पूर्वोत्तर भारताच्या विकासात महत्त्वाची पावलं टाकणारं राज्य म्हणून ओळखलं जातं ते सिक्कीम. देशातलं...
  June 14, 02:00 AM
 • मराठवाडा, नाशिक-नगर हे एकाच गाेदावरी खाेऱ्यातले विभाग, त्यांना पाण्याच्या माध्यमातून नियतीने एकत्र बांधले. अाता त्यांच्यातील पाणी वाटप समप्रमाणात व्हावे यासाठी कायदा असतानाही वरच्या भागातील धरणांतून पाणी साेडण्यास एक तर विराेध केला जाताे किंवा पाणी साेडण्यात अालेच तर चाेरले जाते अथवा बिनबाेभाटपणे अन्यत्र वळवण्यात येते. त्यामुळे धरणाखालील भागात निर्माण हाेणारी तूट समप्रमाणात विभागली जाणे अपेक्षित असतानाही केवळ जायकवाडीच्या माथी मारली जाते. मात्र, अाता या पाणी चाेरीला तसेच...
  June 14, 02:00 AM
 • मोदींनी मंत्रालयांमध्ये भ्रष्टाचारविरहित कामकाजाचे आश्वासन दिले. येथील कर्मचारी- अधिकारी वर्गाला वेळेवर काम करण्याची सवय लावली.रस्ते बांधणीचे काम दिवसाला ६ किलोमीटर एवढे होत होते. ही क्षमता सुमारे ३० किलोमीटर एवढी झाली आहे. पण आता २०१९ मध्ये केवळ भाजपविरोधी मानसिकतेतून निवडणूक लढवली गेल्यास ती कदापि यशस्वी ठरू शकणार नाही. भारताला एक महासत्ता तसेच एक समृद्ध राष्ट्र बनवणे हाच जनसंघाच्या परंपरेतील सर्वात मोठा संदेश आणि त्याचा उद्देशही होता. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीकरणे हे...
  June 13, 02:00 AM
 • साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणूक मुख्यत: महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे अाणि विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दृष्टीने राजकीय पत-प्रतिष्ठेचा मुद्दा ठरली हाेती. या निवडणूक निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशाेक जगदाळे यांना पराभव स्वीकारावा लागला. या प्रतिष्ठेच्या लढाईत रमेश कराड यांनी एेनवेळी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पंकजा मुंडे यांनी...
  June 13, 02:00 AM
 • अटलबिहारी वाजपेयी यांनी जे केलं, तेवढंही प्रणवकुमार मुखर्जी यांना जमलं नाही. वाजपेयी संघाचे कट्टर स्वयंसेवक. तरीही मोदी यांच्यासारख्या संघाच्या दुसऱ्या कट्टर स्वयंसेवकानं गुजरातेत २००२ च्या फेब्रुवारीमार्चमध्ये जो मुस्लिमांचा नरसंहार घडवून आणला, त्या वेळी गुजरातच्या या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभं राहून वाजपेयी यांनी त्यांना राजधर्म पाळा असा जाहीर सल्ला दिला. ती एक प्रकारची कानउघाडणीच होती. मोदी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावायला हवा, असं वाजपेयी यांचं मत...
  June 12, 06:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED