आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक:22 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला भोपळा, आदिवासी बालेकिल्लाही उद्ध्वस्त

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

{प्रथमच आदिवासी जागांवर काँग्रेसचा सफाया : आपची आदिवासी भागांत काँग्रेसच्या व्होट बँकेत घुसखोरी. त्यांनी १ जागा जिंकली. भाजप २३ व काँग्रेसने ३ जिंकल्या. २०१७ मध्ये काँग्रेस १५, भाजपने ९ जिंकल्या होत्या.

{भाजपला ५७% एससी जागा अधिक : एससीच्या १३ जागांपैकी भाजप ११, काँग्रेसने ३ जिंकल्या. २०१७ मध्ये काँग्रेसने यापैकी ६, भाजपने ७ जिंकल्या. दलित, काँग्रेसी जिग्नेश मेवानी वडगाम मतदारसंघातून निवडून आले.

{सौराष्ट्रने पुन्हा केले चकित : सौराष्ट्रात भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. गेल्या वेळी भाजपने सौराष्ट्र-कच्छ भागात २३ आणि काँग्रेसने ३० जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपने विक्रमी ४६ जागा जिंकल्या. काँग्रेसने आपला बालेकिल्ला उत्तर गुजरात गमावला. त्यांना ९ जागांचे नुकसान झाले. म्हणजे काँग्रेसने सर्व बालेकिल्ले गमावले. काँग्रेस ३३ पैकी २२ जिल्ह्यांत खातेही उघडू शकली नाही.

{पाटीदारबहुल भागांत मोठा बदल : भाजपने पाटीदार समुदायाचा दबदबा असलेल्या ६१ पैकी ५५ जागा जिंकल्या. आपच्या ५ उमेदवारांपैकी २ पाटीदार होते, पण आपकडून लढलेले पाटीदार समुदायाचे तीन मोठे चेहरे अल्पेश कथीरिया, गोपाल इटालिया व धार्मिक मालविया पराभूत झाले. ओबीसी चेहरा सीएम उमेदवार इशुदान गढवीही पराभूत झाले.तिकीट वाटपात भाजपचे जातीय समीकरण अचूक पक्ष पटेल ओबीसी दलित आदिवासी इतर भाजप ४१/४८ ४८/५७ ११/१३ २३/२७ ३३/३७ काँग्रेस+ ३/४१ ३/४९ २/१४ ३/२८ ६/५० जिंकले/तिकीट दिले

बातम्या आणखी आहेत...