आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहाला उधाण:निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये जल्लोष सुरू, कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा डान्स

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झाल्यानंतर शनिवारी (13 मे) 36 केंद्रांवर मतमोजणी सुरू झाली. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत दाखवले जात आहे किंवा तो सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, निकालापूर्वीच दिल्लीतून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात ढोल-ताशे वाजवून जल्लोष सुरू असल्याचे दिसत आहे.

कर्नाटक विधानसभा निकालाचे संपूर्ण कव्हरेज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेस नेत्यांचा मोठ्या विजयाचा दावा

कर्नाटकात निकाल यायला अजून वेळ आहे, पण दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू झाला आहे. काँग्रेसचे अनेक नेतेही मोठ्या विजयाचा दावा करत आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र म्हणाले, “आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि आमचे सरकार स्थापन होईल. आम्हाला विश्वास आहे आणि सर्व सर्वेक्षणांनी असे दाखवले आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जिंकणार आहे.

सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस पुढे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजप दुसऱ्या, तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

काय सांगतात एक्झिट पोल?

इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. एक्झिट पोलनुसार या निवडणुकीत काँग्रेसला 122-140, भाजपला 62-80, जेडीएसला 20-25, अपक्षांना 0-3 जागा मिळू शकतात. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्यात बहुमताचा दावा करत आहेत.

त्याचवेळी, ABP-सी व्होटर एक्झिट पोल त्रिशंकू विधानसभेची स्थिती दर्शवत आहे, काँग्रेस नक्कीच सर्वात मोठा पक्ष बनत आहे, परंतु बहुमतापासून दूर राहू शकते. एक्झिटने भाजपला 83-95, काँग्रेसला 100-112, जेडीएसला 21-29, इतरांना 2-6 जागा मिळाल्या आहेत.

संबंधित वृत्त्

सावधगिरी:घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितले

कर्नाटक विधानसभेचा निकाल लाइव्ह अपडेट्स :सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला