आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक 2022:दक्षिणेतील भडाेच क्षेत्र : इथे नर्मदा माता सागराला मिळते

नवनीत गुर्जर | नॅशनल एडिटर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दक्षिण गुजरातमधील उर्वरित भागात फेरफटका मारूया. हा भाग वडाेदरानंतर नर्मदेपलीकडे आहे. तिकडे दाेन जिल्हे आहेत. मध्य प्रदेशवासीयांची नर्मदा माता भडोचमध्ये सागराला मिळते. अलाहाबादमध्ये संगमावर नदीचे पाणी वेगवेगळे दिसते. तसे येथे दिसत नाही. परंतु नर्मदा माता येथे ओझरती हाेत असल्याचे दिसते. नदीच्या किनाऱ्याला भाडभूत म्हटले जाते. येथे मध्यभागी जाणे अतिशय कठीण काम आहे.

समुद्रात भरती येते तेव्हा बाेट अडकू शकते. नर्मदा परिक्रमा करणारे इथूनच बाेटेने नदी पार करतात. त्यानंतर दुसऱ्या तीरावरून चालू लागतात. एक गाेष्ट खरी आहे. गुजरातमध्ये नर्मदेच्या पाण्याचा वापर झाला तसा मध्य प्रदेशात झालेला नाही. बहुतांश शहरात पिण्यासाठी नर्मदेचे पाणी, नहरी अतिशय रुंद आणि खाेल आहेत. ते पाहून वाटते, एका नर्मदेतून अनेक नर्मदा निघाल्या असाव्यात. असाे. भडोच जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. जम्बुसर, भरूच, वागरा, अंकलेश्वर, झगडिया. भरूच शहर व आैद्याेगिक क्षेत्र अंकलेश्वरसह तीन जागा भाजपच्या ताब्यात आहेत. जम्बुसर येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. झगडिया आदिवासी क्षेत्र आहे. येथे आदिवासी नेते छाेटू वसावाचे साम्राज्य आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या पक्षाचे नाव बीटीपी आहे. भारतीय ट्रायबल पार्टी. बीटीपीच्या गेल्या वेळी दाेन जागा हाेत्या. झगडिया व नर्मदा जिल्ह्यातील डेड्यापाडा. छाेटू भाईचा वसावाचा मुलगा महेश वसावा डेड्यापाडाचा आमदार आहे. यंदा येथे एक रंजक किस्सा घडला. महेश वसावा यांचा मित्र चैतरने अर्ज दाखल केला आहे. महेश यांच्या विजयात चैतर यांचा सिंहाचा वाटा हाेता. त्यामुळे यंदा महेश ही जागा लढवणार नाहीत. त्यांनी अर्ज मागे घेतला. ते आता वडिलांसाठी प्रचार करत आहेत. नांदाेद काँग्रेसकडे आहे. या दाेन्ही जागा राखीव आहेत. आदिवासीबहुल आहेत.

भडोच व अंकलेश्वर भाजपच्या पारंपरिक जागा आहेत. परंतु वागराबद्दल तूर्त नक्की काही सांगता येत नाही. जम्बुसरमध्ये काँग्रेस नेते मगन साेलंकी यांचे कुटुंबीय संजय साेलंकी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांचा मतदारसंघात प्रभावही चांगला दिसताे. गुजरातमध्ये आपला काेणती जागा मिळाे न मिळाे, परंतु डेड्यापाडामध्ये चैतरचा विजय निश्चित मानला जाताे. इतर काेणत्याही मतदारसंघात आपबद्दल एवढ्या ठामपणे सांगता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...