आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election 2021
  • West Bengal Election 2021 Phase 7 Polling LIVE Update; Mamata Banerjee TMC BJP Party | Vidhan Sabha Voting Percentage Latest News Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान:कोरोनामध्ये 5 जिल्ह्यातील 36 जागांवर मतदान सुरु; 37 महिलांसह 288 उमेदवार रिंगणात

कोलकाता12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोलकातामध्ये तपासणी करणारी प्रत्येकी दुसरी व्यक्ती बाधित

पश्चिम बंगालमध्ये सध्या सातव्या टप्प्यातील निवडणूक सुरु आहे. दरम्यान, येथे 5 जिल्ह्यातील 36 जागांवर मतदान होणार असून यामध्ये 37 महिलांसह 288 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे. निवडणूकीची सुरुवात सकाळी सात वाजेपासून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे देशात मोठ्या प्रमाणात संसर्गाचा उद्रेक निर्माण झाला आहे. समोर आलेल्या एका अवहालानुसार, राजधानी कोलकातामध्ये आरटीपीसीआर तपासणी करणारा प्रत्येकी दुसरा व्यक्ती महामारीने बाधित आढळून येत आहे. उर्वरित राज्यांत प्रत्येकी चारपैकी एक नमूना पॉझिटिव्ह आढळून येत आहे.

सातव्या टप्प्यातील ही निवडणूक 5 जिल्ह्यात होणार आहे. यामध्ये दक्षिण दीनापूर आणि मालदा जिल्ह्यातील 6-6, मुर्शिदाबादमधील 11, कोलकाता 4 आणि बर्दवानमधील 9 विधानसभा जागांचा समावेश आहे. राज्यातील आठवी आणि शेवटच्या टप्प्यातील विधानसभेची निवडणूक 35 जागांवर 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याचा निकाल 2 मे रोजी येईल.

कोलकातामध्ये तपासणी करणारी प्रत्येकी दुसरी व्यक्ती बाधित
संपूर्ण देशात कोरोनाची भयंकर लाट आहे. पश्चिम बंगालमधील स्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. राजधानी कोलकातामध्ये आरटीपीसीआर तपासणी करणारा प्रत्येकी दुसरा व्यक्ती महामारीने बाधित आढळून येत आहे. उर्वरित राज्यांत प्रत्येकी चारपैकी एक नमूना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. हे प्रमाण एका महिन्यात पाचपटीने वाढले आहे. कोलकाता व परिसरातील प्रयोगशाळांतील आकडे 45 टक्के 55 टक्के पॉझिटिव्हिटी रेट सांगू लागल्या आहेत. राज्यातील दुसऱ्या भागात हे प्रमाण सुमारे 24 टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...