आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर जामनगरमधून रिवाबा जडेजा विजयी:आमदारकीबरोबरच मंत्रीपदाची माळ देखील गळ्यात पडण्याची शक्यता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर जामनगर विधानसभा मतदार संघ या वेळी जास्तच चर्चेत होता. भाजपने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली होती. रिबावा रवींद्र जडेजा आता विजयी झाल्या आहेत. त्यांनी 55,341 मते मिळवत आप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा परभव केला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 24,008 मते मिळाली.

त्यामुळे रिवाबा जडेज्या यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे. याबरोबरच सरकार स्थापनेत त्यांना मंत्रिपदाची ऑफर देखील दिली जाऊ शकते. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात रिवाबा यांनी विजय खेचून आणला.

रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. पंतप्रधानांनी त्यांचा दोघांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. पंतप्रधानांनी त्यांचा दोघांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

राजकारणात प्रवेश

नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी एकदा दिल्लीला गेलेल्या रिवाबा यांनी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदारकीची की, आमदारकीची निवडणूक लढवायची या संभ्रमात त्या आधी होत्या. असे असले तरी त्यांनी 2018 पासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मतदार संघातील अनेक कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग वाढवला होता.

फोन आला, मोदी-शहा तुम्हाला उमेदवार करू इच्छितात

एके दिवशी रिवाबा यांना गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांचा फोन आला. ते म्हणाले- मोदीजी आणि अमित शाहजी तुम्हाला उमेदवार म्हणून पाहू इच्छितात. तुम्ही तयारीला लागा. रिवाबाने सर्वप्रथम ही बाब पती रवींद्र जडेजा यांना सांगितली आणि निवडणूक लढवण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. वास्तविक त्यांच्या घरातूनच त्यांना भाजपमध्ये जाण्यास विरोध होता.

रवींद्र जडेजाची बहीण काँग्रेसमध्ये

रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयना जडेजा काँग्रेसमध्ये आहेत. जामनगर उत्तरमधून त्या काँग्रेसच्या तिकीटाच्या दावेदार होत्या, पण पक्षाने बिपेंद्रसिंग जडेजा यांना तिकीट दिले. तरी देखील नयना यांनी बिपेंद्र सिंग यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळे जडेजा यांच्या घरातूनच दोन वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार करण्यात येत होता.

रिवाबा या आपल्या फिटनेस बाबत नेहमीच जागृत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी योगा आणि सायकलीचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत.
रिवाबा या आपल्या फिटनेस बाबत नेहमीच जागृत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी योगा आणि सायकलीचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...