आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात कुणाचा, निर्णय आज:भूपेंद्र यांच्यासह 8 मंत्र्यांचे भवितव्य ठरणार; 93 जागांपैकी 39 वर 10 वर्षांपासून एकसारखा कौल

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०१७ : १८ जागी २ % हून कमी फरकाने हार-जीत

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यांत ९३ जागांवर सोमवारी मतदान होईल. ८३३ उमेदवारांमध्ये ६९ महिला आहेत. भाजपकडून ८, काँग्रेस-७ व आपकडून एक महिला उमेदवार आहे. २१ अपक्ष महिलाही आहेत. २०१७ मध्ये या ९३ जागांपैकी ३६ वर जय-पराजयातील अंतर ५ टक्क्यांहून कमी होते. त्यात भाजप व काँग्रेसला प्रत्येकी १७ व दोन अपक्ष विजयी झाले होते. त्यात २ टक्के अपक्षांना मिळाल्या होत्या. २ टक्क्यांहून कमी फरक असलेल्या १८ जागा होत्या. भाजप-१०, काँग्रेस-९ व अन्य १ होते.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादेत दाखल झाले. आई हिराबा यांची त्यांनी भेट घेतली. मोदींनी २ महिन्यांत राज्यात ६१ कार्यक्रम केले. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ३१ जाहीर सभा, ४ रोड-शो केले. त्यादरम्यान १३५ बैठकांनाही हजेरी लावली. दुसऱ्या टप्प्यात भूपेंद्र पटेल, ८ मंत्री, ६० आमदार, आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेले हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी मैदानात आहेत. गेल्या वर्षीच्या विश्लेषणानुसार ९३ पैकी ३९ वर निकालाचा कौल सारखाच होता. म्हणजेच एकाच पक्षाची सत्ता राहिली. २५ वर भाजप व १४ वर काँग्रेसचा विजय होत आला आहे. मात्र उर्वरित ५४ जागांवरील निकालात नेहमी बदल दिसून येतो.

आंदोलनानंतर १ जागा गेली..

पहिल्या टप्प्यात कमी मतदानानंतर सोमवारी उत्तर गुजरातच्या ३२ व मध्य-पूर्वेतील ६१ जागी मतदान होईल. २०१७ मध्ये दोन्ही क्षेत्रांत ७०.७६ टक्के मतदान झाले . अनेक आंदोलनानंतरही भाजपने २०१२ च्या तुलनेत केवळ १ जागा गमावली.

भाजपचा गड, २००२ पासून १९ जागांवर सलग विजय

भाजप २००२ पासून अजिंक्य - असारवा, दसक्रोई, एलिसब्रिज, मणिनगर, नरोडा, साबरमती, डभोई, हलोल, इडर,जेतपूर, खेरालू, मातर, मेहसाणा, नडियाद, रावपुरा, सयाजीगंज, शहेरा, वाघोडिया, विसनगर.

दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यांत भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढत

उत्तर गुजरातच्या बनासकांठा, पाटन, मेहसाणा, साबरकांठा, अरावल्ली, गांधीनगरमध्ये काँग्रेस २०१७, २०१२ मध्ये १७ जागा जिंकल्या. भाजपने २०१२ मध्ये १५ तर २०१७ मध्ये १४ जागा जिंकल्या होत्या.

यंदा १३ आदिवासी जागांवर थेट लढत वर्ष जागा टर्नआऊट भाजप काँग्रेस इतर 2012 13 70.51% 3 10 - 2017 13 67.85% 4 8 1

{काँग्रेस या ५ जागी 2002 पासून सलग विजयी - भिलोडा, बोरसद, दांता, खेडब्रह्मा व महुधा.

{मध्य गुजरातच्या दाहोद, पंचमहाल, महिसागर, छोटा उदेपूर हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...