Home >> Editorial >> Columns

Columns

 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेला देशभरातून १६ लाख ३८ हजार ४२८ मुले बसली होती. यामध्ये ६ लाख ७१ हजार १०९ मुली आणि ९ लाख ६७ हजार ३२५ मुले होती. निकालाची टक्केवारी पाहिली तर या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण निकाल पाहिला तर ३.५ टक्क्यांनी मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. सेंट्रल बोर्डाच्या दहावी परीक्षेच्या निकालाचे केवळ एवढेच विश्लेषण करून चालणार नाही, तर सेंट्रल बोर्डाला...
  May 30, 02:00 AM
 • गेल्या चार वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी किती चांगली होती, याचे गोडवे भाजप गात आहे आणि ही कामगिरी किती वाईट होती, याचा लेखाजेखा काँग्रेस व इतर विरोधक मांडत आहेत. मात्र, यापलीकडे जाऊन जरा बारकाईनं बघितल्यास काय आढळतं? ...तर जनमानसात खोलवर पसरलेलं विद्वेषाचं विष. ते देशाचे शत्रू आहेत, त्यांची कड घेणारे हे देशद्रोही आहेत, हा समज समाजमनात पद्धतशीरपणे रुजवला गेला आहे. हिंदू असण्याचा दुराभिमान-सार्थ अभिमान नव्हे-बाळगण्यात गैर काहीच नाही, किंबहुना तसा तो बाळगायलाच पाहिजे, असं...
  May 29, 06:11 AM
 • २७ वर्षांपूर्वी आपल्याला जागतिकीकरण स्वीकारावे लागले. त्या वेळी खासगीकरण आणि परदेशी वस्तूंच्या विरोधात आंदोलने झाली. पण खासगीकरण थांबले नाही आणि विदेशी वस्तूंचा वापरही कमी झाला नाही. देशाभिमान आणि देशातील उद्योग चालावेत यासाठी देशी उत्पादने नागरिकांनी स्वीकारावीत हे प्रयत्न तेव्हाही स्वागतार्ह होते आणि आजही. पण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे प्रयत्न पुरेसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्याचे कारण परदेशी वस्तू जेवढ्या (विशेषतः चिनी) स्वस्त मिळतात तेवढ्या स्वस्त भारतीय उद्योग देऊ...
  May 28, 06:13 AM
 • कविसंमेलन आटोपल्यानंतर रात्री उशिरा झोपी गेलो. पण पहाटे पहाटे हाजी पंडितांच्या गलबल्याने झोपमोड झाली. पंडित अंगणात उभे राहून मोठ्याने ओरडत होते. बंधू-भगिनींनो, या लोकशाहीचा सर्वात शीलवान, निष्ठावान प्राणी बघा. डोळे चोळत मी खोलीच्या दारातून अंगणात बघतोय तर अजब दृश्य दिसले. एक मेलेला सरडा अंगणात लटकवून हाजी पंडितांनी सर्व गोतावळा अंगणात मांडला होता. मी खिन्नपणे म्हणालो, अरेे हाजी भाई, सकाळी सकाळी हा काय पोरकटपणा? या बिचाऱ्या प्राण्याला का मारून टाकले बरं? पंडित खेकसतच उत्तरले, बघा...
  May 28, 05:18 AM
 • ओबामाकेअरच्या धर्तीवर आणली जात असलेली मोदीकेअर ही महत्त्वाकांक्षी योजना २०१९ च्या निवडणुकीचा मोदींचा हुकमी पत्ता असणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या ११५० हून अधिक नवीन चाचण्यांच्या परवानग्या आहेत त्यात गर्भधारणेच्या चाचणीची परवानगी नाही. गर्भपाताकडे नेमक्या कोणत्या धोरणाने पाहायचे हे आजवरच्या भारतीय राजकारण्यांना निश्चित करता आले नाही.देशाची वाढती अवाढव्य लोकसंख्यापाहता कुटुंबनियोजन सक्तीचे करून गर्भपातावरील निर्बंध मोठ्या प्रमाणावर घटवले गेले तर त्याचे दुहेरी लाभ होऊ शकतात....
  May 26, 02:00 AM
 • ३४ वर्षाचे वय हे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे नव्हे, फलंदाजाच्या बाबतीत तर नाहीच. त्यातही तो ए बी डिव्हिलीयर्स इतका यशस्वी असेल तर अजिबातच नाही. एबीडी या नावाने लोकप्रिय डिव्हिलीयर्स गेली १४ वर्षे दक्षिण अाफ्रिकेसाठी खेळला. भारतातल्या आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अविभाज्य घटक होता. गेल्याच आठवड्यात एबीडीने आयपीएल सामन्यात अशक्यप्राय वाटणारा सीमारेषेवरचा झेल इतक्या सहजतेने टिपला, की चाहत्यांनी त्याला स्पायडरमॅन म्हणायला सुरुवात केली. याच आयपीएलमध्ये सर्वात लांब...
  May 26, 02:00 AM
 • चांगले उत्पादन घेऊनही सरकार पुन्हा आयात करत जे आहेत तेही भाव गडगडवायला लावत असेल तर सरकारची शेतीबाबतची दृष्टी किती अनुदार आणि म्हणूनच विघातक आहे हे लक्षात येते.शेतीचे अर्थकारण बिघडले की देशाचेही बिघडते हे समजायचा वकुब सरकारचा नाही. शेतमालाबाबत तरी देशांतर्गत स्थिती पाहूनच मग आंतरराष्ट्रीय करार पाळावेत किंवा करार करतानाच त्यातच तशा तरतुदी ठेवाव्यात हे भान सरकारने ठेवलेले नाही. भारतीय शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला सीमा उरलेली नाही. शेतीबाबतची एकंदरीत धोरणे अशी आहेत की, शेतीची हत्याच...
  May 25, 02:00 AM
 • १९९९-२००३ या काळात उदारीकरण-खासगीकरण-जागतिकीकरण धोरणे अटलबिहारी वाजपेयी सरकारला योग्य रीतीने रेटता आली नाहीत. त्यात भाजपची कृषी क्षेत्रावर आघात करणारी धोरणे त्यांच्या इंडिया शायनिंग कॅम्पेनच्या मुळावर आली आणि २००४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ १३८ तर काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या. दोघांमध्ये फक्त सात जागांचा फरक होता. भाजपच्या या अनपेक्षित पराभवाची मीमांसा करताना त्या वेळी भाजपचे चाणक्य समजले जाणारे प्रमोद महाजन यांनी असे वक्तव्य केले होते की, एनडीए आघाडी जशी भाजपने बांधली...
  May 24, 01:09 AM
 • संयुक्त राष्ट्रांपुढे पॅलेस्टाइनचा प्रश्न ७० वर्षांपासून आहे. मात्र, हा प्रश्न सहजपणे सुटेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगीत तेल ओतण्याचेच काम केले. इतक्या उघडपणे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असताना आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया पुरेशा स्पष्ट नाहीत. १८ मे २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने इस्रायलने गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांवर सशस्त्र हल्ले करून जी हत्या केली त्याची चौकशी करण्याचा ठराव पास केला. त्यानुसार...
  May 24, 12:53 AM
 • सर्वच अडचणींवरील उपाय हे निवडणुकीत झालेल्या विजयावर अवलंबून आहेत, असे चित्र उभे आहे. न्यायालयीन प्रणालीपासून बौद्धिक वर्गापर्यंत सर्वत्र असंतोष आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटीत विनाकारण निर्माण झालेल्या मुद्द्यांवरून विद्यार्थी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळाला नाही, म्हणून शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या सर्व गंभीर प्रश्नांपुढेही निवडणूक हेच सर्वकाही असेल तर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची हार हे सरकारसाठी खबरदारीचे असे संकेत आहेत, असे मानायला हरकत...
  May 23, 02:00 AM
 • पंढरपूर मेळाव्यातून राज्याला एक राजकीय संदेश देण्याचा डाॅ. प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न दिसतोय. धनगर समाजाला बरोबर घेऊन अकोला पॅटर्न राज्यभर राबवू. तिसरी आघाडी करून सत्तेचं समीकरण जुळवू, हा तो संदेश दिसतो. अकोला पॅटर्नमध्ये धनगर समाजासह इतर छोट्या- मोठ्या ओबीसी जाती, मुस्लिम आणि दलित यांची बेरीज घडवून सत्ताधारी वर्गाच्या कब्जातून सत्ता हिसकावून घेण्याचं सूत्र आहे. आरक्षणाचा प्रश्न जसजसा लांबतोय तसा धनगर समाजातला असंतोष वाढत चाललाय. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत हा समाज...
  May 22, 05:23 AM
 • सत्तास्थापनेची घाई झाली तरी तो घटनाभंग नव्हे वा लोकशाहीचा खून नव्हे. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे ही लोकशाहीची हत्या असेल तर आपल्याच आमदारांना कोंडून ठेवून मुक्त मतदान करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालणे ही न्याय्य लोकशाही व्यवस्था आहे का? आपल्या आमदारांत राजकीय निष्ठा नाही, अशी कबुली यातून काँग्रेस देत होती. राजकीय निष्ठा नसलेल्या आमदारांबद्दल राज्यपालांना संशय वाटला तर त्यात असंवैधानिक काय आहे? राजकीय पक्षांबाबतची आपली आवडनिवड बाजूला टाकून कर्नाटकी...
  May 21, 02:00 AM
 • भारतात ई. सी. जी. सुदर्शन यांच्यासारखे अतिशय गाढे अभ्यासक, सैद्धांतिक, वैज्ञानिक जन्माला येतात; पण त्यांची आणि त्यांच्या वैज्ञानिक कार्याची प्रेरक माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आपले कर्तृत्व दाखवायला अशा थोर व्यक्तींना भारताबाहेर जावे लागते.विज्ञान म्हणजे काही तरी वस्तूचे मॉडेल करूनदाखवणे अशी धारणा शालेय जीवनापासून मांडली जाते. त्या मर्यादेत आपल्याकडे केवळ कारागीर बनतील. खरे तर आहे त्या विज्ञानापलीकडच्या शोधांची प्रेरणा मिळाली तर आपण विज्ञानात प्रगती करू शकू. पुंज प्रकाश...
  May 19, 02:00 AM
 • सिक्कीम हे एकमेव राज्य की जे स्वातंत्र्याला ७० वर्षं पूर्ण होऊनही भारताच्या हवाई नकाशावर नव्हतं. सिक्कीमला जायचं झालं तर एक तर कोलकात्याहून बागडोगराला विमानानं जाऊन पुढे सव्वाशे किलोमीटर अंतर रस्त्यानं कापावं लागायचं किंवा भूतानमधल्या पारो विमानतळावरून रस्त्यानं जात साडेतीनशे किलोमीटर अंतर कापावं लागायचं. आता ती गरज उरलेली नाही. आता कोलकात्याहून थेट पाक्योंगलाच विमानानं जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वोत्तर भारताच्या विकासातलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल गेल्या आठवड्यात...
  May 18, 02:00 AM
 • कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी भाषकांच्या पट्ट्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्ण पराभव झाला. मराठी भाषकांच्या बालेकिल्ल्यात बेळगाव जिल्ह्यातील तीन जागा समितीने लढवल्या होत्या. परंतु तीनही ठिकाणी समितीचा पराभव झाला. मराठी भाषकांसाठी कन्नडिगांसमोर सातत्याने लढणाऱ्या व एक ना एक दिवस आपला परिसर महाराष्ट्रात सामावला जाईल, या आशेने तग धरून असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला हा मोठा धक्का आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण बेळगाव व खानापूर या दोन मतदार संघातून निवडून आलेले...
  May 17, 07:50 AM
 • कर्नाटक विधानसभेच्या निकालांतून काही निश्चित निष्कर्ष निघू शकतात व काही भ्रम दूर होऊ शकतात. पहिली बाब म्हणजे हे निकाल ऐतिहासिक नाहीत. कर्नाटकमधील राजकीय चित्र, म्हणजे प्रत्येक पक्षाचे बलाबल हे बऱ्याच प्रमाणात होते तसेच राहिले आहे. काही जागा कमी-जास्त झाल्या असल्या तरी फार मोठा फेरफार झालेला नाही. निकालांतील आकडेवारी पाहता ही बाब थोडी धक्कादायक वाटेल. पण मागील निकालांशी व्यवस्थित तुलना केली तर कर्नाटकातील चित्र फारसे बदलले नसल्याचे लक्षात येईल. मागील निवडणुकीत काँग्रेसला १२२ जागा...
  May 17, 06:51 AM
 • भाजपने अाक्रमकपणे मुसंडी मारत कर्नाटक विधानसभेच्या सर्वाधिक जागा पटकावल्या अाणि काँग्रेसच्या सुमारे ५० जागा कमी झाल्या. अर्थातच नरेंद्र माेदींच्या शिरपेचात खाेवले गेलेले हे अाणखी एक माेरपीस म्हणता येईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले हाेते. बहुतेक सारे मंत्री, मुख्यमंत्री, प्रमुख खासदार अाणि अामदार कैक दिवस कर्नाटकात तळ ठाेकून हाेते. पंतप्रधान माेदी अाणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. कर्नाटकचा प्रत्येक काेपरा अमित शहा यांनी धुंडाळून...
  May 16, 03:13 AM
 • महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये प्रत्येक वर्षी कमीअधिक प्रमाणात दुष्काळाचे सावट असते. पाऊस कमी होत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न गेल्या काही वर्षांत कमालीचे घटले आहे. केवळ शेती हाच एकमेव उद्योग असलेल्या शेतकऱ्यांना तर शेतीने पुरते कर्जबाजारी केले आहे. त्यामुळे देशभरात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रातदेखील हा आकडा वाढताच आहे. ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, त्याच महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या गावांमधील शेतकरी मात्र सधन होतोय. आता या...
  May 16, 03:10 AM
 • हा लेख लिहिताना कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या बहुमतावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झालेले नाही. कारण आकडे अजूनही खाली-वर होतायत. पण काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. याबरोबरच नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी राहुल गांधी तुल्यबळ नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या निवडणुकीचे निकाल स्पष्टच होते, पण या निवडणुकांनी शक्तिशाली अखिल भारतीय नेत्याच्या रूपात मोदींचा उदय झाला, हे सिद्ध करून दाखवले. भारताच्या राजकारणात यापूर्वी असे दोनच नेते झाले. नेहरू आणि इंदिरा गांधी. मोदी हे तिसरे. म्हणूनच हे...
  May 16, 01:06 AM
 • कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं सूप वाजलं आहे. हा स्तंभ आज प्रसिद्ध होत असताना मतमोजणीची धामधूम सुरू झाली असेल. कोणाच्या पारड्यात मतदार आपलं वजन टाकतील? कर्नाटकातील सामना हा तिरंगी आहे. सत्ता काँग्रेसच्या हातात आहे. भाजप ती हिसकावून घेऊ पाहत आहे आणि या दोन राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेते प्रादेशिक पक्ष असलेला जनता दल (सेक्युलर) हा राज्यात मोजक्या काही ठिकाणी आपला जम बसवून आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या या पक्षाला किती जागा मिळतात, यापेक्षा तो काँग्रेस व भाजप...
  May 15, 07:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED