आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातची छाती आता 156:भाजपचा सर्वात मोठा विजय, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणे कठीण, वाचा निकालाची 5 वैशिष्ट्ये

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये भाजपने इतिहास रचला. ब्रँड मोदींच्या प्रभावामुळे भाजपने १८२ पैकी १५६ (८६%) जागा जिंकल्या. राज्याच्या ६२ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाने एवढा प्रचंड विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधात रोष (अँटी इन्कबन्सी) दिसला नाही. कारण भाजपने गत निवडणुकीत जिंकलेल्या ९२ जागाही यंदा पुन्हा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष फक्त १७ ठिकाणी जिंकू शकला. १० टक्केही जागा मिळाल्या नसल्याने काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळणेही अवघड आहे. आपने केवळ ५ जागा जिंकल्या मात्र त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळेल. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात सत्तांतराची परंपरा यंदाही कायम राहिली. काँग्रेसने ६८ पैकी ४० जागा जिंकून भाजपकडून सत्ता खेचून घेतली.

निकालाची 5 वैशिष्ट्ये

प्रथमच : भाजपने एखाद्या राज्यात 86% जागा जिंकल्या. 2013 मध्ये राजस्थानात 82% जिंकल्या होत्या.

प्रचंड विजय : भाजपचा सर्वात मोठा विजय, 7 वेळा जिंकणारा दुसरा पक्ष, बंगालमध्ये डावे पक्ष 8 वेळा जिंकले होते.

डबल धमाका : भाजपला काँग्रेसपेक्षा दुप्पट मते, सत्ताधारी - विरोधी पक्षात देशात सर्वात मोठे अंतर.

मुस्लिम जोडले : 19 पैकी 15 मुस्लिमबहुल जागा जिंकल्या. यापैकी 6 जागा कधीही जिंकल्या नव्हत्या.

...अन् हिमाचल : भाजपची 6% मते घटल्याने डाव उलटला; 2% काँग्रेस, 4% आप, भाजपचे बंडखोर विजयी

विक्रमी जनादेशासमोर नतमस्तक

तरुणांना भाजपचे विकासाचे राजकारण हवे आहे. जातीयवाद, घराणेशाहीला तरुण भीक घालत नाहीत. केवळ विकास आणि विजयाने तरुणांचे मन जिंकता येते. भाजपकडे विजय आणि विकास दोन्हीही आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भाजपची मतपेढी स्थिर, विराेधकांची मते विभागली

भाजपने मागील निवडणुकीपेक्षा 2.5% अधिक मते अन् 57 जागा जास्त जिंकल्या. निकालात दिसते की भाजपची मतपेढी स्थिर राहिली, तर विराेधकांच्या मतांची विभागणी झाली. सौराष्ट्र व दक्षिण गुजरातेत आपने काँग्रेसला भगदाड पाडले. याच भागात आपला सर्वाधिक मते मिळाली.

  • काँग्रेसने इंदिरा गांधींच्या नावावर १९६६ ते ७७ व १९८० ते ८४ दरम्यान १४ राज्यांत ८३ निवडणुका लढवल्या. ४४ जिंकल्या. इंदिरांचा स्ट्राइक रेट ५३%
  • भाजपने २००२ पासून आतापर्यंत मोदींच्या नावावर ५७ निवडणुका लढवल्या, एनडीएच्या ५ विजयांसह ३२ जिंकल्या. मोदींचा स्ट्राइक रेट ५६%
बातम्या आणखी आहेत...