आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Elections Violence; Election Commission Postponed Chunav In Two Seats In Bengal And One In Odisha; News And Live Updates

बंगालमध्ये राजकीय हिंसाचार:राज्यात भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला, 9 ठार; गृह मंत्रालयाने मागितला अहवाल; उद्या जेपी नड्डा पश्चिम बंगाल दौर्‍यावर

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भाटपाडा येथे भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली

देशातील पश्चिम बंगालसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी लागले. दरम्यान, राज्यात तृणमूल काँग्रेसने 214 जागा जिंकत विजय मिळवला. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. विशेष म्हणजे निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजपा कार्यालयाला आग लावण्यात आली होती. तर सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर येत आहे.

त्यामुळे संबंधित प्रकरणात केंद्रिय गृहमंत्रालयाने लक्ष घातला असून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याबाबत बंगाल सरकारकडून अहवाल मागविला आहे. दुसरीकडे, भाजप नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांवरील हा हल्ला ममता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दरम्यान, उद्या मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पश्चिम बंगाल दौर्‍यावर आहेत.

राज्यात सध्या भीतीचे वातावरण - दिलीप घोष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दावा केला आहे की, राज्यातील निकालानंतर गेल्या चोवीस तासांत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, राज्यात सध्या भीतीचे वातावरण असून सत्ताधारी पक्ष हातजोडून बसलेला आहे. पोलिस यंत्रणादेखील मदत करण्यास तयार नसल्याचे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, आम्ही संबंधित प्रकरणासाठी राज्यपालांची भेट घेतली असून त्यांनी आम्हाला कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.

संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. दरम्यान, यामध्ये काही लोक विजयाचा आनंद साजरा करत एका घरात घुसून तोडफोड करत असल्याचे दिसत आहे.

भाजप कार्यालयावर हल्ला

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भाटपाडा येथे काही लोकांकडून भाजपच्या कार्यालयात आणि काही दुकानांवर हल्ला करत तोडफोड केली आहे. दरम्यान, एका व्यक्तीने सांगितले की, यावेळी बॉम्बही टाकण्यात आले असून टीएमसीच्या बदमाश्यांनी माझे दुकान लुटले आहे. येथे किमान 10 बॉम्ब टाकण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले. कूचबिहारमधील सीतलकुचीतून ही हिंसाचाराची घटना समोर येत आहे. तर दुसरीकडे, नंदीग्राममध्ये भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून हळदियात रविवारी सायंकाळी काही बदमाशांनी माध्यमांना प्रतिनिधींना मारहाण केली आहे.

राज्यपालांनी पोलिस अधिकर्‍यांकडून जाब विचारला
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्यातील जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता सोमवारी पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि कोलकाता पोलिस आयुक्तांना कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. राज्यात निकालानंतर होत असलेल्या हत्या धोकादायक परिस्थितीचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पोलिस अधिकार्‍यांना कायद्याचे राज्य पुनर्संचयित करण्यासाठी सर्व पावले उचलण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...