आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्खे भाऊ आमने-सामने:सोराबच्या जागेवर एका भावाने दुसऱ्या भावाचा केला पराभव, वडिलांकडून राजकीय वारसा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात एका भावाने दुसऱ्या भावाचा पराभव करत सोराब विधानसभेची जागा जिंकली आहे. या दोन भावांपैकी एक म्हणजे मुधू बंगारप्पा तर दुसरे कुमार बंगारप्पा. या निवडणुकीत मधु यांनी कुमार यांचा पराभव करून सोराब मतदार संघाची जागा जिंकली. यापूर्वी कुमार बंगारप्पा या जागेवरून आमदार होते.

कुमार बंगारप्पा यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. 2018 मध्येही जनतेने कुमार यांना निवडून दिले होते, परंतु यावेळी बाजी उलटली आणि मुध यांना जागा मिळवण्यात यश आले. 2018 च्या निवडणुकीत कुमार बंगारप्पा सुमारे 13,000 मतांनी विजयी झाले होते, तर 2004 मध्ये त्यांनी सुमारे 12,000 मतांनी विजय मिळवला होता.

भाऊ राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र

सोराब विधानसभा जागा शिमोग्गा जिल्ह्यात येते. या विधानसभा निवडणुकीत ही जागा अतिशय चर्चेत ठरली आहे. दोन भावांपैकी एक भाजपच्या तिकिटावर तर दुसरा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढला होता. दोन्ही भाऊ राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र आहेत.

2004 मध्ये पहिल्यांदाच एकमेकांसमोर

कुमार बंगारप्पा (INC) आणि मधु बंगारप्पा (भाजप) 2004 च्या निवडणुकीत प्रथमच एकमेकांविरुद्ध लढले. या निवडणुकीत कुमार 44,677 मते मिळवून विजयी झाले, तर मुध बंगारप्पा यांना 32,748 मते मिळाली. 2013 मध्ये जेव्हा मधु बंगारप्पा यांनी जेडीएसकडून निवडणूक लढवली आणि 58,541 मते मिळवून विजय मिळवला तेव्हा सोराबचे निवडणूक चित्र बदलले.

या निवडणुकीत KJP उमेदवार हरतालू हलप्पा यांना 37,316 मते मिळाली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या कुमार बंगारप्पा यांना 33,176 मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

वडिलांकडून मिळाला राजकीय वारसा

एस. बंगारप्पा मुख्यमंत्री असतानापासून या जागेवर बंगारप्पा कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यांना या जागेवर कधीही प्रचाराचीही गरज भासली नाही आणि ते निवडणूक जिंकायचे, असे सांगितले जाते. वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा आता त्यांची मुले पुढे चालवत आहेत. फरक एवढाच की दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पक्षात आहेत.