आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल विधानसभा 2021:मतुआबहुल ठाकूरनगर मतदारसंघात नेत्यांच्या बंडखोरीमुळे भाजपची हानी, मतांची विभागणी; सुब्रत यांना तिकीट दिल्याने स्थानिक नेते दूर

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नॉर्थ-24 परगणाच्या 17 मतदारसंघांतून रिपोर्ट, 22 एप्रिलला मतदान होणार

मतुआ समुदायाचा गड मानल्या जाणाऱ्या ठाकूरनगरमध्ये सुब्रत ठाकूर यांना तिकीट दिल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंड केले आहे. आपल्याला तिकीट मिळावे असे या नेत्यांना वाटत होते. बनगावच्या माजी खासदार ममता ठाकूर म्हणाल्या, आसाममध्ये १९ लाख लोकांना छावण्यांत ठेवण्यात आले आहे. लोकसभेतील विजयानंतर मतुआ समुदायाला नागरिकत्व मिळालेले नाही. लोक आता भाजपला मतदान करणार नाही.

नॉर्थ-२४ परगणा व दक्षिण-२४ परगणा हे पश्चिम बंगालमधील दोन महत्त्वाचे जिल्हे. सरकार ठरवणारे दोन मतदारसंघ अशी त्यांची आेळख. या भागातील विजयामुळे बंगालच्या सत्तेचा मार्ग प्रशस्त होतो. कारण या दोन्ही जिल्ह्यांत विधानसभेच्या ६४ जागा आहेत. तृणमूलने २०१६ मध्ये नॉर्थ-२४ परगणाच्या ३३ पैकी २७ जागी विजय मिळवला होता. त्यामुळे तृणमूलला मोठी आघाडी मिळाली होती. परंतु यंदा भाजपने तृणमूलच्या वाटेत अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. २२ एप्रिलला सहाव्या टप्प्यात नॉर्थ-२४ परगणाच्या १७ जागांवर मतदान होणार आहे. तेथे तृणमूल-भाजप यांच्यात आरपारची लढाई होणार आहे. कारण मतुआ मतदार भाजप व तृणमूलमध्ये विभागले गेले आहेत. नॉर्थ-२४ परगणामध्ये मतुआ समुदायाची लोकसंख्या तीन कोटीतत आहे. १ कोटी ८० लाख मतदार आहेत. मतुआ समाज एस्सी वर्गात समाविष्ट होतो.

हा समाज पाठीशी राहावा यासाठी खूप प्रयत्न केले जातात. काही दिवसांपूर्वी मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी मतुआ महासंघाचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. मतुआ मतदारांचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजपने सीएए कार्डही खेळले. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सीएए लागू करून समुदायाला स्थायी नागरिकत्व दिले जाईल, असे जाहीर केले आहे. सर्व प्रकारची कागदपत्रे असताना नागरिकत्वाची गरज काय, असा प्रश्न तृणमूले केला आहे. मतुआबहुल बनगाव लोकसभेत येणाऱ्या गायघाट मतदारसंघातून भाजपने बनगावचे खासदार शांतनू ठाकूर यांचे बंधू सुब्रत ठाकूर यांना मैदानात उतरवले. कारण ठाकूर कुटुंबीय स्वत:देखील मतुआ समुदायातून येतात.

बातम्या आणखी आहेत...