आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार विजयी झाले आहेत. काँग्रेसने 6 जागा जिंकल्या असून 127 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 3 जागा जिंकल्या असून 3 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 22 जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, “काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. भाजपने कोट्यवधी रुपये खर्च केल्यास ऑपरेशन लोटस होऊ शकते पण कर्नाटकात कोणी सिंधिया नाहीत. कर्नाटकात तगडे काँग्रेसवाले आहेत."
या देशाला प्रेम आवडते - राहुल गांधी
कर्नाटक निवडणुकीचे निकाल पाहून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मीडियाला संबोधित करताना म्हणाले, “कर्नाटकमध्ये द्वेषाचा बाजार बंद झाला आहे, प्रेमाचे दुकान उघडले आहे. गरीब जनतेने भांडवलशाही सत्तेचा पराभव केला. काँग्रेस पक्ष कर्नाटकातील गरिबांच्या पाठीशी उभा राहिला. ही लढाई आम्ही प्रेमाने लढलो. या देशाला प्रेम आवडते हे कर्नाटकने दाखवून दिले."
राहुल गांधी होऊ शकतात पंतप्रधान - सिद्धरामय्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीचा निकाल हा लोकसभा निवडणुकीची पायरी आहे. मला आशा आहे की, सर्व बिगर भाजप पक्ष एकत्र येतील. मला आशा आहे की राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनतील. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, “काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. काँग्रेसला जवळपास 130 जागा मिळतील, असेही आम्ही प्रचारादरम्यान सांगितले होते. हा मोठा विजय आहे. कर्नाटकातील जनतेला बदल हवा होता. ते भाजप सरकारला कंटाळले आहेत.
कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार विजयानंतर म्हणाले, “मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना श्रेय देतो ज्यांनी खूप कष्ट केले, लोकांनी खोटे उघड केले. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना विजयाची खात्री दिली होती. सोनिया गांधी तुरुंगात मला भेटायला आल्या तेव्हा मी विसरू शकत नाही, मी पदावर राहण्याऐवजी तुरुंगातच राहणे पसंत केले, पक्षाचा माझ्यावर इतका विश्वास होता."
संबंधित वृत्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.