आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal CM Mamata Banerjee । Allegs BJP Over Nandigram Defeat । Governor Congratulates And Suddenly Everything Changed; News And Live Udpates

ममतांचा मोठा गौप्यस्फोट:नंदीग्रामच्या रिटर्निंग ऑफिसरने जीवे मारण्याच्या भीतीपोटी केली नाही फेरमोजणी; राज्यपालांनी विजयाबद्दल केले होते अभिनंदन

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 मे ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी 214 जागेवर विजय मिळवला. परंतु, त्यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांना एकेकाळचे तृणमूलचे सेनापती व भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी 1956 मतांनी पराभूत केले आहे. तथापि निकालामध्ये रात्री उशिरापर्यंत आघाडी-पिछाडी सुरू होती. अखेर रात्री 11.30 वाजता ममतांच्या पराभवाची अधिकृत घोषणा झाली. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सोमवारी भाजपवर मोठे गौप्यस्फोट केले आहे. दरम्यान, त्यांनी 'माझ्या पराभवाच्या मागे मोठे रहस्य दडलेले असून माझा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांच्या मते, मतमोजणीदरम्यान नंदीग्राम येथील रिटर्निंग ऑफिसर घाबरलेले असून त्यांनी फेरमोजणी करायला नकार दिल्याचे ते म्हणाल्या. त्यांनी भाजपवर गौप्यस्फोट करत म्हणाल्या की, जर अधिकार्‍यांना फेरमोजणी केली असती तर त्यांना जीवे मारले गेले असते. नंदीग्राम येथील मतमोजणीवर शंका उपस्थित करत त्या म्हणाल्या की, मतमोजणी केंद्रावर 4 तासांकरीता सर्वर बंद होते. यादरम्यान, राज्यपालांनीदेखील अभिनंदन केले होते.

5 मे ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ममता बॅनर्जी
रविवारी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसला 214 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, त्या 5 मे रोजी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. विशेष म्हणजे 66 वर्षीय ममता बॅनर्जी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तथापि, त्यांना पुन्हा एका जागेवरुन निवडणूक घ्यावी लागू शकते. यापूर्वी ममता यांनी 20 मे 2011 रोजी प्रथम तर 27 मे 2016 रोजी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

2024 मध्ये विरोधकांचे नेतृत्व करण्याचे संकेत
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमचा पक्ष सर्व प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करत असून तरीदेखील भाजपने जुन्या दंगलीचे फोटो पसरवून आमची बदनामी सुरुच ठेवली. दरम्यान, टिएमसीने बहुमताने निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा विजय साजरा केला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, मी एक स्ट्रीट फायटर आहे आणि माझ्याकडे लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. कोणीही एकट्याने काहीही करू शकत नाही. त्यामुळे 2024 मध्ये आम्ही एकत्र येत भाजपाचा नाश करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...