आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Result 2021; Mamata Banerjee, Kailash Vijayvargiya, Rahul Gandhi, Sarbananda Sonowal, Palaniswami, And Kerala Politics

निकालांची उत्सुकता:ममता विजयी झाल्या तर राष्ट्रीय पातळीवर बनतील मोदींविरोधी चेहरा, पराभव झाल्यास पक्ष फुटण्याची शक्यता; जाणून घ्या कोणत्या राज्यात कुणाची प्रतिष्ठा लागली पणाला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक राज्यामध्ये एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे अंदाज वर्तवताना दिसत आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. कोणत्या पक्षाला सत्तेची गुरुकिल्ली मिळणार ते 2 मे रोजी स्पष्ट होणार आहे. पाच राज्यांच्या या निवडणुकीत काही मोठे राजकीय चेहरे आहेत, ज्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर मग एक नजर टाकुया त्या नेत्यांवर ज्यांच्यामुळे या निवडणूकीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत...

ममता बॅनर्जी: पुन्हा एकदा आपल्या राजकीय प्रवासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर
पाच राज्यांत निवडणुका झाल्या आहेत, परंतु संपूर्ण देशाचे डोळे बंगालकडे लागले आहेत. जेव्हा मोदी-शाह या जोडीने ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली, तेव्हा स्ट्रीट फाइटर दीदींनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढविली. या निवडणुकींचे निकाल ममता बॅनर्जी यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम घडवून आणतील, हे दोन भागात विभागून बघुयात...

जर दीदी निवडणूक जिंकल्या तर...
बंगालची निवडणूक भाजपने आक्रमकतेने लढवली आहे. या पक्षाने राज्यात आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. इतके करूनही जर ममता पश्चिम बंगालमध्ये आपले सरकारला वाचवण्यात यशस्वी ठरल्या तर त्या राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकार विरोधी युतीचे नेतृत्व करणा-या प्रबळ दावेदार ठरतील.

कोलकातामधील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मणि तिवारी सांगतात, "भाजप जर ही निवडणूक जिंकू शकला नाही तर मोदी-शाह या अजिंक्य जोडीचा पराभव स्वबळावर केला, असा संदेश दीदी संपूर्ण देशाला देण्यात यशस्वी होतील."

विश्लेषकांच्या मते, बंगालमधील दीदींचा विजय त्यांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी आघाडीचा नेता देखील बनवू शकेल.

जर दीदींचा पराभव झाला तर ...
राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वीच तृणमूलचे अनेक नेते (शुभेंदू अधिकारी, दिनेश त्रिवेदी) ममतांची साथ सोडून भाजपामध्ये दाखल झाले होते. ममता बॅनर्जी निवडणूक हरल्या तर त्यांच्या पक्षात बंडखोरीचा सूर आणखी तीव्र होईल.

टीएमसीमध्ये ममता यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पार्टीतील एक गट नाराज आहे. सत्ता हातून गेल्यानंतर या गटातील अनेक आमदार भाजपकडे आपला मोर्चा वळू शकतात. पक्षावरील ममतांची पकड कमी होण्यासोबतच भाजप अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या मदतीने दीदींना राजकीय वेढा घालू शकतात, जे प्रामाणिक प्रतिमा असलेल्या ममतांसाठी एक मोठा झटका ठरु शकेल.

राहुल गांधी: जर आसाम-केरळमध्ये काँग्रेसचा पराभव झाला तर जी -21 च्या निशाण्यावर येऊ शकते

या निवडणूकीत ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जोरदार लढा देताना दिसले ते म्हणजे केरळ आणि आसाम. या निवडणुकांमध्ये राहुल गांधी केरळमध्ये अधिक सक्रिय होते. परंतु, बहुतेक एक्झिट पोल केरळमध्ये डाव्या आघाडीची सत्ता येऊ शकते असा अंदाज बांधत आहेत. केरळचे ज्येष्ठ पत्रकार बाबू पीटर यांचे म्हणणे आहे की, राहुल हे पक्षाचे नेते आहेत आणि ते केरळचे खासदार असल्याने त्यांचे नाव थेट केरळच्या पराभवाशी जोडले जाईल. सुरुवातीला अशी शक्यता होती की आसाममध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल. मात्र, एक्झिट पोलमध्ये आसाममध्ये भाजपचा परडा जड ठरतोय. तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुक सोबत आहे जी सत्तेत परत येत असल्याचे दिसत आहे. तर, या विजयाचे श्रेय स्टालिन यांना जाईल. बंगालमध्ये कॉंग्रेस स्पर्धेतच नाही.

एक्झिट पोलनुसार, या निवडणुकांमध्ये काँग्रेसची एकूण कामगिरी फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत भाजप पुन्हा एकदा राहुलवर अपयशी आणि कमकुवत नेता म्हणून हल्ला करु शकतो. तसेच, काँग्रेसच्या असंतुष्ट गटातील (G-21) गुलाम नबी आझाद यांच्यासारखे नेतेही राहुल यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकतात. मात्र सध्या राहुल यांच्या राजकीय स्थितीत यामुळे फारसा फरक पडताना दिसत नाही. होय, पण जर बंगालमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आणि तृणमूलला सरकार स्थापण्यासाठी डाव्या-काँग्रेसची गरज भासली तर राहुल काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागू शकते.

पलानीस्वामी: निवडणुका हरल्यानंतरही ते जयललितांचे वारसदार ठरु शकतात
जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK मध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. निवडणुकीदरम्यान सीएम पलानीस्वामी यांनी अशी काही पावले उचलली ज्यामुळे समजा ते निवडणूकीत पराभूत झाले तरी पक्षावरची त्यांची पकड आणखी1 मजबूत होईल.

चेन्नईतील द हिंदूचे राजकीय पत्रकार उद्धव म्हणतात, "मुख्यमंत्री असताना पलानी यांनी वन्नियार जातीला आरक्षण दिले होते. तो स्वत: गवंदर या समाजातील आहेत. या दोन्ही जाती दक्षिण तामिळनाडूमध्ये मोठ्या संख्येने आहेत. या दोघांमध्ये पलानी यांनी आपली पकड मजबूत केली आहे. यावेळी एआयएडीएमके या भागातून जिंकताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत विजयी झालेले बहुतेक आमदार पलानी यांचे समर्थक असतील. जे पक्ष नेतृत्वात पलानी यांना मदत करतील.'

शशिकलांच्या काळात पक्षावर थेवर समाजाचे वर्चस्व होते, परंतु आता पलानी यांनी हे सामाजिक समीकरण बदलले आहे आणि ते पक्षात वर्चस्व मिळविण्याच्या लढाईत पुढे दिसत आहेत. म्हणजेच पलानी कदाचित सत्ता गमावतील पण पक्षावरची त्यांची पकड मजबूत असेल.

पी. विजयन: पराभूत झाले तर सामान्य पॅटर्न समजला जाईल, विजयी झाल्यास केरळमध्ये सीपीएमचे वर्चस्व असेल

केरळमध्ये दर पाच वर्षांनी डावी आघाडी आणि काँग्रेसप्रणीत यूडीएफ दरम्यान सरकारे बदलतात. परंतु, बहुतेक एक्झिट पोलमध्ये केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार सत्तेत येईल असे दिसत आहे. जर हे घडले तर ते ऐतिहासिक ठरेल आणि या विजयामुळे विजयन केरळच्या डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचे नेते होतील, ज्यांना आव्हान देण्यासारखे कोणी नसेल.

केरळच्या राजकारणावर घट्ट पकड असलेले पत्रकार अनिल एस म्हणतात की, 'विजयन यांनी तिकीट वाटपात टू टर्म नॉर्म (सलग दोनदा विजयी झालेल्या आमदारांना तिकिट न देण्याचा नियम) लागू करून आधीच अनेक बड्या नेत्यांना बाजूला केले आहे. पक्षाच्या राज्य पॉलिट ब्युरोवरील त्यांची पकड पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. आणि जर त्यांनी डाव्या आघाडीला पुन्हा सत्तेत आणले तर सीपीएमवर त्यांचे वर्चस्व असेल.'

सर्बानंद सोनोवालः जर आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर प्रतिष्ठा वाढेल, परंतु सरमा यांचे आव्हानही असेल
आसाम निवडणूकीत काही माध्यमांच्या वृत्तानुसार सीएए-एनआरसीचा मुद्द्याचा तेथे वेगळ्या प्रकारे प्रभाव पडला. आणि तिथे काँग्रेस भाजपच्या पुढे दिसत आहे. एक कारण असेही देण्यात आले की, जर हिमंत बिस्वा सरमा हे सर्वानंदऐवजी आसामचे मुख्यमंत्री असते तर भाजपाने पुन्हा निवडणूक जिंकणे सोपे झाले असते.

मात्र, नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला आसाममध्ये सत्ता राखण्यात यश येणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. अर्थात, हा विजय मुख्यमंत्री सर्वानंद यांची प्रतिष्ठा वाढवणारा असले. सोबतच जर पुन्हा सत्ता आली तर भाजपचे 'ईशान्येकडील अमित शहा' म्हणून ओळखले जाणारे हिंमत बिस्व सरमा यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आसाममधील स्थानिक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. त्यांच्या मते, सर्वानंद हे पंतप्रधान मोदींचे विश्वासार्ह आहेत आणि हिमंत हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपचा विजय झाल्यास केवळ स्वच्छ प्रतिमा असलेले सर्वानंद मुख्यमंत्री होतील, असे दिसून येत आहे.

कैलास विजयवर्गीय: बंगालमध्ये भाजपचा विजय असो किंवा पराभव पक्षात यांचे महत्त्व वाढेल
कैलास विजयवर्गीय यांनी मागील काही वर्षांत बंगालमध्ये बरीच कामे केली आहेत, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांचे काम असो, संघटना बळकट करणे असो किंवा टीएमसीचे आमदार फोडणे असो, त्यांनी या सर्वांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंगालचे पत्रकार प्रभाकर मणि तिवारी म्हणतात की, जर भाजपाने बंगालचा गड राखला तर पक्षात त्यांचे वजन वाढेल. तज्ज्ञांचा मते, अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या मूळ राज्यात मध्य प्रदेशात मोठी भूमिका हवी असेल. परंतु, भाजप बहुमतापासून दूर राहिला तरी पक्षाला त्यांच्या कामाचे महत्त्व समजेल.

बातम्या आणखी आहेत...