आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee MK Stalin Oath Taking Ceremony Update; Bengal CM Will Meet Governor Today; News And Live Updates

या आठवड्यात 5 राज्यांतील सरकार स्थापन होणार:ममता बॅनर्जी आज बंगालमध्ये राज्यपालांची भेट घेणार; तामिळनाडूमध्ये स्टालिन यांनी आमदारांची बैठक बोलावली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे भाजप मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना संधी देणार की हेमंत बिस्वा यांना यावर अजून सस्पेंस कायम आहे.

देशात काल 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. दरम्यान, यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या आठवड्याअखेर पाच ही राज्यांत सरकार स्थापन केले जाणार असल्याची चर्चा वर्तवली जात आहे. रविवारी आलेल्या निकाल्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाममध्ये भाजप, तामिळनाडूमध्ये डीएमके, केरळमध्ये कम्युनिस्ट आणि पुडुचेरीत एनडीएकडून सरकार स्थापन केले जाणार आहे. दरम्यान, कोणत्या राज्यांत कोणाचे सरकार हे स्थापन होईल हे आपण समजून घेऊया...

पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी संध्याकाळी 7 वाजता राज्यपालांची भेट घेणार
रविवारी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसला 214 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, नंदीग्राम मतदार संघातून ममता बॅनर्जी यांना पराभव स्विकारावा लागला आहे. परंतु, टिएमसीजवळ बहूमत असल्याने त्यांचे सरकार स्थापन होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी याबाबतीत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण ममता यांनी यासाठी राज्यापालांचा वेळदेखील मागितला आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास 66 वर्षीय ममता बॅनर्जी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तथापि, त्यांना पुन्हा एका जागेवरुन निवडणूक घ्यावी लागू शकते. यापूर्वी ममता यांनी 20 मे 2011 रोजी प्रथम तर 27 मे 2016 रोजी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

तामिळनाडू: एमके स्टालिन 7 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील

विधानसभेच्या निवडणुकीत एमके स्टालिन यांच्या द्रविड मुनेत्र कळगम (द्रमुक) पक्षाने 234 पैकी 130 जागा जिंकल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत युतीने आतापर्यंत 156 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठीचा बहूमत डीएमके जवळ आहे. पक्षाचे सरचिटणीस दुराई मुरुगन यांच्या मते, आज संध्याकाळी 6 वाजता चेन्नईतील पक्ष मुख्यालय अण्णा अरिवलयम येथे एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीत द्रमुकचे आमदार एमके स्टालिन यांची अधिकृतपणे मुख्यमंत्री म्हणून निवड करतील. विशेष म्हणजे यामध्ये आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तयार करण्यात येणार असून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एमके स्टालिन 7 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

आसाम : मुख्यमंत्री पदावर सस्पेंस; सोनोवाल की बिस्वा
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला आहे. परंतु, येथे सध्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही आहे. कारण सध्या राज्यात दोन महत्वाचे चेहरे असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे भाजप मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना संधी देणार की हेमंत बिस्वा यांना यावर अजून सस्पेंस कायम आहे. दरम्यान, हेमंत बिस्वा यांनी काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री पद न मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु, एवढे मात्र नक्की पक्ष यापैकी एकाला उपमुख्यमंत्री पद देऊ शकते.

दरम्यान, 126 विधानसभेच्या जागा असलेल्या आसाममध्ये यावेळी आसाममध्ये भाजपा आघाडीला 75 जागा मिळाल्या असून म्हणजे 2016 च्या तुलनेत एक जागा जास्त मिळाली आहे. तर दुसरीकडे, कॉंग्रेसला 50 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) यांच्यासमवेत निवडणूक लढविली होती. तर कॉंग्रेसने एआययूडीएफ, बीपीएफ, सीपीआय (एम), सीपीआय, सीपीआय (एमएल), एजीएम आणि आरजेडी यांच्या सहकार्याने आपले उमेदवार उभे केले होते.

बातम्या आणखी आहेत...