आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TMC's Land Is Slipping Here, The Issue Of Polarization Is In BJP's Favor; People Say Nothing Is Done Without A Catastrophe; News And Live Updates

पुर्व वर्धमानच्या 8 जागांवरील अवहाल:धुव्रीकरणाचा मुद्दा भाजपच्या पारड्यात; टीएमसीची बाजू कमजोर, लोक म्हणतात - पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही

पुर्व वर्धमान9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगाल निवडणूकीमध्ये या जागांवर बाउरी समाज यापूर्वी टीएमसी पक्षाला मतदान करीत असे.

देशात सध्या पश्चिम बंगालसह इतर राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील पुर्व वर्धमानच्या 8 जागांवर येत्या 25 एप्रिलला मतदान होणार आहे. पुर्व वर्धमानच्या 8 जागांमध्ये खंडाघोष, वर्धमान दक्षिण, रैना, जमालपूर, मन्तेश्वर, कळना, मेमारी आणि वर्धमान उत्तर अश्या आठ मतदारसंघाचा समावेश होता. एकेकाळी ही क्षेत्र टीएमसीचे बालेकिल्ला मानला जायचा. परंतु, आता टीएमसीच्या स्थानिक नेत्यांच्या भष्ट्राचारामुळे येथील लोक त्रस्त झाले आहे. त्यामुळे येथे भाजप टीएमसी पक्षाला जोरदार टक्कर देऊ शकते. मन्तेश्वर येथील देवव्रत रॉय म्हणतात की, 'कोनो ऐमोन काज नेई जेटा बिना काटमनी दिए होये' (पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही). त्यामुळे या आठ मतदार संघातील लोक पर्याय भाजपाला स्विकारु शकतात.

या निवडणूकी बाउरी समाज भाजपसोबत
पश्चिम बंगाल निवडणूकीमध्ये या जागांवर बाउरी समाज यापूर्वी टीएमसी पक्षाला मतदान करीत असे. परंतु, आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर जाऊन काम केल्यामुळे याचा फायदा भाजपला मिळणार आहे. विशेष म्हणजे टीएमसीमधून भाजपमध्ये आलेल्या मुकुल रॉय यांचा मागासवर्गीय समाजात प्रवेश करण्यात मोठी भूमिका होती. त्यांना टीएमसीची शक्ती आणि अभाव माहित असल्यामुळे ही जमेची बाजू असणार आहे.

भाजपला या गोष्टींचा फायदा मिळणार
या निवडणूकीत भाजपला जिंकण्यासाठी तीन फॅक्टर महत्वाचे मानले जात आहे. यामध्ये एक टीएमसी पक्षातील नेत्यांच्या विरोधातील नाराजगी, हिन्दू-मुस्लिम धुव्रीकरण आणि भाजप पक्षाची एक संधी देण्याची मागणी हे तीन मुद्द्यांवर ही निवडणूक होऊ शकते. आणि याचा फायदा भाजपला मिळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...