Home >> Editorial >> Columns

Columns

 • अमर्त्य सेन अर्थशास्त्र हा विषय सोडून जेव्हा राजकारणावर घसरतात आणि शासनावर टीका करू लागतात, तेव्हा उलटा चाबूक आपल्यावरही बसणार आहे, यासाठी त्यांनी तयार राहणे आवश्यक आहे. अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. नोबेल पारितोषिकांच्या मानकऱ्यांत भारतीय फार कमी असतात, त्यामुळे एखाद्या भारतीयाला किंवा भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ किंवा विद्वानाला नोबेल पारितोषिक मिळाले की, तो आपल्या दृष्टीने मोठा हीरो होतो....
  July 13, 07:32 AM
 • जयमती तशी काल्पनिक होती, पण स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अनेक घटनांशी त्यातले प्रसंग समांतर जाणारे होते. जयमतीची पूर्ण फिल्म आज उपलब्ध नाही, पण ७० च्या दशकात चित्रपट उद्योगावरचा लघुपटाचे भूपेन हजारिकांनी जे संशोधन केलं, तेव्हा त्यातली निम्मी फिल्मच त्यांच्याही हाती लागली होती. नागाव हा आसाम राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा. तो महत्त्वाचा अशासाठी कारण बहुचर्चित काझीरंगा नॅशनल पार्क याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्याची स्थापना ब्रिटिश काळातली, १८३३ सालची. दोन हजारांहून अधिक निरपराध...
  July 12, 08:35 AM
 • आजच्यापेक्षा बिकट अवस्था बँकांची १९९०-९२ या काळात होती. ओव्हरड्यूचे अवजड ओझे डोक्यावर आणि कामकाज मात्र केवळ पेपर प्रॉफीट दाखविण्यात धन्य. पण खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या बरोबरीने नरसिंहम कमिटीच्या शिफारशीनुसार एनपीए निकषांनी बँका प्रारंभी तोट्यात आल्या, पण नंतर सावरत सुदृढ झाल्या. आताही तसेच होईल. आपले बँकिंग सध्या वाईट संक्रमण काळातून जात आहे. जवळजवळ सर्व बाजूंनी बदनामीचे दगड फेकायला अनेकजण सरसावले आहेत. बँकांची परिस्थिती चिंता करण्याजोगी आहे, हे मान्य. पण सारे संपले, या...
  July 11, 08:16 AM
 • उदारमतवादाविषयी संशोधनात्मक काम करणाऱ्या देशभरातल्या व्यक्ती आणि प्रत्यक्षात जनआंदोलन उभारलेल्या, सरकारविरोधात एल्गार केलेले कुशल लोकसंघटक या उदारमतवादी राजकारणाचे पुनर्जागरण परिषदेनिमित्ताने एकत्र आले. त्याचा हा ताळेबंद... देवळाली येथे अलीकडेच उदारमतवादी राजकारणाचे पुनर्जागरण ही परिषद पार पडली. या परिषदेची सर्वात जमेची बाजू म्हणजे, यात इंडिया आणि भारत परस्परांना भेटले आणि एकमेकांच्या समस्या परस्परांहून फारशा वेगळ्या नाहीत, हे त्यांना समजून घेता आले. भारत आणि इंडिया यांना...
  July 10, 04:35 PM
 • लोकांना ठेचून मारण्यापासून ते मंत्रोच्चारानं पीक चांगलं येतं, याचं अप्रत्यक्ष समर्थन होण्यापर्यंतचे प्रकार २०१४ पूर्वी बघायला वा ऐकायला मिळत नसत. आज ते घडत आहेत. उघड घडत आहेत. वारंवार घडत आहेत. ...कारण भौतिक प्रगती करणारा, पण विषमता असणारा, हिंसा व विद्वेषानं भारलेलं नि:सत्त्व व निकृष्ट समाजमन असलेला, बहुसंख्याकांचं वर्चस्व असणारा समाज हेतुत: पद्धतशीरपणे निर्माण केला जात आहे. राणा अयुब या आहेत महिला पत्रकार आणि स्वाती चतुर्वेदी या आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या. या दोन्ही स्त्रियांना...
  July 10, 08:52 AM
 • गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक बदलांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत होत असलेले बदल चांगले की वाईट, याचा देशांतर्गत संभ्रम संपत नसताना परकीय गुंतवणूकदारांना हे बदल संधी का वाटतात? देशाचे मॅक्रो इकॉनॉमिक चांगले असताना त्याचे परिणाम दिसण्यास वेळ लागतो आहे, म्हणजे हे बदल वाईट आहेत, असे म्हणायचे का? की ते स्वीकारणे, यातच आपले आणि आपल्या देशाचे हित आहे ? नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गेल्या आठवड्यात देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. भारताची आर्थिक स्थिती फार...
  July 9, 08:38 AM
 • काही वर्षांपूर्वी मोबाइल फोन उत्पादन करणाऱ्या ठराविक कंपन्यांची भारतीय बाजारपेठेत मक्तेदारी होती होती. या कंपन्यांकडून ग्रामीण भागातला शेतकरी, मजूर, शहरी-निमशहरी भागातला कमी उत्पन्न असलेला ग्राहक दुर्लक्षित केला जात होता. अशा काळात रिलायन्सने स्वस्त मोबाइल बाजारपेठेत आणून बड्या मोबाइल कंपन्यांना दणका दिला होता. गेल्या वर्षी इंटरनेट सेवा देणाऱ्या अशाच काही बड्या कंपन्यांना रिलायन्स जिओने स्वस्त दरात इंटरनेट प्लॅन देऊन दुसरा दणका दिला होता. आता वेगवान ब्रॉडबँड इंटरनेट देण्याच्या...
  July 7, 07:52 AM
 • कुठलेही व्हिडिओ, वेबलिंक्स, मॉर्फ इमेजेस, फेक फिगर्स वापरून हवा तो परिणाम साधणे हा व्हॉट्सअॅपचा केंद्रबिंदू झाला आहे. मारा, कापा, चौरंगा करा, चिरडून टाका हे परवलीचे शब्द बनले आणि नेत्यांची प्रक्षोभक भाषणे, बेताल वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे काही दिवसांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. यानंतर सरकारी यंत्रणांनी...
  July 7, 07:42 AM
 • माझे पोट, माझी आवड, असा व्यक्तिगत स्वातंत्र्यापुरता आहाराचा मुद्दा मर्यादित राहिलेला नाही. तुमचा आहार जगाच्या तापमानवाढीस, जल संकटास, पर्यावरणाच्या नाशासही कारणीभूत ठरतो, या भावनेतून जबाबदार मंडळी शाकाहाराकडे वळू लागली आहेत. पण म्हणून मांसविक्रीच्या कोट्यवधीच्या इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष करणेही सध्याच्या भारताला परवडणारे नाही. जगातला शक्तिशाली प्राणी कोण तर हत्ती. वेगवान कोण तर घोडा, हरीण. कष्टाळू, श्रमिक प्राण्यांमध्ये कोणाचे नाव घ्यायचे तर बैल, रेडा, उंट, गाढवाचे. बुद्धिमत्तेच्या...
  July 6, 09:16 AM
 • २०१७ मध्ये व्हाइट हाऊसने प्रकाशित केलेल्या नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजीतून ट्रम्प प्रशासनाने तत्त्वनिष्ठ वास्तववादाचा अंगीकार केल्याचे स्पष्ट होते. याचाच भाग म्हणून कोणत्याही विचारधारेशी जवळीक न ठेवता आपल्याला हव्या त्या परिणामांच्या निष्पत्तीसाठी प्रयत्न करणे हे अमेरिकन सरकारचे धोरण आहे. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाबाबत रोज नव्या चर्चा घडून येतात. अनेकदा विविध माध्यमांतून होणाऱ्या विवेचनामध्ये ट्रम्प यांच्यावर टीकाच जास्त होते. अमेरिकेने उत्तर कोरियाशी वाटाघाटी सुरू...
  July 5, 08:51 AM
 • धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा राईनपाड्यात तब्बल साडेपाचशे किलोमीटर अंतरावरून भीक मागण्यासाठी आलेल्या नाथपंथी डवरी समाजाच्या पाच लोकांचा कुण्या राक्षसांनी नव्हे तर संवेदना हरवलेल्या माणसांनीच दगडांनी ठेचून खून केला. नाथपंथीय समाजातील हे लोक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील होते. राईनपाड्यापासून हे गाव साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे. हे लोक आपल्या कुटुंबासह आलेले होते. सध्या देशभर मुलं पळवण्याची अफवा साेशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे या...
  July 4, 09:28 AM
 • नरेंद्र माेदींनी काही चमत्कारिक पाऊल उचलले नाही तर २०१९ मध्ये विराेधी पक्षांच्या अाघाडीचे सरकार बनू शकते. परंतु हेदेखील तितकेच खरे की, ते सरकार १९७७ च्या माेरारजी अाणि चरणसिंह सरकारप्रमाणे, १९८९ सालच्या व्ही.पी. सिंग अाणि चंद्रशेखर तसेच १९९६ मधील देवेगौडा, गुजराल सरकारप्रमाणेच अल्पजीवी असेल. अापसातील कुतरअाेढीमुळे या सरकारचा जीव मेटाकुटीस येईल. म्हणूनच सत्तारूढ-विराेधी पक्षांप्रमाणे सामान्य भारतीयांच्या दृष्टीनेदेखील अागामी वर्ष अडचणींचे, संघर्षाचे ठरणार अाहे. २०१९ च्या...
  July 4, 09:24 AM
 • विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका झाल्या. मुंबई आणि नाशिक शिक्षक तर मुंबई आणि कोकण पदवीधर असे चार आमदार निवडून देण्यात आले. नाशिक, मुंबई आणि कोकण या टापूतील शिक्षक पदवीधर या मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहेत. शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षांना धडे शिकवणारे आहेत. खासकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. विधान...
  July 3, 08:09 AM
 • विधान परिषदेच्या जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाची उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक अक्षरश: एकतर्फी पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी होताना नरेंद्र दराडे यांनी घसघशीत मताधिक्य पदरात पाडून घेत अगदी सहजरीत्या आमदारकीवर ताबा मिळवला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बंधू किशोर यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एका दमात अन् एकहाती जिंकली. दोन्ही निवडणुकांच्या केंद्रस्थानी पैसा अन् पैठणी होती. निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप, धनशक्ती विरुद्ध...
  July 3, 08:08 AM
 • खरे तर भारतीय उद्योगांचे अर्थचक्र लक्षात घेऊन अनुत्पादक कर्जांचे निकष पूर्वीचेच ठेवायला हवे होते किंवा मंदीची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करायला हवे होते. ज्या कर्ज मंजुरी प्रकरणांत अनियमितता दिसते तेवढ्यापुरती कारवाई मर्यादित ठेवायला हवी होती. मोठ्या कर्जांना जेवढे आणि नको इतके प्राधान्य दिले जाते त्यापेक्षा छोट्या उद्योगांनाही देत सूक्ष्म कर्जांची संख्या वाढवत अधिकाधिक लोकसंख्येला व्यावसायिक बनण्याची सुलभ संधी दिली जायला हवी होती. अनुत्पादक कर्जांमुळे आर्थिक संकटात...
  July 2, 06:17 AM
 • लातूरमध्ये झालेली एका कोचिंग क्लास चालकाची हत्या आणि औरंगाबादमध्ये राहुल श्रीरामे नामक पोलिस उपायुक्तावर दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा यामुळे मराठवाड्याचे जनमानस स्तंभित झाले आहे. मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी हजारो पालक मुलांना ज्यांच्याकडे विश्वासाने सोपवतात त्यांच्या आत पैशांसाठी हत्या करण्याइतपत लालची आणि क्रूर सैतान दडलेला असावा? ज्यांच्या अस्तित्वामुळेच महिला, मुलींना समाजात सुरक्षिततेची भावना यावी त्या पोलिस अधिकाऱ्यामध्येही तरुण मुलीवर बलात्कार करण्याची वृत्ती...
  July 2, 06:01 AM
 • जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू झाला त्याची आज वर्षपूर्ती. म्हटली तर तशी सामान्य बाब. परंतु ऐतिहासिक म्हटली जाऊ शकते. इतिहासाला विद्वान आपल्या सोयीनुसार वाचतात. योग्यतेनुसार मांडत असतात. त्यात भर घालत असतात. एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री जीएसटी लागू करण्याची घोषणा करण्यासाठी समारंभ आयोजित केला होता. ही गोष्ट संपूर्ण देशाला आजही आठवते. मध्यरात्री अशी बैठक केवळ स्वातंत्र्य (१९४७), स्वातंत्र्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष (१९७२) व...
  July 1, 09:22 AM
 • उच्च शिक्षणातील गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसी बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याची जागा एचईसीआय म्हणजे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया थोडक्यात उच्च शिक्षण आयोग घेणार आहे. यूजीसी ६१ वर्षे जुनी आहे. देशातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. सुरुवातीच्या काळात देशात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या कमी होती. शैक्षणिक धोरणावर फारसा भर नव्हता, त्यातून आर्थिक भांडवलाचाही प्रश्न होता. अशा अनेक...
  June 30, 08:06 AM
 • कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी असलेला हीरो आणि भ्रष्ट शासनव्यवस्था यांच्यातला संघर्ष हा अनेक भारतीय चित्रपटांचा कथाविषय. नागालँडमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ती त्याचीच पुनरावृत्ती आहे, असे तिथल्या अनेक सिव्हिल सोसायट्यांचे म्हणणे आहे. कठोर प्रशासक असलेला आणि जनतेत लोकप्रिय होत असलेला अधिकारी जसा सत्ताधीशांना नकोसा होतो, तसाच प्रशासनात लोकप्रिय ठरणारा अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या नाराजीस पात्र ठरतो आणि त्याच्या नशिबी बदलीचा फतवा येतो हा अनुभव भारताच्या कुठल्याही...
  June 30, 07:57 AM
 • काही दिवसांपूर्वी आगामी सार्वत्रिक निवडणूक पाकिस्तानचेच लष्कर फिक्स करत असल्याचा आरोप झाल्याने पाकिस्तानातील बडे लष्करी अधिकारी नाराज झाले होते. ही नाराजी सर्वत्र वाढताना दिसत आहे. असे चित्र पहिल्यांदा दिसत नाही. १९९०मध्ये आयएसआय या गुप्तहेर संघटनेने पाकिस्तान पीपल्स पार्टीचा पराभव करण्याच्या हेतूने विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटले होते. आगामी निवडणुकांत पैशाचे वाटप होत नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्कर प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी केला असला तरी त्यांच्या दाव्यात...
  June 29, 06:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED