जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Columns

Columns

 • मवाळ हिंदुत्वाचा पुरस्कर्ता अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यास प्राधान्य देणारे भाजपचे, कदाचित देशातील पहिले राजकारणी ठरावेत ते गाेव्याचे मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकर. धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी राजकारणाला पसंती देणाऱ्या पर्रीकरांसमाेर राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत लाेटलेल्या गाेव्याला पूर्वपदावर आणण्याचे अाव्हान होते. लोकांचा पक्षावरील विश्वास उडाला तेव्हा त्यांनी जनतेत जीव ओतला. मध्यमवर्गीय आणि संरक्षित मतदारांची मने जिंकून ते या वर्गाचे हीरो ठरले....
  March 19, 09:35 AM
 • महत्प्रयासाने राज्यात शिवसेनेशी युती करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आल्यानंतरही जालना जिल्ह्यात जो काही घोळ सुरू होता तो अखेर संपल्यात जमा आहे. जालना विधानसभेचे शिवसेना आमदार आणि राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे यांना आव्हान देणे सुरूच ठेवले होते. कोणत्याही परिस्थितीत आपण जालना लाेकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करणारच आहोत, अशी खोतकरांची गेल्या दोन वर्षांपासूनची भाषा होती. युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकर एक तर...
  March 18, 10:36 AM
 • आैरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापुरात गुरुवारी महिलांनी हंडा माेर्चा काढला. या माेर्चाला उत्तर द्यायला ग्राम पंचायतीत काेणीच नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आपला सगळा राेष काढला. फर्निचरची माेठ्या प्रमाणावर माेडताेड करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून गावांमध्ये टँकर सुरळीत सुरू करावेत, अशी या महिलांची मागणी हाेती. तब्बल २५ वर्षांपासून ग्रामस्थ नळ याेजनेसाठी लढा देताहेत. मात्र, याकडे शासन, प्रशासन, काही नेते, अधिकारी कारणं पुढे करत दुर्लक्ष करत आहेत. पाऊस कमी...
  March 16, 10:14 AM
 • ब्रिटिशांनी मुंबई वसवली. त्यांच्याकडे दूरदर्शीपणा होता. आपल्याकडे तो अजिबात नाही. म्हणून मुंबईसारख्या शहरात पूल कोसळण्याच्या घटना पुन्हा-पुन्हा होतात. आता दादरच्या टिळक पुलाचं उदाहरण घ्या. या पुलाने शंभरी पार मागेच केली आहे. म्हणजे आता या पुलाचं आयुर्मान संपलं आहे. पण, आपण लक्ष द्यायला तयार नाही. ब्रिटिशांच्या बांधकामात सेफ्टी फॅक्टर नावाची बाब होती. म्हणजे बांधकामाची मुदत संपल्यावरही तो २५ वर्षे आरामात टिकू शकतो. त्या फॅक्टरवर आज आपण जगतोय. कसाब (हिमालय) पूल कोसळला नाही, त्याचा स्लॅब...
  March 16, 10:12 AM
 • आपल्याकडे सार्वजनिक स्थावर मालमत्तेच्या जोरावर शहरे बदलत आहेत, पण त्यांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परवाची दुर्घटना पुलाबाबत घडली. पण हा प्रश्न केवळ पुलाचा नाही, शहरांमधील दुतर्फा उभारलेल्या इमारती, रस्ते, फुटपाथ, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सांडपाणी व्यवस्था, जलव्यवस्थापन अशा सगळ्या सार्वजनिक मालमत्तांचा प्रश्न आहे. शहरांची वाढ होत असताना मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्थावर मालमत्तेची निर्मिती करणे आवश्यक असते, व त्या होत असतात. आपल्याकडे राजकीय नेते, राजकीय...
  March 16, 10:11 AM
 • आधी विदर्भ द्या आणि मगच भाषण द्या, अशी घोषणा देत केंद्रातील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. गडकरींनी शांततेचे आवाहन केले, पण गोंधळ कमी झाला नाही. शेवटी त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढू, असा सज्जड दम दिला. हे प्रकरण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तापले. त्यांच्या या वक्तव्याचा मग विदर्भवाद्यांनी मोठा विरोध केला. त्यांच्याविरोधात पोलिस तक्रारही दिली. अनेक विदर्भवाद्यांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला. हे प्रकरण अद्याप...
  March 15, 10:17 AM
 • विश्वचषक क्रिकेट स्पर्धा चार वर्षांनी एकदा येते तर आयपीएल दरवर्षी असते, हे विधान दुसऱ्या कुणाचे नाही, तर दस्तुरखुद्द टीम इंडियाच्या कप्तान विराट कोहलीचे आहे. दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवल्याचा भारतीय खेळाडूंमधला जोश २-३ अशा भारतातच गमावलेल्या मालिकेत दिसला नाही. गेले वर्षभर सतत क्रिकेट खेळलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंवर खेळाचा पडलेला ताण आता स्पष्ट होऊ लागला आहे. कोहलीपाठोपाठ भुवनेश्वर कुमारनेही आयपीएल स्पर्धेतील संभाव्य ताणाबाबत चिंता व्यक्त केली...
  March 15, 10:16 AM
 • तीव्र होत चाललेल्या दुष्काळाच्या झळांमुळे ग्रामीण जनता होरपळून निघत असताना दुष्काळ हाच सुकाळ मानणारी एक मुजाेर, जमात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पुण्याईने गेल्या काही दशकांमध्ये तयार झाली. शेतकरी व अन्य ग्रामीण जनता परेशान झाली आहे, त्यांना दिलासा द्यायचा तर मोठ्या प्रमाणावर दुष्काळी कामे करावी लागतातच. त्या दिवसांमध्ये पैसे खर्च करताना शासन उदार असते. दुष्काळी कामे करताना त्यातील सत्यता, निकषांचा अंमल, होणारा खर्च याची पडताळणी न करता सरकार अतिशय सैल हाताने पैसा...
  March 14, 09:59 AM
 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिसेंबर २०१८मध्ये पश्चिम आशियातील अमेरिकेच्या घडामोडींबद्दल केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे संपूर्ण जगातच चलबिचल सुरू झाली. ही घोषणा म्हणजे एप्रिल २०१९ पर्यंत अमेरिका आपले संपूर्ण सैन्य सिरियातून माघारी घेईल, असे ट्रम्प म्हणाले. इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया अँड इराक म्हणजेच इसिस या दहशतवादी संघटनेचा समूळ नायनाट झाल्याने आपले उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे म्हणत अमेरिकेने हा निर्णय घेतला, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली. आज मार्चमध्ये आपण या...
  March 14, 09:57 AM
 • महाराष्ट्र शासनाने मुक्तशाळा शिक्षणाबाबतचा एक निर्णय नुकताच जाहीर केला आहे. मुक्त शिक्षणासाठी एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. हे मुक्त बोर्ड मुक्त विद्यापीठासारखे असेल. मुलांची शाळा सुटली तरी त्यांनी शिक्षण सोडू नये या उदात्त हेतूने ही उपाययोजना केली आहे, असा युक्तिवाद केला आहे. कोणत्याही शाळेत प्रवेश न घेता घरबसल्या कुणालाही शिकता येईल किंवा अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करता येईल. सध्याच्या राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक पर्यायी विषयांची सोय केली आहे....
  March 13, 09:37 AM
 • लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासन आणि राजकीय पातळीवर एकाचवेळेस ही लगबग सुरू आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षांपेक्षा भाजपसाठी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही मोदी सरकारची सत्व परीक्षा ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी घेतलेले निर्णय लोकांना मान्य आहे की लादले गेलेले आहेत? याचे उत्तर याच निवडणुकीतून मिळणार आहे. मोदींचे सरकार हे विश्वासार्ह सरकार आहे; हे दाखवून देण्यासाठी जे निवडून येतील त्यांनाच पुन्हा तिकीट आणि जे निवडून...
  March 13, 09:29 AM
 • सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच नाशिकसह अवघ्या उत्तर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या यंत्रणा अन् निवडणूक इच्छुक उमेदवार कामाला जुंपले गेले आहेत. या एकूण धावपळीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक कसरत केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीला तसेच त्यांचा सत्तेतील सहभागी साथीदार शिवसेनेला करावी लागणार आहे. याचे प्रमुख कारण असे की, शतकी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला वा द्विदशकी वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला गमवण्यासारखे काहीच नाही. जे काही गमवायचे...
  March 12, 10:08 AM
 • २०१८ हे वर्ष महाराष्ट्रातील दलित राजकारणाला कलाटणी देणारे ठरले. यात प्रामुख्याने कोरेगाव भीमाच्या दंगलीचा उल्लेख करावा लागेल. या घटनेनंतर राज्यातील दलित राजकारण ढवळून निघाले. या निमित्ताने दलित समाजाची एकजूट दिसून आली आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केले. माळी, तेली समाजासह इतर मागासवर्गीय आणि दलित मतांचे एकत्रीकरण करून ९० च्या दशकात प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्नचा यशस्वी प्रयोग करून दाखवला होता. गेली काही वर्षे प्रकाश आंबेडकर याच पॅटर्नला अधिक व्यापक स्वरूप देऊ पाहत...
  March 12, 10:06 AM
 • औरंगाबादच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच प्री एलएलबीच्या परीक्षा घेतल्या. त्या परीक्षेतील दोन पेपर्स रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने केला असून आता विद्यार्थ्यांना त्या दोन विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल. विद्यापीठाला हा निर्णय घ्यायला दिव्य मराठीने उघड केलेला एक शैक्षणिक घोटाळा कारणीभूत ठरला आहे. शहरातल्या एका विधी महाविद्यालयाने विद्यापीठाची परीक्षा सुरू होण्याच्या आठवडाभर आधी महाविद्यालयात एक सराव परीक्षा घेतली. त्या परीक्षेसाठी...
  March 11, 10:28 AM
 • खरे म्हणजे न्यायालयाचे काम केवळ साक्षी-पुराव्यांवर चालते. भावनांना तेथे कसलेही स्थान नसते. पण बाबरी मशीद की रामजन्मभूमी? या दीर्घकाळ रेंगाळत असलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय खंडपीठाने मध्यस्थीसाठी तीन सदस्यांची मध्यस्थ समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. मध्यस्थी करत उभय पक्षात सर्वमान्य तडजोड घडवून या वादावर कायमचा तोडगा काढला जावा ही प्रामाणिक इच्छा सर्वोच्च न्यायालयाची आहे. समितीने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून दोन समाजातील तेढ कमी व्हावी आणि भळभळत्या...
  March 11, 10:26 AM
 • लातूर.. मराठवाड्यातील माेठं शहर... अलिकडे शिक्षणाची पंढरी झालेलं. पुणे, मुंबई, आैरंगाबादसह पश्चिम महाराष्ट्रातूनही विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात. शहर तसं चांगलं; पण पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नानं बदनाम हाेऊ लागलं होतं. पाण्याची टंचाई येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेली. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली तसं शहर विस्तारत गेलं. पाण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चक्क ५० बाेग्यांच्या रेल्वेने ४५ लाख लिटर पाणी मिरजेहून लातूरला पाेहोचवलं गेलं. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. पण पाण्याचा...
  March 9, 10:13 AM
 • कलाप्रिय जमशेद भाभांना एनसीपीएच्या उभारणीत टाटा उद्योगसमूहाची मदत हवी होती. त्या हेतूने ते टाटा उद्योगसमूहाचे तेव्हाचे प्रमुख जे. आर.डी. टाटांना भेटायला गेले. जेआरडींसारख्या अतिशय व्यग्र माणसाचा आपण वेळ खात आहोत या भावनेने जमशेद भाभा संकोचून गेले होते. तेव्हा जेआरडी एका सिमेंट कंपनीच्या कामात व्यग्र होते. जमशेद भाभा जेआरडींना म्हणाले, तुमच्यासारख्या व्यग्र माणसाचा मी वेळ खाल्ला याबद्दल मला माफ करा. यावर जेआरडींनी जे उत्तर दिले त्यात टाटा उद्योगसमूहाचे तत्त्वज्ञान व्यक्त होते....
  March 9, 10:12 AM
 • १९७० सालापासून आजवरच्या ५० वर्षांत हिंदुकुश पर्वतरांगांमधल्या १५ टक्के हिमनद्या नष्ट झाल्या आहेत आणि जागतिक तापमानवाढीचा सिलसिला असाच सुरू राहिला तर या शतकाच्या अखेरपर्यंत आणखी १५ ते २० टक्के हिमनद्या वाढत्या तापमानामुळे वितळून नाहीशा झालेल्या असतील आणि पर्यायाने या पर्वतरांगांमधले ९० टक्के हिम (बर्फ) वाहून गेलेले असेल, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते आहे. वैश्विक तापमानवाढीचं संकट दर वर्षागणिक असंच गहिरं होत राहिलं, साधा दीड अंश तापमानाचा फरकही सरासरी तापमानात पडत राहिला, तर या...
  March 7, 10:35 AM
 • राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून खान्देशसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी शासन प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या मुद्द्याला हात घातला आणि मागे पडलेला हा विषय पुन्हा चर्चेत आला. राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून खान्देशात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी...
  March 6, 10:06 AM
 • समाजाला चमत्काराची प्रतीक्षा असते. विज्ञान चमत्कारांकडे अतीव संशयाने आणि सावध नजेरेने पाहते. विज्ञानाचे मर्मच मुळी चिकित्सा आणि पुनर्चिकित्सा यात दडलेले असते. साहजिकच एड्समुक्तीचे संकेत देणाऱ्या ताज्या घटनेकडे जगभरच्या माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून पाहिले असले तरीही समस्त विज्ञानविश्वाने या आशादायी निष्कर्षाचे सावधपणे स्वागत केले आहे, आणि हीच विज्ञाननिष्ठ समुदायाकडून जगाला असलेली अपेक्षासुद्धा आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकांत एचआयव्हीच्या रोगाने जगभर हाहाकार माजवला होता....
  March 6, 10:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात